Books / Dhvani Vichara Naryan Govind Kalelkar

1. Dhvani Vichara Naryan Govind Kalelkar

Page 1

GOVERNMENT OF INDIA

ARCHÆOLOGICAL SURVEY OF INDIA

CENTRAL ARCHÆOLOGICAL LIBRARY

ACCESSION NO.6958

CALL No. 414/ kal

D.G.A. 79.

Page 2

DHVANI VICĀRA

By NARAYAN GOVIND KALELKAR, M.A., D.Litt. (Paris) Lecturer in French and Linguistics, Maharaja Sayajirao University, Baroda

6958 ARCHA OLOGICAL New Delbi

LIBRARY CENTRAL

414

POONA 1955

Page 3

Code No. : H 47 ,

First Edition : 1000 Copies, May 1955

Price Rs. 5

All Rights Reserved

CENIRAL ARCHAEOLA*',A LIBRARY, NEW DERIL Acc. No 69.58- Date. 1711.5.7. Call No.

Printed by S. R. SARDESAI, B.A., LL.B., at the Navin Sam.a.th Vidyalaya's Samarth Bharat Press, 41 Budhwar Pet't, Poona 2. Published by Dr. S. M. KATRE, for the Deccan Colleee Post- Graduate and Research Institute, Yeravda, Poona 6.

Page 4

अर्पण माझे गुरु श्री. झॅल ब्लॉक् यांच्या पुण्यस्मृतीस.

Page 6

अनुक्रमणिका

ऋमांक विषय पृष्ठ

Foreword ix

१. प्रस्तावना .- १-१२

२. उपोद्धात : ध्वनिविचाराचा इतिहास ३. प्रकरण १ लें : ध्वनिनिर्मिति ... ४. प्रकरण २ रें : ध्वनींचा भार्षेत उपयोग .. ३८

५. प्रकरण ३ रें : ध्वनिपरिवर्तन ... ६२ ६. प्रकरण ४ यें : ध्वनिपरिवर्तनाच्या प्रवुत्ती ... ८१ ७. प्रकरण ५ वें : ध्वनिपरिवर्तनाचा भाषेवर परिणाम ९३ ८. प्रकरण ६ वें : अनपेक्षित ध्वनिपरिवर्तन ... ११०

९. प्रकरण ७ वें : नव्या भाषा .. १२७ २०. प्रकरण ८ वें : भाषेचें दृश्य स्वरूप : लेखन १३९ ११. प्रकरण ९ वें : लिपीचीं मूलतत्वें आणि मराठीचें लेखन १५२ १२. प्रकरण १० वें : परिणामकारी ध्वनिविचार ... ६९

१३. टीपा : .* १८७

२४. सूचिपत्र १९१

Page 8

FOREWORD

At an Informal Conference of Linguists and Educa- tionists which the Deccan College sponsored in 1953 under a subvention received from the Rockefeller Foundation of New York, there was unanimous agree- ment regarding arrangements for proper teaching of Linguistics at Universities. The Conference further recommended that historical grammars of the principal Indian languages should be published in a uniform series and that translations into principal Indian lang- uages of the most important standard books on general and Indian linguistics written in foreign languages should be made available. While the Committee which was entrusted with the task of drafting the details of all these recommendations has made a number of very useful constructive plans, it is with real pleasure that I introduce this short Introduction to Phonetics byl Prof. N. G. KALELKAR. It is by no means a translation of any standard work on general linguistics written in a foreign language. It is a work of great originality presenting in Marathi the fundamental discipline of Phonetics and as such is a real contribution to the linguistic literature of the world. While a large number of linguistic treatises have appeared in Marathi, no linguistic scholar will dispute the fact that most of those were written without a proper scientific back -. ground. From that point of view, this is the first. scientific work in linguistics that is now being published in Marathi and it is a real privilege for me to introduce. it to the world of scholarship. Professor KALELKAR does not need any introduction to Marathi readers. His facility in expressing even the

Page 9

[x]

most abstruse ideas in telling phrases is well known. He combines a high degree of literary excellence with the scientific accuracy of a sensitive linguist trained in the Paris School under the direct tutelage of the late Professor JULES BLOCH. He has all the necessary quali- fications for presenting modern linguistic theory and practice in its most developed forms to students in India. The present work bears ample evidence of this scholarship and of the scientific attitude which is the hall-mark of the French School of Linguistics. It is a privilege for the Deccan College to inciude this short Introduction in Marathi to General Phonetics in its Hand-book Series in thus giving a practical shape to the recommendations made by the Standing Com- mittee of the Conference of Linguists and Educationists constituted in 1953. The Deccan College launches this programme of linguistic studies and training in favour- able circumstances. The response, which the first Winter School of Linguistics, held between 15th November to 24th December in 1954, evoked among scholars all over India, indicates the growing interest among University teachers and administrators. It is hoped that this pre- cursor of a large number of useful scientific Hand-books furthering the cause of linguistic studies in India will bring into realisation all the recommendations of the Conference referred to aboveand enable Universities and Governments to set up the necessary machinery for working out a new Linguistic Survey of India and Common Graded Vocabularies in each of the principal languages of India designed to ease inter-communication between the different linguistic communities.

9th April 1955 S. M. KATRE

Page 10

प्रस्तावना

एका विशिष्ट ध्वनिपरंपरेचा उपयोग करून प्रत्येक मानवसरमाज आपले व्यवहार करत असतो; या ध्वनिपरंपरेला भाषा असे नांव आहे. कालांतरानें इतर सामाजिक संस्थांप्रमाणे हे परंपरागत ध्वनीहि एका विशिष्ट क्षेत्रमयादेत एका निश्चित दिशेनें बदलतात; पण एकत्र व्यवहार करणान्या समाजांत ते सारख्या प्रमाणांत बदलत असल्यामुळें आणि ही बदलण्याची करिया अतिशय मंद गतीनें आणि नकळत ह्ोत अस्यामुळे समाजाचें जीवन कोणताहि अडथळा उत्पन्न न होतां अचाधितपणे चालूं राहतें. यावरून हैं दिसून येईल कीं, विचार व्यक्त करून व्यवहार चाल- विण्यासाठी उपयोगांत आणत्या जाणाऱ्या या भाषानामक सामाजिक संस्थेचा अभ्यास करायचा असेल, तर ज्या ध्वनींचा उपयोग भाषा करते, ते कसे उत्पन्न होतात आणि केव्हां, कुठें व कसे बदलतात, याचें ज्ञान आपण आर्धी करून घेतलें पाहिजे. शरीररचनेचें ज्ञान हा ज्याप्रमाणे वैद्यकशास्त्राचा, त्याचप्रमाणें ध्वनिज्ञान हा भाषाशास्त्राचा पाया आहे. पण गेल्या अनेक वर्षोपासून आपल्या देशांतील विद्यापीठांच्या शिक्षण- क्मांत भाषाशास्त्र या विषयाचा अंतर्माव केला गेलेला असूनहि या विषया- संबेधींच अज्ञान मुळीच कमी झालेलें नाहीं. या विषयावर मराठीत लिहिलीं गेलेलीं आणि विश्वविद्यालयानें शिफारस केलेलीं पुस्तकें पाहिली, म्हणजे भाषाशास्त्राचें ज्ञान या देशांतील लोकांना कधीतरी होईल की नाहीं, याची शंका वाटते, वर्षानुवषें विचारले जाणारे तेच ते प्रश्न पाहिल्यावर भाषाशास्त्राच्या परीक्षकांच्या ज्ञानाची परीक्षा झाल्यावांचुन रहात नाहीं. या शास्त्राच्या निरनिराळ्या शाखत्रांत पडलेली भर, एवढेंच काय पण ती भर टाकणारांची नांवें देखील ज्या देशांत अपरिचित आहेत, तेथें भाषा- विषयक अभ्यास व संशोधन यांचें भवितव्य फारसें उज्जवल असणें शक्य नाही, हैं उघड आहे.

Page 11

ध्वनिविचार

अशा परिस्थितींत एकदम भाषाविषयक प्रश्नांची चर्चा करण्याच्या भरीस न पडतां अथवा शब्दांच्या व्युत्पत्तीच्या प्रदेशांत पूर्व तयारीशिवाय पाऊल टाकण्याच्या भानगर्डीत न पडता, या शास्त्राच्या अम्यासाला पाया- पासून सुरवात करणेंच योग्य ठरेल. भार्षेत वापरत्या जाणान्या मूलभूत ध्वनींना वर्ण असें म्हणतात. या वर्णाचा अभ्यास दोन प्रकारें होऊं शकतो. एक अभ्यास वर्णानें उच्चारा- नुसार वर्गीकरण करून ते कसे उत्पन्न होतात याचा : हा वर्णाच्या स्थिर स्वरूपाचा अभ्यास होय. दुसरा अभ्यास एकाच भार्षेतील वर्णाच्या उच्चार- क्रियेंत कालांतरानें बदल होऊन त्या ठिकाणी दुसरे वर्ण कसे येतात याचा. पहिल्या अम्यासांत स्थैर्य या तत्वाला प्राधान्य आहे; प्रत्येक क्रियेला अपरिहार्य असणाऱ्या काल या तत्वाचें अस्तित्व लक्षांत न घेतां आणि : कालगतीमुळें व्यवहारांतील घटनांमध्यें घडून येणाऱ्या स्थित्यंतराचा अभाव गृहीत धरून केलेला वर्णनात्मक अभ्यास हा स्थैर्यप्रधान अभ्यास होय. दुसऱ्या अम्यासांत हैं प्राधान्य स्थित्यंतराला दिलेलें आहे: एका विशिष्ट प्रदेशांतल्या एका विशिष्ट काळच्या भाषेचा ती स्थिर आहे असें. मानून जो अभ्यास होतो, त्यांत त्या भाषेच्या त्या काळच्या स्वरूपाचें वर्णन देण्यांत येतें. प्रत्येक भाषेचें स्वरूप हें ती भाषा ज्या वर्णांचा. उपयोग करते त्या वर्णानी निश्चित होतें. या वर्णोची संख्या व उच्चारपद्धति निश्चित असते. कोणत्याहि भाषेचें एखाद्या विशिष्ट काळांतील व्याकरण लिहितांना त्या भाषेला स्थिर मानूनच तिचे वर्णन कराबें लागतें; म्हणून पहिल्या प्रकारचा अभ्यास स्यैर्यप्रधान, वर्णनात्मक व एककालिक असतो. एखादया भार्षेत एखाद्या कालखंडांत घडून येणाऱ्या परिवर्तनांचा तो

चित्र असतें. इतिहदास नसून, एखाद्या कालबिंदूवरील स्थिरप्राय वाटणा्या भाषेचें तें.

दुसऱ्या प्रकारचा अभ्यास हा गतिप्रधान असून त्यांत एका विशिष्ट कालबिंदूपासून दुसऱ्या एका कालबिंदूला र्पोचेपर्येत भाषेच्या ध्वर्नीत जी परिवर्तनें होतात आणि भार्षेत त्यामुळें ज्या घडामोडी होतात, त्यांचा इतिहास असतो. अशा रीतीनें पहिला अभ्यास स्थैर्यप्रधान तर दुसरा २

Page 12

प्रस्तावना

गतिप्रधान असतो; पहिल्या अभ्यासांत भाषा स्थिर आहे असें मानलें जातें, तर दुसऱ्यांत भाषेच्या स्वाभाविक गतिमान् किंवा प्रवाही स्वरूपा- चर भर दिलेला असतो; म्दणून दुसऱ्या प्रकारच्या अभ्यासाला ऐतिहासिक किंवा (तो दोन कालबिंदूंनी मर्यादित केला गेला असत्यामुळें) द्वैकालिक अशी संज्ञा आहे. केवळ ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून त्या काळचे मराठीचे ्वनी व व्याकरण यांचें ज्ञान करून घेणें हा एककालिक, स्थैर्यप्रधान आणि वर्णनात्मक अम्यास होय; पण ज्ञानदेवांपासून एकनाथ, तुकाराम, मोरोपंत इत्यादिकांच्या काळापर्येत मराठीचें स्वरूप कसकसें बदलत गेलें हें पाहणें हा इवैकालिक, गतिप्रधान आणि ऐतिहासिक अभ्यास होय. जुन्या साहित्याच्या अम्यासाच्या निमित्तानें फार प्राचीन काळापासून आपल्याकडे व्युत्पत्ति या विषयाला बरेच महत्व आलेलें आहे. किंबहुना च्युत्पत्ति म्हणजेच भाषाशास्त्र, अशी अनेक लोकांची समजूत असते. वास्तविक व्युत्पत्ति ही वर सांगितलेल्या ध्वनींच्या ऐतिहासिक अभ्या- साची एक शाखा होय, आज भार्षेत रूढ असलेला एखादा शब्द (म्हणजे एक विशिष्ट कल्पना व्यक्त करणारा ध्वनिसमुच्चय) अमुक एका काळीं ध्वनिरूपानें कसा होता हैं सांगणे म्हणजे त्या शब्दाची व्युत्पत्ति देणें. आज ज्या ध्वनीनी 'पान' किंवा 'वारा' ही कर्पना आपण व्यक्त करतो त्या ध्वनींचें तुकारामकाळी, ज्ञानदेवकाळीं, पांचव्या शतकांत, बुद्धकारळीं अथवा बेदकाळी काय स्वरूप होतें, हें ज्या शास्त्राच्या मदतीनें आपणांला कळतें वें व्युत्पत्तिशास्त्र. थोडक्यांत व्युत्पत्ति म्हणजे शब्दांतील ध्वनींचा इतिहास. जुने अंथ वाचण्यासाठीं ध्वनींच्या मिन्नभिन्न काळांतील स्वरूपाचें ज्ञान असणें आवश्यक आहे. परंतु केवळ लिपि शिकून हैं ज्ञान होणार नाहीं, कारण ध्वनी बदलले तरी जुनी लिपि आणि लेखनपद्धति कायम ठेवण्याकडेच रूढिप्रिय समाजाची प्रवृत्ति असते. 'ज्ञान' असा लिहिला जाणारा शब्द मराठींत उच्चारदृष्टया 'दन्यान्' असा आहे, ग्हणजे त्याचें मूळ 'ज + आ +न' याच्यापासून तो कितीतरी दूर गेलेला आहे. ही गोष्ट रह्टीआड करून होणारा भाषेचा अभ्यास अशास्त्रीय होईल हैं ३

Page 13

ध्वनिविचार

उघड आहे. उच्चार हाच भाषेचा खरा पुरावा होय. म्हणून जुन्या काळची भाषा लेखनरूपानें उपलब्ध झाली, तरीहि त्या काळीं ती कशी उच्चारली जात असे याचें ज्ञान नसेल, तर भाषेच्या अभ्यासाला फारशी मदव होणार नाहीं. थोडक्यांत म्हणजे एखाद्या विशिष्ट काळचें व्याकरण शिकण्यासाठी, जुन्या अंथांचा अभ्यास करण्यासाठीं, प्राचीन काळापासून आजपर्येत जी भाषिक परंपरा बाह्यतः भिन्न होत गेली असूनहि अखंडित राहिली आहे. तिचें ज्ञान करून घेण्यासाठी, ध्वर्नीच्या या द्विविध अम्यासाची आवश्य- कत्ा आहे. ध्वनिविचाराचें हैं महत्व पाहिल्यावर भाषा किंवा साहित्य शिक- वणारांना त्याचें ज्ञान असणें किती अपरिहार्य आहे, हें दिसून येतें. तसेंच या विषयाचें स्वरूप पूर्णपरणे शास्त्रीय आहे, हेंहि त्याचा नीट अभ्यास केल्यावर लक्षांत येतें, ध्वनिपरिवर्तनाचा अभ्यास करून एका बिशिष्ट भार्षेत आज अस्तित्वांत असलेल्या ध्वनींचा इतिहास आपण नककी केल्यावर एखाद्या शब्दाची व्युत्पत्ति पाहतांना वितंडवादाला जागा राहतां कामा नये. असें असूनसुद्धां अनेक ओढाताणीच्या व्युत्पत्ती सुच- बिल्या जातात आणि ग्राह्य मानत्या जातात. वस्तुतः आज मराठीत वापरला जाणारा एखादा शब्द (परभार्षेतून उसने घेतलेले शब्द सोडून) व त्या शब्दाचें प्राचीन स्वरूप यांच्यांतील परिवर्तनाचे टप्पे निश्चित असले पाहिजेत. मात्र हे टप्पे ठरविण्यापूर्वी आज मराठी भार्षेत किती व कोणते ध्वनी आहेत आणि मराठींत आज उपयोगांत आणला जाणारा एखादा ध्वनि कोणकोणत्या अवस्थामधून त्याच्या प्रचलित स्वरूपापर्येत येऊन पोचला आहे, यांचें पूर्ण ज्ञान करून घेतलें पाहिने. उदाहरणार्थ, मराठींतील क हा स्फोटक ध्या. तो शब्दाच्या आरंभीं असल्यास मूळ कोणत्या ध्वनीपासून येतो, शब्दाच्या मध्यें असत्यास कोठून येतो क शब्दाच्या शेवटीं कोढून येतो, हैं भाषेच्या इतिहासाचा अभ्यास करून नक्की केलें पाहिजे, कान, चाक, पिकणें, भीक, इत्यादि शब्दांत एक वाटणारा क हा वर्ण ऐतिहासिकटष्टथा मुळात किती भिन्न असलेल्या ४

Page 14

प्रस्तावना-

वर्णापासून अथवा वर्णसमुच्चयांपासून आलेला आहे, हैं अभ्यासकाला दिसतें आणि मूळ वर्णाच्या परिवर्तनाचा नियमितपणाहि त्याच्या लक्षांत येतो. सामाजिक संस्थांचा आणि तद्विषयक शास्त्रांचा अभ्यास करतांना तो ऐतिहासिक दृष्टीनें केला तरच अभ्यासूंना आणि विद्यार्थ्योना मार्गदर्शक ठरतो. पूर्वी कोणत्या घटना घडत्या आणि तदनुसार एखादा विशिष्ट सामाजिक संस्थेचें स्वरूप कसें बदलत गेलें याचें योग्य ज्ञान आपण मिळबलें, तरच आज त्या सामाजिक सस्थेचें स्वरूप असें कां, या प्रभाचें समाधानकारक उत्तर आपल्याला देतां येईल. पूर्वग्रहदूषित दष्टीनें इतिहासाचा खरा अभ्यास होणें शक्य नाही. उदाहरणार्थ, प्रत्येक शब्दाचें मूळ शक्य तोंवर संस्कृतपर्येत नेऊन भिडवण्याची संवय पाहा, या संवयीमुळें आपण बरेच वेळां सत्यापासून दूर जातो. 'हिंदुस्तान' हा शब्द 'हिंदुस्थान' असा लिहून मग 'हिंदु' शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल निरर्थक वादविवाद झालेले आपण बाचतो. हा शब्द भार्षेत प्रथम का, कधी व कुठें आला याच्याकडे आपण लक्ष दिलें, तर आपणाकडून हास्यास्पद चुका होणार नाहीत. ठराविक अर्थानें रूढ झालेल्या एखाद्या शब्दाचें स्वरूप निश्चित असलें पाहिजे; मग तें योग्य पुरा्याच्या अभावीं आपल्याला सांपडलें नाहीं तर इलाज नाहीं, 'पान* हा शब्द म्हणजे अर्थवाहक ध्वनिसमुच्चय 'पर्ण' या शब्दापासून आला आहे. तो 'पण्य' या शब्दापासून आला आहे असा व्यर्थ बाद आपण घालत नाहीं; कारण ऐतिहासिक दृष्टीनें, म्हणजे एक विशिष्ट अर्थ व्यक्त करणाऱ्या ध्वर्नीच्या परिवर्तनाच्या दष्टीनें, 'पर्ण' हा शब्दच 'पान' या शब्दाच्या मुळाशी आहे, हें ज्ञान आपल्याला झार्ले आहे. प्राचीन काळा- पासून आजपर्येत तो कसकसा बदलत आला, याचा पुरावा बेगवेगळ्या काळीं लिहिल्या गेलेल्या साहित्यांतून गोळा करून आपण त्याबद्दल आपली खात्री करून घेतली आहे. या शब्दाच्या परिवर्तनाला लागणारे नियम इतर तशाच शब्दांनाहि लागूं पडतात. ध्वनि आणि अर्थ यांच्या बाबतीत 'पर्ण' या शब्दाकडून व्यक्त होणारी परंपरा 'पान' या शब्दा- ५

Page 15

ध्वनिविचार

कडूनहि चालवली जात आहे आणि या 'पान' शब्दानें इतर कांहीं अर्थ व्यक्त होत असले, तरीहि ते कांहीं विशिष्ट बौद्धिक प्रवृत्तींना आणि नियमांना धरून होतात, असें दाखवून देतां येतें; एवढेंच नव्हे-तर अर्थाच्या दृष्टीनें भाषेच्या रूर्ढीत घडून येणारा हा फरक हा भाषाशास्त्राच्या एका स्वतंत्र शाखेचा विषय आहे. अशा रीतीनें भाषेमागील बौद्धिक प्रवुर्त्तीची जाणीव ध्वनीच्या इति- हासाच्या ज्ञानाइतकोच अपरिहार्य आहे. म्हणून भाषेच्या शास्त्रीय स्वरू- पाचें यथार्थ आकलन होण्यासाठीं भाषेचा, म्हणजे ज्या परंपरागत ध्वनीनीं समाज आपले व्यवहार चालवतो त्या ध्वनींचा इतिहास आणि ती भाषा ज्या समाजाकडून बोलली जाते त्या समाजाच्या जीवनाचें सूक्ष्म ज्ञान आपण मिळवलें पाहिज. त्याचप्रमाणे एका विशिष्ट काळांतील भाषेचें स्वरूप निश्चित करायचें असेल, तर त्या भाषेचा त्या काळांतील व्यव- हार किती व कोणत्या ध्वनींनी होत असे, तें दाखवून दिलें पाहिजे. इतिहास, गणित, साहित्य इत्यादि शास्त्रें आज मान्यता पावलेलीं आहेत; ती मान्यता अजून भाषाशास्त्राला मिळालेली नाहीं. ध्वनींची माहिती मिळवण्यांत फायदां काय, हा प्रभ सुशिक्षित लोकहि विचारतात; आणि भाषाशास्त्र, ध्वनिविचार यांसारखे विषय विद्यापीठांतून शिक- चण्याची कांहीं आवश्यकता आहे, असें मोठमोठ्या शिक्षणतज्ज्ञांनाहि चाटत नाहीं. ही उदासीनता उद्वेगजनक आहे आणि ती लौकर दूर होऊन या देशांतील विद्यापीठांत भाषेच्या शास्त्रीय अभ्यासाला योग्य तें स्थान मिळेल असें वाटत नाहीं. शिवाय अनेक अनधिकारी लोकांनी या विषयांत हस्तक्षेप करून त्यासंबंधीं इतके गैरसमज निर्माण केलेले आहेत कीं, त्या गैरसमजांचें निराकरण करणें हेंहि भाषाशास्त्राचें यथार्थ स्वरूप अभ्यासकांच्या नजरेला आणणाऱ्या शिक्षकांचेंच् काम झालें आहे. अधिक ज्ञान मिळविणें, न समजणाऱ्या प्रश्नाचा समाधानकारक खुलासा करणें आणि जिज्ञासा जागत ठेवून बुद्धीचा जिवंतपणा कायम ठेवणें, हें खन्या शिक्षणाचें कार्य आहे. बाहेरील जगाच्या निकट सानि- ध्यांत येण्याची संधि आपणाला आज मिळाली आहे. परकीय भाषांच्या ६

Page 16

प्रस्तावना

अधिकाधिक अभ्यासानें आपणाला इतर समाजांची जितकी ओळख होईल तितकी ती इतर कशानेंहि होणार नाहीं. परकीय भाषा शुद्धपणे बोलण्या- साठीं त्या भार्षेतील ध्वनीचा नीट अभ्यास करून ते ध्वनी बिनचूक उन्चारण्थाची कवायतहि आपण केली पाहिजे. अर्थात् भाषाशास्त्र शिकतांना तें अमुक दृष्टीनें उपयोगी आहे ग्हणून शिकतां कामा नये, उपयुक्ततेच्या दृष्टीनें चालविलेलें ज्ञानार्जन हैं शास्त्रीय संशोधनाच्या तत्वाला घातक आहे; कारण या वृत्तीनें संशोधन करणारी व्यक्ति तें तन्मयतेनें आणि निरपेक्षपणे करूं शकणार नाहीं, पूर्वी उपलब्ध नसलेलें ज्ञान प्रकाशांत आणणे हेंच संशोधकाचे कार्य असलें पाहिजे. तें निरूपयोगी आहे, उपयोगी आहे किंवा घातुक आहे, याचा काथ्याकूट करण्याचें त्याला कारण नाहीं; कारण उपयुक्ततेच्या दृष्टीनें होणारें संशो- धन सर्वागीण होणें शक्य नाहीं आणि ज्ञानांत सर्वोगीण भर टाकणें हैं तर ज्ञानवृद्धि करणारांचें काम आहे. मराठी भाषेतून शास्त्रीय विषयांवरील ग्रंथ लिहिणाऱ्या लोकांना एका महत्वाच्या प्रभाला तोंड द्यावें लागतें. हा प्रश्र परिभाषेचा होय. शास्त्रीय प्रगर्तीत मागासलेल्या समाजाच्या भार्षेत तें शास्त्र सुटसुटीतपणे व्यक्त करण्याला लागणाऱ्या शब्दांचा अभाव असणे, ही गोष्ट अत्यंत स्वाभा- बिक आहे. हा अभाव दूर केल्याशिवाय शास्त्रीय विषयांवरचें लेखन होणें शक्य नाहीं. तो दूर कसा करावा आणि स्वभार्षेतून जिज्ञासूंना वेग- वेगळ्या शासत्नांचें ज्ञान अगर्दी सोप्या रीतीनें कसें करून द्यावें, याबद्दल विचार होणें जरूरीचें आहे. बेगवेगळ्या शास्त्रांतील पारिभाषिक संज्ञा गोळा करून त्यांचें हिंदी- करण करण्याचा कारखाना नागपूर येथें चालूं आहे. पारिभाषिक संज्ञांचे भारतीय प्रतिशब्द त्या त्या विषयावरील ग्रंथ लिहिले जाण्यापूर्वीच तयार करून ठेवले म्हणजे शास्त्ज्ञांना नवे शब्द शोधून काढण्याचा त्रास पडणार नाही, या सद्धेतूनें प्रेरित होऊन हैं कार्य हातीं घेण्यांत आलेलें आहे. पण परिणामकारक शास्त्रीय लेखनाला ही पद्धत उपयोगाची नाहीं. 9

Page 17

ध्वनिविचार

खरें म्हणजे आपल्याला परिचित असलेल्या शब्दसंग्रहाच्या मदतीनें शास्त्रीय प्रश्नांवर लेख लिहिले गेले पाहिजेत. विवेचनाच्या ओघांत सहज सुचलेला शब्द हा मुद्दाम बनविलेल्या पारिभाषिक शब्दापेक्षा अधिक महत्वाचा होय. असे सहज सुचून रूढ झालेले शब्द भाषेची अर्थवाहकता वाढवतात आणि वाचकाला फारसे परिश्रम न होतां समजतात. संस्कृत धातूंबरून अथवा शब्दांवरून पारिभाषिक कोश तयार कर- ण्याची पद्धत अनिष्ट आहे. आधी शास्त्रीय विषयांचा नीट अभ्यास केलेली पिढी तयार झाली पाहिजे आणि केवळ भाषांतर करण्याची आकाक्षा बाळगणारा नव्हे तर शास्त्रांचा नीट अभ्यास करून त्यात अधिक भर घालण्याच्या हेतूनें संशोधनामागे लागलेला विद्द्वर्ग तयार झाला.पाहिजे. अशा व्यक्तींकडून लिहिले जाणारे लेख अथवा ग्रंथ हेच विवेचनाच्या आणि परिभाषेच्या दृष्टीनें आदर्श मानले पाहिजेत, शास्त्रीय साहित्य- निर्मितीच्या प्रारंभींच्या प्रयत्नांत परिभाषेविषयों एकवाक्यता नसली तरी हरकत नाहीं, पण या पहित्या. प्रयत्नांतूनच हवी असलेली सामग्री आप- णाला मिळेल, अशा रीतीनें रूढ झालेले शब्द सर्वाना परिचित होतील. त्यांचें मूळ काय आहे अथवा त्यांचा खरा अर्थ काय आहे, हे बाद निरर्थक होत, मुद्दाम नवे शब्द निर्माण करून रूढ असलेले शब्द शास्त्रीय नाहीत या सबनीवर काढून टाकणें अत्यंत कोत्या बुद्धीचें लक्षण आहे. इतकें असूनहि ज्या ठिकाणी एखादा नवा शब्द आणणे अपरिहार्य ठरेळ त्या ठिकाणी तो बोलभार्षेतील साधनांचा उपयोग करून बनवावा. सामान्य वाचकाला परिचित अशा सुटसुटीत संस्कृत शब्दाचा प्रयोग केला तरीहि चालेल, पण ज्याचा अर्थ समजण्यासाठी त्याला संस्कृत शब्दकोशाकडे किंवा पारिभाषिक शब्दकोशाकडे धांव ध्यावी लागेल असा शब्द टाळणेंच योग्य ठरेल, भाषेतून शब्द कोशांत आला पाहिजे, कोशांतून भार्षेत नव्हे. अशा प्रकारचा प्रयत्न प्रस्तुत अ्रंथात करण्यांत आलेला आहे. उदाहरणें आणि तास्विक विवेचन यांच्या मदतीनें नव्यानें उपयोगांत आणलेला शब्द स्पष्टपर्णे समजेल अशी काळजी घेण्यांत आली आहे आणि हा नवा

Page 18

प्रस्तावना शब्द फक्त विशिष्ट अर्थानेंच नवा असून एरव्हीं तो दुसन्या अर्थानें किंवा अर्थानीं भार्षेत रूढ आहे आणि साधारण सुसंस्कृत वाचकांच्या परिचयाचा आहे, याकडेहि लक्ष देण्यांत आलेलें आहे. हा ग्रंथ हातीं घेणान्या वाचकाला निदान संस्कृत व जुनी मराठी या दोन भाषांचा परिचय असेल अशी अपेक्षा आहे. जुन्या व्याकरण अंथात सांगितलेलें निराळ्या शब्दांत सांगण्यासाठी किंवा पूर्वीच्या ख्यातनाम लेखकांशी विरोध येईल असे प्रसंग टाळून या अंथांतील विवेचन केलेलें नाहीं. भाषाशास्त्र म्हणून एकोणिसाव्या शतकांत अस्तित्वांत आलेल्या समाजजीवनाच्या अभ्यासाला आवश्यक अशा नव्या शास्त्राच्या एका महत्वाच्या अंगाचें दिग्दर्शन या ग्रंथांत केलेलें आहे. पाश्चात्यांच्या मतांबद्दल अज्ञान, गैरसमज आणि तिरस्कार असणारे लोक थोडे नाहींत. अशा लोकांना या अंथाच्या वाचनानें कदाचित् कांहींहि नवें ज्ञान मिळणार नाहीं. परंतु जिज्ञासु वाचकांसाठीं हा अंथ लिहिलेला असल्यामुळें, पूर्वग्रह न ठेवतां या विषयाकडे वळणाऱ्या मूठभर विद्यार्थ्याना जरी याच्या वाचनानें कांहीं फायदा झाला आणि या विषयाचें अधिक सूक्ष्म ज्ञान मिळवण्याची इच्छा त्यांना झाली, तरी लेखकाला आनंद वाटेल, या अंथांत ठिकठिकाणी आलेला 'प्राकृत' हा शब्द एका विशिष्ट समाजाची एका विशिष्ट प्रदेशांतली एका विशिष्ट काळांतली भाषा या अर्थानें ध्यायचा नसून, संस्कृत व मराठी यांची मघली अवस्था दाख- बणारी एक परंपरा या सामान्य अर्थानें ध्यायचा आहे. प्रदेश आणि काळ याला अनुसरून प्राकृताचे अनेक मेद उपलब्ध असस्यामुळें आणि या भेदांच्या निक्चित प्रदेशमर्यादा व कालमर्यादा ठरवणे अजून तरी शक्य नसल्यामुळें 'प्राकृत' हा शब्द स्थूल अर्थानेंच, म्हणजे संस्कृत (किंवा वैदिक) भाषेची उत्तरावस्था व आधुनिक आर्यंभाषांची पूर्वा- बस्था या अर्थानेंच घेतला आहे. त्याचप्रमाणे मराठीचीं उदाहरणें लेख- काला परिचित असलेल्या बोलींतली आहेत. शास्त्रीय अंथाचें वाचन करतांना तें प्रारंभापासून सुरवांत करन क्रमा- कमानें शेवटापर्येत जात केलें पाहिजे, आपल्याला कुतूहल असणाऱ्या

Page 19

ध्वनिविचार

विषयाची माहिती देणारें पान उघडून आणि तेवढाच भाग बाचून जिज्ञासूचे नेहमीं समाधान होईल असें नाहीं, कारण पुढील प्रकरणांत आलेत्या विवेचनाचे धागे मागील प्रकरणांत असतात, म्हणून असें वाचन अनेक वेळां गैरसमज आणि गोंधळ निर्माण करतें. पूर्वरचित ग्रंथाच्या अभ्यासाशिवाय आणि त्यांनी ज्ञानांत टाकलेली भर लक्षांत घेतल्याशिवाय कोणत्याहि शास्त्राच्या उत्कातीची, प्रगतीची, व त्या शास्त्रापु्ढे असणान्या न सुटलेल्या प्रभ्नाची व त्यांतल्या अश्ञात गोष्टींची योग्य कल्पना येणें शक्य नाहीं, ही कल्पना ज्याला नीटपणे आली असेल आणि अधिक ज्ञानार्जनासाठी व संशोधनासाठी हैं शास्त्र कोणत्या पद्धतीचा उपयोग करतें हैं ज्याला पूर्णपणें समजलें असेल, तोच तें शास्त्र आहे याहून अधिक पुढे नेऊं शकेल, केवळ जुन्या भाषा शिकून जुनें साहित्य वाचून 'आपस्या' तत्वानी भाषेचा पुरावा हाताळणान्या पंडितांना आधुनिक भाषाशास्त्रांत स्थान नाहीं. केवळ बररुचि, हेमचंद्र किंवा लक्ष्मीघर यांची व्याकरणें वाचून भाषाशास्त्र किवा आर्यभाषांची उत्क्रांति यांचें यथार्थ ज्ञान होणार नाही, या ग्रंथांचा अभ्यास भाषेच्या अभ्यासाचीं साधनें म्हणून अवश्य केला पाहिजे, पण त्यांतलें ग्राह्य किती व अग्राह्म किती हैं समजण्यासाठी शास्त्रीय बुद्धीचा विकास करणें अप- रिहार्य आहे. यासाठी शास्त्रीय विषयावरील जितके अधिक ग्रंथ वाचतां येतील तेबढे वाचून आपलें ज्ञान शास्त्रीय प्रगतीच्या वेगानें वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, केवळ इंग्रजी अ्रंथ वाचून भाषाशास्त्राचें योग्य ज्ञान किंवा निर- निराळ्या भाषा, बोली, भाषासमूह इत्यादीबद्दल होणाऱ्या अभ्यासाची पूर्ण माहिती होणें अशक्य आहे. पण इतर भाषांतून होणाऱ्या मौल्यवान प्रंथांचें अज्ञान आपल्या देशांत भरपूर असूनहि तें दूर करण्या- साठीं एखादी योजना करावी असा विचार कोणाच्याहि स्वम्रांतसुद्धां येत नाहीं ही खरोखर कौतुकाची गोष्ट आहे! या अ्रंथाच्या रचनेसाठी ज्या ज्या ग्रंथांचा आधार घेतला त्यांतले मोजके आणि महत्वाचे अंथच आधारभूत अ्रंथांच्या यादीत सांपडतील. १०

Page 20

प्रस्तावना

य्यांतील कांहींचा उपयोग पुष्कळ मोठ्या प्रमाणावर झाला, कारण ते या विषयाबरचेच ग्रंथ होते; तर कांहींचा उपयोग विवेचनाची सुलभता वाटवण्याच्या दष्टीनें मला झाला. पदटीना अगर्दी जरूर अशा ठिकाणी खुलासा म्हणून किंवा अंथलेखनानंतर आठवलेला मुद्दा अथवा उदाहरण दाखल करण्यासाठी म्हणून दिस्या आहेत. ध्वनिविचाराचें स्थूल ज्ञान करून देण्यासाठी आणि अप्रत्यक्ष रीतीनें त्याच्याशी संबंध असणान्या लेखनादि विषयांचें स्वरूप तात्विक दष्टीनें वाचकांच्या नजरेला आणण्या- साठी हा अ्रंथ लिहिलेला आहे. म्हणून त्यातील मुदयांचा विचारहि स्थूल दृष्टीनेंच केला पाहिजे. उदाहरणार्थ, 'धोटक' हा शब्द 'घोडा' या शब्दाचें मूळ म्हणून देण्यांत आल्यास तो विवेचनाच्या सोयीसार्ठी आहे, असेंच त्या ठिकाणी समजलें पाहिजे; कारण ऐतिहासिक दृष्टीनें पाहिलें तर 'घोडा' या शब्दाचें तें संस्कृतीकरण असणेहि शक्य आहे. संस्कृतकार्ळी 'घोटक' या शब्दापासून निघाल्यास चालूं काळांत ध्वनिदृष्टया त्याचें काय परिवर्तन होईल, एबढेंच 'घोटक' 'घोडा' यावरून समजून घेतलें पाहिजे. या अ्रंथाला देण्यांत आलेल्या नांवाचादि थोडा खुलासा करणें इष्ट ठरेल, 'ध्वनि' हा शब्द पदार्थविज्ञानशास्त्रांत आणि साहित्यश्यास्त्रांतहि वापरण्यांत येतो. यांतत्या पहिल्या शास्त्रांत तो 'कर्णेद्रियावर विशिष्ट संवेदना घडवणाऱ्या लहरी' या अर्थानें वापरला जात असून हाच अर्थ एका मर्यादित क्षेत्रांत भाषाशास्त्रांतील ध्वनीच्या अभ्यासालाहि लागूं पडतो, भाषाशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखरांना 'विचार' हा शब्द या अ्रंथात वापरण्यांत आला असल्यामळें भाषेच्या शास्त्रांतील ध्वनिविषयक शाखेचा विचार करणाऱ्या अभ्यासाला 'ध्वनिविचार' हैं नांव दिलेलें आहे. अपूर्णता आण दोष यांपासून हा ग्रंथ पूर्णपणें अलिप आहे असें लेखकाचें म्हणणे नाहीं.ज्या शास्त्राचें संशोधन अजून बर्रेच व्हायचें आहे त्या शास्त्राष्या बाब्तीत सर्वश्रेष्ठ भाषाशास्त्रज्ञांनाहि असें म्हणतां येणार नाही.परंतु उपलब्ध असली माहिती या विषयांचें स्थूलज्ञान मिळवूं इच्छिणान्यांसाठीं शक्य तितक्या सुबोधपणे तिच्या शास्त्रीय स्वरूपाला कोणताहि बाघ न आणतां मांड- भ्याचा प्रयत्न या अ्रंथांत केला आहे, एबढेंच फक्त म्हणतां येणें शक्य आहे. ११

Page 21

ध्वनिविचार

या ग्रंथांत देण्यांत आलेल्या आकृती कु. लीना डॉक्टर या विद्या- र्थिनीच्या आहेत. इंग्रजी भार्षेतील आंदोलन दाखविणारा जेम्स जॉइस् यांचा उतारा महाराजा सयाजीराव विद्यापीठांतील इंग्रजीचे प्राध्यापक श्री. दि. द. माहुलकर यानीं दिला, त्याचप्रमाणें हस्तलिसिताच्या कांहीं भागाचें पुनर्लेखन सौ, कुमुद चौधरी यांनीं केलें. या सर्वाचा मी आभारी आहें. मुद्रणप्रत तयार असतांहि ती प्रसिद्ध होण्याचा योग येण्यास काला- वधि लागला आणि शेवटी माझे हितर्चितक मित्र डॉ. सु. मं. कन्ने यांनी मनावर घेतलें नसतें तर अजुनहि हा ग्रंथ अप्रकाशित राहिला असता. शास्त्रीय अंथाच्ा लेखक आपला ग्रंथ पुन्हां वाचूं लागला तर मध्यंतरीच्या काळांत आलेल्या नव्या कल्पना, ज्ञानांत पडलेली भर आणि विवेचन- पद्धतीत सुचलेले फेरफार यामुळें त्यालाच आपलें लेखन असमाधानकारकं बाटूं लागतें. पुढील आवृत्तीचा योग आल्यास या दृष्टीनें आवश्यक अशा सुधारणा करतां येतील, पण हा प्रथमावृत्तीचा योग आणव्याबद्दल डॉ.कने यांचे मनापासून आभार मानून ही प्रस्तावना पुरी करतों. बडोदें, १५-१-१९५५ नारायण गोविंद कालेलकर

१२

Page 22

आधारभूत ग्रंथ

BLOCH, Jules: *La formation de la langue marathe, (Paris 1920). BLOCH, Jules: L'indo-aryan (Paris 1930). DAUZAT, Albert : La Géographie linguistique, (Paris 1948). Encyclopédie francaise (Tome I, Paris 1937). GRAMMONT, Maurice: Traite pratique de prononciation francaise (Paris 1934). GRAMMONT, Maurice: *Traité de phonetique (Paris 1939). JESPERSEN, Otto: A Modern English Grammar (on his- torical principles), (Heidelberg 1909). MACDONNEL, Arthur A .: A Vedic Grammar for Students, (Oxford 1916). MEILLET, Antoine: Introduction a l'etude comparative des langues indo-européennes, (Paris 1937). MEILLET, Antoine: Les langues dans l'Europe nouvelle, (Paris 1928). MEILLET, Antoine: Linguistique historique et linguistique générale, (Paris 1926 & 1938). PISCHEL, R .: Grammatih der Prahrit-Sprachen, (Strass- burg 1900). SAUSSURE, Ferdinand de : *Cours de linguistique générale (Paris 1931). VENDRYES, Jean : *Le langage, (Paris 1939). WOOLNER, Alfred C .: Introduction to Prahrit, ( Calcutta 1917).

  • विशेष उपयोग केलेले ग्रंथ. याशिवाय लघुसिद्धान्तकौमुदी, हेमचन्द्र, वररुचि, लक्ष्मीघर यांची ज्याकरणें, ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र इ. ग्रंथ उपयोगांत घेतले आहेत. १३

Page 25

नाकाची नविका कानाची पो कुकी

जबनाच हाड़

ओठ - तालुपर

जीग

जमापाक हाइ- 23r1111 जिखामूज निशेखा पुववे ताड़ बरसा स्वरमालिका

कषमुख रगालसा स्वरनामिका अन्ज न लिका किकाइड़

शास नविमा थायगइूड़

छानी चें हाड -

तोंड, कान व घसा: (आकृति ?) [पान नं. १]

Page 26

उपोद्धात ध्वनिविचाराचा इतिहास ध्वनि उत्पन्न कसे होतात आणि त्याचें वर्गीकरण कसें केलें पाहिजे, या बाबतींत जे ज्ञान आज आपणांला आहे, त्याचा प्रारंभ करषी व कोठे झाला, हा प्रश्र महत्वाचा असला तरी त्याचे उत्तर मिळणे शक्य नाही. भाषा ही ध्वनिरूप असून लेखनानें आपलें मनोगत व्यक्त करायचें असेल तर बोलताना ज्या ध्वनीचा आपण उपयोग करतों ते' ध्वनींच' लिहून दाख- बले पाहिजेत, ही कल्पना ज्याच्या मनात प्रथम आली ते सर्वात पहिले ध्वनिवेत्ते होते, जगांतलें प्रारंभीचें लेखन चित्रमय होतें. भाषा ही ध्वनीनी बनलेली आहे, हें या लेखकांच्या स्वमीहि नव्हतें; त्यांचें सर्व लक्ष मनुष्या- कडून व्यक्त होणान्या विचारावर केंद्रित झालें होतें. विचार हा एक मनोव्यापार असून तो दुसऱ्यांना आकलन होईल असें स्वरूप जर त्याला दयायचें असेल तर तें ज्ञानेंद्रियांना गोचर होईल असें असलें पाहिजे, या मूलभूत तत्वाचें ज्ञान करून पेष्मासाठी मानवजातीला बौद्धिक प्रगतिपथा- वर बराच प्रवास करावा लागला होता. चिंत्रलेखनानें विचार व्यक्त करणारा मनुष्य क्रमाक्रमारने वर्णलेखनापर्यत येऊन पोंचला, म्हणजे त्यानें विचार व्यक्त करणाऱ्या साधनानें पृथककरण करून त्यांतली मूलभूत तत्वें शोधून काढली .. : ग्रीकानी सेमिट्टिक लोकांकडून 'त्याची लेखनपद्धति उचलली, पण ती अवयवलेखनावर आधारलेली असस्यामुळें ग्रीक भाषेच्या दष्टीनें अपुरी व असमाधानकारक होती; त्यामुळें पृंथकरणाच्या तत्वावर त्यानीं या पद्धतीतून प्रत्येक वर्ण स्पष्ृपणे व्यक्त करणारी वर्णलेखनपद्धति शोधून काढली, गीक व्याकरणकर्त्यानी फार जुन्या काळापासून ध्वनींच्या अभ्या- साकडे लक्ष दिलें होतें, परंतु हा अभ्यास ऐकलेत्या वर्णाचें म्हणजे श्रतीचें वर्णन देणारा होता भाणि त्यांनी केलेलें ध्वनीचें वर्गीकरण श्रुतीच्या पृथककरणावर आधारलेलें होतें.

Page 27

२ ध्वनिविचार

भारतीयांनींहि आपली लिपि परकीयांकडून घेतली; ही घटना गीक लिपि निर्माण झाल्यानंतरची आहे. त्यांनीि अतिशय कौशल्यानें तिच्यांत योग्य तो बदल करून आपल्या भाषेच्या लेखनाला तिला पूर्ण समर्थ केलें; पण लिपीच्या आगमनाच्या आधीं फार पूर्वापासून भारतीयांनीं आपला ध्वनिविषयक अभ्यास सुरूं केला होता आणि ध्वर्नीचें योग्य निरीक्षण व पृथकरण करून वेगवेंगळे ध्वनी कसे निर्माण होतात आणि ते निर्माण: होतांना तोंडांतील अवयवांच्या कायकाय हालचाली होतात, याचें सूक्ष्म वर्णन त्यानी करून ठेवलें होतें. या कारणांमुळें जरी त्यांनी केवळ स्व- भार्षेतील ध्वनीचाच अभ्यास केला आहे, तरीहि त्यांना वर्णनात्मक ध्वनि- विचाराचे अध्वर्यूं ग्हणण्यास कोणतीच हरकत नाहीं. अशा रीतीनें ध्वनिविषयक ज्ञानाच्या बाबतींत भारतीयांनी विलक्षण प्रगति केली असली, तरी त्यानंतर त्यांनीं या शास्त्रांत कोणतीच भर घातली नाहीं. आजचें ध्वनिविषयक ज्ञान सर्वस्वीं पाश्चिमात्य विद्वानांच्या अविश्रांत परिश्रमाचेंच फळ आहे. युरोपांतील शिक्षणक्रमांत एकोणिसाव्या शतकापर्येत ग्रीक व्याकरण- कत्याचें ध्वनिवर्णन शिकवण्यांत येत असे; पण संस्कृतचा 'शोध' लागून ग्रीक, लॅटिन इत्यादि भारषांशी असलेला तिचा संबंध लक्षांत येतांच तुलनात्मक व्याकरणाला प्रारंभ झाला आणि ध्वनिवर्णनाची भारतीय पद्धत स्वीकारून उच्चारदृष्टया ध्वनींचा अभ्यास व वर्गीकरण करण्यास सुरवात झाली. परंतु शरीरशास्त्राचें ज्ञान असणान्या तज्ज्ञानी या विष- यांत लक्ष घालीपर्येत ध्वनिविचारानें फारशी प्रगति केली नाहीं. १८५६ मध्यें जर्मन शरीरशास्त्रज्ञ बॅक याचा शरीरशास्त्राच्या दष्टीनें या विषयाचें विवेचन करणारा एक ग्रंथ प्रसिद्ध झाला. १८५७ पासून १८६९ पर्येत चेक शरीरशास्त्रज्ञ चेर्माक यानें या ज्ञानांत महत्वाची भर घातली, स्वरनालिका आणि कंठ यांचें ध्वनिविषयक कार्यं आणि अनु- नासिकें निर्माण करण्यांत तालुपटाकडून होणारें कार्य, याबद्दलचें श्रेय त्याला दिलें पाहिजे. १८६२ मध्यें हेल्महोल्त्स् या जर्मन शास्त्रज्ञानें स्वरं- विषयीं महत्वाची माहिती देणारा अंथ लिहिला आणि स्वरांतील भेद

Page 28

ध्वनिविचाराचा इतिहास ३

स्पर्शस्थानापेक्षां ठशाचा अधिक आहे आणि हा ठसा तोंडांतील पोकळीच्या विशिष्ट आकृतीनें निर्माण होतो हैं दाखवून दिलें. याच सुमाराला आपल्या Visible Speech (१८६७) या ग्रंथांत बेल या इंग्रज प्राध्यापकानें वर्णाच्या, विशेषतः स्वरांच्या उच्चारक्रियेचें वर्णन दिलें. १८७६ मध्यें जर्मनशास्त्रज्ञ झिफेर्स यानें आपल्या ध्वनिविचारावरील अं्थात आपल्यापुर्वी होऊन गेलेल्या तज्जांच्या शोधांच्या मदतीनें या शास्त्रांत झालेली प्रगति दाखवून दिली. स्वीट वगैरे अ्रंथकारांनी या शास्त्रानें लावलेले शोध जनतेसमोर ठेव- ण्यास मदत केली, पण १८८५ च्या सुमारास शास्त्रज्ञांना जाणीव झाली कीं आपलें कार्य अत्यंत मंदगतीनें चाललें आहे आणि तुलनात्मक व्याकरणाच्या प्रगतीला साह्यभूत असा अधिक प्रकाश ध्वनिविच्चारांतील प्रभांवर टाकणें आवश्यक आहे. ही जाणीव होतांच इतर शास्त्राप्रमाणें आपणहि यांत्रिक साधनांच्या मदतीनें स्वतःथ्या विषयाचा अभ्यास करावा आणि त्याचें स्वरूप अधिक स्पष्ट व सूक्ष्म करावें, असा विचार अनेक शास्त्रज्ञांच्या मनांत आला; पण त्याला परिणामकारक असें मूर्त स्वरूप देण्याचें श्रेय रस्लो या भाषाशास्त्रश्ञाला आहे. ध्व्नीना यंत्राच्या साहाने दृश्य स्वरूप देऊन त्यांतल्या बारीकसारीक भेदांचा अभ्यास करण्याकडे जिज्ञासूंचें लक्ष लागलें आणि आतांपर्येत भाषाशास्त्राविषयीं उदासीन अस- लेल्या शरीरशास्त्रज्ञांच्या हातीं गेलेला ध्वनींचा अभ्यास शरीरशास्त्राची मदत घेऊन भाषाशास्त्रज्ञांनी स्वतःच सुरूं केला. सध्यां आपण यर यांत्रिक ध्वनिविचाराच्या युगांतच आहों. मात्र केवळ यंत्राचा उपयोग करून ध्वनींचा अभ्यास आपणाला करतां येणार नाहीं. यंत्राचा उपयोग ध्वनिविचाराचें सूक्ष्म निरीक्षण करण्या- सार्ठी आहे आणि ध्वनिविचार ही भाषाशास्त्राची शाखा आहे. भाषा- शास्त्राचा अभ्यास करता करतां उद्भवणाऱ्या ध्वनिविषयक प्रभ्रांचें अधिक समाधानकारक ज्ञान करून घेण्यासाठीं अस्तित्वांत आलेलें एक साधन म्हणजे यांत्रिक ध्वनिविचार, भाषाविषयक प्रश्नांच्या केवळ तास्विक अम्यासानेंहि ध्वनिविषयक माहिती मिळूं शकते आणि हें तत्वग्रह्णच पुढे

Page 29

४ ध्वनिविचार

यंत्राच्या साह्यानें अधिक निश्चित रूप धारण करूं शकतें, फेर्दिनां द सोसूर या केवळ चिंतनशील शास्त्रज्ञाच्या लेखनावरून ही गोष्ट स्पष्ट दिसून येते. हा नुसत्या ध्वनीच्या वर्णनात्मक अभ्यासाचा इतिहास झाला. पण वेगवेगळ्या भाषांतील ध्वनीच्या इतिहासाचेंहि एक शास्त्र आहे. भाषांचा इतिहास, त्यांची परस्परांशी तुलना, यांच्या आधारावर हें शास्त्र उमारलेलें आहे. उदाहरणार्थ, मराठींतील क हा वर्ण कसा उच्चारला जातो, तो निर्माण होतांना तोंडांतील अवयवांच्या काय हालचाली होतात, जिमेच्या कोणत्या भागाचा टाळूच्या कोणत्या भागाला स्पर्श होतो, ही माहिती देण्याचें काम वर्णनात्मक ध्वनिविचाराचें आहे. पण मराठींतील क हा ध्वनि ऐतिहासिकटष्टथा मूळ कोणत्या ध्वनीपासून कसकसा बदलत आजच्या अवस्थेला येऊन पोंचला, याची माहिती दे्याचें काम ऐति- हासिक ध्वनिविचाराचें आहे. एकच ध्वनि कालांतरानें बदलत जाऊन भिन्न प्रदेशांत भिन्न रूपें धारण करतो; या उत्क्रांतीचा अभ्यासहि ऐति- हासिक अभ्यासच आहे. अशा रीतीनें निर्माण झालेल्या भिन्न रूपांचा तुलनात्मक अम्यास करणें; दोन एकवंशीय भाषांची तुलना करणें, हाहि अभ्यास ऐतिहासिक स्वरूपाचाच आहे. ऐतिहासिक ध्वनिविचाराची सुरुवांत तुलनात्मक व्याकरणापासून होते. म्हणून या व्याकरणाचा निर्माता बॉप् याला हें श्रेय अप्रत्यक्षपणें जातें. अप्रत्यक्षपणे म्हणण्यांचें कारण हें की बॉपू स्वतः ध्वनिविचारज्ञ नव्हता. पण १८१८ मध्यें डॅनिश शास्त्रज्ञ रास्क यानें संस्कृतचें ज्ञान नसतांहि जर्मानिक भाषांचा ग्रीक, लॅटिन, स्लाव्ह या भाषांरशी असलेला संबंध दाखविला, यानंतर चारच वर्षानी आपल्या जर्मन व्याकरणांत त्रिम् यानें त्याच्या नांवानें प्रसिद्ध असलेला महत्वाचा व्वनिविषचक सिद्धांत मांडला आणि आधुनिक भाषाशास्त्राचें बीजारोपण केलें. १८२२ मध्यें पॉट यानें ध्वनिविचाराच्या ऐतिहासिक शासत्रेत व्युत्पत्ति य्या विषयाची भर घालून तुलनात्मक ध्वनिविचाराला प्रारंभ केला, पण

Page 30

ध्वनिविचाराचा इतिहास

आतांपर्येतचा ध्वनिविचार लिपीनी व्यक्त होणाऱ्या अक्षरांभोंवर्ती झाला होता. अक्षरांकडे लक्ष न देतां तें उच्चारांकडे देण्याची शास्त्रीय दृष्टि श्लाय्- शर यानें प्रासत करून दिली, ध्वनीच्या परिवर्तनाचे नियम स्थिर आणि निश्चित आहेत असें ग्रहीत धरून तुलनेच्या तत्वावर इंडोयुरोपियनचें पूर्व- रूप निक्चित करण्यांचा त्यानें प्रयत्न केला, आणि या वंशांतील प्रत्येक; भाषेच्या वेगवेगळ्या प्रदेशांतील उत्क्रांतीचा इतिहासि नजरेसमोर ठेवला. याच काळांत शरीरशास्त्रज्ञांनीं वर्णनात्मक ध्वनिविच्चारांत वरील प्रगति; केली होती. झिफेरसचा ध्वनिविचारावरील ग्रंथ तर वरींच वर्षे प्रमाणभूत मानला जात होता. १८६३ साली डॅनिश गणितज्ञ आसमान यानें संस्कृत, गीक आणि जर्मानिक या भाषांतील सकृद्दर्शनीं अनियमित वाटणाऱ्या स्फोटकांचें स्पष्टीकरण केलें आणि १८७७ मध्यें त्याचाच देशबांधव व्हेर्नर यानें इंडोयुरोपियन भार्षेंतील आघाताचा तिच्या पुढील अवस्थेबर होणारा. परिणाम दाखवून दिला, अशा रीतीनें अनियमित रूपें आणि अपवाद यांच्यामागील विशिष्ट परिस्थितीचें अधिकाधिक ज्ञान होऊन ध्वनिपरिवर्त- नाचें शास्त्रीय म्हणजे नियमबद्ध रूप अधिकाधिक मान्य होत चाललें. शेरर, ऑस्ट्हॉफ्, बुगमान् यांच्या संशोधनांनीं ही गोष्ट अधिक स्पष्ट झाली. याच तत्वाच्या आधारावर इंडोयुरोपियन भार्षेत असलेल्या एव ओ या स्वरांचें अस्तित्व (ते संस्कृत भार्षेत नष्ट झालें असूनहि) सिद्ध करण्यांत आलें, हा शोध १८७७ सालीं फे. द सोसॅर व कोलित्स यांनी प्रसिद्ध केला. इंडोयुरोपियन व्यंजनांचाहि अधिक अभ्यास होऊन या भार्षेत दोन क होते असें आस्कोली यानें दाखवून दिलें. १८७६ मध्यें बुगमान् यांनी असें निदर्शनाला आणलें कीं संस्कृत व ग्रीक या भार्षातील अच्या जार्गी कांहीं ठिकाणी इंडोयुरोपियन भारषांत अनुनासिक वर्ण सांपडतात. या सूचनेच्या दिशेनें जाऊन १८७८ मध्यें सोसूर यानीं इंडोयुरोपियन स्वर- पद्धतीवरील आपला सुप्रसिद्ध प्रबंध लिहिला. या बेळीं त्यांचें वय एकवीस होतें. या अंथाचें महत्व हैं कीं इतर अंथांप्रमाणें परस्परार्शी संबंध नस- ले्या वेगवेगळ्या शोधांनी तो भरलेला नसून ध्वनिविचारांतील एका

Page 31

६ ध्वनिविचार

निश्चित विषयाचा पूर्ण आणि पद्धतशीर अभ्यास त्यांत प्रथमच आलेला आहे. एका विशिष्ट भार्षेतील एका विशिष्ट वर्णसमुच्चयाचा शास्त्रीय अभ्यास करून त्यांनों भाषांच्या पद्धतशीर अभ्यासाला चालना दिली. १८८९ सार्ली शमिट यानें दोन भिन्न भाषांत दिसून येणाऱ्या एकाच स्वरूपाच्या घटनेचा तुलनात्मक अभ्यास बाह्य स्वरूपाच्या आणि अर्थाच्या दृष्टीनें करून दाखविला. १८९५ मध्यें ग्रामाँ यांनी ध्वनिविषयक नियमांची व्यापकता सिद्ध केली आणि ध्वनिविषयक घटना या बाह्यतः वेगवेगळ्या भाषांत भिन्नभिन्नं असल्या तरी त्या सर्वोच्या मागील तत्व एकच कसे आहे, तें अभ्यासकांना पटवून दिलें. १९०१ सालीं मेये यांनी विसदशी- करणाचा नियम शोधून काढला आणि हीं व्यापक तत्वें शोधून काढण्याची परंपरा अजूनहि चालूं आहे. मृतभाषांचा खोल अभ्यास आणि विद्यमान बोलीचें सूक्ष्म निरीक्षण यांच्या साह्यानें अजन पुष्कळ करतां येण्यासारखें आहे. दीर्घ व्यासंग आणि चिवटपणा या दोन गुणानींच योग्य शास्त्रीय ज्ञान मिळचिलेले जिज्ञासु संशोधक हें करूं शकतील.

Page 32

प्रकरण पहिलें ध्वनिनिर्मिति

सामुदायिक जीवन हें मनुष्यप्राण्याचें एक वैशिष्टथ आहे. मनुष्य- प्राण्यांच्या समूहाला समाज ही संज्ञा आहे. या समाजाचें जीवन शक्य तितकें सुलभ व्हावें यासाठीं अनेक परंपरागत आचार निर्माण झाले आहेत आणि संस्था निर्माण करण्यांत आल्या आहेत, सहजीवनाच्या संवयीमुळेंच विवाह, शिक्षण, शासनपद्धति इत्यादि संस्थांची आवश्यकता भासून त्या अस्तित्वांत आल्या आहेत. सहजीवनांत लोकांचा अनेक कारणांनीं एकमेकांशी संबंध येतो, अनेक गोष्टींत एकजुटीनें वागण्याची त्यांना आवश्यकता भासते. असें असल्यामुळें ज्याज्या साधनांनी सामा- जिक व्यवहार व्यवस्थित होऊन समाजाची प्रगति होईल तींतीं साधनें उपयोगांत आणणे हें मानवी जीवनाचें एक मूलभूत तत्त्वच बनलें आहे. या साधनांत भाषा या नांवानें परिचित असणान्या साधनाला बरेंच वरचें स्थान द्यावें लागेल, विवाहादि संस्थाप्रमाणें भाषा ही देखील एक पर- परागत सामाजिक संस्था आहे, म्हणून सामाजिक संस्थांचे सामान्य नियम तिलाहि लागूं पडतात, भाषेचा अभ्यास करतांना तिचें हैं सामाजिक स्वरूप आपण एकसारखें लक्षांत ठेवलें पाहिजे. परंपरागत अशा एका विशिष्ट ध्वनिसमुच्चयानें एक विशिष्ट कल्पना व्यक्त करण्याचा संकेत पाळणारा मानवसमूह म्हणजेच एक विशिष्ट भाषा बोलणारा समाज. प्रत्येक भाषेची परंपरा ही त्यात्या समाजापुरती मर्यादित असते, परंतु सहजीवनाचें सर्वश्रेष्ठ आणि अपरिहार्यं साधन म्हणून ध्वनींच्या साहानें व्यवहार चालवणें हें बहुतेक सर्व ज्ञात मानवसमाजांत रूढ असल्यामुळें आणि बाह्यतः परस्परमिन्न वाटणाऱ्या संस्कृतीमागील मानवी जीवन आर्थिक गरजा, भावना, आकांक्षा, या व इतर बाबर्तीत विलक्षण सारखें असस्यामुळें मनोगत व्यक्त करण्याचें साधन म्हणूनः उपयोगांत आणल्या जाणान्या वेगवेगळ्या भाषांच्या अभ्यासानंतर सर्व भाषांना लागूं पडणाररी

Page 33

८ ध्वनिविचार

तत्वें भाषाशास्त्रज्ञांनीं शोधून काढलीं आहेत, ध्वनींच्या साह्यानें बनविलेले संकेत वापरून व्यवहार चालवणे हें सर्वं भाषांमध्यें आढळणारें आद्य तत्व आहे; म्हणून ध्वनींचा अभ्यास ही भाषाशास्त्राचें यथार्थ ज्ञान करून देणारी पहिली, सर्वोत आवश्यक आणि अपरिहार्यं गोष्ट आहे.

सर्व प्राण्यांमध्यें मनुष्याचें श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारीं दोन कारणें आहेत. एक त्याच्ा हात, दुसरें त्याची भाषाशक्ति. स्वंतःच्या हाताचा मनुष्य वाटेल त्याप्रमाणें उपयोग करूं शकतो. त्याला झाडावरचें फळ हवें असेल तर हातांत काठी घेऊन तो तें पाडूं शकतो. पक्ष्याप्रमाणें चोचीचा प्रहार करून किंवा जनावराप्रमाणें चावा घेऊन त्याला त्या फळावर असल्या जागींच हल्ला चढवावा लागत नाहीं. तो तें अप्रत्यक्ष रीतीनें मिळवूं शकतो. त्याच्या हाताच्या विशिष्ट रचने- मुळें हैं शक्य झालेलें आहे. माणसाची बौद्धिक प्रगति इतकी झालेली आहे की साध्यप्रासीसाठीं त्याला स्वतःला साध्याकडे जावें लागत नाहीं; साधनाचा उपयोग करून तो तें गांढूं शकतो. भाषाशक्ति हें अशाच प्रकारचें दुसरें एक साधन आहे. आपल्या मनांतली इच्छा ध्वनिरूप साधनानें मनुष्य दुसऱ्याकडे व्यक्त करूं शकतो आणि आपलें इच्छित मिळवूं शकतो. साधनाचा उपयोग करून साध्य गांठणें हें मनुष्याच्या श्रेष्ठत्वाच्या बरील दोन कारणांमागील सामान्य तत्व होय, साधनाचें महत्व मनुष्याच्या जीवनांत इतकें आहे कीं नव्या साधनांचा शोध लावणें अथवा ती निर्माण करणें या दृष्टीनें मानवजातीचा होत राहिलेला विकास हाच मानवी संस्कृतीचा खरा इतिहास होय, असें म्हणण्यास हरकत नाहीं. व्याक्ति स्वतःचें साध्य मिळवण्यासाठी जें साधन हुडकून काढते त्याचें स्वरूप अनिक्वित असणें शक्य आहे. झाड़ावरचें फळ पाडण्यासाठी कोणी काठीचा उपयोग करील, दुसरा एखादा अचूक नेम मारून तें दगडानें पाडील, तर तिसरा स्वतच झाडावर चदून तें हातानें तोडून घेईल,

Page 34

ध्वनिनिर्मिति

पण व्यक्तीच्या व्यबहारांत असणारें हैं स्वातंत्र्य सामाजिक जीवनांत नसतें, सामाजिक जीवनाची सफलता सर्वोनी एकाच प्रकारच्या साधनांचा उपयोग करण्यावर अवलंबून असते, या सर्वमान्य साधनाला सामाजिक संस्था असें म्हणतात. एक विशिष्ट समाज एका विशिष्ट भाषेचा उपयोग करून आपले व्यव- हार करत असतो, भाषा हा प्रत्येक समाजाचा परंपरागत वारसा आहे. त्यांतले संकेत सर्वानी पाळले पाहिजेत. त्यांत व्यक्तिस्वातंत्रयाला वाव नाहीं; म्हणून वरील विवेचनाच्या आधारानें भाषा ही देखील एक सामाजिक संस्था आहे हैं कबूल करावें लागेल. ही सामाजिक संस्था आपलें कार्य कसें करते हैं आपणांला पहायचें आहे. समजा की तहान लागल्यामुळें आपणाला पाणी पिण्याची आवश्यकता भासली, तर आपणाला पाणी हवें आहे ही इच्छा आपण ध्वनिरूप साधनानें दुस्याकडे व्यक्त करूं शकतों व ती पुरी करून घेऊं शकतों. या कार्यमालिकेंतले सर्व टप्पे आपण पाहूं : तहान लागतांच पाणी पिण्याचा विचार मनांत येतो; तो सफल व्हावा अशी इच्छा त्यानंतर निर्माण होते; त्यामुळें ती दुसऱ्याला कळविण्याचा प्रयत्न घडून येतो; त्या प्रयत्नाचा परिणाम ध्वनिरूपानें मूर्त स्वरूपाला येणें याचें नांव भाषा. परंतु ध्वनिरूपानें व्यक्त केलेला विचार जोंपर्यत श्रोत्याला ऐकूं गेलेला नाहीं तोंपर्येत वक्त्यानें आरंभलेलें कार्य-रहणजे ध्वनिरूपानें भपलें मनो- गत दुसन्याला कळवण्याचा प्रयत्न-पूर्ण झाले असे म्हणंतां येणार नाहीं. ध्वनिरूप विचार ऐकूं येणें याला श्रुति असें म्हणतात, तो श्रोत्याला कळणे याचें नांव आकलन. भाषेचा सर्वोगीण अभ्यास करण्यासाठी विचार, इच्छा, प्रयत्न, भाषा, श्षति आणि आकलन या. तत्त्त्वांचें योग्य ज्ञान करून घेतलें पाहिजे, येथे हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं वक्त्याच्या विचाराचें आकलन केवळ तो ऐकून होत नाही, तर ज्या ध्वनिपरेंपरेचा तो उपयोग करतो ती श्रोत्याच्या परिचयाची असली तरच हें आकलन होणें शक्य आहे. वक्ता आणि श्रोता एकाच ध्वनिपरंपरेचा उपयोग करणारे, म्हणजे एंकच भाषा बोलणारे व समजणारे असले पाहिजेत ..

Page 35

ध्वनिविचार

या ठिकाणीं मात्र यांतल्या एकाच तत्वाचा विचार करायचा आहे. सें ग्हणजे ज्या साधनानें विचार व्यक्त होतात तें साधन, अर्थात् ध्वनि. कर्णेद्रियावर एक विशिष्ट प्रकारची संवेदना. घडवणाऱ्या वायुलहरींना ध्वनि असें म्हणतात. पदार्थविज्ञानशास्त्राच्या नियमानुसार अनेक प्रकारे या लहरी निर्माण होण्याची शक्यता असते; परंतु घड्याळाची टिकटिक, पक्ष्यांची किलबिल, ढगांचा गडगडाट, झाडांचीं पानें सळसळण्यामुळें होणारा आवाज, धातूवर आघात होऊन उत्पन्न झालेल्या नादलहरी, इत्यादि ध्वनी: भाषाशास्त्राच्या क्षेत्रांत येत नाहींत. आपलें मनोगत व्यक्त करण्याच्या हेतूनें मनुष्याध्या तोंडांतून बाहेर पडणाऱ्या ध्वनींचाच विचार या शास्त्रांत केला जातो, म्हणून या ध्वनीचें पृथकरण व वर्गीकरण करणें, तो निर्माण कसा होतो हैं पहाणें आणि तो जेथें निर्माण होतो, त्या मनुष्याच्या अवयवांचा परिचय करून घेणें, ही ध्वनीचें योग्य ज्ञान होण्याला लागणारी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ज्या अवयवांचा आणि नैसर्गिक साधनांचा उपयोग करून मनुष्य ध्वनि निर्माण करतो न्यांना ध्वनियंत्र ही संज्ञा आहे. या यंत्राची हालचाल कशी घडते, त्याचे महत्त्वाचे भाग कोणते आणि ध्वनीत भेद उत्पन्न होण्याचीं कारणें कोणतीं ययाचा विचार ध्वनीचें मूलभूत स्वरूप समजण्यासाठी केला पाहिजे. एखादा ध्वनि ऐकल्यानंतर पूर्वपरिचय असल्यास तो कोणत्या घट- कांचा बनलेला आहे, हैं स्थूलमानानें आपणाला सांगतां येतें. राम (उच्चारांत राम्) हा शब्द उच्चारतांच त्यांत र, आ, म् हे तीन मूलभूत ध्बनी आहेत; किंवा सीता या शब्दांत सू, ई, त, आ हे चार मूलभूत ध्वनी आहेत, हें सामान्यपर्णे कोणताहि सुशिक्षित मनुष्य सांगूं शकेल, या मूलभूत ध्वर्नीचें यापेक्षां अधिक पृथकरण करणें श्रोत्याला शक्य नसतें, अशा रीतीनें बाह्यतः एका ठराबिक मर्यादेपलिकडे ज्यांचें अधिक परृथकरण करणें शक्य नसतें त्या अविभाज्य ध्वनीना वर्ण असे म्हणतात. अशा रीतीनें ध्वनीचें पृथकरण जरी श्रोत्याकडून होत असलें तरी त्याचा याहून अधिक अभ्यास करण्यासाठीं ध्वनि जेथें निर्माण होतो तेर्थेंच, म्हणजे

Page 36

ध्वनिनिर्मिति ११

वक्त्याच्या ध्वनियंत्राकडेच, आपणाला लक्ष दिलें पाहिजे; कारण ध्वनी- तील भेद समजण्याचें कार्य जरी कानांकडून होतें, तरी उच्चाराच्या दष्टीनें त्यांत असलेले फरक बोलणान्या व्यक्तीच्या ठिकाणीच आपणाला सांपडतात. वेगवेगळ्या ध्वनीचें स्वतंत्रपणें पूर्ण ज्ञान होण्यासाठीं ध्वनि:

घेतली पाहिजे. यंत्राच्या रचनेच्ी आणि हालचार्लींची सूक्ष्म माहिती आपण करून

येथें बोलणें व ऐकणें या दोन क्रियांनी ध्वनिव्यापाराचीं दोन टोकें- प्रारंभ व शेवट-दर्शवली जातात, म्हणून आपण आ्धी त्यांचें स्वरूप थोडक्यांत समजावून घेऊं.

नावें लागतें: ध्वनि निर्माण झाल्यापासन तो ऐकूं बेईपर्यंत त्याला तीन अवस्थांमधुन

निर्मिति किंवा उक्ति म्हणजे वक्त्यानें ध्वनि निर्माण करणें; हृति म्हणजे तो वक्त्याच्या तोंडापासून श्रोत्याच्या कानांपर्यत जाऊन रपोंचणें; आणि श्रुति म्हणजे तो श्रोत्यानें ऐकणें. मनुष्य मुका असेल तर निर्मिति होणार नाहीं, म्हणजे तो बोळूं शकणार नाहीं, बोलणारा, व ऐकणारा एकमेकापासून फार अंतरावर असतील तर हृति होणार नाहा, म्हणजे.वक्त्याचा आवाज श्रोत्याच्या कानांपर्येत जाऊन पोंचणार नाईीं. वक्ता ज्याच्याशी बोलतो तो मनुष्य बहिरा असेल तर श्रति होणार नाही, म्हणजे वक्त्याचें बोलणें त्याला ऐकूं येणार नाहीं. यांपैकीं हृति आणि क्ति यांचा विचार भाषाशास्त्रांत होत नाहीं, फंक्त निर्मितीचाच होतो. ध्वनियंत्राच्या साह्यानें मनुष्याला कोणकोणते वर्ण निर्माण करतां येतात, ते कसे निर्माण होतात व त्यांचें वर्गीकरण कसें करायचें या गोष्टींचा सामान्य विचार भाषाशास्त्राच्या ज्या शार्खेत • करण्यांत येतो तिला ध्वनिविचार असें म्हणतात. हा अभ्यास कोणत्याहि एका विशिष्ट भार्षेतील ध्वनींचा नसतो. एका. विशिष्ट भारषेतीळ ध्वनींचा

Page 37

१२ ध्वनिविचार

विचार त्या भाषेच्या व्याकरणाकडून होत असून अशा अभ्यासाला वर्णविचार हें नांव आहे. श्वासोक्छ्ासाच्या नैसर्गिक क्रियेचा उपयोग करून मनुष्य ध्वनि निर्माण करतो, शरीराच्या ज्या भागांत हवा खेळते ते सर्व भाग आणि या भागांशी ज्यांचा निकटचा संबंध येतो ते सर्व अवयव, हीं ध्वनिनिर्मि- तीचीं आणि ध्वर्नीतील भेद दर्शविण्याचीं मूलभूत साघनें आहेत. छाती व पोट, फुप्फुसें, श्वासनलिका, कंठ, घसा, तालुपट, तोंड आणि नाक, हे ध्वनियंत्राचे मुख्य घटक आहेत. श्वासोच्छ्रास चालं असतांना हवा फुप्फु- सांत सांठविण्याचें आणि बाहेर सोडण्याचें काम एकसारखें चालूं असतें. प्रथम उच्छासावरोबर नाकपुख्यांच्या वाटेनें हवा टाळूच्या वर अस- लेल्या नाकाच्या पोकळींत येते. तेथून ती तालुपटाच्या (म्हणजे पडजी भेच्या) मागील घशांत येते. तेथून कंठप्रदेशांत आल्यावर तिच्यापुढें दोन मिन्न मार्ग उभे रहातात. त्यांपैकीं एक गळ्याच्या पुढभ्या भागाला असून त्यांतून हवा फुप्फुसांत प्रवेश करते; याला श्वासमार्ग असें म्हणतात, याच्याच मागच्या बाजूला दुसरा मार्ग असून या मार्गोतून आपण खाललेलें अन्न आंतड्यांत प्रवेश करतें; याला अन्नमार्ग ही संज्ञा आाहे. अन्न तोंडा- बाटे अनमार्गोत उतरत असता जिमेच्या मागील टोंकाला असलेलें जिह्वा- मूल खालीं दाबलें जाऊन श्वासमार्गाचा रस्ता.बंद करतें; त्यामुळें जेव- तांना पुढे सरकणारें अन्न श्वासमार्गोत शिरुन श्वासावरोध करू शकत नाहीं, जेवणें व बोलणें या क्रिया एकदम चालूं ठेवल्यास कित्येकदां अन्नाचे कण श्वासमार्गोत जाऊन ठसका लागतो ही गोष्ट सर्वाच्या अनु- भवार्चा आहे. फुष्फुसांत सांठवलेली हवा श्वासनलिकेंतून परत वर येऊन तोंडावार्टे बाहेर नेण्यांत आली तरच ध्वनिनिर्मिति होऊं शकते. पण श्वासोक्कासाच्या नैसर्गिक क्रियेत नाकावाटें श्वासमार्गोत येणारी ब. परत नाकावाटें बाहेर पडणारी हवा तोंड़ांत कशी आणतां येईल, याची माहिती आपण आर्धी करून घेतली पाहिजे.

Page 38

तातुशिखर नाकाची पोक नी तालुपट जीभ

जिव्हामूल मोर्गान्यीची पोककी कपड गंाथ ऑरिटेनॉइड ग्रंथि ग्रंथि किकॉइड किकाइड ग्रंथि कण्ठ मुख श्वासमार्ग मुखयन्न (आकृति 2)

[पान नं. १२ ]

Page 40

ध्वनिनिर्मिति १३

आपण ज्यावेळीं श्वास आंत घेतों त्यावेळी नाकपुडी आणि नाकाची पोकळी या मार्गानी तालुपटाच्या मागच्या बाजूनें हवा श्वासमार्गात प्रवेश करते. तालुपट आड आला नसता तर कांहीं हवा तोंडांतहि गेली असती. परंतु तालुपट हैं घसा व तोंड़ यांना विभागणारें एक दार असून तें पाहिजे तेव्हां उघडता येतें व बंद करतां येतें, श्रास चालूं असतांना तालु- पट खालीं लोंबत असतो आणि हवेची तोंडाकडे जाण्याची वाट बंद असते. हा तालुपट मागच्या बाजूनें बर नेऊन बाहेर पडणाऱ्या हवेचा नाकाच्या पोकळींत प्रवेश करण्याच्ा मार्ग आपण पूर्णपणें बंद करूं शकतों किंवा थोडी हवा नाकावार्टे व थोडी तोंडावाटें जाईल अशा रीतीनें आपणाला तो अर्घवट बंदहि करतां येतो.

दिसून येईल. यावरून तालुपटाची हालचाल व्वनिनिर्मितीला अपरिहार्य आहे हैं

हवा तोंडांत येऊन जो ध्वनि निर्माण करते त्याचें स्वरूप तोंडांतील अवयवांच्या हालचालीवर अवलंबून असतें. म्हणून आधीं आपण या अवयवांचा परिचय करून घेऊं. तालुपटाकडून आरंभ करून ओठांच्या दिशेनें जात जात आपण तोंडाची वरची बाजू पाहूं लागलों तर सर्वात आ्धीं तालुपटाला लागून असलेला टाळूचा मऊ भाग येतो१. हा टाळूचा सर्वात मागचा भाग असून त्याला मृदुतालु अथवा अंततालु असें ग्हणतात. याच्यानंतर टाळूचा सर्वात उंच व खोलगट असा मध्यभाग येतो; त्याचें नांव मध्यतालु किंवा तालुशिखर. याहून जरा पुढे येतांच दांतांपूर्वी येणारा टाळूचा कठीण भाग लागतो; याचें नांव पूर्वतालु किंवा कठिनतालु. चावण्याच्या दांतांच्या मुळारशी आणि कठिनतालूला प्रारंभ होण्यापूर्वी अर्धवर्तुलाकृति चिन्हाच्या माळेचा एक प्रदेश आहे; या प्रदेशाला दंतमूलें अ्षसें म्हणतात. दंतमूलांनंतर वरचे दांत लागतात. वरच्या व खालच्या दांतांना आच्छादणारे ओठ उजव्या व डाव्या बाजूला ज्या ठिकाणी एकमेकांना मिळतात त्या बिंदूंना ओष्ठसंधि असें नांव आहे. खालच्या दांतांना लागूनच अधोदंतमूलें आहेत. तोंड बंद असून श्वासोक्कास चालला

Page 41

१४ ध्वनिविचार

असता खालील चावण्याच्या दांतांना जिमेचें टोंक लागलेलें असतें, या टोकाला जिव्हाम हैं नांव असून त्याच्या मागील बाजूला दाढांपर्येत पस- रलेल्या जिमेच्या बाकीच्या भागाला जिव्हापृष्ठ असें म्हणतात. तौंडांतील इतर सर्व अवयर्वापेक्षां जिमेची हालचाल ही अधिक विविध प्रकारची व अधिक महत्वाची आहे, आणि तोंडांतून बाहेर पडणाऱ्या हवेला अडवून घरण्याचें काम ती ओठांइतकें पूर्णपणें करत नसली, तरी तोंडांत वेगवेगळ्या ठिकाणी हवेला कमी अधिक प्रमाणात अडथळा करून ध्वनीच्या उच्चा- रांत ती असंख्य भेद निर्माण करूं शकते; म्हणून उच्चारभेद समजन घेण्याच्या अभ्यासांत जिमेची हालचाल ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. जिमेच्या सर्वात मागच्या भागाला जिव्हामूल म्हणतात. जिव्हामू- लाच्या बाजनें श्वासमार्गोत प्रवेश करतांच गळ्याच्या पुढे असलेली कंठग्रंथि लागते. ही पुरुषांच्या बाबर्तीत विशेष प्रामुख्यानें दिसून येते. कंठग्रंथीच्या मागच्या बाजूस दोन मांसपिंड असन हे मांसपिंड व कंठग्रंथि यांच्या दरम्यान स्वरनालिका वसलेल्या आहेत, स्वरनालिका एकंदर चार असून त्या उजवीकडे एकाखालीं एक व डावीकडे एकाखरालीं एक अश्या आहेत. यपिकीं फक्त खालच्या दोन स्वरनालिकांतच् कंप निर्माण करण्याचें सामर्थ्यं असल्यामुळें त्यांना खन्या स्वरनालिका अशी संज्ञा आहे. वरच्या व खालच्या स्वरनालिकांतील पोकळीला मोर्गान्यीची पाकळी असें म्हण- तात. स्वरनालिकांच्या या पोकळींतून हवा ये-जा करत असते. श्वासोच्छवास चालूं असतांना (१) हवा नाकावाटे ये-जा करत. असते, (२) तोंड बंद असतें, (३) ताखुपट खाली लोंबत असतो आणि (४) स्वरनालिका स्तब्ध असतात. मनुष्य बोलूं लागतांच (१) हवा तोंडाबाटे बाहेर जाऊं लागते, (२) तोंडांतील अवयवांची हालचाल सुरूं होते, (३) तालुपट खालीं लोंबत रहातो किंवा वर जातो आणि (४) स्वरनालिका स्तब्ध रहातात किंवा कंपयुक्त होतात.

Page 42

  • जिन्हामूल

कषग्रंथि वरच्या स्वर नालिका मोर्गान्यीची पोकळी. खालच्या स्वरनालिका -- क्रिकाइडु श्र्ासमार्ग.

स्वरनालिका (मागच्या बाजूनें) (आकृति ३) [पान नं. १४ ]

Page 44

ध्वनिनिर्मिति १५

उच्चार करता येण्यासारख्या ध्वनींची संख्या या चार तत्त्वांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संयोगावर अवलंबून राहील; पण नीट विचार केला तर आपल्या लक्षांत येईल कीं यांतल्या तीन तत्वांचें आपणाला निश्चित ज्ञान आहे. हवेचें बहिस्सरण एकाच प्रकारचें असतें, तालुपटाच्या वाग- ण्याचे प्रकार दोन : खालीं लोबत रहाणें किंवा वर जाणें. स्वरनालि- कांच्या वागण्याचे प्रकारहि दोन : स्तब्ध रहाणें किंवा कंप पावणें, मात्र चवथें तत्व हैं अतिशय अनिश्चित स्वरूपाचें आहे. या ठिकाणी ओठ, दांत, दंतमूलें, कठिनतालु, मृदुतालु, तालुशिखर, जिव्हाय, जिव्हा- पृष्ठ, या सर्वोच्या वेगवेगळ्या हालचार्लीनी व स्पर्शस्थानांनी असंख्य प्रकारचे ध्वनी निर्माण होतात. पण तत्वतः मनुष्याच्या ध्वनियंत्राकडून निर्माण होऊं शकणान्या सर्व ध्वनींची माहिती देणें ही जवळजबळ अशक्य गोष्ट आहे.'धवनींचा अभ्यास व वर्गीकरण कसें करावें, याची दिशाच ध्वनिविचारांत दाख- बली जाते; म्हणून कोणत्याहि विशिष्ट भाषेचें व्याकरण अथवा इतिहास लिंहूं इच्छिणाऱ्या अभ्यासकानें ध्वनिनिर्मितीच्या मुळाशी असलेली तच्वें नीट समजावून घेऊन मगच स्वभार्षेतील ध्वनींची चर्चा केली पहिजे.

सोपें होईल. वरील गोष्टी नीट लक्षांत घेतत्या तरच पुढील विवेचन समजणें

फुष्फुसांत असलेली हवा स्वरनालिकांत कंप उत्पन्न करून तोंडांतूनं बाहेर पडूं लागली म्हणजे एक प्रकारचा ध्वनि ऐकूं येतो. स्वरनालिका स्वब्ध ठेवूनि हवा अशा रीतीनें बाहेर लोटतां येते, पण त्यामुळें निर्माण झालेला ध्वनि पहिल्या ध्वनीपेक्षां कठोर वाटतो. हवेचा लोट तोंडाबाहेर पडून उत्पन्न झालेल्या या ध्वनीला प्राण असें म्हणतात. त्यापैकीं पहिला प्राण हा स्वरनालिकांत कंप उत्पन्न करून निर्माण होत असल्यामुळें त्याला सकंप (किंवा संस्कृत व्याकरणाच्या भार्षेत म्हणायचें झालें तर मृदु) प्राण असें म्हणतात, हा संस्कृत भार्षेतला ह होय. दुसऱ्या प्राणाच्या वेळी स्वरनालिका स्वब्ध असतात, म्हणून त्याला निष्कंप (किंवा संस्कृत व्याकरणाच्या परिभाषेप्रमाणे कठोर) प्राण अशी संज्ञा आहे. हा संस्कृत

Page 45

१६ ध्वनिविचार भार्षेतळा विसर्ग होय, घ, ध, भ, वगैरे मृदु म्हणजे सकंप व्यंजनांत सांपडणारा प्राण हा सकंप प्राण किंवा श्वास होय. ख, थ, फ बगैरे कठ़ोर म्हणजे निष्कप व्यंजनांत सांपडणारा प्राण हा निष्कंप प्राण किंवा विसर्ग होय. विसर्ग म्हणजे कठोर ह आणि श्वास म्हणजे मृदु ह. स्वरनालिकांत कंप उत्पन्न करून होणारे ध्वनी मृदु आणि स्वरनालिकांत कंप उत्पन्न न करतां होणारे ध्वनी कठोर. तौंडाची हालचाल किचित् बदलून स्वरनालिकांत कंप सुरूं असतांना आणखी एक प्रकारचा ध्वनि आपणाला निर्माण करतां येतो. मात्र ह- च्या उच्चाराच्या बेळीं ज्याप्रमाणें हवा मोठया प्रमाणांत आणि जोरानें बाहेर पडते त्याप्रमाणें ती या ध्वनीच्या उच्चारांत पडत नाहीं, हवा एका ठराविक प्रमाणांत बाहेर पडत राहून तिच्या सांठयाच्या प्रमाणांत आप- स्याला या ध्वनीचें उच्चारण चालूं ठेवतां येतें, अशा रीतीनें ह्वेचा प्रवाह जितका वेळ आपणांला बांहेर सोडतां येईल तितका वेळ हा ध्वनि चांलूँ रहातो, ग्हणून या ध्वनीला (म्हणजे स्वराला) प्रवाही ध्वनि असें म्हणतात. प्रवाह हें सर्वं स्वरांचें वैशिष्टथ आहे, शिवाय सर्व स्वर सकंप- ही असतात, म्हणून स्वर हे सकंप (ग्हणजे मृदु) आणि प्रवाही (म्हणजे कमी अधिक वेळ उच्चारतां येणोर अथवा हस्वदीर्घ) ध्वनी होत. आता अशी कल्पना करा की फुप्फुसांतली हवा तोंडांत येतांयेतांच ओठ मिटले गेले, हवेला अडथळा उत्पन्न झाला; इतक्यांत ओंठ एकदम उघडले जाऊन हवा बाहेर पडली, तर जो ध्वनि उत्पन्न होईल त्याला (म्हणजे या उदाहरणांतत्या पला ) व्यंजन असें म्हणतात. बाहेर पड- णारी हवा वार्टेत अडवली गेव्यामुळें या ध्वनीला एक विशिष्ट आवाज प्राप्त झाला, म्हणून अड्थळा हैं व्यंजनांचें वैशिष्टय होय, उच्चार होप्यापूर्वी हवा ज्या ठिकाणी अद्वली जाते त्या ठिकाणाला त्या व्यंज- नाचें स्पर्शस्थान ग्हणतात. पयां उ्चारांत हवा ओठांकडून अडवली गेली असल्यामुळें पचें स्पर्शस्थान ओठ हैं होय आणि प्रत्येक व्यंजनाचें

Page 46

प घर्षक फ घर्षक स (झ)

(आकृति ४) (आकृति ५) (आकृति ६)

[पान ने. १७,२३] [पान नं. २४ ]

Page 48

ध्वनिनिर्मिति १७

वर्गीकरण त्याचें स्पर्शस्थान लक्षांत घेऊन करण्यांत येत असल्यामु्ळे प ओष्ठवर्गातलें किंवा ओष्ठथ व्यंजन होय. वर्णाची विभागणी स्वर आणि व्यंजनें या दोन वर्गात करण्याची प्रथा आहे. वस्तुतः ध्वनि या सामान्य नांवानें दर्शविल्या जाणाप्या स्वर आणि व्यंजन या वर्गाना विभागणारी निश्चित रेषा काढणें कठीण आहे. शिवाय कित्येक वर्ण स्थानपरत्वें स्वर किंवा व्यंजन यांपैकीं कोणतीहि भूमिका करूं शकत असल्यामुळें या दोहोंतील भेद पुष्कळदां मूलभूत नसून कार्यविषयक असतो, हें उघड आहे, आणि पुढील विवेचनांत योग्य ठिकाणीं हें दाखवूनहि देण्यांत येईल; मात्र स्वर आणि व्यंजनें यांतला जो ठळक भेद वर सांगितला त्या मेदाच्या (म्हणजे ध्वनीच्या उच्चारांत कर्मीत कमी आणि अधिकांत अधिक अडथळा यांच्या) प्रमाणानुसार या वर्णात एक प्रकारचा अनुक्रम नकी करता येतो, या क्रमानुसार मिळा- 1 लेलीं वर्णमालिकेचीं दोन टोंकें एकमेकाहून स्पष्टपणे मिन्न आहेत असें दाखवून देतां येतें. अडथळा शून्य आ (इतर सर्वं वर्ण) (व्यंजन)

(स्वर) ! या दिशेनें अडथळ्याचें अडथळा पूर्ण ।प्रमाण वाढत चाललें आहे. प प्रथम ज्यांत अडथळा मुर्ळींच नाहीं असें या मालिकेचें टोंक आपण घेऊं. अशी कल्पना करा कीं तोंड पूर्ण उघडलें आहे, जीभ जागच्या जारगी स्वस्थ पडून आहे, तालुपट वर गेला आहे. तोंड पूर्ण उबडें असल्यामुळें तोंडांतून बाहेर पडतांना हवेला अडथळा होणार नाही; तालुपट वर गेल्यामुळें हवा श्वासमार्गोतून तोंडांत येतांना तिला अडथळा होणार नाहीं; आणि जीभहि जागच्या जागीं पडन असल्यामुळें हवेला तोंडांतल्या तोंडांत अडथळा होणार नाहीं, अशा परिस्थितीत स्वरनालिकांत कंप उत्पन्न झाला आणि हवा तोंडाबाहेर पडली तर आ हा स्वर निर्माण होईल. परंतु तोंड पूर्ण मिटलें आहे, जीभ जागच्या जागीं स्वस्थ पडून आहे आणि ताछुपट वर गेला आहे, अशी आतां कल्पना करा, अशा वेळीं स्वर- ध्व.वि .... २

Page 49

१८ ध्वनिविचार

नालिका निष्कंप राहून हवा एकदम तौडात आली तर तिला बाहेर जाण्याचा मार्ग (म्हणजे तेाड) पूर्णपणें बंद असल्याचें आढळून येईल, तोंड पूर्णपणे चंद. असणें हा सर्वोत मोठा अडथळा होय; तो दूर करून हवा एकदम बाहेर पडली तर प हें व्यंजन निर्माण होईल. रच्यांत उद्धाटन किंवा तोंडाचें उघडणें (म्हणजे हवेला बाहेर जाण्याची वाट) शून्य आहे अशा प या वर्णाकडून ज्यांत उद्धाटन पूर्ण आहे अशा आ या वर्णांकडे आपण क्रमाक्रमानें गेलों, तर वाटेत आपणांला इतर सर्व वर्ण भेटतील. प हें व्यंजन उच्चारतांना हवेला झालेला अडथळा ओठांकडून झाला होता; म्हणून प या व्यंजनाला ओष्ठथ व्यंजन म्हणतात आणि ओठां- कडूने हवेला अडथळा निर्माण होऊन त्याचा उच्चार होतो यासाठीं ओठ हैं त्याचें स्पर्शस्थान आहे असें म्हणतात. कोणत्याहि वर्णाचा उच्चार होण्यापूर्वी हवा ज्या ठिकाणी अंशतः अथवा पूर्णतः अडवली जाते त्या ध्वनियंत्राच्या भागाला त्या वर्णाचें स्पर्शस्थान मानतात. पण जिमेकडून अडथळा होऊनहि एखादा वर्ण निर्माण होऊं शकतो; अशा वर्णाच्या उन्चाराच्या वेळीं ज्या भागाला जिमेचा स्पर्श होऊन ध्वनि उत्पन्न होतो, तो भाग त्या वर्णाचें स्पर्शस्थान होय. जीम ही तोंडांत पसरलेली आहे, ती अनेक प्रकारच्या हालचाली करूं शकते आणि म्हणून तिला अनेक प्रकारचे ध्वनी निर्माण करता येतात. दांत, दंतमूलें, टाळूचे वेगबेगळे भाग, यांना तिचा स्पर्श होऊन जी व्यंजनें निर्माण होतात, त्यांचा उच्चार होण्यापूर्वी हवा दांत, दंतमूलें, इत्यादि ठिकाणी अडवली जाते; म्हणून या ठिकाणांना त्या त्या व्यंजनांचीं स्पर्शस्थानें ग्हणतात; व या स्पर्शस्थानांवरूनच या व्यंजनाना दंत्य, दंतमूलीय, तालव्य हीं नांवें देण्यांत आरली आहेत. पण व्यंजनांचा अधिक विचार करण्यापूर्वी त्यांच्या उच्चाराला आव- श्यक अशा हालचालींची आपण माहिती करून घेऊं. :प्रथम हवा फुप्फुसांतून बाहेर निघते. श्वासनलिकेंतून तोंडांत येतांच ती ओठांकडून किंवा तोंडांतल्या इतर कोणत्यातरी भागी जिभेकडून

Page 50

ध्वनिनिर्मिति १९

अडवली जाते आणि यानंतर ताबडतोब किंवा कांहीं वेळानंतर हा अड- थळा दूर करून ती बाहेर पडते. म्हणजे या उच्चारणक्रियेंत पुढीलप्रमाणें तीन टप्पे आहेत: (१) फुप्फुसांत सांठविलेली हवा तोंडाबाहेर पडण्यापूर्वी कुठेंतरी अडबली जाणें. याचें नांव स्तंभन. (२) अडवलेली हवा धरून ठेवणें. याचें नांव धृति. (३) धरून ठेवलेली हवा अडथळा दूर करून बाहेर पडणें. याचें नांव स्फोट. म्हणून स्फोट हें ज्या व्यंजनांचें वैशिष्टय आहे त्या व्यंजनांना स्फोटक असें म्हणतात.२ प, त, क, हीं स्फोटक व्यंजनें होत. सामान्यतः स्फोटकाच्या उच्चारांत स्तंभनामागून ताबडतोब स्फोट होतो. धृति (म्हणजे अडवलेली हवा धरून ठेवण्याची कालमर्यादा) जबळ जवळ शून्य असते. प किंवा त यांसारख्या साध्या स्फोटकाचा उच्चार करून पाहिला म्हणजें हैं चटकन् आपल्या लक्षांत येईल. धृति म्हणजे अडवून ठेवलेल्या व्यंजनाचा स्फोट होण्याला लागणारा काळ. जरी हा काळ साध्या स्फोटकांत जवळजवळ शून्य असतो तरी त्त, पप, क, इत्यादि व्यंजनयुग्मांत तो आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. अति व अत्ति या दोन शब्दांत उच्चारदष्टथा फरक इतकाच कीं पहिल्या शब्दां- तील त धृतिशून्य आहे, म्हणजे या शब्दांतील त न्या उच्चारासाठीं अडबलेली हवा ताबडतोब सोडून द्यावी लागते; दुसऱ्या शब्दांतील त ची धृतिमर्यादा कानाला उमगणारी असते आणि अडवून धरलेल्या हवेला आपण (तिच्या सांठयाच्या प्रमाणांत) पाहिजे तितका वेळ थोपवूं शकतों. कोणत्याहि वर्णाची धृतिमर्यादा वाढवणे म्हणजे तो वर्ण दीर्घ करणें. ज्या वर्णांची धृतिमर्यादा कर्मीत कमी म्हणजे जवळजबळ शुन्य आहे त्याला व्हस्व म्हणतात३ अत्ति या शब्दामधला त हा अति या शब्दा- मधल्या त पेक्षां दीर्घ आहे; हाच या दोन तमधला फरक, यावरून व्यंज- नयुग्म म्हणजे एकच व्यंजन दोनदां उच्चारणें नसून एकाच व्यंजनाची धृति वाढवून त्याचा दीर्घ उच्चार करणें हें होय.

Page 51

२० ध्वनिविचार

जर स्तंभन हें व्यंजनावर> हें चिन्ह काढून आपण व्यक्त केलें आणि धृति व स्फोट यांना ... व < हीं चिन्हें आपण दिलीं, तर अति व अ़त्ति यांतला फरक आपणाला पुढें दिल्यात्रमाणें दाखवतां येईल. x< अति: अत्इ

अत्ति: अतइ < aVA धृति म्हणजे वर्णाच्या टच्चाराला लागणारी कालमर्यांदा होय हैं दाख- वून दिव्यानंतर स्तंभन व स्फोट यांमधील भेद आपण उदाहरणांनीं स्पष्ट करून घेऊं. एखाद्या स्फोटकाचा उच्चार होण्यापूर्वीच्या सर्व क्रिया घडून आल्या आणि लगेच आपण तोंडाचे अवयव दुसऱ्या स्फोटकाच्या स्पर्शस्थानी आणले, तर हा भेद स्पष्टपणे लक्षांत येतो. अशी क्पना करा की ह्वेच्या बहिस्सरणाच्या वेळीं जिभेचें टोंक वरच्या दांतांवर दाबलेलें आहे; स्वर- नालिका स्तब्ध असून तालुपट वर गेलेला आहे; इतक्यांत जिव्हापृष्ठाचा स्पर्श जर मृदुतालूला झाला आणि हवा लगेच तोंडाबाहेर पडली (म्हणजे स्फोट झाला), तर त्क हं संयुक्त व्यंजन आपणाला मिळेल, यांतील त चा स्फोट झालेला नाहीं, कारण त्याचें स्तंभन चालूं असतांनाच क ला लागणारी उच्चारक्रिया घडून आलेली आहे; आणि क हा तच्या मागून आलेला असल्यामुळें त्याचाच काय तो स्फोट झालेला आहे. तचें केवळ स्तंभनच झालेलें असल्यामुळें त्याला स्तंभित व्यंजन म्हणतात आणि कचा स्फोट झालेला असल्यामुळें त्याला स्फुट व्यंजन म्हणतात. यांपैकी स्तभित व्यंजन धृति बाढवून दीर्घ करतां येतें; स्फुट व्यंजन मात्र धृतिशून्य असतें, आपण स्वीकारलेल्या चिन्हांच्या मदतीनें हें व्यंजन पुढीलप्रमाणें व्यक्त करतां येईल. >>< त्क : त् कू अ > `x< उत्कट: (उ) त् ... क् (अट)

Page 52

ध्वनिनिर्मिति २१

याच्या उलट असें समज या की वरील परिस्थिर्तीतच जिव्हापृष्ठाचा स्पर्श मृदुतालूला झाला असतांनाच जीभ खालीं येऊन जिव्हाय वरच्या दांतांवर दाबलें गेलें आणि लगेच स्फोट घडून आला तर क्त हैं संयुक्त व्यंजन निर्माण होईल, यांतील क स्तंभित असून त स्फुट आहे. हें आप- णाला खालीं दिल्याप्रमाणें दाखवतां येईल. > >< क्त : क् त् अ > >< रक्त : (र) क् --- त् (अ) शब्दाचे अवयव पाडण्याच्या कार्मी त्याचप्रमाणे कालांतरानें एकाच भार्षेतील ध्वनीचें परिवर्तन कसें घडून येतें हें नीट समजण्या्या कामी उच्चारपद्धतीच्या या मूलभूत तत्वांचें ज्ञान असणें अपरिहार्य आहे. वरती ह्वेच्या बहिःसरणाला सर्वात मोठा अडथळा उत्पन्न करणारें प हें व्यंजन कसें निर्माण होतें तें आपण पाहिलें. ओठ एकाच ठिकाणी मिट्ूं शकत असल्यामुळें ओष्ठथ व्यंजन हें सर्वत्र एकाच प्रकारचें असतें; पण जीभ ही वाटेल तशी हलवतां येत अस्यामुळें: आणि तिच्या वेगं- वैगळ्या भागांचा स्पर्श तोंडाच्या वेगवेगळ्या भागांना होऊं शकत अस- स्यामुळें तिच्या हालचालींनी उत्पन्न होणाऱ्या दोन महत्वाच्या व्यंजनात अनेक सूक्ष्म भेद निर्माण करता येतात. यापैकीं जिव्हाग्राचा स्पर्श वरच्या दांतांना किंवा त्यांच्या जवळच्या प्रदेशाला करून पहिल्या प्रकारचें व्यंजन निर्माण होतें. हैं दंत्य व्यंजन होय. जिव्हापृष्ठाचा स्पर्श टाळूच्या कोणत्याहि भागाला होऊन जें व्यंजन निर्माण होतें तें ताळव्य व्यंजन होय. प्रथम दंत्य व्यंजनांचा आपण विचार करूं, जिमेचें टोंक वरच्या दांतांवर दाबलें जाऊन नंतर स्फोट झाला तर त हैं व्यंजन निर्माण होतें. या व्यंजनाच्या उच्चारणांत जिभेच्या टोंकाचा स्पर्श प्रत्यक्ष दांतांनाच होत असल्यामुळें हैं खरें दंत्य व्यंजन होय. यापेक्षा जीम जरा वर जाऊन तिचें टोंक दतमूलांना लागलें आणि मग स्फोट झाला तर टहा उच्चार

Page 53

२२ ध्वनिविचार

ऐकूं येईल, हा दंतमूलीय ट होय, मराठींतला ट दंतमूलीय आहे. दंत- मूलांपासून तों थेट तालुशिखरापर्येत टाळूच्या वेगवेगळ्या भागांना जिभेच्या टोंकाचा स्पर्श करून अनेक प्रकारचे ट निर्माण करतां येतात; त्यांपैकीं तालुशिखर हैं ज्याचें स्पर्शस्थान आहे. अशा टला संस्कृत व्याकरणांत मूर्धन्य ही संज्ञा आहे. विवेचनाच्या सोयीसाठीं हें मूर्धन्य व्यंजन आपण ढ़ या अक्षरानें व दंतमूलीय व्यंजन ट असें दर्शवूं, तालव्य व्यंजनांतहि तीन महत्वाचे प्रकार आहेत. तालुपट आणि तालाशेखर यांच्या मधव्या भागाला जिव्हापृष्ठाचा वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श होऊन हे प्रकार निर्माण होतात. जिमेचा पृष्ठभाग तालुपटाजवळील टाळूच्या सर्वात मऊ भागाला लागून होणारा पहिला प्रकार, याला मृदुतालव्य किंवा तो टाळूच्या शेवटच्या भागांत होत असल्यामुळें अंततालव्य असें म्हणतात. अरबी भाषेतील क (प) अंततालव्य आहे. या मऊ भागाच्या अलिकडील भागाला जिव्हापृष्ठाचा स्पर्श झाला म्हणजे मध्यतालव्य क. बहुतेक भारतीय आर्य भाषांतील क या प्रकारच्ा आहे. यालाच संस्कृत व्याकरणांत कंठ्य असें नांव आहे.परंतु आतां- पर्येतच्या विवेचनावरून कोणतेंहि व्यंजन केवळ कंठांत उत्पन्न होणें शक्य नाहीं ही गोष्ट दिसून येण्यासारखी आहे. म्हणून शास्त्रीय विवेचनांत हें नांव न वापरणेंच योग्य ठरेल. जिमेचा पृष्ठभाग याहून अलिकडच्या म्हणजे तालुशिखराजवळच्या भागाला लागून उच्चारला जाणारा पूर्वतालव्य क होय. या भागाला जिव्हापृष्ठ लावून स्फोट करणें अतिशय कठीण आहे. हा स्पर्श ढिला राहिला तर कित्येकदां जिभेचें टोंक दांतांबर दाबलें जाऊन एकदम स्फोट होतो. आणि मग हा दंत्य स्फोट म्हणजे त आणि त्यामागून जीभ व टाळू यांमधुन निसटून आलेली हवा म्हणजे तालव्य सीत्कार श यांच्या मिश्रणानें तयार झालेलें च हें व्यंजन आपणाला मिळतें. है तीन प्रकारचे तालव्य उच्चार कानाला उमगण्यासारखे असल्यामुळें

Page 54

ध्वनिनिर्मिति २३

पाठथपुस्तकांत फक्त त्याचाच निर्देश केला जातो. परंतु जिमेच्या पृष्ठभागानें तालुशिखरापासून तालुपटापर्येत टाळूला कोठेंही स्पर्श करून तालव्य स्फोट- कांचे असंख्य सूक्ष्म प्रकार निर्माण होणें शक्य आहे; आणि, बाह्यदुष्टया दोन भाषांतला तालव्य स्फोटक कित्येकदां एकाच प्रकारचा वाटला तरी स्पर्शस्थानाच्या दृष्टीनें त्यामध्यें निश्चित अंतर आहे असें ध्वनिलेखनांत दिसून येतें. स्फोटकांच्या वर्णनावरून हैं दिसून येईल कीं त्यांचा उच्चार होण्या- पूर्वी हवा तोंडांतील एका विशिष्ट ठिकाणी पूर्णपणें अडवली जाते; या अडथळयाला आपण स्तंभन असें म्हणतों. पण आतां अशी कल्पना करा कीं स्फोटकांच्या निर्मितींत होणारें हें स्तंभन जरा अपुरें राहिलें आहे; म्हणजे स्तंभन चाललें असतांहि स्पर्शस्थानांतील ढिलाईमुळें हवा थोड्या- बहुत प्रमाणांत बाहेर जातच राहिली आहे. अशा परिस्थिर्तीत जें व्यंजन उच्चारलें जाईल तें निर्मेळ स्फोटक असणार नाहीं; कारण थोडी वाट मिळालेली हवा तोंडांतील अवयवांना घासून, म्हणजे त्यांच्यार्शी घर्षण करून बाहेर पडेल, या व्यजनांना घर्षक हें नांव आहे. थोडक्यांत घर्षक म्हणजे घर्षणयुक्त स्फोटक, घर्षकांच्या उच्चारांच्या वेळीं चालूं असणारें ह्वेचें बहिस्सरण तिच्या पुरवठयाच्या प्रमाणांत कमी अधिक वेळ चालूं ठेवतां येतें, म्हणून ते अवधियुक्त किंवा धृतियुक्त आहेत असें ग्हणतात; शुद्ध स्फोटकांचा उच्चार चटकन् करावा लागत असल्यामुळें ते अवधि- रहित किंवा धृतिशून्य म्हटले जातात. हे अवधियुक्त घर्षकहि स्फोटकांप्रमाणें अनेक प्रकारें निर्माण होऊं शकतात, परंतु येथें मात्र कांहीं महत्वाचेच घर्षक दिले आहेत. प चा उच्चार चालला असता दोन ओठांमध्यें अग्दी बारीक फट राहून उच्चारला जाणारा ओष्ठथ घर्षक प. बरचे दांत खालच्या ओठांबर दाबले जाऊन हवा बाहेर जात राहि- ल्यामुळें उच्चारला जाणारा दंत्यौष्ठ घर्षक फ. इंग्रर्जीर्त या अक्षरानें हा दाखवला जातो. जिभेचें टोंक वरच्या व खालच्या दांतांना लागून उच्चारला जाणारा

Page 55

२४ ध्वनिविचार

दंतमध्य घर्षक थ. इंग्रजीतील three या शब्दांत th असा लिहिला जाणारा. पुष्कळदां वरच्या दांतांना होणारा स्पर्श अगदी थोडा असतो. स, श व ष हेही घर्षक असून त्यांना सौत्कार अशी संज्ञा आहे. यापैकीं स हा दन्त्य सी्कार आहे. त्याचा उच्चार होतांना जिमेचा पुढचा भाग खोलगट होतो, जिमेचें टोंक खालच्या दांतांवर दाबलें जातें, जिमच्या कडा बरच्या दांतांना लागतात आणि जिभेच्या पृष्ठभागावरून वहात येणारी हवा दंतमूलांना स्पर्श करून बाहेर पडते. जिमेच्या हालचार्लींत किंचित् फरक करून या सीत्काराचे अनेक भेद निर्माण करतां येतात. श हा सी्कार तालव्य वर्गोतला आहे. त्याच्या उच्चाराच्या बेळीं बरचीं दंतमूले जिमेच्या टोकाजवळ येतात; म्हणजे हीं दंतमूले व जिव्हाग् यांत एक बारीक फट रहाते. जिमेचा पृष्ठभाग मागे सरकून टाळूच्या अगदी जवळ येतो आणि जिमेच्या कडा, वरच्या दाढ़ा व त्यांच्या जव- ळचीं दंतमूलें यांच्यावर घट्ट दाबल्या जातात. जिभेचें टोंक अधिकाधिक वर नेऊन या सीत्कारांत आणखी भेद निर्माण करता येतात,तें तालुशि- खराला लागलें म्हणजे मूर्धन्य सीत्कार ष निर्माण होतो. तालव्य स्फोटकांच्या स्तंभनांत ढिलाई झाली तर तालव्य घर्षक ख निर्माण होतो. आरबी, जर्मन, वगैरे भाषांत तो सांपडतो. अर्थांत् या तालव्य घर्षकांची स्पर्शस्थानें तालव्य स्फोटकांइत्कींच असणार हैं उघड आहे. पण या वर्गातील साधारपणें आढळून येणारा घर्षक अंततालव्यच असतो. यापूर्वीच हवेचा लोट तोंडाबाहेर पडून होणाऱ्या प्राण नांवाच्या ख्वनीचा उल्लेख आला आहे. हा प्राणदेखील घर्षकच आहे; कारण घर्षण न करतांच हवा तोंडांतून बाहेर पडली तर कोणताच आवाज उत्पन्न होणार नाहीं. कठिनतालूपासून कंठापर्येतच्या कोणत्याहि भागाशी या हवेचे घर्षण होऊन ध्वनिनिर्मिति होणें शक्य असल्यामुळें अशा प्रकारचे सर्व ध्वनी प्राण या सदरांत येतील, केवळ बहिस्सरणानें होणाऱ्या आवा- जाला विसर्ग ही संज्ञा आहे.

Page 56

द्रव वर्ण- मराठी र्

ताल न्य-श (आकृति ८)

(आकृति ७) [पान नै. २५]

Page 58

ध्वनिनिर्मिति २५

द्रववर्ण या नांवानें ओळखले जाणारे र व ल हे ध्वनी आणि या ध्वनीचे विविध प्रकार हेसुद्धां घर्षकच आहेत. ल चा उच्चार करतांना जिभेचें टोंक वरचे दांत व दंतमूलें यांच्या- र दाबलें जातें आणि जिव्हापृष्ठ अशा रीतीनें वर उचललें जातें कीं तोंडाचा मघला भाग बंद होतो. आणि बांध घातलेल्या पाण्याप्रमाणें हवा जिमेष्या दोन बाजूंच्या कडांनी वहात जाते, हाल दंत्य हाय. जिभेचें टोक जरा वर जाऊन टाळूला लागल्यास तालव्य ळ निर्माण होतो. हा मराठींतला ळ होय. याहूनही वर जाऊन जिमेचें टोंक तालुशिखराला लागलें तर मूर्धन्य ळ उच्चारला जातो. अर्थात दंत्य ल व भूर्धन्य ळ यांच्या दरम्यान जिभेचें टोंक कुठेंहि लागून या द्रववर्णांचे अनेक सूक्ष्म भेद निर्माण होतात. र या घर्षकाचा उच्चार करतांना जिव्हापृष्ठ टाळूकडे जरा कमी उचललें जातें, जिमेचें टोंक दंतमूलांपासून ताडशिखरापर्येतच्या टाळूच्या चेगवेगळ्या भागांना स्पर्श करतें, जिमेच्या कडा वरच्या दाढांना लाग- तात आणि जिभेत कंप सुरूं होतो. मराठींतल्या रचा उच्चार दंतमूलीय आहे, तर संस्कृतचा मूर्धन्य म्हणजे जिभेचें टोंक तालुशिखराला स्पर्श करून होणारा आहे. या शिवाय जिभेचें टोंक खालच्या दातांना लावून आणि जिव्हापृष्ठ कमी अधिक प्रमाणांत वर नेऊन, तसेंच जिमेच्या कडांनी दोन्ही बाजुंच्या खालच्या तीन दाढांना स्पर्श करूनहि एक र उच्चारतां येतो. र व ल हे सर्व भाषांत सांपडतात असें नाहीं. चिनी भार्षेत र हा वर्ण नाही, तर अवेस्तामध्यें ल आढळत नाहीं. इंग्रजीत अवयवाच्या शेवर्टी येणारा I आतां उच्चारांतून नाहींसा झाला आहे आणि परिणार्मी मागचा स्वर पुष्कळदां दीर्घ झाला आहे : father, order. :- अर्धस्वर या नांवानें ओळखले जाणारे य आणि व हे वर्णहि घर्षकच् आहेत. ज्याप्रमाणे ख (सख्त मघला), थ (three मधला) फ (father मघला), हे घर्षक क, त, प, या स्फोटकांचे मिळते वर्ण

Page 59

२६ ध्वनिविचार

आहेत, तसेच य आणि व हे अर्धस्वर इ आणि उ या संवृत स्वरांचे मिळते वर्ण आहेत. याशिवाय आणखी एक घर्षक असून तो थ या अक्षरानें अथवा h हें अक्षर उलटें करून दाखवला जातो. त्याचा मिळता सवर डॅ हा फ्रेंचमध्यें 4 व जर्मन भार्षेत # असा लिहिला जातो. यच्या उच्चाराच्या वेळीं वरचे व खालचे दांत एकमेकांच्या अगर्दी जवळ येतात, ओछठसंघी किंचित् मागें सरकून दोन ओठांमध्यें थोडें अंतर रहातें, जिमेचें टोंक खालच्या दांतांवर थोडेंसें दाबलें जातें आणि जिमेथ्या कडा टाळूच्या दोन्ही बाजूला अशा रातीनें दाबल्या जातात की तोंडांत येणान्या हवेला आपल्या स्पर्शस्थानापर्येत म्हणजे पूर्वतालूपर्येत येऊन पोंचण्यासाठीं टाळूच्या मध्यरेषेवरून जाणारी एक चिंचोळी वाटच राहते, यामुळेंच घर्षण होतें आणि य हा धर्षक उत्पन्न होतो. जिभेच्या कडांचा दाब अगरदी सैल असता तर ह्वेच्या बहिस्सरणाचा मार्ग अधिक चंद झाला असता आणि घर्षण व अडथळा कमी होऊन इ हा स्वर उच्चारला गेला असता. उलटपक्षीं याच परिस्थिर्तीत जिन्हापृष्ठ टाळूच्या अगदी जवळ आलें असतें आणि जिमेचें टोंक खालच्या दांतांबर दाबलें गेलें असतें व नंतर स्फोट झाला असता तर हा दंत्य स्फोटक आणि त्यामागून येणारा तालव्य घर्षक यांच्या मिश्रणानें त् + श हा अर्धस्फोटक (सकंप असत्यास द् + झ्) आपणाला मिळाला असता. वच्या उच्चाराच्या वेळीं दांतांमधील अंतर अधिक असते, जीभ मार्गे सरकून वचा स्पर्शबिंदू जो तालुपट त्याच्या सपाटीला येते, जिमेच्या i.

टोंकाचा खालच्या दांतांच्या मुळांना स्पर्श होतो, ओठ वर्तुलाकार होऊन पुढें सरकतात. जीभ जरा खालीं येऊन घर्षण जरा कमी झालें असतें तर उ हा स्वर उच्चारला गेला असता. उलटप्क्षी वची तयारी होऊन उच्चारापूर्वी ओंठ पूर्णपणें मिटले गेले असते तर घर्षक निर्माण न होतां हवेला झालेल्या अडथळ्यामुळें शुद्ध स्फोटक निर्माण झाला असता. ग्हणजे व ऐवर्जी प (सकंप असल्यास ब) ऐकूं आला असता. स्फोटक व घर्षक यांच्या दरम्यानदेखील एक महत्वाचा वर्णप्रकार

Page 60

ध्वनिनिर्मिति

आहे. घर्षकांच्या उच्चारांत स्तंभन व ह्वेचें बहिस्सरण एकाच वेळीं होतें आणि त्यांच्या स्फोटाला लागणारी कालमर्यादा आपण कमीअधिक करूं शकतों, पण या वर्णप्रकारांत तसें नसतें. येथें हवा बाहेर जाऊं लागली न लागली तोंच स्फोट होतो. म्हणून हा पुरता स्फोटकहि नाहीं, कारण यांत स्तंभनाच्या बरोबरच हवेचें बहिस्सरण सुरूं झालेलें असतें; परंतु हा परता घर्षकहि नाहीं, कारण ह्वेच्या बहिस्सरणाला प्रारंभ होतांच येथें स्फोट करावा लागला आहे. हवेचा लोट घेऊन बाहेर पडणान्या या स्फोटकांना अर्धस्फोटक असें म्हणतात. घर्षकांचा उच्चार स्वरांच्या उच्चाराप्रमाणें कमीअधिक वेळ चालूं ठेवतां येतो, ते अवधियुक्त असतात म्हणून ते स्वरांना जवळचे आहेत. अर्धस्फोटकांचा उच्चार एकदम करावा लागतो त्याला एक निश्चित कालमर्यादा आहे, म्हणजे ते अवधिरहित आहेत आणि त्यामुळें ते स्फोटकांना अधिक जवळचे आहेत. अर्धस्फोटकांमध्यें स्फोट आणि घर्षण या दोन तत्वांचें मिश्रण अस- ल्यामुळें ते स्फोटक व घर्षक या दोन प्रकारच्या वणानी बनलेले आहेत, त्यामुळें त्यांना स्वतंत्र वर्ण न म्हणतां संयुक्त वर्ण ग्हणणेंच योग्य ठरेल. आपल्या भार्षेत ख, थ, फ इत्यादि एकाक्षरानें दर्शविलेले ध्वनी हे वस्तुतः अर्धस्फोटक असून ते कह, त्ह, प्ह, या उच्चारांचे निदर्शक आहेत, अशाच प्रकारें बनलेल्या म्ह, न्ह, व्ह इत्यादि अक्षरांत वस्तुस्थिति दर्शवणारें द्विवर्णलेखन स्पष्ट असल्यामुळें आपली दिशाभूल होत नाहीं. ज्या ध्वनींत स्फोट व घर्षण किंवा घर्षण व स्फोट यांनी बनलेल्या संयुक्त वर्णाचा एकदम उच्चार होतो ते सर्व ध्वनी अर्धस्फोटक या सदरांत येतात. ग्हणुन ख, थ, फ यांच्याप्रमाणें प्र, क्र, म्य, क्ष, त्स, प्य, त्व आणि स्प, स्क, इम, ष्ट, इत्यादि ध्वनीहि अर्धस्फोटकच आहेत. च, छ, ज, व झ या अक्षरांनी मराठींत दर्शवले जाणारे ध्वनी हे शुद्ध वर्ण नसून वरील तत्वानुसार तयार झालेले अर्धस्फोटक आहेत. च या अक्षरानें मराठीत दोन उच्चार दर्शवले जातात. एक चार, चिवडा, इत्यादि शब्दांतला तालव्य उच्चार आणि दुसरा चुना, चार इत्यादि शब्दांतला दंत्य उच्चार.

Page 61

२८ ध्वनिविचार

यांपैकीं तालव्य च हा त या दंत्य स्फोटकाबरोबर श या तालव्य घर्षकाचा उच्चार होऊन बनलेला आहे; म्हणजे तो ला आहे. अथात् तश या लेखनानें दर्शवलेला उच्चार पूर्णपणे च होत नाहीं; पण त्याबरोबरच ध्वनिविषयक प्रयोगांनी हेंहि सिद्ध केलें आहे कीं च हा ध्वनि अर्धस्फोटक असून त आणि श यांच्या मिश्रणानें बनलेला आहे. ocho (ओचो) या स्पॅनिश शब्दाचें ध्वनिमुद्रण करून ध्वनिमुद्रिका उलटी फिरवल्यावर ओश्तो असा उच्चार ऐकूं येतो, हैं प्रथम पॉल पासी या फ्रेंच ध्वनिशास्रज्ञांनी दाखवून दिलें, शिवाय कालमापन यंत्राच्या मदतीनें असेंहि आढळून आलें कीं चच्या उच्चाराला लागणारा सरासरी वेळ एक स्फोटक व एक घर्षक यांना लागणाऱ्या सरासरी वेळेच्या बेरजेइतका म्हणजे दोन वर्णोना लागणान्या वेळेइतका असतो, आतां त्श हा स्फोटक घर्षक व च हा अर्धस्फोटक यांतल्या उच्चारांत जो भेद आहे तो कोणता? पहिली गोष्ट म्हणजे त्शच्या उच्चारांत दोन वर्ण वेगवेगळे ठेवण्यांत आले आहेत तर चच्या उच्चारांत ते एकजीव झालेले आहेत, पहिल्याच्या उच्चाराचा कालावधि यामुळें किचित् अधिक झाला असुन दुसन्यांत तो कर्मीत कमी आहे. पहिला उच्चार सामान्यतः एका अवयवाच्या शेव्टी येणारा त आणि त्यानंतरच्या अवयवाच्या सुरुवातील येणारा श यांच्या मिश्रणानें ह्ोतो: उदा. सात शेव््या, तो घरांत शिरला, या ठिकाणी ऐकूं येणारा रश आणि चार, चिवडा यांतला च यांत हा भेद दिसून येतो. : म्हणून ता याला संयुक्त वर्ण आणि च या ध्वनीला अर्धस्फोटक म्हणणें योग्य ठरेल. याच चच्या ताबडतोब माणून हवेचा लोट आला तर छ (त्+श- +हू) हा त्रिवर्णदशक ध्वनि मिळतो. चुना, चारा, इत्यादि शब्दांत दिसून येणारा दंत्य अर्धस्फोटक च हा त्+स् यांच्या संयोगानें तयार झालेला आहे. संस्कृत भार्षेत च या तालव्य अर्धस्फोटकाचा मिळता त हा संयुक्त वर्ण नाहीं, तर्सेंच त्स या संयुक्त चर्णाचा मिळता अर्थस्फोटक चहि नाहीं; पण चच्या तालव्य आणि दंत्य उच्चाराला लागणारी सर्व साधनें त्या भार्षेत आहेत. कालप्रवाहांत

Page 62

ध्वनिनिर्मिति २९

ध्वनींची उत्क्रांति होतां होतां मराठींत त्स चा मिळता अर्धस्फोटक तयार झाला. या साध्या ऐतिहासिक सत्याची जाणीव ध्वनिविचाराच्या तात्विक ज्ञानाच्या अभावामुळें आपल्याकडील विद्वानांना झाली नाहीं आणि मगर हा च मराठी भार्षेत कुटून आला यासंबंधीं स्वैर तर्क सुरूं झाले, चचा प्राणमिश्रित उच्चारहि (तरह) कांही ठिकार्णी ऐकण्यांत येतो. इच्छा हा शब्द इत्सहा असा उच्चारला गेलेला सांपडतो. पण एकंदरीत हा उच्चार मराठींत दुर्मिळच आहे. वरील सर्व व्यंजनांना, म्हणजे रफोटक, अर्धस्फोटक व घर्षक यांना, स्वरांच्या जबळ ओढण्याचा मार्ग म्हणजे स्वरांच्या अ्गी असणारा एक अपरिहार्य गुण या व्यंजनांत आणणें, तो गुण म्हणजे ध्वनीच्या उच्चाराच्या वेळीं स्वरनालिकांत कंप उत्पन्न करणें, सर्व स्वर हे स्वरनालिकांत कंप उत्पन्न करून उच्चारले जातात; हा कंप व्यंजनोच्चारणाच्या वेळी झाल्यास ही सर्व व्यंजनें स्वरांप्रमाणे सकंप म्हणजे मृदु बनतील आणि क त प इत्यादि निष्कंप किंवा कठोर व्यंजनांऐवर्जी ग द ब बगैरे मृदू व्यंजनें आपल्याला ऐकूं येतील. मुख्य कठोर वर्ण आणि त्यांचे मिळते मृदु वर्ण पुढीलप्रमाणे आहेत: क्क त प ट ग द ब ड x, th (three gh (अरबी 'बाघ' मघला th मधला) f (this मधला) V ख थफ ठ घध भ ढ च, 'छ ज, झ (झेंड्डू व झरा यांतला) श, स झ, झ (अनुक्रमें फ्रेंच j rose मधील 8) ह (निष्कंप) ह निष्कंप ह स्वतंत्रपणें वापरला जात नाहीं, त्याचप्रमाणें य रल हे वर्णहि स्वतंत्रपणें निष्कंप म्हणून आढळत नाहींत. अशा रीतीनें स्फोटक, अर्धस्फोटक, घर्षक, मृदु व्यंजनें या टप्यांनी आपण हळूंहळूं स्वरांध्या क्षेत्राजवळ येत चाललों आहोत. उच्चारांतील

Page 63

३० ध्वनिविचार

अडथळा कमी झाल्यास य आणि व या घर्षकांऐवर्जी इ आणि उ हे स्वर उत्पन्न होतात, हैं आपण पाहिलेंच आहे. याचप्रमाणें र आणि ल यांच्या स्पर्शस्थानांत ढिलाई उत्पन्न करून आतां आर्य भारषांतून नष्ट झालेले ऋ व ल हे स्वर मिळतील, अंशतः ते फ्रेंच chambre, semble या शब्दांच्या शेवटी आढळतात. अडथळ्याचें प्रमाण कमी झाल्यास य व र ल या व्यंजनांऐवर्जी इ उ ऋ ल हे स्वर निर्माण होतात, त्यामुळें या व्यंजनाना अर्धस्वर अथवा अर्धव्यंजनें म्हणणें अयोग्य होणार नाहीं. त्याचप्रमाणें अडथळा किंचित् वाढतांच इ उऋल यांर्ची व्यंजनें होत असल्यामुळें हे स्वर इतर स्वरांपेक्षां व्यंजनांना अधिक जवळचे आहेत ही गोष्ट उघड आहे. अर्धस्वरनंतर अ, आ, ए आणि ओ हे शुद्ध स्वर येतात. आ चा उच्चार कसा होतो हैं पूर्वी आलेंच आहे. आच्या उच्चा- राला लागणारें उद्घाटन जवळजवळ निम्म्यानें कमी करून अ हा स्वर ननिर्माण होतो. म्हणजे अ हा आचा वहस्व उच्चार नव्हे. दोन ओठांमधील अंतर कमीअधिक करून आच्या उच्चारांत अनेक भेद निर्माण करतां येतात, परंतु त्याचे महत्वाचे प्रकार दोन आहेत. आच्या उच्चाराला लागणारें तोंडाचें उघडणें जेव्हां कमीत कमी असतें, तेव्हां संवृत आ निर्माण होतो. हा तोंडाच्या पुढच्या भागांत होत अस- स्यामुळें त्याला पुढचा किंवा पूर्व आ असेंहि म्हणतात. तोंडाचें उघडणें जास्तींत जास्त होऊन उच्चारला जाणारा आ हा विव्ृत आ ह्ा नांवानें ओळखला जात असतो. त्याचें स्पर्शस्थान तोंडाच्या मारच्या भागांत आहे. त्यामुळें त्याला मागचा किंवा उत्तर आ असें म्हणतात. फ्रेंचमध्यें हे दोन्ही प्रकार आहेत. ह्यांपैकी संवृत आचा उच्चार विवृत एच्या जवळ असून विवृत आचा उच्चार वित्रुत ओच्या जवळचा आहे. एच्या उच्चाराच्या बेळीं तोंडांतील अवयव संवृत आच्या अवस्थेत असतात. पण वरचे व खालचे दांत अधिक जबळ येतात, ओष्ठसंधी किंचित् मागे सरकतात, जिभेचें टोंक खालच्या दांतांना जोरानें लागतें,

Page 64

आ ए 3

4 3

ओठ तालुपट

स्वरांचीं क्षेतरें (आकृति ९)

[पान नं. ३०]

Page 66

ध्वनिनिर्मिति ३१

आणि जिमेच्या कडा दाढांना लागतात. हा संवृत ए होय. मरार्ठीतला ए संबृत आहे. 1. दांतामंघलें अंतर यापेक्षा वाढलें, ओष्ठसंधी आणखी मागे गेले आणि जीभ खालच्या दांतांवर जोरानें दाबली गेली म्हणजे विवृत ए निर्माण होतो. मराठींत यांचें लेखन अ असें करतात. फ्रेंच, गुजराती बगैरे भाषांत हे दोन्ही प्रकारचे ए सांपडतात. ओचा उच्चार करतांना जिभेचें टोंक खालचे दांत व दंतमूलें यांना लागतें, जिमेच्या मागच्या कडा वरच्या दाढांना स्पर्श करतात, ऊच्या उच्चाराला ओठ जितके पुढे येतात त्यापेक्षांहि यावेळीं ते अधिक पुर्ढे जातात. हा संवृत ओ होय. मराठींतला ओ संवृतच आहे. तोंडाचें उघडणें अधिक होऊन जीभ फक्त अधोदंतमूलांनाच लागली कीं विवृत ओ उच्चारला जातो. मराठींत याचें लेखन ऑ असें करतत. हे दोन्ही ओ फ्रेंच, इंग्रजी, बंगाली, इत्यादि अनेक भाषांत उपलब्ध आहेत. इ, उ,ए, ओ हे स्वर, य आणि व हे अर्धस्वर, तसेंच र् आणि ल् हे द्रववर्ण केवळ रवरांच्या ग्हणजे अ, आ, इ, उ, ए, ओ. यांच्या मागून एका झटक्यांत उच्चारले गेले की जो दोन स्वरांचा, एको्चारदर्शक संयोग होतो त्याला स्वरसंयोग असें म्हणतात. मराठींत फक्त ऐ व औ हेच संयुक्त स्वर मानले आहेत; परंतु बर दिलेल्या व्याख्येप्रमाणें आणखी कितीतरी संयुक्त स्वर मराठींत आढळतात. उदा०-देवळांत-कावळा पायद्ळ-सोंवळा-सोयरा-पेरणें-बोलणें इत्यादि शब्दांत असणारे एव्- आवू-आय्-ओब्-ओय्-एर-ओल हे समुच्चय एकोच्चारदर्शक स्वर- संयोग आहेत. संयोगांत आद्य स्वरावर आघात असून दुसरा आघात- रहित असतो. पाऊल या शब्दांतील ऊ आघातयुक्त आहे; पावलांवर या शब्दांत तो आघात नाहींसा झाला आहे. साधारणपणे इ व उ हे आघातरहित होतांच म्हणजे स्वरसंयोगाचे उत्तर वर्ण बनतांच ते व्यंजनाना अधिक जवळचे होतात आणि त्यांचा उच्चार य आणि व सारखा होतो.

Page 67

३२ ध्वनिविचार

या स्वरसंयोगाच्या उलट वर्णकम असूनहि स्वरसंयोग होऊं शकतो. आय् व आव् यांच्याच घटकांनी बनलेले या आणि वा हे देखील स्वर- संयोगच आहेत. यांतील पहिल्याला उतरता स्वरसंयोग असे नांव असून दुसऱ्याला चढता स्वरसंयोग हें नांव आहे. ए व ओ हे संयुक्त स्वर आहेत असें संस्कृत व मराठी व्याकरणांत शिकवलें जातें, पण या दोन्ही स्वरांत एकेकच् ध्वनि असल्यामुळें ते दोन्हीहि शुद्ध स्वर आहेत, हें वर दिलेल्या संयुक्त स्वरांच्या व्याख्येवरून दिसून येईल, ज्या काळीं ए हा अ आणि इ यांच्या संधीचा आणि ओ हा अ आणि उ यांच्या संधीचा निदरशक होता, एवढेंच नव्हे तर या दोन स्वरांचा उच्चार अनुक्में अय् व अवू असा होत असे, त्या काळींच त्यांना संयुक्त स्वर म्हणणें योग्य होतें. पूर्वी आयू व आव् उच्चार असणारे आणि लेखनांत ऐ व औ असे दर्शवले जाणारे संयुक्त स्वर आज ध्वनिपरिवर्तन होऊन अय व अब् असे उच्चारले जात आहेत. खुद्द संस्कृतमध्येंच पुढेपुढें अ +इ आणि आ +इ किवा अ + उ आणि आ + उ यांतला उच्चारमेद नष्ट झाला आहे: राम + ईश्वर, रमा + ईश, शीत + उष्ण, शारदा + उपासक, इत्यादि उदाहरणांवरून हें दाखवून देतां येईल, म्हणून संस्कृत व्याकरणानें केलेलें ध्वर्नीचें वर्गी- करण डोळे मिटून मराठीला लावण्यांत अर्थ नाहीं. संयुक्त स्वरांत मोडणारे आणखी एका प्रकारचे वर्ण अजून आप- ल्याला पहायचे आहेत. त्यानंतर वर्णाचें जरूरीपुरतें ज्ञान आपल्याला झालें असें म्हणतां येईल, आतांपर्येतच्या विवेचनांत बहिस्सरणाच्या वेळी तालुपढ़ बर जाऊन हवेची नाकाच्या पोकळींत शिरण्याची वाट बंद करतो असें गहीत घर- ण्यात आले होतें. पण टाळूचा पडदा खालीं लोंबत राहिला तर श्रास- नलिकेंतून तोंडाकडे जाणान्या हवेला अडथळा होतो, आणि ती तालु- पटाच्या मागच्या बाजूनें नाकाच्या पोकर्ळीत शिरते व तेथें नाद उत्पन्न करते, पण सामान्यतः हा अडथळा पूर्ण नसतो आणि थोड़ी हवा तोंबा-

Page 68

दापूमे द्ार ए अ आ ओ ऑ ओ 3

-नालुपर्ट

बंद ए (आकृति १०)

स्वरांचे स्पर्शनिंदू (आकृति 2२)

[पान नं. ३१]

Page 70

ध्वनिनिर्मिति ३३

वाटेही बाहेर पडते. अशा रीतीनें तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या हवेनें उत्पन्न केलेल्या ध्वनीला या नादाची साथ मिळून जो ध्वनि निर्माण होतो त्याला अनुनासिक वर्ण असें म्हणतात. हा नाद स्वरोच्चारणाच्या वेळीं झाला, म्हणजे स्वरोच्चार करतांना तालुपट खालीं लोंबत राहिला, तर अं आं इं उं एं ओं इत्यादी अनुनासिक स्वर आणि व्यंजनोच्चारणाच्या वेळीं झाल्यास इ, म, न, इत्यादि अनुनासिक व्यंजनें निर्माण होतात. तत्वतः सर्व व्यंजनांची अनुनासिक व्यंजनें बनणे शक्य आहे. उदा० बचा उच्चार होतांना तालुपट खालीं लोबत राहिला तर म हें अनु- नासिक उत्पन्न होतें. ब हा सकंप असस्यामुळें म हा देखील सकंप आहे. पच्या उच्चाराच्या बेळीं जर तालुपट खाली लोंबत राहिला तर जें अनु- नासिक निर्माण होईल तें पप्रमाणे निष्कंप असेल. स्कैडिनेव्हियन भार्षेत निष्कंप व्यंजनांमागून निष्कंप म येतो. पण एकंदरीत निष्कंप अनुनासिकें दुर्मिळच आहेत. सामान्यपणें उपलब्ध असणारी अनुनासिकें सकंप असून अवधियुक्त असतात. कंप आणि अवधि या दोन तत्वांमुळें द्रववर्णोप्रमाणें हीं अनु- नासिकेंहि स्वरांचें काम करूं शकतात. कित्येक भाषात हे स्वतंत्र स्वर असतात. इंडो-युरोपियन भार्षेत म आणि न हे स्वर होते असें तुलना- त्मक व्याकरणानें दाखवून दिलें आहे. यामुळें य आणि व या अर्धस्वरां- प्रमाणें त्यांचाहि उपयोग संयुक्त स्वर बनवण्याच्या कार्मी होतो. अनुनासिकांनंतरहि ही वर्णमालिका संपुष्टांत आलेली नाहीं. वर्ण ज्या तत््वांचे बनले आहेत त्यातली कांही तत्वें अनिश्चित प्रमाणांची असत्या- मुळें या अनिश्चिततेचा उपयोग करून वर्णात अनेक सूक्ष्म प्रमाणभेद निर्माण करतां येतात, त्यामुळें एकंदर वर्णसंख्या अगणित आहे. असें म्हणण्याला हरकत नाहीं. या अनिश्चित तत्वांत मुख्यतः दोन तच्ांचा समावेश होतो, एक अवधि आणि दुसरें कंपन, अवधि रहणजे कोणताहि वर्ण उन्चारण्याला लागणारा काळ, हा ध्व.वि .... ३

Page 71

३४ ध्वनिविचार

काळ एका विशिष्ट अवस्थेंतत्या व्यंजनांपुरता निश्चित असतो, पण कित्ये- कदां तो बाढवतांहि येतो. स्फोटक व्यंजन आणि स्तंभित व्यंजन यांच्यां- तला फरक दाखवतांना ही गोष्ट स्पष्ट करण्यांत आली आहे. घर्षकां- सारखीं कांही व्यंजनें आणि सर्व स्वर स्वभावतःच अवधियुक्त असतात हें पूर्वी आलेलेंच आहे. या वर्णाना प्रवाही ध्बनी असेंहि ग्हणतात. ते ज्या वेळीं कर्मीत कमी कालावर्धीत उच्चारले जातात त्या वेळीं त्यांना व्हस्व ही संज्ञा असून हा कालावधि जितका वाढवावा तितके ते दीर्घ होत जातात. या काळावधीच्या तत्वावर स्वरांमध्ये =हस्व व दीर्घ असे भेद करण्यांत आलेले आहेत, पण त्यामुळें त्यांच्या उच्चारांत इतर कोणताहि फरक घडून येत नाहीं. या तत्वानुसार अ, आ, इ, उ, ए, आणि ओ हे केवल स्वर व्हस्व किंवा दीर्ध उच्चारतां येतात, पण व्याकरणांत अ हा फक्त वहस्व, आ, ए, ओ हे फक्त दीर्घ आणि केवळ इ, उ हे काय ते -हस्व किंवा दीर्घ आहेत असे शिकवलें जातें, हैं वर्गीकरण वस्तुस्थितीला सोडन आहे. घर-घरें, दार-दारें यांतले अ व आ हे स्वर अनुक्रमें दीर्घ व ्हस्व आहेत. दोन्-दोरा, तेलू-तेरा, यांतत्या ओ व ए ह्या स्वरांनाहि हाच नियम लागूं पडतो. आपल्या लेखनपद्धतींत फक्त इ व उ हे स्वरच वहस्व व दीर्घ दाखवण्याची सोय असल्यामुळें आणि वर्णविचाराचें शिक्षण देतांना आपले व्याकरणकार सामान्यपणें संस्कृताचें अनुकरण करत असल्यामुळें हे दोष उद्भवतात. संस्कृत व्याकरणांत आ हा अ चा दीर्घ उच्चार सांगण्यांत आलेला आहे. म्हणजे या भार्षेत आपण मराठींत ज्याचा उच्चार अ करतो तो =हस्व आ असावा असे मानावें लागतें. मराठींतील अ व आ या दोन स्वरांमधला फरक अवधीचा, म्हणजे ते उच्चारण्याला लागणान्या काळाचा नसून उद्घाटनाचा म्हणजे उच्चाराच्या वेळीं होणान्या मुखविस्ताराचा आहे, हें पूर्वीच दाखवण्यांत आलें आहे. दोन व्हस्व इ मिळून होणारी इ ही दीर्घ इ असत्यामुळें, दोन अ मिळून होणारा आ हा दीर्घ अ होय

Page 72

ध्वनिनिर्मिति ३५

असें तर्कशास्त्र याच्यामागें दिसतें, अ+अ=आ हा नियम संस्कृत भाषे- पुरताच खरा आहे. छंदोरचर्नेत अ ला एक मात्रा व आ, ए, ओ यांना दोनदोन मात्रा आहेत, या नियमानेंहि =हस्वदीर्धत्वाचें कोणतेंच तत्त्व सिद्ध होत नाहीं. फक्त मराठी काव्यांत अ चा उच्चार नेहमीं व्हस्व व आ, ए, ओ यांचा नेहमीं दीर्घ असतो, एवढाच याचा अर्थ होईल, पण कवितेची भाषा उच्चारण्याची आणि तिच्यांतल्या अवयवांची संख्या मोजण्याची पद्धत अगदी स्वतंत्र आहे, म्हणून तिचे नियम व तत्वें तिच्या क्षेत्रा- पुरतींच मर्यादित समजलीं पाहिजेत. 1 स्वरोच्चारणाच्या वेळीं स्वरनालिकांत होणाऱ्या कंपाची गति कर्मी- अधिक करून आवाज खालींवर नेतां येतो. एका विशिष्ट कालमर्यादेत होणाऱ्या स्वरनालिकांच्या कंपनसंख्येवर आरोह किंवा अवरोह अवलंबून असतो. कित्येक भाषांत स्वरांच्या ्हस्वदीर्घत्वाला फारसें महत्त्व नसतें, स्थान- परत्वें एखरादा स्वर =हस्ब किंवा दीर्घ होतो अथवा हेतुपूर्ण आघातामुळें- हि एखादा =हस्व स्वर दीर्घ बनतो. 'हें कोणाचं पुस्तक आहे?' 'त्याचं.' 'त्याचं !' ह्या ठिकाणीं दुसऱ्या त्यामध्यें आलेली तीव्रता थोडी दीर्घत्वा- मुळें आणि थोडी आरोहामुळें म्हणजे आची कंपनसंख्या वाढल्यामुळें आलेली आहे. परंतु संस्कृतसारख्या कांहीं भाषा अशा आहेत कीं त्यांच्यांत =हस्व-दीर्घत्व हैं कित्येकदा अर्थफेर घडवून आणतें: सलिल-सलीलं, सिता-सीता, सुत-सूत, इत्यादि. अशाच रीतीनें आरोहाचा उपयोग अतिपूर्वेकडील भाषात फार मो्या प्रमाणावर करण्यांत येतो. एरव्हीं समवर्ण असणारे शब्द केवळ आरोहांत फरक करून अनेक अर्थ व्यक्त करूं शकतात. स्वरांमध्ये वैशिष्टथ उत्पन्न करण्यांचा दुसरा एक प्रकार ग्हणजेआद्य- स्वर उच्चारतांना कंठमुख एकदम उघडणें. यामुळें शब्दांतील इतर स्वरांपेक्षां आद्यस्वर अगर्दी वेगळा वाटतो. हा आद्यस्वराघात जर्मन भार्षेत स्पष्टपणें दिसन येतो.

Page 73

३६ ध्वनिविचार व्यंजनोच्चारणांत दोन विशेष प्रकार आढळतात. उच्चारणविधीर्शी संबंध असलेले स्नायु ताठ करून किंवा सैल ठेवून पहिला प्रकार निर्माण होतो आणि उच्चाराच्या वेळी कंठमुख कसीअधिक उघडलें गेल्यानें दुसरा प्रकार मिळतो. ज्या भाषांत स्नायूवरील दाब सरासरी राहतो तिच्यांतर्ली व्यंजनें संथ- पणे, स्वाभाविक व विनायास बाहेर पडत्यासारखीं वाटतात. संस्कृत भाषेचें उदाहरण या बाबतींत उत्तमपणे लागूं पडतें. याच्या उलट कांहीं भाषा बोलतांना स्नायु इतके ताठ होतात आणि ध्वनिनिर्मिति इतकी परिश्रमपूर्वक झाल्यासारखी वाटते कीं अशी भाषा ऐकतांना संस्कृत, फ्रेंच, इटालियन इत्यादी भाषांत आढळणाऱ्या मार्दवाऐवर्जी एक प्रकारची कठोरता आपल्या प्रत्ययाला येते. जर्मन भारषेत ही कठोरता विशेष दिसून येते.

निर्माण होतें. कंठमुखाच्या संकोचानें किंवा विकासानें व्यंजनांत आणखी वैशिष्टथ

  • कंठमुख संकुचित करून उच्चार केल्यास दोन्ही बाजंच्या स्वरनालि- कांतील अंतर साहजिकच कमी होतें, रफोटकाचा उच्चार करतांना जर तो कठोर असेल तर पुढे येणाऱ्या स्वराला लागणारा कंप उत्पन्न करण्या- साठी हा अंतराचा कमीपणा उपयोगी पडतो आणि जर तो मृदु असेल तर त्याला लागणारा कंप प्रारंभापासून निर्माण करणें शक्य होतें. पण कंठमुख विस्तृत असेल तर त्याला कठोर स्फोटकामाणून येणाऱ्या स्वराला लागणारा कंप किंवा मृदु स्फोटकाला ताबडतोब आवश्यक असणारा क्रंप वेळेवर होणार नाहीं; यामुळें पहिल्या प्रकारच्या (संस्कृत, फ्रेंच बगैरे भाषांच्या) उच्चारांत मृदु स्फोटक प्रारंभापासूनच सकंप असतात, तर दुसऱ्या प्रकारच्या (जर्मन, इंग्रजी बगैरे भाषांच्या.) उच्चारांत त्यांचा प्रारंभ कठोर स्फोटकांसारखा असून ते नंतर मृदु बनतात. कंठमुख विस्तृत केल्यानें दुसरा एक परिणाम घडून येतो, तो हा की तोंडहि त्या प्रमाणांत अधिक उघडें राहून स्वरनालिकांना न हलवता श्वास वन्याच मोठ्या प्रमाणांत बाहेर जाऊं शकतो. स्फोटकांच्या उच्चा-

Page 74

ध्वनिनिर्मिति ३७

राच्या वेळीं श्वास अशा रीतीनें बाहेर पडला म्हणजे केवळ स्फोटकां- ऐवजीं सप्राण स्फोटक निर्माण झाल्याचा भास होतो आणि क, त, प, इत्यादि स्फोटक किंचित् ख, थ, फ, असे ऐकूं येतात. आपल्या परिचयाच्या सर्वसाधारण वर्णाचें विवेचन आतां संपलें. पण आतांपर्यैत सांगितलेले वर्ण हवा तोंडाबाहेर जाऊन उत्पन्न झाले होते. याचा अर्थ असा नव्हे कीं हवा तोंडाबाहेर गेली नाहीं तर उच्चार होणार नाहीं. श्वास तोंडांतल्या तोंडांत ठेवून उच्चारनिर्मिति करण्याचा प्रयत्न केला तर खटक्यासारखा आवाज ऐकूं येतो. ह्वेचें बहिस्सरण न होता उत्पन्न झालेले हे वर्ण अंतःश्वास वर्ण या नांवानें ओळखले जातात. या तत्वानुसार ध्वनिनिर्मिति केल्यास जितके निःश्वास वर्ण आहेत तितकेच अंतःश्वास वर्णहि उत्पन्न होऊन एकंदर वर्णसंख्या आतांपर्यत होती त्याच्या दुप्पट होईल. हे वर्ण आफ्रिकेंतील कांहीं भाषांत आहेत असें म्हणतात. या वर्णोचा उच्चार आपण कित्येकदा उद्गारवाचकांसारखा करतों. टाळूला नीभ लावून केलेला द् ट् हा आवाज, सहानुभूति अथवा खेद दर्शवणारा च् च् हा आवाज, खाद्यपेयांवर ताव दिल्यानंतरचा अथवा त्या आधींचा समाधानदर्शक त् त् हा आवाज, अर्शी फारच थोडीं उदाहरणें आपल्या- कडेहि आढळतात.

Page 75

प्रकरण दुसरें ध्वनीचा भाषेत उपयोग ध्वनींचें पृथकरण करून त्यांतले अविभाज्य घटक कोणते आणि ध्वनियंत्राच्या कोणकोणत्या हालचार्लीनीं ते निर्माण होतात, याचें सामान्य विवेचन मागील प्रकरणांत करण्यांत आलें. ध्वनीच्या या अविभाज्य घट- कांना वर्ण अशी संज्ञा आहे. वर्णाचें स्वरूप समजन घेणें हें भाषेच्या अम्यासांतील आद्य तत्व आहे, कारण वर्णोचा उपयोग करून आपण कल्पना व्यक्त करणारे ध्वनिसमुच्चय निर्माण करतों. या ध्वनिसमुच्चयांना शब्द असें म्हणतात; हे शब्द वाक्यांत वापरून आपण आपले व्यवहार करतों. प्रत्येक वर्णांचा स्वतंत्रपणें पृथगभ्यास करणें ही ध्वनिविचाराची चात्विक बाजू झाली; पण वर्णाचें असें परस्परमिन्न अवस्थेंतील ज्ञान त्यांच्या व्यावहारिक अभ्यासाला फारसें उपयोगी पडणार नाहीं. अभ्या- साच्या सोईसाठीं जरी वर्ण आपण एकमेकांपासून वेगळे केले, तरी भार्षेत म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारांत ते स्वतंत्रपणें वापरले जात नाहींत. भार्षेत त्यांचें स्थान दुय्यम आहे; तेथें त्यांचा उपयोग शब्द निर्माण करण्याचें साधन म्हणून होत असल्यामुळें त्यांचा अभ्यास शब्दाचे घटक म्हणूनच केला पाहिजे, भाषेचें शास्त्र आणि तिचा इतिहास यांच्या दृष्टीनें हाच अभ्यास अत्यंत मार्गदर्शक आणि उपकारक ठरतो, एवढेंच नव्हें तर हाच त्यांचा 3 खरा आणि वस्तुस्थितीचें ज्ञान करून देणारा अभ्यास होय. कोणत्याहि घटकाचे वैयक्तिक गुण आणि त्याचे एका समूहाचा भाग म्हणून असणारे गुण परस्परविरुद्ध नसले तरी परस्परभिन्न मात्र अस- तातच. मनुष्याचें जीवन एक स्वतंत्र व्यक्ति म्हणून, कुटुंबांतली एक व्यक्ति म्हणून, समाजांतली एक व्यक्ति म्हणून किंवा केवळ एक प्राणी म्हणून विविध प्रकारचें असूं शकतें; आणि मनुष्याच्या खन्या स्वरूपाचें ज्ञान त्याच्या अशा सर्वोगीण अभ्यासानेंच् होतें, ज्याचा यांतल्या कशाशीहि

Page 76

ध्वनींचा भाषेत उपयोग ३९

संबंध नाहीं असा कुटुंबनिरपेक्ष, समाजनिरपेक्ष, सृष्टिनिरपेक्ष, आदर्श मनुष्य ही एक अमूर्त कल्पना आहे, वस्तुस्थिति नव्हे. मानवजातीच्या अभ्यासानें आपण मनुष्याबद्दलचें ज्ञान मिळबत नाहीं; मनुष्यांचा अभ्यास करून आपण मानवजातीचें चित्र तयार करतों. अमूतीकडून आपण मूर्तांकडे जात नाहीं; मुर्ताकडून अमूर्तांकडे जातों. शास्त्रीय अभ्यासांत मात्र आपण अश्ञा रीतीनें प्राप्त झालेलें ज्ञान प्रारंभींच ग्रहण करूं शकतों, कारण अमूर्त चिंतनाची संवय झाल्यावर कोणत्याहि शास्त्राचें तत्वग्रहण सुलभ होतें, ज्या ठिका्णी एखादा मुद्दा समजणें कठीण वाटेल त्या ठिकाणी तो योग्य उदाहरणांनी सुबोध करतां येतो. ज्या विविध घटनांना एखादें तत्व लागूं पडतें त्या घटनांचा नीट अभ्यास केल्यानें तें तत्व आपल्याला आकलन होऊन आपलें बौद्धिक समाधानहि करतें; म्हणूनच ध्वनींच्या उच्चाराची तात्विक बाज स्पष्ट होण्यासाठीं आणि ध्वनीचें व्यावहारिक स्वरूप कळण्यासाठीं ते ज्या रीतीनें बापरले जातात ती रीत समजणें आवश्यक आहे. ध्वनिविचार- दृष्टथा जरी वर्णाचें स्वरूप एकाच प्रकारचें असलें तरी बोलण्याच्या भार्षेत तें कसें मर्यादित होतें, हैं बोलभाषेच्या निरीक्षणानें जाणून घेणें इष्ट आहे; तसेंच कालांतरानें एखाद्या भारषेतील ध्वनीत जें परिवर्तन घडून येतें त्याचें यथार्थ ज्ञान होण्यासाठीं ती भाषा वेगवेगळ्या कारळी कशी उच्चारली जात होती इकडे आपण लक्ष दिलें पाहिजे, हें उच्चारज्ञान केवळ लिपि वाचतां येऊन होणार नाहीं याचीहि आपण जाणीव ठेवली पाहिजे .. उदाहरणार्थ पाच आणि चाप हे शब्द ध्या. यांत्या पहिल्या शब्दां- तस्या पचा उच्चार ओठ उघडल्याशिवाय होत नाहीं, तर दुसऱ्या पच्या उच्चाराच्या वेळीं मिटलेले ओठ उघडावे लागत नाहीत, यावरून पचा उच्चार स्थानपरत्वें कसा बदलतो तें दिसन येतें. इंग्रजीतील little व tell हे शब्द ध्या, पहिल्या शब्दांतला आद्य 1 आणि अंत्य 1 यांचीं स्पर्शस्थानें अगदी भिन्न आहेत असें दिसून येईल. पहिला 1 दंत्य असून दुसरा tt च्या साहचर्यानें तालव्य बनला

Page 77

४० ध्वनिविचार

आहे. पहिल्या शब्दांतील t (लेखनांत tt) आणि दुसऱ्या शब्दांतील t यांचें स्पर्शस्थानहि थोडें बेगळें आहे हैं दिसून येईल. प, t, 1 हे वर्ण कोणत्याहि शब्दांत नसतांना आपण त्यांचें जें स्वरूप निश्चित करतों, तें आदर्श व विकारशून्य असतें. हें त्यांचें तात्विक स्वरूप होय. परंतु हेच वर्ण शब्दांत वापरले जाऊं लागतांच त्याना चैतन्य आणि व्यक्तित्व प्राप्त होतें; आजुबाजच्या परिस्थितीमुळें ते विकारक्षम बनतात. कोणत्याहि भाषेचा खरा अभ्यास हा या विकारक्षम वर्णाचा अभ्यास होय, मिन्नभिन्न परिस्थितीत एकच वर्ण कोणकोणतीं रूपें धारण ED Ao .nhe करतो याचें ज्ञान एखाद्या समाजाच्या उच्चारविषयक संवयी शोधन काढण्याच्या कामो उपयोगीं पडतें, मात्र उच्चारांत वर्णाना होणारे है विकार महत्वाचे असले तरी बरेच बेळां ते इतके सूक्ष्म असतात की ते लेखनांत व्यक्त करणें नेहमींच शक्य किंवा व्यवहार्य नसतें, लेखन हैं ध्वनींचें दृश्य स्वरूप आहे, पण तें पूर्णपणे समाधानकारक असें ध्वनि- चित्रण करूं शकत नाहीं. उच्चारांचें यथातथ्य लेखन करणारी लिपि कोणत्याहि भाषेजवळ नाहीं, पण लेखनपद्धतीचें हें वैगुण्य जोंपर्येत व्यवहाराच्या आड येत नाहीं, तोंपर्येत कसेंहि करून तिच्याच द्वारें समाज आपले व्यवहार चालवतो. इंग्रजी भाषेचें उदाहरण या बाब्तीत आपल्या चांगलेंच परिचयाचें आहे. वर्ण स्वतंत्र असतांना त्याचें रूप कांहींहि असो, पण तो शब्दाचा घटक बनतांच त्याचें स्वातंत्र्य नष्ट होऊन तो विकारक्षम बनतो. स्थान परत्वें शब्दांत त्याचा जो अनुक्रम असतो त्याच्यावर आणि त्याच्या आर्धीं आणि नंतर येणाऱ्या वर्णावर प्रत्येक वर्णाचा उन्चार आणि कालांतरानें घडून येणारें परिवर्तन अवलंबून असतें. वर्णोची परस्परांवर होणारी ही प्रतिक्रिया संस्कृतच्या संधिनियमांत उत्तम प्रकारें दिसून येते. अंत्य स्थानी एकच व्यंजन शिलक राहणें, दोन मिन्नवर्गीय व्यंजनें एकमेकांजवळ आलीं असता स्थानपरत्वें ती सबल किंवा निर्बल ठरणें, दंत्य व्यंजनांची मूर्धन्य आणि सकंप व्यंजनांची निष्कंप

Page 78

ध्वनींचा भाषेत उपयोग ४१

व्यंजनें होणें, दोन स्वर एकजीव होणें या गोष्टी सामान्य अभ्यासकाच्याहि परिचयाच्या आहेत. स्थानपरत्वें अथवा सहवासपरत्वें वर्णोमध्यें घडून येणाऱ्या सूक्ष्म मेदांना वर्णाची अंतर्गत पुनर्व्यवस्था असें ग्हणतात. शब्दाचा घटक म्हणून वावरूँ लागतांच वर्णावर नियंत्रण पडतें. स्वतःला मिळालेल्या जागेच्या आजबाजच्या वणाशी तडजोड करून त्या वर्णाला राहावें लागतें. तो दुर्बल वर्णाच्या सान्निध्यांत आला किंवा ज्या स्थानी त्याचें सामर्थ्य वाढेल असें स्थान त्याला प्राप्त झालें तर त्याला एक प्रकारचें वर्चस्व गाजवता येतें. पण स्वतःहून बलिष्ठ वर्णाच्या शेजारीं तो आला किंवा ज्या ठिकाणी त्याचें सामर्थ्य कमी होईल अशी जागा त्याला मिळाली तर तो स्वतःच विकारयुक्त होतो. परभारषेतील शब्द आपण आपस्या सोई- प्रमाणें बदलतों. इंग्रजींतील master, post, captain यांचे उच्चार आपल्याकडे मास्तर-माष्टर, पोस्त-पोष्ट, कप्तान असे होतात आणि' इंग्रजी थ व ध (three, this) हे घर्षक व मराठी थ व ध हे अर्ध- स्फोटक यांत कांहीं फरक आहे, याची आपल्याकडील बहुसंख्य इंग्रजी शिकलेल्या लोकांना जाणीव नसते. तसेंच अरबी शब्दांतील ख व अरबी-इंग्रजींतील फ हे घर्षक देखील आपण आपल्या वर्णमालेच्या साध- नांचा उपयोग करून बदलतों. तख्त व सख्त यांऐवजीं तक्त व सक्त; फिक्र याऐवजी फिकीर हे अर्धस्फोटक अस्णारे उच्चार आपण करतों. परभाषेतील ध्वनीचे शुद्ध उच्चार करण्यासाठीं आपण त्यांचें योग्य शिक्षण घेतलें पाहिजे आणि ज्या भाषा इंग्रजीप्रमाणे आघातप्रधान आहेत त्यांचें आघाततत्वहि आपण समजून घेतलें पाहिजे. उच्चारामुळें वर्णोच्या स्वरूपांत फरक पडून होणारी अंतर्गत पुन- वर्यवस्था आणि कालांतरानें एका भार्षेतील ध्व्नीत होणारें परिवर्तन या दोन अगरदी मिन्न घटना आहेत. अंतर्गत पुनर्व्यवस्थेत एकाच भार्षेतील ्वनी एका ठराविक काळच्या उच्चारांत स्थानपरत्वें आणि सहवास- परत्वें भिन्न रूपें धारण करतात. पाद, विप्र, अपू या शब्दांतील पचे वेगवेगळे उच्चार या व्यवस्थेनुसार होतात, पण सर्प, कूप, बाष्प बगैरे

Page 79

४२ ध्वनिविचार

शब्दांतील प हा वर्ण कालांतरानें उत्क्रांत होत जाऊन त्याचीं जी मिन्न रूपें होतात त्या क्रियेला ध्वनिपरिवर्तन हैं नांव आहे. वर्णाच्या पुनर्व्यव- स्थेंत भार्षेतील वर्णोत परिस्थितीमुळें घडून येणारी एकाच काळांतील रूपांतरें विचारांत घेण्यांत येतात, म्हणून या पुनर्व्यवस्थेला एककालिक असें म्हणतात; पण ध्वनिपरिवर्तनाचे नियम समजण्यासाठीं एकाच भाषेचीं निदान दोन भिन्न काळांतील रूपें माहीत असणें आवश्यक असतें, ग्हणून ध्वनिपरिवर्तन हें द्वैकालिक आहे असें म्हणतात, वर्णोच्या पुनर्व्यवस्थेचा अभ्यास करतांना (कधींहि स्थिर नसणारी) भाषा स्थिर आहे असें मानून चालाबें लागतें, म्हणून ती व्यवस्था स्थैर्यप्रधान आहे; पण एकाच गोष्टीच्या दोन भिन्नभिन्न काळांतील रूपांचा एकत्र विचार करणें हैं इतिहासाचें काम असल्यामुळें ध्वनिपरिवर्तन हें ऐतिहासिक आहे. मनुष्याला निर्माण करतां येणारी एकंदर वर्णसंख्या फार मोठी आहे. पण कोणत्याहि भार्षेत ४०-५० पेक्षां अधिक वर्ण आढळत नाहींत. एकाच भार्षेतील वर्णोना वर्णमाला हैं नांव असून त्या वर्णोचा अभ्यास करण्याचें काम त्या भाषेच्या व्याकरणाचें आहे. एकाच भार्षेतील वर्णाच्या यया अभ्यासाला वर्णविचार हें नांव असून कोणतीहि भाषा शिकण्यापूर्वी शुद्ध उच्चाराच्या दृष्टीनें तिच्या वर्णविचाराचें सूक्ष्म ज्ञान मिळवणें अत्यंत आवश्यक असतें. वर्णविचार, उच्चार व ध्वनिवैशिष्ट्य लक्षांत न घेतांहि भाषा शिकतां येते; पण ती ज्याची मातृभाषा आहे अशा व्यक्तीशी बोलण्याचा प्रसंग येतांच आपलें अज्ञान आपणाला जाणवतें. त्या भाषेशी असणारा आपला संबंध केवळ लेखनवाचनापुरताच असेल तर आपणाला कोणतीहि अड- चण भासणार नाहीं; कारण एखाद्या भाषेचें विचारसौंदर्य त्या भाषेचा शब्दसंग्रह आणि शब्दप्रयोग यांच्या परिचयानें कळूं शकतें. पण भाषेचें खरें सौंदर्य केवळ तिच्या साहित्यांतून व्यक्त हाणाऱ्या विचारांतच सांप- डतें असें नव्हे; तिचें गद्यहि कित्येकदा संगीताप्रमाणें कर्णमधुर व ताल- 4

चद्ध असतें आणि योग्य ध्वनींचा उपयोग करून अंतश्चक्षसमोर उर्भी राह- तील अर्शी शब्दचिलें निर्माण करण्याचें सामर्थ्य तिला प्राप्त करून देणें हैं

Page 80

ध्वनींचा भाषेत उपयोग ४३

एखाद्या प्रतिभावान् लेखकाला अशक्य नसतें. भाषेंतील ध्वनींचा अभ्यास न केलेल्या वाचकाला तिच्या काव्यांतील आणि गद्यांतील गेयता, नाद- माधुर्य, ध्वन्यनुकरण, इत्यादि सौंदर्यस्थळें दिसणार नाहींत. एखाद्या भार्षेतील वर्णांचें ज्ञान कसें करून घेतां येतें हैं आपण आधीं पाहूं. हें ज्ञान त्या भाषेची अक्षरमाला अथवा लिपि शिकून होणार नाहीं; कारण जगांतील कोणत्याहि भार्षेतील वर्णोची संख्या तिच्यांत वापरल्या जाणाऱ्या अक्षरांच्या संख्येवरून ठरवतां येणें शक्य नाहीं, ज्या भार्षेत एक अक्षर एकच वर्ण दर्शवतें व ज्यांतला प्रत्येक वर्ण एकाच अक्षरानें व्यक्त होतो, ती भाषा लिपिटृष्टया आदर्श होय. या दृष्टीनें जगांतली एकहि भाषा आदर्श ठरणार नाहीं. यासाठी लिपीवरून ध्वनीचें ज्ञान मिळवण्याचा उलटा प्रयत्न न करतां एखाद्या भार्षेत किती व कोणते ध्वनी आहेत आणि त्या भाषेची लिपि हे ध्वनी कशा प्रकारें व्यक्त करते, म्हणजे त्या भाषेची लेखनपरंपरा काय आहे, हैं आपण पाहिलें पाहिजे. इंग्रजी भाषेची लिपि २६ अक्षरांची आहे, पण त्या भाषेची ध्वनि- संख्या याहून अधिक आहे. त्यांतल्या कांहीं वर्णोचे अनेक लेखनप्रकार आहेत. उदाहरणार्थ श हा वर्ण c (ocean), ch (machine,) sch (schist), ss (passion), sh (dish), t (tion), s (sure)इतक्या प्रकारें लिहितां येतो. तर एकच अक्षर कित्येक धवनींचें लेखन करतें. Sनें स (sin), श (sugar ), झ (rose); c नें क (cat ) श (ocean), स (cent), th नें घर्षक थ (thin) व ध (this) इ. मराठी लेखनपद्धतीतहि अनेक उणीवा आहेत; पण त्याबद्दलची चर्च्चा इतरत्र होणार असल्यामुळें या ठिकाणी फक्त मराठी भाषा व्यवहारासाठीं ज्या वर्णाचा उपयोग करते ते किती व कोगते आहेत एवढेंच दाखव- ण्याचा हेतु आहे. स्वर: अ, आ, इ, उ, ए, ओ अर्धस्वरः य, व., द्रवः र, ल, ळ

Page 81

४४ ध्वनिविचार

अनुनासिक: * ङ्, ण, न, म, *ञ. घर्षकः स, श, ह्- ह अर्धस्फोटकः ख, ठ, थ, फ, च१, चरे, छरे-ध, ढ, ध, भ, ज१, ज झ स्फोटक: क, ट, त, पन्ग, ड, द, ब ( हे वर्ण स्वतंत्रपणें वापरले जात नाहीत. १ दंत्य, २ तालव्य, ३ तालव्य च + निष्कंप ह; दंत्य च + निष्कंप ह दुर्मिळ आहे.) खुलासा :- स्वर: (दीर्घ) ई, ऊ हे स्वतंत्र स्वर नाहींत, ते इवउ यांचा अवधि (म्हणजे वर्णाचा उच्चार करण्याला लागणारा काळ) वाढवून मिळतात, उच्चाराला लागणाऱ्या कर्मीतकमी काळापेक्षां अिक वेळ उच्चारला जाणारा वर्ण म्हणजे दीर्घ वर्ण. वर्णोच्चारणाला लागणारा हवेचा पुरवठा चालूं असेपर्येंत एखादा वर्ण लांबवतां येतो, त्यामुळें दीर्घ- पणाची मर्यादा प्रत्येक व्यक्तींत वेगळी असते. गायनाचा अभ्यास केल्यास हें विशेष लक्षांत येतें, वस्तुतः घर, दार, एक, दोन यांतले अ, ख, ए, ओ हे स्वरही दीर्घच आहेत, पण लेखनांत त्यांना स्वतंत्र चिन्हें नाहींत. संस्कृतमध्यें अहास्वर नेहमीं वहस्व व आ, ए, ओ हे नेहमीं दीर्घ असतात. ऋ व ल हे वर्ण संस्कृत शब्दांतच येतात. देवनागरी लिपीचा स्वीकार करतांना मराठीनें हे स्वर तर उचललेच, पण त्याबरोबरच संस्कृतांतहि दुर्मिळ असणारा दीर्घ ऋ व मुर्ळीच अस्तित्वांत नसणारा दीर्घ ल अक्षर- मालिकेत आणला. लेखनांतील ऐ व औ हे उच्चारांत अ+इ आणि अ+उ हे स्वरसंयोग दर्शवतात. याशिवायहि अनेक संयुक्त स्वर मराठींत आहेत, पण त्यांना स्वतंत्र चिन्हें नाहींत. शास्त्रदष्टया संयुक्त स्वराना एकच वर्णदर्शक चिन्ह देणें योग्य नव्हे आणि म्हणून ऐ व औ यांचें लेखन अय्, अव् करणें अधिक योग्य ठरेल. अनुनासिक: ङ्र, ण, न, म हीं अनुनासिकें अनुक्रमें ग, ड, द, ब हे स्फोटक उच्चारले जात असतांना तालुपट लोंबत राहिल्यानें निर्माण शेताव.

Page 82

ध्वनींचा भाषेत उपयोग ४५

हैं अनुनासिक यच्या उच्चाराच्या वेळी तालुपट लोंबत राहिल्यानें उत्पन्न होतें. या शिवाय मरार्ठीत अनुस्वार हैं तत्व असून तें अ, आ, इ, उ, ए, ओ यांच्या मागून येतें; उदा० हंसतो, आतां, हिंवाळा, घरीं, गहूं, तें, तोंवर, किंवा, संसार, संशय, सिंह इत्यादि शब्द किंववा, संबूसार, संव्शय, सिंवह असे उच्चारले जातात, म्हणजे अनुस्वारानंतर व् हा उच्चारसुकर वर्ण पुढील वर्णापूर्वी येतो.१ इतर शब्दांत अनुस्वाराप्रमाणें बिंदु देऊन लिहिलेला ध्वनि हा पुढील वर्णाच्या वर्गातील अनुनासिकासाठीं असतो; उदा० अंग, संत, कंप हे अङूग, सनूत, कम्प असे आहेत. घर्षक :- मराठीतला मुख्य सीत्कार दंत्य स हा आहे. या स पुढे इ, ए, य आल्यास त्याचा श होतो. उदा० सीमा-शाव; शय्या-शेज; मासा, सामान्यरूप *मास्या=माशा. मात्र ए पुढें आला तर कित्येकदा साम्यदर्शनासाठी स बदलत नाहीं, उदा० एकवचन मासा-ससा, अनेक वचन मासे-ससे. शय हैं लेखन मरार्ठींत उच्चारदृष्टया श असेंच आहे. *सश्यांचा=सशांचा, अवश्य, उच्चार अवश्श. ष या अक्षराचा उन्चार मरारठीत श असाच आहे. विषय, भाषा, ऋषि इत्यादि शब्द उच्चारांत विशय, भाशा, रुशी असे आहेत. मराठीत निष्कंप व सकंप असे दोन ह आहेत. त्यापैकी निष्कंप ह स्वतंत्रपणें वापरला जात नाहीं. तो ख, ठ,थ, फ, या अर्धस्फोटकांचा उत्तरवर्ण म्हणून सांपड़तो, म्हणजे ही चार अक्षरें उच्चारदष्टया वह, टह, रह, प्हं अर्शी आहेत. मराठांत स्वतंत्रपणे वापरण्यांत येणारा ह सकंप असून तो घ, ढं, ध, भ या अर्धस्फोटकांचा उत्तरवर्ण म्हणूनहि सांपडतो. म्हातारा, न्हाणें, कुव्हाड, वल्ह्वणें, नव्हे या शब्दांतली संयुक्त अक्षर्रेहि अर्धस्फोटकच आहेत, पण स्वतंत्र चिन्हांच्या अभावी ती संयुक्त व्यंजनांसारखी वाटतात. अर्घस्फोटक: ख, ठ, थ, फ यांसाठीं वर f घर्षक' पहा. च हें अक्षर मराठीत दोन अर्धस्फोटकांसाठीं वापरण्यांत येतें.एक त्+स ्या वर्णोनी बनलेला दंत्य अर्धस्फोटक; हा चटका, चाटणें, चुना, चोर, इत्यादि शब्दांत सांपडतो. दुसरा चिवडा, चेंडू, या शब्दांतील त् +श

Page 83

४६ ध्वनिविचार

या वर्णोनी बनलेला अर्धस्फोटक हा तालव्य होय. मराठी च्य या लेखना- तील य उच्चाररहित असून मागील च तालव्य आहे एवढ़ेंच त्यानें सुचबलें जातें. स हा दंत्यवर्ण इ, ए, य पुढें आल्यास तालव्य श बनत असल्यामुळें च (=त्स) या अर्धस्फोटकालाहि तोच नियम लागून इ, ए, य या रवरांपुढें त्याचा तालव्य उच्चार होणें स्वाभाविक आहे. संस्कृतांतील च मात्र तालव्यच आहे. मराठींत छ हा वर्ण नाहीं. तो फक्त तत्सम शब्दांत आणि उसन्या 1 शब्दांत सांपडतो. प्राकृत छचा मराठींत स (श) होतो. दंत्य छ (त् + स् +ह) मराठींत नाहीं. पण इच्छा हा शब्द इत्सहा असा उच्चारला गेलेला कित्येकदा ऐकण्यांत येतो. ज हें अक्षरहि मराठींत दोन अर्धस्फोटकांसाठी वापरण्यांत येतें. एक दंत्य व दुसरा तालव्य, दंत्य ज हा दंत्य चचा सकंप ध्वनि आहे, किंवा तो त् + स याच्या सकंप रूपांच्या संयोगानें म्हणजे द + दंत्य झ असा बनला आहे. याचप्रमाणें तालव्य ज हा तालव्य चचा सकंप ध्वनि आहे किंवा तो त् + श याच्या सकंप रूपानें म्हणजे द+तालव्य झ असा बनला आहे. संस्कृतमध्यें फक्त तालव्य ज आहे. मराठींत अ, आ, उ, ओ पुढें आल्यास जचा उच्चार दंत्य होतो. उदा. जर, जाळ, जुना, जोगी; इ, ए, य पुढे आल्यास तालव्य होतो. उदा. जिणें, लाजे, ज्याचा. ज्य या लेखनांतील यहि ज हा तालन्य आहे एवढें दाखवण्यापुरताच आहे. संस्कृत ज्य, च्य यांचा मराठींत साधारणपणे ज्, च्च, असा उच्चार करण्यांत येठो. उदा. राज्य, सूच्य इ. झ हें अक्षर मराठी दोन अर्धस्फोटकांसाठी वापरलें जातें. त्यांपकीं एक वर्ण हा दंत्य जचा सप्राण उच्चार दर्शवणारा असन तो झरा, झाडी, झुंज, झोपडी, इत्यादि शब्दांत सांपडतो. हा उच्चार फक्त अ, आ, उ,ओ, या स्वरांपूर्वीच येतो, झिरपणे, झेंडा, इत्यादि शब्दांतील झ हा ालव्य जचा सप्राण उच्चार आहे. संस्कृतांत केवळ हा दुसरा ग्हणजे चालव्य झच सांपडतो, मराठींत इ, ए व य या वर्णापूर्वी झचा तालव्य

Page 84

ध्वनींचा भाषेत उपयोग ४७

उच्चार होतो. उदा. माझा-माझी, माझा-माझ्या, तुझा-तुझे. इय या लेखनांतील य उच्चाररहित असून मागील झ हा तालव्य आहे एबढेंच त्यानें दाखवलें जातें. हाच नियम इय या अक्षरालाहि लागूं पडतो. वरील ४३ वर्णोवर मराठीचा व्यवहार चाललेला आहे. पण यांतहि ङ, न हीं अनुनासिकें स्वतंत्रपणें वापरली जात नाहींत; निष्कंप हच्ी हीच गोष्ट आहे आणि अर्धस्फोटक हे इतर वर्णाच्या मिश्रणानें बनलेले असल्या- मुळें तत्वतः ते वेगळे मोजायला नकोत, या दष्टीनें पाहिलें तर मराठीची ध्वनिसंख्या फक्त ३० भरते. आपल्या लिपीकडे पाहून प्रथमदर्शनी हें असंभाव्य वाटेल; पण कोणत्याहि भार्षेत ३०-४० पक्षां अधिक वर्ण नसतात आणि एवदथा मोजक्या भांडवलावर भाषांचे व्यवहार चाल- व्याचीं तीन कारणें आहेत. पहिलें आणि सर्वोत महत्वाचें कारण हैं की भाषिक प्रवृत्ति नेहमीं व्यव- हार सुलभ करण्याकडे असते. वर्णसंख्या फार मोठी असली तर बौद्धिक अथवा शारीरिक दष्टीनें तिच्ा उपयोग करणें सामान्य माणसाला अतिशय परिश्रमाचे किंवा जवळजवळ अशक्य होईल. भाषा हैं सबंध समाजाच्या व्यवहाराचें सर्वश्रेष्ठ साधन आहे. तिचा उपयोग थोर विद्वानापासून अति- शय अडाणी माणसापर्येत सर्वाना सारखाच होतो; ग्हणून असे साधन होईल तितकें सोपें करण्याकडे प्रत्येक समाजाचें लक्ष स्वाभाविकपणेंच असतें. दुसरें कारण असें की एकंदर वर्णसंख्या जरी अत्यंत मर्यादित असली तरी तिच्या साह्यानें आपणाला दोन, तीन, चार, पांच, इत्यादि वर्णाचे असंख्य समुच्चय बनवतां येतात. उदाहरणार्थ, अ, आ, रू,म् या चारच वर्णापासून आपल्याला राम, रमा, आम्र, मार, मरा, अर्मा, आमे, आरम्, अराम्, आमर, अमार, इत्यादि अनेक शब्द तयार करतां येतील. तिसरें आणि शास्त्रीयद्ष्टथा अत्यंत महत्वाचें कारण हें की प्रत्येक भाषेची वर्णमाला पूर्णपणे सुसंवादी असते. एकंदर ध्वनिसख्येंतले वाटेल ते ३०-४० वर्ण घेऊन एखाद्या भाषेची वर्णमाला तयार होत नाहीं, प्रत्येक भाषेची वर्णपद्धति एका निश्चित प्रकारची असते; ती अत्यंत नियम- बद्ध आणि शिस्तीला धरून असते. सुसंवादित्व आणि नियमबद्धता या

Page 85

४८ ध्वनिविचार

तत्वांचा भंग करून अस्तित्वांत आलेली. एकहि नर्णमाला मिळणार नाहीं. उदाहरणार्थ मराठीची वर्णमाला घ्या. त प b h to क - निष्कंप स्फोटक ग ड द ब - सकंप स्फोटक ख ठ थ फ - विसर्गमिश्र अर्ध स्फोटक ढ ध भ -श्वासमिश्र अर्धस्फोटक तसेंच इंग्रजीचें उदादरण ध्या : k P - निष्कंप स्फोटक g d b - सकंप स्फोटक th f - निष्कंप घर्षक th v - सकंप घर्षक अशञा रीतीनें मराठीचे चार मूलभूत स्फोटक आहेत. त्यांचे सकंप वर्ण करून, निष्कंप रूपांत निष्कंप ह म्हणजे विसर्ग घालून आणि सकंप रूपांत सकंप ह म्हणजे श्वास मिसळून बनलेलीं रूपें आपणाला मिळतात. मराठी ही प्राणप्रधान भाषा आहे ग्हणून तिच्यांत श्वास आणि विसर्ग यांच्या मिश्रणानें बनलेले अर्धस्फोटक मिळणेंच स्वाभाविक आहे. पण कचा अर्धस्फोटक ख आणि तचा मात्र घर्षक थ अशी विसगति सांप- डणे शक्य नाहीं. याच दष्टीनें पाहिलें तर इंग्रजी ही घर्षणप्रधान भाषा असल्यामुळें तिच्यांत t, p.यांचे मिळते घर्षक थ, फ हें मिळणें नियमाला घरून आहे. आतां या बरोबरच क चा मिळता घर्षक ख हा त्या भार्षेत उपलब्ध नाहीं ही गोष्ट खरी आहे, पण अभाव हा सुसवादीपणाला विरोधक नसतो हें तत्व आपण लक्षांत ठेवलें पाहिजे. : हा सुसवादीपणाहि व्यवहार सुलभ करण्याला उपयोगी पडतो. ज्या तत्वानें क, ग, ख, घ ही मालिका बनली आहे तेंच तत्व त, द, थ, ध, इत्यादि मालिकांनाही लागूं पडतें आणि ज्या तत्वानुसार ख, घ, थ, ध, इत्यादि अर्धस्फोटक बनले आहेत, तेंच तत्व च, छ, ज, झ, या अर्ध- स्फोटकांनाहि लागूं पडतें, हें लक्षांत आल्यावर कोणत्याहि भाषेची

Page 86

ध्वनींचा भाषेत उपयोग ४९

वर्णमाला पुढें ठेऊन त्याच्यामागें असणारें तत्व अ्हण करणें कठीण. होणार नाहीं. भाषेच्या वर्णमालेंतील ही अंतर्गत सुव्यवस्था कर्धीहि बिघडत नाहीं. सुसवादित्वाचें हैं तत्व भाषेच्या ध्वनिविषयक रचनेंत इतकें अपरिहार्य आणि अढळ आहे कीं कालांतरानें भाषेच्या ध्वनीत परिवर्तन होऊन जेव्हां नवे ध्वनी निर्माण होतात आणि एक नवी वर्णमाला अस्तित्वांत येते, त्या बेळीं त्या वर्णमालेलाहि हें सुसंवादित्वाचें तत्व लागूं पडतें. ज्या भार्षेतील प हा स्फोटक उत्क्रांत होऊन फहा घर्षक तयार होतो, त्या भार्षेतील त, क यांचे थ, ख हे घर्षक होणें क्रमप्राप्त आहे. जुन्या भाषेची बर्णमाला आणि नव्या भार्षेतील ध्वनी यांचें तौलनिक कोष्टक डोळ्यांसमोर ठेवलें म्हणजे पहिलीकडून दुसरीकडे जातांना होणाऱ्या परिवर्तनाची दिशा स्पष्टपरणे दिसून येते. व्युत्पत्तीच्या अभ्यासाला हीं ध्वनिविषयक मूलभूत तत्वें माहीत असणें अपररिहार्यं आहे. अशा रीतीनें कोणत्याहि भार्षेतील वर्ण हे एका विशिष्ट पद्धतीचे ऐक्य- पोषक घटक असतात. उच्चाराचें पृथकरण करून काढलेले हे वर्ण प्रत्यक्ष व्यवहारांत कसे विकारक्षम बनतात बाचेहि थोडे ज्ञान आपण करून घेतलें आहे. परंतु प्रत्यक्ष भाषणांत आपण वेगवेगळे वर्ण उच्चारत नाहीं, कारण ते एकमेकांशी इतके जोडले गेलेले असतात की पुष्कळदां अनेक वर्णाचा एकत्र उच्चार करावा लागतो. या एकत्र येणाऱ्या वर्णाचा अम्यास भाषेच्या व्यावहारिक स्वरूपाचें ज्ञान करून धेण्यासाठी आवश्यक आहे. कस्पना व्यक्त करण्यासाठीं आपण शब्द वापरतों आणि विचार व्यक्त करण्यासाठीं शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करतों. म्हणजे शब्द हे विचाराच्े अविभाज्य घटक आणि वर्ण हे शब्द ज्या ध्वर्नीचे बनलेले असतात त्या ध्वनींचे अविभाज्य घटक होत, ध्वनिदष्टया शब्द आणि वर्ण यांना सांधणारा एक अत्यंत महत्वाचा दुबा आहे .. वर्ण हे श्वुतीचे अविभाव्य घटक आहेत. श्रुवीकडून ध्वनीचें पृथक्करण झाल्यावर ज्या मर्यादेपलिकडे तें जाऊं शकत नाहीं तो वर्ण, उदाहरणार्थ ध्व.वि.४

Page 87

५० ध्वनिविचार

राम (उ. राम्) यांत र आ म् हे तीन वर्ण आहेत; कावळा (उ. कावूळा) यांत क् आ व् ळ आ हे पांच वर्ण आहेत; प्राण (उ. प्राण्) यांत पू र् आ णू है चार वर्ण आहेत. परंतु वर्ण व शब्द यांच्या दरम्यान ध्वनिनिर्मितीचा जो दुवा आहे तो उच्चाराच्या दष्टीनें अतिशय महत्वाचा आहे. ज्यावेळीं आपण सबंध शब्दाचा विचार करतों त्यावेळीं त्या शब्दानें सूचित होणारी कल्पनाच आपल्या डोळ्यांसमोर प्रामुख्यानें असते; कारण ध्वनींच्या साह्यानें कल्पना व्यक्त करणाऱ्या वर्णसमुच्चयालाच आपण शब्द ही संज्ञा लावतों; अर्थ- शून्य म्हणजे कोणतीहि कल्पना सूचित न करणान्या ध्वनिसमुन्चयाला कोणी शब्द म्हणत नाहीं; त्याचप्रमाणें ज्यावेळीं आपण वर्णाचा विचार करतों त्यावेळी केवळ ध्वनीशिवाय इतर कोणतेंहि तत्व आपण शब्दां- तून शोधून काढत नाहीं. यापैकीं पटिला अभ्यास हा शब्दाचा अथवा ध्वनिसमुच्चयाचा अर्थदृष्टया अभ्यास आहे आणि दुसरा अभ्यास हा त्याचा केवळ ध्वनिदष्टया किंवा वर्णटष्टया अभ्यास आहे. पहिल्यांत ध्वनीच्या विचाराला गौण स्थान आहे; तर दुसऱ्यांत पूर्ण पृथकरण करून मिळालेल्या ध्बनींवर आपलें लक्ष केंद्रित झालें आहे. पण प्रत्यक्ष बोल- तांना आपण शब्द ज्या रीतीनें उच्चारतों तिलाच उच्चारदृष्टा सर्वोत अधिक महत्व देणें योग्य ठरेल, उदाहरणार्थ- मी तिकडे जाईन. तो आला. बगळा पांढरा असतो. आज पाडवा आहे. हीं वाक्यें उच्चाराच्या प्रत्येक टप्प्याला यांबल्यास मी तिकू-डे जा-ईन. तो आ-ला. बगू-ळा पां-द्रा अस्-तो. आजू पाड-वा आ-हे. अर्शी उच्चारली जातील.

Page 88

ध्वनींचा भाषेत उपयोग ५१

उच्चाराच्या दष्टीनें आज व तो हे शब्द एकएक टप्प्यांत आणि जाईन व तिकडे हे शब्द दोनदोन टप्प्यांत म्हटले जातात. हे टप्पे उच्चाराचे मूलभूत घटक असून त्यांना अवयव अशी संज्ञा आहे. प्रत्येक टप्प्याचा प्रारंभ व शेवट यांच्या दरम्यान अवयवाचें क्षेत्र असतें. ध्वनीचें वर्गीकरण स्वर आणि व्यंजनें या दोनच स्थूल विभागांत केलें आणि नंतर अवयवाच्या रचनेचा वरवर अभ्यास केला, तरीहि असें दिसून येईल कीं ते सामान्यतः केवळ स्वरः आ-राम्, उ-पास, भा-ऊ, शा-ई स्वर + व्यंजन: इक-डे, आजू, उल्-टा, जा-ऊन् व्यंजन + स्वर: रा-मा, पू-जा, ये-तो, सु-रूं व्यंजन + स्वर + व्यंजनः राम्, पूल, तीन्, चोर असे बनलेले असतात. यावरून स्वर हैं अवयवांचें अपरिहार्य अंग आहे हें उघड होतें आणि सामान्यपणे एख्राद्या शब्दांतील स्वर मोजून त्यांतील अवयवांची संख्या निश्चित करणें आपणाला शक्य होतें. अर्थात् हे स्वर मोजतांना भाषेच्या लेखनानें आपली दिशाभूल होऊ न देतां तिची उच्चार- पद्धति लक्षांत घेऊनच आपण आपलें काम केलें पाहिजे. उदाहरणार्थ, तरवार, तपासणी, बाण या शब्दांच्या लेखनांत अनुक्में चार, चार व दोन स्वर आहेत, पण या शब्दांचा उच्चार तर-वार, त-पास-णी, बाणू असा असल्यामुळें त्यांची अवयवसंख्या अनुक्रमें दोन, तीन व एक असली पाहिजे हैं सिद्ध होतें. अवयवमापनाचा हा नियम सर्वें भाषांना लागूं पडतो. एखाद्या शब्दाचे अवयव बेगळे करणें याला अवयवच्छेद ग्हणतात. पण सर्वच शब्द कांहीं वर दर्शवल्याप्रमाणें केवलस्वरयुक्त अथवा केवलव्यंजनयुक्त नसतात. कांही अवयवांत अनेक व्यंजनें आणि एखादा 1. संयुक्त स्वरहि असूं शकतो. उदाहरणार्थ, वैद्य: वदद्-य, क्षत्रिय : क्त्- रि-य, क्रौर्य: ऋउर्-य, इ. संयुक्त स्वर हे बाह्यतः दोन स्वरांनी बनलेले दिसले तरी हे दोन स्वर 6958

Page 89

५२ ध्वनिविचार

सारख्या महत्वाचे नसतात. त्यांतला पहिला स्वर मुख्य असून आघात- युक्त असतो आणि दुसरा आघातरहित असून गौण असतो, म्हणजे तो उन्चारटष्टया पहिला स्वर ज्या अवयवांत असेल त्या अवयवाचा भाग असतो. आघातयुक्त आणि आघातरहित स्वरांतील भेद पुढील उदाहर- णांवरून लक्षांत येईल: भाऊ भाऊ + जी भावू + जी बाई बाई +ला बाय् +ला देऊळ हा शब्द उच्चारदृष्टया दे-ऊळू असा असून त्यांतील ऊआघात- युक्त आहे; पण त्याचें सामान्य रूप बनतांच हा ऊवरील आघात निधून पुढील अवयवावर जातो आणि देवळा असें रूप आपणांला मिळतें. पाहुणा या शब्दांतील अंत्य अवयवावर आघातदृष्टया आपलें लक्ष केंद्रित झालें कीं तो पाव्हणा असा उच्चारला जातो. राऊत-राव्ताचा, बाईल-बायू- लेची, पाऊल-पावुलावर, इत्यादी रूपांवरून दिसून येईल कीं मूळ आघात असलेले इ व उ हे स्वर आघातरहित होतांच मागील स्वरांचे उत्तरवर्ण बनतात आणि व्यंजनाजवळ ओढले जातात. वैदू या शब्दांतील ऐचा उच्चार अइपेक्षां अयुच्या अधिक जवळचा आहे. य वइ यांचे वेगवेगळे उच्चार करून पाहिले आणि नंतर वैदू हा शब्द उच्चारला म्हणजे या विधानाची सत्यता लक्षांत येईल, पुढे येणाऱ्या विवेचनांत असें दाखवून देण्यांत येईल कीं अवयवाच्या शेवर्टी येणाऱ्या वर्णाचें उद्धाटन (म्हणजे हवेला तोंडांतून बाहेर जाऊं देण्याचा मार्ग) संकुचित असतें; अर्थात् इ व उ हे स्वर संकुचित झाले, त्यांच्या मार्गातील अड- थळा वाढला, तर ते व्यंजनांजवळ ओढले जाऊन य आणि व असे बनंतील ही गोष्ट स्पष्ट आहे. थोडक्यांत म्हणजे ऐ, औ या संयुक्त स्वरांचा उत्तर वर्ण उच्चारतांना स्वरापेक्षां व्यंजनांचीच उच्चारक्रिया अधिक घडते. चवथा-चौथा, सवदा-सौदा, चवदा-चौदा, गवळण- गौळंग, लवकर-लौकर, भय्या-भैया, इत्यादी शब्दांतील लेखनाची अस्थिरता हेंच सिद्ध करते. केवळ ऐतिहासिक दृष्टीनेंच विचार केला तर चौथा या शब्दाचें आर्धीचें रूप चउथा, नंतरचें चवथा-चौथा असे

Page 90

ध्वनींचा भाषेंत उपयोग ५३

आहे.२ याच नियमानें नवरा, नव्वद, चवळी, ढवळा हे शब्द नौरा, नौवद, चौळी, ढौळा असेहि लिहितां येतील. ह्यगय शब्द मात्र हैगय् असाच लिहावा लागेल, कारण गय् मधाल अ आघातयुक्त असलां तरी तो अंत्य अवयवांत असल्यामुळें दीर्घ आहे आणि दीर्घ झाल्यामुळें त्यानंतर येणारा य कालदृष्टया त्याच्यापासून दूर गेलेला आहे. संयुक्त स्वरांत पूर्ववर्ण व उत्तरवर्ण यांत कालदष्टथा कमींत कमी अंतर असावें लागतें. हें लक्षांत आलें म्हणजे वय्, भयू यांचें लेखन बदलतां येणार नाहीं हें पटेल, त्याचप्रमाणें पै आणि वय यांत एकाच तच्वानें बनलेल्या संयुक्त स्वरांतील फरकहि समजून येईल, नवरा बगैरे शब्द नौरा इ. लिहिल्यास या लेखनाला अशुद्ध म्हणायला रूढीशिवाय दुसरें कोणतेंच कारण नाहीं. वैयक्तिक-वैयर्थ्य हे शब्द वय्यक्तिक-वय्यर्थ्य असे लिहि- ण्यांत आपण संस्कृतच्या रूढ नियमांचें उल्ंघन करतों, पण वरील शब्दांच्या बाव्तीत असा कोणताच मुद्दा समर्थनार्थ पुढें करतां येणार नाहीं. अशा रीतीनें केवळ अवयवांची चर्चादेखील मराठीच्या लेखनार्शी येऊन मिडते आणि हा पश कसा व्यावहारिक स्वरूपाचा आहे तें दर्श- बते. या ठिकाणी एवढेंच सांगितलें पाहिजे की मराठीचें लेखन हें इतर सर्वत्र स्वरांतलेखनपद्धतीला घर्न असल्यामुळें भया, चौथा, लौकर, इ. लेखनापेक्षां भय्या, चवथा, लवकर हें लेखनच सुसंगततेच्या दष्टीनें अधिक इष्ट ठरेल. पण आतांपर्येतचें अवयवाच्या स्वरूपाविषर्यीचें हें विवेचन अगर्दी स्थूल प्रकारचें झालें, कारण एका शब्दाच्या उच्चारांत आपण जे टप्पे पाडतों ते कां आणि कसे पडतात याचें दिग्दर्शन त्यांत नाहीं. तें केवळ वर्णनात्मक असल्यामुळें अवयवाची व्याख्या करतांना तें आपणाला फारसें उपयोगी पडणार नाहीं. ध्वनीच्या उच्चारांत स्वाभाविक असणारे टप्पे किंवा एका वेळेला एकत्र उच्चारले जाणारे ध्वनी म्हणज अवयव होत आणि हे टप्पे इतके स्वाभाविक व सर्वत्र आढळणारे आहेत कीं त्यांच्या उच्चारामागें एखादें निश्चित तत्व असलें पाहिजे हैं उघड आहे आणि तें तत्व ध्वनिविषयकच असलें पाहिजे हैंहि स्पष्ट आहे.

Page 91

५४ ध्वनिविचार

या प्रश्नाचा अभ्यास व ऊहापोह पूर्वी बराच झालेला असूनहि त्याचें समाधानकारक स्पष्टीकरण कोणीहि केलेलें नव्हतें. विसाव्या शतकाच्या प्रंर्भी ज्यांनी आपल्या प्रखर बुद्धीनें भाषाशास्त्रांतील अनेक प्रभ्रांचा उलगडा करून त्या शास्त्राच्या अभ्यासकांना एक नवी दृष्टि प्रास करून दिली, त्या फेर्दिनां द सोसूर या स्विस शास्त्रज्ञांनी या प्रभाचें उत्तर शोधून काढलें, तसेंच डॅनिश भाषाशास्त्रज्ञ ऑटो येस्पर्सन यांनी स्वतंत्र संशोधन करून तोच निष्कर्ष काढलेला असल्यामुळें तो ग्रह्य मानला गेला आहे. तो पुढीलप्रमाणें. 1

आपण यापूर्वी पाहिलेंच आहे कीं ह्वेच्या बहिःसरणाला पूर्ण अडथळा (प हा वर्ण) आणि अडथळ्याचा अभाव (आ हा वर्ण) हीं तोंडाच्या उघडझांपीच्या प्रमाणांत ध्वर्नीच्या उच्चारणांतील दोन टोंकें आहेत. पहिल्यांत उद्धाटन शून्य आहे, तर दुसऱ्यांत तें अधिकांत अधिक आहे. एका टोंकाला पूर्ण अडथळ्यानें निर्माण होणारे स्फोटक आहेत आणि दुसऱ्या टोंकाला स्वर आहेत. या अडथळ्याच्या प्रमाणानुसार फेर्दिनां द सोसॅर यांनी सर्व वर्णाचें वर्गीकरण केलें, पूर्ण अडथळा म्हणजे शून्य उद्धाटन असें ठरवून त्यांनी महत्वाच्या वर्णाचें जें क्रमनिदर्शक कोष्टक चयार केलें तें असें :- उद्धाटन शून्य: स्फोटक-प, ब, म; त, द, न; क, ग, ङ उद्धाटन एक: घर्षक: f, v; 6, 8; स, झ, श, झ; x', Y, x,-४ उद्धाटन दोन: अनुनासिक-म, न, ड्. उद्धाटन तीन: द्रव-ल,1', र, ळ उद्धाटन चार: अर्धस्वर-य, व, W उद्धाटन पांच: अर्धव्यंजन, इ.उ, उॅ उद्धाटन सहा: स्वर-ए, ओ, , ओं, 6 उद्धाटन सातः स्वर-आा, आं, ड् + आ, ह् + आं वाढत जाणाऱ्या उद्धाटनाच्या मागोमाग येणान्या कमी होत जाणाऱ्या उद्धाटनाच्या, क्रमानें बनलेला अवयव हा एक वर्णसमुष्चय

Page 92

ध्वनींचा भाषेत उपयोग ५५

असून त्याचा परमोच्च बिंदु स्वरोच्चारदर्शक असतो,' अशी सोसूर यांची व्याख्या आहे. यापैकीं स्वर हे अवधियुक्त असतात, म्हणजे ते निर्माण करण्यासाठी ध्वनियंत्राची आपण जी रचना करतों8 ती पाहिजे तेवढा वेळ तशीच ठेवतां येणें शक्य असतें. या क्रियेला धृति अशी संज्ञा आहे. सामान्यतः न्यंजनाच्या उच्चारणांत धृतीला लागणारी कालमर्यादा कर्मीत कमी म्हणजे शून्य असते. हा मुद्दा लक्षांत घेतल्यानंतर अवयवाच्या स्पष्टीकरणासाठी पुढील वर्णमालिका देतां येईल. atesoyonugiwnpe यांतील आ, ए, ओ, ओ, उ, इ, न (स्वर) व ए या धृति आहेत. त, स, य, न, ग, व, प, हीं या स्वरांना परस्परांपासून बेगळीं कर- णारीं व्यंजनें म्हणजे उघडझापीच्या क्रिया आहेत. यांतील कांहीं व्यंजनांत बंद होणें पूर्ण आहे : उदाहरणार्थ, त, ग, प; तर कांहीत तें अशंतःच आहे : स, य, न, व. कांहीं व्यंजनांत स्वरनालिकांचा कंप आहे. उदा० य, न, ग, व; तर कांहीत तो नाहीं: त, स, प; पण सर्वं स्वरांत आढ- ळणारें सामान्य तत्व हें कीं ती धृतियुक्त आहेत, आणि सर्व व्यंजनांना लागू पडणारें तत्व हैं कीं त्यांच्या उच्चारणांत प्रथम बंद होण्याची आणि त्याच्याच मागोमाग उघडण्याची क्रिया होते. शिवाय एकच वर्ण स्थान- परत्वें स्वर किंवा व्यंजनहि असूं शकतो, म्हणजे त्यांत धृतीचें तत्वहि आणता येतें किंवा उघडझांपीची क्रिया अंमलांत आणून त्यांत धृतीचा अभावहि आणतां येतो. उदाहरणार्थ, इ किंवाय, उ किंवा व, न (स्वर) किंवा न. स्पर्शस्थान तेंच असतें आणि उच्चारहि तोच राहतो, पण स्वरोच्चारणांत धृतीला प्राधान्य दिलें जातें, तर व्यंजनोच्चारणांत तें उच्चारणक्रियेला दिलें जातें. पहित्यांतील प्रधानतत्व कालमर्यादा हें आहे, दुसऱ्यांत तें किया हें आहे. स्वर हा पूर्णपणें एकाच अवयवाचा भाग असतो, एबढेंच नव्हे तर अवयवाचें उच्चारणहि त्याच्याच भोंवतीं केंद्रीभूत झालेलें असतें. याच्या

Page 93

५६ ध्वनिविचार ....

उलट व्यंजन हें पुष्कळदा दोन अवयवांच्या सरहद्दीवर असतें आणि तें त्या दोहोत विभागलें गेलेलें असतें. x< अति : अ-तूड > < अत्ति : अत्-तड या शब्दांतील उच्चारभेद स्पष्ट करतांना ही गोष्ट दाखवून देण्यांत आलेली आहे. येथे अत्ति या शब्दांतील तचें स्तंभन पहिल्या अवयवांत असून दुसऱ्या अवयवांत त्याचा स्फोट झालेला आहे. तचें स्तंभन पहित्या अवयवाचा शेवट दासत्रवतें आणि स्फोट दुसऱ्या अवयवाचा प्रारंभ दाखवतो. आपा या शब्दांतील पहिला अवयव दुस्या अवयवांतील पच्या उच्चारणासाठीं ओठ मिटताच्च संपतो आणि पच्या स्फोटापासून दुसरा अवयव सुरूं होतो. अर्थात् पची धृति या दोन अवयवांच्या मध्यें आहे हें उघड आहे. हाच नियम सकंप म्हणजे मृदु व्यंजनांनासुद्धां लागूं पडतो. उदा० आबा या शब्दाच्या उच्चारणांत कोणताहि खंड पडत नाहीं, कारण आ या स्वराच्या उच्चारासाठी सुरूं झालेलें कंपन बमध्येंहि आहे आणि पुढें येणा्या आमध्यें देखील तें चालूं राहतें, पण आपा या शब्दांतील प- मध्यें तें नसल्यामुळें कंपनदृष्टथा तरी आ-पा यामध्यें एक खंड पडतो. ... > <... आ प आ WW -WNW ... > <.. आ बू आ WWNWNNNW येथे ... हें चिन्ह धृति किंवा कालमर्यादा दाखबणारें आहे.> या चिन्हानें खालील वर्णाचें स्तंभन व < या चिन्हानें स्फोट दाखवण्यांत आलेला आहे, आणि वर्णाखालीं केलेलें हें चिन्ह तो वर्ण कंपयुक्त आहे आणि-हें चिन्ह तो कंपयुक्त नाहीं असें दर्शवतें, पण कंप-

Page 94

ध्वनींचा भाषेत उपयोग ५७

तत्वाच्या दष्टीनें आबा या शब्दांत अखंडता असली तरी बच्या उच्चा- रणासाठी त्यांत तोंड बंद करावें लागतें आणि त्यामुळें हवेचें बहिस्सरण बंद होतें, हें बंद होणेंच एका अवयवाचा शेवट व दुसन्याचा प्रारंभ यांच्या मर्यादेवर आहे. पण ससारखे धघर्षक किंवा य, व, र, ल, म, न यांच्यासारखे अर्ध- स्वर, थोडक्यांत म्हणजे ज्यांना आपण अवधियुक्त वर्ण ग्हणतों, त्यांच्या बाबर्तीत हवेचें बहिस्सरण संपूर्णपणें कुठेंच अडवलें जात नाहीं. पण त्यांच्या उच्चारणांत मुखयंत्राच्या हालचालीनें हवेचा मार्ग संकुचित कर- ण्याची आणि त्यामाणून तो मोकळा करण्याची करिया घडून येते. हा संकोचच मर्यादित प्रमाणांतील एक अडथळा असून त्यामुळें या वर्णाच्या उच्चारणांतहि अवयवाचें स्वरूप स्पष्ट करण्याला आवश्यक अशा स्तंभन व स्फोट या किया घडून येतात, हें आपणाला दिसतें. हच्या उच्चारणाच्या वेळीं हा उच्चार जितका जोरदार करावा तितका स्वरनालिकांतील कंप कमी होत असल्यामुळें आणि फुप्फुसांतील हवा एकदम बाहेर लोटावी लागत असल्यामुळें हवेचा मार्ग पूर्ण बंद कर- ण्याचा अथवा संकुचित करण्याचा येथें प्रक्षच उद्भवत नाहीं. त्यामुळें हा उच्चार अनेक भार्षात अत्यंत दुर्बल असून कांहीं भाषांत तर तो पुढे- पुढें नाहोंसाहि झाला आहे, अंत्य हचा उच्चार मराठींत याच कारणानें नाहींसा झाला. रक्षा-रक्खा-राख, दुग्ध-दुद्ध-दूध, व्याघ्र-बग्घ- वाघ, इत्यादि शब्दांतील शेवटचा ह दुधाचा, राखेचा, वाघाचा, इत्यादि सामान्य रूपांच्या परिणामानें लेखनांत राहिलेला आहे. लक्षपूर्वक ऐकल्यास स्वाभाविक उच्चारांत तो आढळणें शक्य नाहीं. भीक, हात, भाता इत्यादि शब्दांत तर लागोपाठ येणारे दोन प्राणप्रयत्न टाळण्या- साठी त्यांतील सुरवातीचा प्रयत्नच फक्त शिल्लक ठेवण्यांत येतो. ६ बहीण, कु्हाड, बिव्हाड, इत्यादि शब्दांत त्याला दृढता आणण्याच्या दृष्टीनें मुळच्या वर्णानीं स्थानांतर केलें आहे. भगिनी-भइणी-बहीण, कुठार-कुढार-कुऱ्हाड, बिढार-बिन्हाड, आहे, नाहीं, बगैरे शब्दांची

Page 95

५८ ध्वनिविचार

हाय्-हाए, न्हायू-न्हाई, हीं रूपें, जातो आहे, बगैरे प्रयोगांचा जातोयु असा उच्चार या विधानाला पुष्टि देवात. मराठींतील अवयव स्वर, व्यंजनें, संयुक्त स्वर, संयुक्त व्यंजनें यांच्या मिश्रणांनी बनलेले असतात, पण स्वर किंवा संयुक्त स्वर हे या अवयवांचे अपरिहार्यं घटक होत, शब्दारंभीं एकत्र येणारे वर्णसमुच्चय सोडून चाकीच्यांचा आपण विचार केला तर असें दिसून येईल कीं लेखनांत एकत्र झालेले वर्ण कित्येकदा बेगळे केले जातातः ग्रह=ग्र-ह पण उग्र=उग्-र तर लेखनांत वेगळे दर्शवलेले वर्ण उच्चारांत एकत्र येतातः ऐट=ऐट्, राम=राम् अवयव हेंच उच्चाराचें स्वामाविक माप होय. म्हणून चित्रलेखना- नंतरचें जुन्यांत जुनें लेखन बन्याच ठिका्णी अवयवाबर आधारलेलें आहे, वर्ण ही कल्पना तात्विक व पृथककरणात्मक आहे. ती न समजतांहि अशि- क्षित लोक स्वाभाविकपणेच अवयवांच उच्चार करत असतात, उदाहर- णार्थ, तरवार या शब्दांत फक्त तर-वार हे दोन उच्चारमूलक घटक आहेत हैं अशिक्षित माणूसहि समजू शकतो, ही महत्वाची गोष्ट आहे. लेखनांत एकान् अक्षरानें दर्शवलेले वर्णसमुच्चय उच्चारदृष्ट्या खरो- खर कसे बेगळे असतात, हैं त्या वर्णोच्या इतिहासाकडे पाहिल्यास दिसून येईल, रक्षा व क्षार या शब्दांतील क्ष या अक्षरानें दाखविला गेलेला ्वनि उच्चारदष्टया एकच असता तर कालांतरानें त्याचें एकच स्थित्यं- तर झालें असतें. परंतु रक्षा-रक्खा, क्षार-खार, या परिवर्तनाकडे पाहि- स्यावर त्यांचा मूलभूत भेद स्ष्ट दिसून येतो, रक्षा या शब्दांतील क्ष अवयवदष्टया विभागला गेलेला आहे, क्षार मध्यें तो एकाच अवयवांत आहे. या संबंधीचें विवेचन पूर्वी येऊन गेलेलें असल्यामुळें येथें त्याची पुनरुक्ति करण्याची जरुरी नाहीं, पण अवयवांतील वर्णाची रचना कांहीहि असली तरी वर्णांचा क्रम लक्षांत घेतल्यास अवयव म्हणजे उद्धाटन आणि संवारण या उच्चारणक्रियांच्या सीमानी मर्यादित केलेला समुच्चय ोय, हें ध्यानांत ठेवलें पाहिजे.

Page 96

ध्वनींचा भार्षेत उपयोग ५९

या ठिकाणीं संयुक्त स्वर या नांवानें ओळखल्या जाणाऱ्या वर्ण- समुच्चयाचा अवयवाच्या दृष्टीनें विचार करणें आवश्यक आहे. संयुक्त स्वरांचें स्वरूप आपल्याला कसेंहि दिसलें तरी उच्चारणाच्या दुष्टीनें त्यांचा अंत्य वर्ण आद्य वर्णापेक्षां कमी उद्धाटनाचा असतो. ऐ या संयुक्त स्वरांत अ व इ हे वर्ण असल्याचें शिकवण्यांत येतें, पण येथें इ हा अंत्य वर्ण असल्यामुळें तो अधिक बंद म्हणजे ह्वेच्या बहिःसरणाला अधिक अडथळा करणारा किवा व्यंजनाजवळचा आहे. इचा मार्ग संकु- चित केल्यानें य हें व्यंजन निर्माण होतें, त्यामुळें यापूर्वीच्या विवेचनांत दाखवून दिल्याप्रमाणें ऐ हा स्वर अय असा आहे. आई व आय् या शब्दांतील फरक हा कीं आई या शब्दांतील दोन्ही वर्ण पूर्ण स्वर आहेत आणि त्याची ईं आघातयुक्त आहे. आयू या शब्दांतील उत्तरवर्ण अर्घ- स्वर बनला आहे, कारण त्याच्यावर आघात नाहीं आणि त्याचें उद्धाटन इपेक्षा कमी आहे. अवयवाच्या व्यारपेप्रमाणे एकमेकांमागून येणाऱ्या उघडझांपीच्या क्रियांपैकी यू या वर्णानें येथें बंद होण्याची करिया दाखवली जाते. आई हा शब्द दोन स्वतंत्र स्वरांच्या अस्तित्वामुळे दोन अव- यवांचा आहे, तर आय् या शब्दांतील उत्तरवर्ण आ या आघातयुक्त स्वरारशी निगडित असल्यामुळें तो शब्द एकावयवी आहे. स्तंभन व धृति यांचें स्वरूप स्पष्टपणे समजलें म्हणजे पुण्याचा टांगे- वाला आणि पुण्याचा संचय यांतील लेखनांत सारखा दिसणारा पण उच्चारांत भिन्न असा पहिला शब्द ध्वनिदष्टया कसा असला पाहिजे याची कल्पना येते.

१ पुण्याचा =पु-ण्या-चा २ पुण्याचा = पुण-ण्या-चा यांतील पहिल्या शब्दांतील ण धृतिशून्य असून तो यर्शी संयुक्त झाला आहे. पण दुसऱ्या शब्दांत तो धृतियुक्त आहे. त्याच्या उच्चाराचा प्रारंभ म्हणजे स्तंभन पहित्या अवयवाच्या शेवर्टी होत असून शेवट म्हणजे स्फोट दुसऱ्या अवयवाच्या प्रारंभी होत आहे .:

Page 97

६.० ध्वनिविचार

या दोन शब्दांतील उच्चारमेदाचें कारण लक्षांत आलें की संस्कृत छंदोर चनेतील एंकमात्रिक अक्षरें व द्विमालिक अक्षरें यांचा खुलासा होतो. सामान्य नियमाप्रमाणें संस्कृतमध्यें -हस्व स्वरांना एक व दीर्घ स्वसना दोन मात्रा दिलेल्या आहेत. या भार्षेत अ हा स्वर नेहमीं व्हस्व म्हणजे एकमात्रिक आणि आ, ए, ओ हे स्वर नेहमीं दीर्घ ग्हणजे द्विमा- त्रिक असतात, केवलव्यंजन, व्यंजनयुग्म किंवा संयुक्तव्यंजनें यांच्याशी जोडला गेल्यानें =हस्व स्वराच्या एकमात्रिकत्वांत कोणताच फरक होत नाहीं. पद, प्रद, सप्प यांतील प, प्र आणि प्प' यांच्या सान्निध्यानें त्यांच्यारशी जोडल्या गेलेव्या अ या स्वराच्या मात्रेत म्हणजे कालमापनांत छंदाशास्त्राच्या दृष्टीनें कोणताहि फरक नाहीं. परंतु अन्न, पुण्य, विप्र, बगैरे शब्दांतील पहित्या अक्षराला दोन मात्रा देण्यांत आल्या आहेत, बाचें कारण हें की या अक्षरांपुर्दे न्र्, ण्य, प्र हीं संयुक्त व्यंजनें आलीं असून त्यांच्या आद्य वर्णाचे ग्हणजे न, ण, प यांचे स्तंभन 'पहिल्या अक्षरांतील स्वरानंतर सुरूं होतें आणि तो स्वर व हें स्तंभन यांना या दोन मात्रा दिलेत्या आहेत. म्हणजे या शब्दांतील अन् या अवय- वांच्या दोन मात्रा आहेत, केवळ अ या अक्षराच्या नव्हेत. पुढे संयुक्त व्यंजन आलें तर मागील स्वराचा धर्म बंदलतो एवढें निर्रीक्षण संस्कृत व्याकरणकर्त्योनी केलें होतें, ही ऐतिहासिकदष्टया महत्त्वाची गोष्ट आहे. 'अग्र वगैरे शब्दांतील संयुक्त व्यंजनांचा पूर्व वर्ण घृतियुक्त आहे आणिं 'अ्रहण शब्दांतील गहून तो भिन्न आहें असें दाखवायचें असल्यास तत्वतः हा शब्द अग्य्र असा लिहिला पाहिजे, पुण्याचा संचय या ऐवजी पु्ण्याचा संचय असे लिहित्यानें वाचकांची सोय होईल, नाहींतरी शल्याचा- किल्ल्याचा, सत्याचा-चित्त्याचा असें एकाच उन्चाराचें द्विघालेखन मराठीत रूढ आहे, त्यांतील पहिल्या लेखनाला धृतिशून्य व्यंजनाचें (भाल्याचा, इ.) व दुसऱ्या लेखनाला धृतियुक्त व्यंजनाचें (बाल्या वस्था, इ.) काम देऊन, हा प्रक्ष सोडवतां येण्यासारखा आहे. ऐतिहासिक दृष्टीनें पाहिल्यास अप्र हा शब्द अगम असा उच्चारला जात असल्यामुळेंच

Page 98

ध्वनींचा भाषेत उपयोग ६१

पुढें त्याचें परिवर्तन अग्ग असें झालें, तो जर अ-त्र असा उच्चारला जात असता तर त्याचें परिवर्तन अग असेंच झालें असतें. ग्राम>गाम, अग्र>अग्ग या परिवर्तनांत तें दिसून येतें: म्हणजे पहिलें स्थान सोडून इतरत्र कोठेंहि संयुक्त व्यंजन आलें तर संस्कृतांत त्याचा प्रारंभ त्याच्या आधीच्या अवयवाच्या शेवर्टी व शेवट ते ज्या अक्षरांत असेल त्याच्या प्रारंभीं होत असे. या विशिष्ट उच्चारपद्धतीचा आणखी एक परिणाम असा आहे की एका विशिष्ट व्यंजनानें संपणाज्या शब्दानंतर तेंच व्यंजन ज्याचा आद्यवर्ण आहे असें संयुक्त व्यंजन आलें तर उच्चारदृष्टया कोणताच फरक घडत नाहीं. सत् + त्व = सत्त्व, स +त्वर =सत्वर वाक् +कम = वाक्कम, वि +क्रम =विक्रम संधिनियमांकडे बोट दाखवून या शब्दांच्या लेखनाचें समर्थन कर- ण्यांत कोणताहि अर्थ नाहीं. भाषा ही बोलण्यासाठीं असते; सर्व समाजा- कडून होणाऱ्या उच्चारांत जे भेद आपण आणूं शकत नाहीं ते लेख- नांत असले काय अगर नसले काय, त्यांना फाजील महत्व देण्यांत अर्थ नाहीं. वर्णोच्चाराचीं मूलतत्वें समजून घेतल्यानंतर संस्कृत संधिनियमांचा अभ्यास केला तर तो अतिशय उद्बोधक ठरतो. चहा वर्ण शुद्ध नसून तो त आणि श यांच्या मिश्रणानें बनलेला आहे, हें समजल्यानंतर तत् + च याचें तच्च हैं रूप स्वाभाविक आणि नियमित बाटतें, येथें पहिल्या शब्दांतील अंत्य तचा उच्चार चच्या सुरुवातीच्या तला मिळून त्याची धृति वादली आणि तत् + च (=) याचें तच्च म्हणजे तच्श हैं रूप बनलें. अशा रीतीनें वर्णोचा शास्त्रीय अभ्यास जुन्या व्याकरणांतील घडा- मोडींना बुद्धिग्राह्य बनवतो. जुनें व्याकरण बऱ्याच दृष्टीनें अपूर्ण असलें वरी न्यानें केलेलें निरीक्षण कित्येकदा ध्वनीच्या इतिहासाला मार्गदर्शक ठरतें, हाच याचा निष्कर्ष आहे.

Page 99

प्रकरण तिसरें ध्वनिपरिवर्तन ध्वनी निर्माण कसे होतात आणि त्यांचें वर्गीकरण कोणत्या तत्वावर करण्यांत येतें, याचा विचार आपण पहिल्या प्रकरणांत केला; व नंतर भार्षेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनीचे स्वर्प उच्चारांत कसें बदलतें अगर विकारयुक्त बनतें हैंहि आपण पाहिलें. भाषा ही एका विशिष्ट वर्णमालेचा उपयोग करून निर्माण केलेल्या ध्वनिसंकेतांनी समाजाचे व्यवहार चालवणारी एक सामाजिक संस्था आहे. ज्या विशिष्ट वर्णमालेचा उपयोग भाषा करते ती निश्चित ध्वनीनी बन- लेली आणि सुसंवादी असते; ग्हणजे वाटेल ते वर्ण घेऊन भाषा आपले व्यवहार करत नसून एका ठराविक तत्वाला अनुसरून बनलेल्या वर्ण- मालेचा ती उपयोग करते. पण असें असूनहि आज़ जी भाषा आपणाला पूर्णपर्णे समजते तिचें कांहीं काळापूर्वीचें रूप आपणांला समजायला कठीण जातें आणि फार जुनें रूप तर बरेच बेळां ओळख़तांहि येत नाहीं. या दुर्बोधतेचें अथवा न समजण्यानें कारण हैं कीं भार्षेतले ध्वनी एकसारखे बदलत असतात; ते कर्धीहि स्थिर नसतात. याचा अर्थ असा कीं ज्या ध्वनींचा उपयोग करून आपण एखादी कल्पना सूचित करतों त्यांचा उच्चार हळूंहळूं बदलत जाऊन मूळ ध्वर्नीच्या जागीं दुसरे ध्वनी येतात. एके कार्ळी सप्त असा उच्चारला जाणारा ध्वनिसमुच्चय बदलत जाऊन त्याचें सत्त हें रूप होतें आणि ही उच्चार बदलण्याची क्रिया त्या- नंतरहि एकसारखी चालूं असून कालांतरानें या सत्तचें सात असें उच्चा- रण होतें: पण-प चा त्त होण्याची क्रिया एका विशिष्ट कालमर्यादेत एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रापुरतीच खरी आहे. आज हा वर्णसमुच्चय अस- लेला एखादा शब्द आपण संस्कृत भार्षेतून घेतला अथवा दुसऱ्या एखादया

Page 100

ध्वनिपरिवर्तन ६३

भार्षेतून आलेल्या शब्दांत तो असला तर त्याचाहि उच्चार पुढें असाच बदलेल असें नाहीं. गुप्त, जप्ती, हप्ता, इत्यादी अनेक शब्द आपणांला आज भार्षेत दिसतात. यावरून पूर्वी पचा त्त झाला म्हणजे हा वर्णसंघ उच्चारण्याची आपली शक्ति नष्ट झाली असें नाहीं हें तर सिद्ध होतेंच्च, पण त्याबरोबरच परिवर्तनाच्या एका विशिष्ट क्षेत्रांतील एका विशिष्ट कालमर्यादेंतच पशत्त ही घटना घडून येते हेंहि दिसतें, स्वरमध्यस्थ संस्कृत पचा मराठींत व होतो (सं. दीपक> म, दिवा) याचा अर्थ असा की स्वरमध्यस्थ पचा व होण्याची प्रदेशमर्यादा म्हणजे मराठी भाषा ज्या भागांत बोलली जाते तो भाग आणि कालमर्यादा म्हणजे संस्कृत दीपक हा उच्चार बदलून दिवा हा उच्चार होईंपर्येत गेलेला काळ, पण यावरून एवदधाच काळांत पुढें मराठी सापळा याचा उच्चार सावळा असा होईल असें अनुमान करता येणार नाहीं; कारण प चा व होण्याचें क्षेत्र आणि काळ निश्चित आहे. नंतरच्या काळांत आज मराठींत असणार स्वरमध्यस्थ प बदलून व होतीलच असें नाहीं. भाषेच्या ध्वनिपरिवर्तनांत एकदा झालेली घटना परत घडेल असें म्हणतां येणार नाहीं. निदान प्राचीन भाषांच्या परिवर्तनाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना तरी कोणत्याहि भार्षेत एखाद्या ध्वनीचें परत तेंच तेंच परिवर्तन होण्याची प्रवृत्ति दिसून आलेली नाहीं. शिवाय आज अमुक प्रकारें उच्चारला जाणारा ध्वनि मूळ कोणत्या ध्वनीपासून आला एवढेंच ध्यनिपरिवर्तनाच्या नियमांनी नक्की करायचें असतें, त्या ध्वनीचें भविष्यकाळीं काय परिवर्तन होईल याचा तर्क करायचा नसतो. थोडक्यांत म्हणजे भूतकालीन भाषांचा अभ्यास करून भाषेतील ध्वनी कसे व का बदलतात हैं शोधून काढण्याचा प्रयत्न करणें एवढेच भाषेच्या अम्यासकाचें या बाबर्तींत काम आहे. म्हणून प्रथम आपण उच्चार बदलणें म्हणजे काय तें पाहूं. एखादा व्वनि उच्चारण्यासाठीं मुखयंत्राची जी हालचाल करावी लागते तिच्यांत फरक झाला तर त्याचा परिणाम उच्चारावर होतो. उदाहरणार्थ, वट आणि वड हे दोन शब्द ्या. पूर्वी वट असा उच्चारला जाणारा ध्वनि-

Page 101

६४ ध्वनिविचार

समुच्चय आज वड असा उच्चारला जातो. ज्या ठिकाणी ट हा वर्ण होता त्या ठिकाणीं ड हा वर्ण आला आहे, म्हणजे टचा ड झाला आहे असें सामान्य भार्षेत आपण म्हणूं. ध्वनीच्या उच्चारक्रियेचें योग्य ज्ञान झाल्या- चर आपल्या लक्षांत येईल की ट आणि ड या दोन वर्णात एकच फरक आहे. ट या वर्णात कंप नाहीं, टच्या उच्चाराच्या बेळीं स्वरनालिका स्तब्ध असतात, म्हणून ट हा वर्ण निष्कंप किंवा कठोर आहे. टच्या उच्चाराच्या बेळीं आपण मुखयंत्राची जी हालचाल करतों ती डच्या उच्चा- रांत कायम असते, मात्र त्या बेळीं स्तब्ध असलेल्या स्वरनालिकांत आता कंप सुरूं झालेला असतो. त्यामुळें पूर्वी निप्कंप असलेसा ट आतां सकंप र्किंवा.मृदु बनतो, म्हणजेच टचा ड होतो. घटिका, स्फोट इत्यादि शब्दांतील टच्या जागीं पुढेड येतो, या सर्व शब्दांतला ट दोन स्वरांच्या मध्यें आहे. घटिका=घ् अ ट् इ का, स्फोट=रफ् ओ ट्अ. दोन स्वरांध्या मध्यें असलेल्या वर्णाला स्वरमध्यस्थ वर्ण अशी संज्ञा आहे. म्हणून संस्कृत स्वरमध्यस्थ टचा प्राकृतांत ड होऊन मराठीत डच राहतो असें म्हणतात. यावरून हें दिसून येईल की परिवर्तन समजावून देण्यासाठी ध्वनींचा उच्चार कसा होतो आणि उच्चारक्रियेंत कोणता बदल झाल्यामुळें अमुक ध्वनीपासून अमुक ध्वनि आला, हें दाखवतां आलें पाहिजे. हे उच्चार समजवण्यासाठीं दोन गोष्टींचा आवश्यकता आहे. ज्या प्राचीन भार्षेतलीं उदाहरणें देऊन तिच्या ध्वनीचें पुढ़ें होत जागारें परि- वर्तन आपण दाखवतों, त्या भाषेच्या वर्णमालेचें ज्ञान म्हणजे त्या भाषेचा व्यवहार किती व कोणत्या ध्वनीनीं चालला होता याची बिनचूक माहिती, ही पहिली गोष्ट; आणि भाषा बदलली तरी परंपरागत लिपीचा आधार घेऊनच् समाज आपले लेखनव्यबहार चालवत असतो या गोष्टीची जाणीव, ही दुसरी, जुने ध्वनी जाऊन नवे ध्वनी आले किंवा ध्वनींची संख्या कमी- अधिक झाली तरी लेखनचिन्हें तींच राहतात, म्हणून लेखन उच्चार- दृष्टया समजण्याला आधीं बोलभाषेचा परिचय असावा लागतो. चारा आणि चार, आजा आणि राजा या शब्दांतील लेखनांत एकाच चिन्हानें दर्शवलेल्या ध्वनीतील उच्चारभेद फक्त बोलभाषा येत असली तरच

Page 102

ध्वनिपरिवर्तन ६५

कळतो. म्हणून जुनी व नवी भाषा यांन्ा ध्वनिविषयक संबंध दाखवतांना प्रत्येक भिन्न वर्ण स्वतंत्र चिन्हानें व्यक्त केला पाहिजे किवा (हें शक्थ नसल्यास) ज्या ठिकाणी घोटाळा होईल त्या ठिकाणी स्पष्ट खुलासा केला पाहिजे, उदाहरणार्थ, झ या अक्षराबद्दल बोलतांना त्यानें व्यक्त होणारा उच्चार कोणत्या शब्दांत दंत्य (झारा) आहे आणि कोणत्या शब्दांत तालव्य (झेंडा) आहे, हें सांगितलें पाहिजे. परंपरागत लिर्पीच्या उपयोगामुळें उद्भवणारी ही अडचण दूर कर- ण्यासाठी पाश्ात्य संशोधकांनी प्रत्येक वर्णाला स्वतंत्र चिन्ह असणारी वर्णोच्चारदर्शक लिपि तयार केली आहे. लॅटीन लिपीतच थोडाफार फरक करून ही लिपि तयार करण्यांत आलेली असल्यामुळें मूळ लिपीचा सुट- सुटीतपणा आणि प्रत्येक वर्ण लेखनांत बेगळा व स्वतंत्र दर्शवण्याचें त्या लिपीचें वैशिष्टथ या शास्त्रीय लिपीत आलेलें आहे. संस्कृतच्या भाषिक म्हणजे बोलभार्षेत असणाऱ्या स्वरूपापासून प्राकृत ही भाषिक अवस्था निर्माण होते आणि प्राकृतचें क्रमशः परिवर्तन होऊन मराठी अस्तित्वांत येते, असें स्थूलमानानें गहीत धरून आज मराठींत वापरस्या जाणाऱ्या ध्वनींचा इतिहास आपण पाहूं लागलों तर आपल्याला पुढील गोष्टी करणें आवश्यक ठरेल, प्रथम मरांठींत एकंदर किती आणि कोणते ध्वनी आहेत तें पाहणें, नंतर कोणत्या प्राकृतकालीन ध्वर्नीतून हे "ध्वनी आले आहेत, म्हणजे हळूंहळूं उच्चारांत बदल होऊन निर्माण झाले आहेत याचें ज्ञान मिळवणे आणि याच क्रमानें प्राकृतांतील ध्वनींची निरमिति कोणत्या संस्कृत ध्वनींपासून झाली आहे हैं अभ्यास करून ठर- वणे. उदाहरणार्थ, मराठी काम या शब्दाचें प्राकृत रूप कम्म आहे आणि प्राकृत कम्म या रूपाचें संस्कृत मूळ रूप कर्म (न्) आहे. यावरून असें म्हणतां येईल की मराठी आद्य क प्राकृत आद्य कवरून येतो आणि आ्कृतातील आद्य क संस्कृत आद्य कवरून येतो; किंवा संस्कृतांतील आद क प्राकृतांत कच राहतो आणि प्राकृतांतील आद्य कदेखील मराठीत कच राहतो, पण याचा अर्थ असा नव्हे कीं मराठी आद्य क फक्त संस्कृत-प्राकृत आद्य कवरून येतो. उदाहरणार्थ तो संस्कृत आद्य क्रवरून बनलेल्या ध्व.वि.५

Page 103

६६ ध्वनिविचार

प्राकृत आद्य कबरूनहि येऊं शकेल: सं. क्रोश>प्रा. कोस>म.कोस. मात्र अशा रीतीनें मराठी आद्य क संस्कृतांतून प्राकृतच्या मार्गानें कोणकोणत्या ध्वनींचें परिवर्तन होऊन येतो हैं दाखवून दिल्यानंतर ज्यांचें मूळ संस्कृत आहे अशा मराठी शब्दांतील प्रत्येक आद्य क या नियमा- नुसारच आला पाहिजे, स्थानपरत्वें प्रत्येक ध्वनि एका निश्चित मार्गानेंच भूतकालीन भाषेतून वर्तमान भार्षेत येतो; म्हणजे शब्दाच्या आरंभी, मध्यें अथवा शेव्टी असल्यास तो परिवर्तन पावून येण्याच्या वेगवेगळ्या अवस्था मुळापासून प्रचलित रूपापर्येत ठरलेल्या असतातः पर्ण > पण्ण पान, कर्णे > कण्ण > कान, अद्य > अज्ज > आज, मद्य > मज्ज > माज, अन्य > अ्ल > आन, शन्य (क) > सुब्ब (अ)> सुना, इ. नियमित मार्गानें अपोक्षिलेलें एखादें परिवर्तन न मिळता त्या- ऐवजी आपल्याला कित्येकदा वेगळेंच रूप मिळतें. पण ध्वनीच्या उत्कां- तींत केवळ परिवर्तनाचेच नियम लागूं पडतात असें नाहीं. इतर कारणां- नींही अपेक्षिलेलें परिवर्तन मर्यादित बनबलें जातें. अशा बाह्यतः अनिय- मित वाटणाऱ्या घटनांचा अभ्यास करून त्यामागील कारणपरंपरा शास्त्र- ज्ञांनीं शोधून काढलेली असल्यामुळें ध्वनिपरिवर्तनाच्या क्षेत्रांत अपवा- दाला स्थान उरलेलें नाहीं. फक्त कित्येकदा संशोधनाला अवश्य असणारा सर्व पुरावा भाषेच्या अभ्यासाला उपलब्ध असणाऱ्या साधनांत मिळत नस- स्यामुळें कांही परिवर्तनांचा निश्चित व समाधानकारक उलगडा होत नाहीं. कोणत्याहि भार्षेतील व्युत्पत्तीबद्दल बोलतांना त्या भार्षेतील ध्वनीचा इतिहास ठाऊक असणें अपरिहार्य आहे. ध्वनिपरिवर्तनामागलि तत्वें निश्चित आणि नियमित असून प्रत्येक ध्वनीच्या परिवर्तनाचें क्षेत्र आणि काळ यांच्याहि मर्यादा ठरलेल्या आहेत. या निश्िततेमुळेंच व्युत्पत्ति हें एक शास्त्र बनलेलें आहे. जगांतील सर्व भाषांच्या ध्वनीच्या इतिहासांत हें परिवर्तन सांपडतें. हें परिवर्तन शब्दांत होत नसून वर्णात अथवा वर्णसंघांत होतें. शब्दांत विशिष्ट स्थलीं विशिष्ट परिस्थितींत असलेला वर्ण विशिष्ट प्रकारें बदलतो आणि हैं तत्व निरपवादपणें अशा प्रकारच्या सर्व वर्णाना लागूं पडतें.

Page 104

ध्वनिपरिवर्तन ६७

संस्कृत आद्य प प्राकृतांत पच राहून मराठींतहि पच राहतो. सं. पाद > प्रा. पाअ> म. पाय, पाव सं. पर्ण > मा. पण्ण > म, पान सं. पुत्र > प्रा. पुत्त > म. पूत पण स्वरमध्यस्थ संस्कृत पचा प्राकृतांत व होऊन मराठीत वच राहतो. सं. सपाद > प्रा. सवाअ>म. सवा सं. कूपक > प्रा. कूवअ> म, कुा सं. वापी > प्रा. वावी> म. वाव प्र या संघाचा शब्दारंभीं प आणि इतरत प्प होतोः सं. प्रतिष्ठान > प्रा. पड्ठाण> म. पैठण ( < पैठाण) सं. प्रणप्तृ > प्रा. पणत्त > म. पणतू सं. क्षिप्रम् > प्रा. खिप्पाम् प्राकृत प्पचा मरा्ठींत प होतोः सं. सर्प > प्रा. सप्प >म. साप सं. शूर्प > प्रा. सुप्प > म. सूप संस्कृत णचा प्राकृतांत ण्ण व मराठींत न होतो : सं. पूर्णिमा > पुण्णिवा > म. पुनीव सं. चूर्ण (क) > प्रा. चुण्ण (अ) > म, चुना जर्मन भाषेत सर्व ई (i) चा आधीं एइ (ei) व नंतर आइ (ai) होतो, पण आइचें लेखन मात्र जुनें म्हणजे ei हेंच राहतें: win >Wein, triben>treiben,lihen>leihen,zit> Zeit. सर्व ऊ (प) चाआऊ (au) होतो: hus>Haus, zun>zaun, ruch>Rauch.सर्व त्स (z) चा स (ss) होतो: wazer>Wasser,fliezen>fliessen लॅटीन भार्षेत सर्वं स्वरमध्यस्थ Sचा r होतोःgenesis> generis *asena >arena फ्रेंच भार्षेत सर्व तालव्य 1 चा y होतो: piller, bouillir. लेखन तेंच पण उच्चार piye, buyir.

Page 105

६८ ध्वनिविचार

• बरील उदाहरणांवरून दिसून येईल की ध्वनिविषयक बदल हे एका विशिष्ट परिस्थितीर्शी निगडित असतात, केवळ अमुक एक वर्ण बदलवो असें नसून स्थान, क्रम, आघात, दुसऱ्या वर्णाचें सान्निध्य, तो पुढे असणें किंवा मागे असणें, आगेंमागें स्वर असणें, इत्यादि प्रका- रानीं एका विशिष्ट परिस्थितींत असणारा वर्ण बदलतो. सप्तमधील पचा न होऊन सत्त हें रूप येतें, तर याच दोन वर्णोनी बनलेल्या उत्पद्यते- मधील त्पचा प कायम राहून उप्पज्जइ हें रूप मिळतें. एकाच वर्णाचें स्थानपरत्वें होणारें भिन्न परिवर्तन या विषयाची चर्चा अन्यत्र आली असल्यामुळें या ठिका्णी त्याचा फक्त उल्लेखच केला आहे. अशा रीतीनें परिवर्तनक्षम असणारा वर्ण बदललाच पाहिजे, ज्या ठिकाणी तो बदलत नाहा अगर वेगळ्या प्रकारें बदलतो त्या ठिकार्णी या अनियमितपणाचें समाधानकारक कारण दिलें पाहिजे, वर दिलेल्या उदाहरणांत प्रति (ष्ान) याचें आर्धीं पइ (ठ्वाण) व नंतर पै (ठण) झालेलें आहे. वस्तुतः प्रति याचें प्राकृतच्या पूर्व कालांत पटि असें रूप झालें आहे, म्हणजे त्यांतल्या तचा लोप न होतां आर्धीं आलेल्या रच्या परि- णामानें ट झाला आहे .. या पटिचें पुढें पडि व शेवर्टी पड असें रूप होतें : प्रतिशन्द > पटिसद्द > पडिसद्द > पडिसाद, पडसाद; प्रति- (छाया) > पड(छाया). या नियमानुसार प्रतिष्ठान याचें परिवर्तनपटि- द्वाण असें झालें पाहिजे. पण पुढे आलेल्या-ट्वाण या पदांतील टवर्गीय वर्णाच्या सान्निध्यामुळें पटिमधाल ट नाहींसा झाला आहे; अपवादानें पटिऐवजी पइ हें रूप आलेलें नाहीं. ध्वनिपरिवर्तन दोन प्रकारचें असतें : स्वयंभू व संयोगजन्य. वर्ण जेव्हां स्वतःव्याच परिस्थितीमुळें अथवा अंतर्गत कारणांनी बदलतो तेव्हां परिवर्तन स्वयंभू आहे असें ग्हणतात; पण आजूबाजूच्या कारणांनी जेव्हां चर्णात फरक होतो तेव्हाँ परिवर्तन संयोगजन्य आहे असें म्हणतात. उदाहरणार्थ संस्कृत शचा प्राकृतांत (मागधी व्यतिरिक्त) सर्वत्र स होतो, जर्मानिक t चा जर्मन भार्षेत 7 (त्स) होतो, प्राकृत छचा मराठींत स होतो. हीं स्वयंभू परिवर्तनाचीं उदाहरणें झाली. पण लॅटीन ct, pt यांचा

Page 106

ध्वनिपरिवर्तन ६९ 4

इटालियन भार्षेत tt होणे (factum >fatto, captivum>cattivo), किंवा संस्कृत प्त, त्र, कर यांचे प्राकृतांत त्त, त्त, क, होणें (सक्ष >सच, पुत्र> पुत्त, चक्र> चक्र ) हीं संयोगजन्य परिवर्तनार्ची उदाहरणें आहेत, कारण या ठिकाणीं संयुक्त व्यंजनांतील एक व्यंजन, अधिक प्रभावी ठरून त्याच्या संयोगामुळें दुसरें व्यंजन बदललें आहे. परिवर्तनाला अनुकूल परिस्थिति असतांना तें घडून आलेंच पाहिजे, नाहींतर त्याचा अभ्यास करणें अशक्य होईल. .. " संयोगजन्य परिवर्तन हें नेहमीं निर्बैधयुक्त असतें, याचा अर्थ असा नव्हे कीं स्वयंभू परिवर्तन हें पूर्णपणें निर्बेधरहित असतें. कित्येकदा परि- वर्तनकारक परिस्थितीच्या अभावामुळें ही स्वयंभृता त्याच्या ठिकार्णी येते. प्राकृत छव स यांचें परिवर्तन मराठींत स असें होतें, परंतु इ, ए, य पुढें आल्यास मात्र हा स तालव्य बनतो, म्हणजे त्याचा श होतो : सप्त > सत्त > सात, क्षण > छण > सण, वत्स > वच्छ>वास(रूं); पण क्षेत्र> छेत्त > शेत, शीतलक > सीअल(अ)> शिळ्या. स्वयंभू व संयोगजन्य परिवर्तन यांच्यांतला भेद स्पष्ट समजून घेष्या- साठी परिवर्तनाचे सर्व टप्पे आपण तपासले पाहिजेत; ग्हणजे एखाया चर्णाचें रूप आधीं काय होतें, नंतर काय होतें, याचें ज्ञान मिळवून या इतिहासाच्या आधारें त्या वर्णाच्या सर्व अवस्थांचा अनुक्रम ठरवला पाहिजे, असें केलें म्हणजेच बाह्मतः असंभाव्य वाटणारी रूपें सुसगत व नियमित आहेत हें पटेल, उदाहरणार्थ स्वरमध्यस्थ सचा लॅटीन मार्षेत र होतो हैं विधान आक्षेपाई आहे. कारण समध्यें कंपतत्व नसल्यामुळे त्याचा एकदम र होणें शक्य नाहीं. ग्हणून सचा र होण्यापूर्वी स आषि र यांच्या दरम्यान असलेल्या आणि रला जवळ असणाऱ्या एका अव- स्येंतून स आर्धी गेला असला पाहिजे, स्वरांचें वैशिष्टथ कंप हैं आहे. समध्यें कंप नाहीं, तेव्हां आर्धी आपल्या आर्गेमागें असलेल्या स्वरांच्या प्रभावामुळें हा स सकंप होईल; म्हणजे त्याचें परिवर्तन झ असें होईळ. सचें झ हें परिवर्तन स्वरांच्या सहबासामुळें घडून आलेलें आहे म्हणून तें संयोगजन्य आहे; पण झ हा वर्ण लॅटीन वर्णमालेत खपण्यासारखा नाहीं

Page 107

७० ध्वनिविचार

तेव्हां तो टाळून आपल्या वर्णमालेला सुसंगत असा एक वर्ण भाषेनें निर्माण केला. हा वर्ण र होय आणि तो मात्र स्वयंभू परिवर्तनानें आलेला आहे. म्हणून या ठिकाणी स> र असें स्वयंभू परिवर्तन नसून स> 'झ> र असें आर्धीं संयोगजन्य व नंतर स्वयंभू परिवर्तन झालें आहे. संस्कृत भार्षेत होणाऱ्या हरि: गच्छति = हरिर्गच्छति या सं्धीत हरिस गच्छति - हरिझ् गच्छति-हरिर्गच्छति ही परंपरा याच निय- मानें लागूं पडेल. या कारणामुळेंच मराठी ध्व्नीचा इतिहास सांगतांना बन्याच वेळां केवळ संस्कृत मूळ देणें व प्राकृत अवस्था वगळणें योग्य ठरणार नाहीं. संस्कृत स्वरमध्यस्थ ल प्राकृतांत तसाच राहून मरार्ठींत त्याचा ळ होतो; काल > काळ, तिल > तीळ, बल > बळ. एवढ्यावरून संस्कृत स्वर- मध्यस्थ लचा मराठींत ळ होतो असें विधान करणें बरोबर ठरणार नाही, कारण या नियमाप्रमाणें संस्कृत तैल याचें (ऐ हा स्वर आहे असें धरून) मराठींत तेळ असें रूप होईल, पण तें तेल असें होतें आणि हैं रूप प्राकृत तेह्ल या रूपापासून येतें. म्हणून मराठी-ळ<प्रा .- ल. <सं. -ल आणि मराठी एल प्रा एह <सं. ऐल असें स्पष्टीकरण करणें येथे योग्य ठरेल. मराठीचें ध्वनिशास्त्र अभ्यासतांना कित्येकदा प्राकृत अवस्थें- तील रूपें बगळल्यास घोटाळा उत्पन्न होण्याचा संभव असतो, याउलट एकमेकांपासून अगर्दी भिन्न असलेले ध्वनीहि मधला दुवा सांपडतांच किती नियमितपणें उत्कांत झाले आहेत तें समजतें. या वर्णपरिवर्तनाला स्थलकालमर्यादा आहे. एका ठराविक काळांत, एका ठराविक प्रदेशांत, एका ठराविक परिस्थिरतीत असलेल्या वर्णाचें एक निशित रूपांतर होतें. म्हणून वर्णपरिवर्तनाला ध्वनिदष्टया अनुकूल असी परिस्थिति, त्या परिवर्तनाच्या सर्व अबस्था, परिवर्तन पूर्ण होण्याला लागलेळा काळ आणि परिवर्तनाच्या अमलाखालों असलेला प्रदेश किंवा लोकसमूदद या सर्व गोष्टी अवश्य लक्षांत घेतल्या पाहिजेत. ध्वनिपरिवर्तनाबद्दल एवढा विचार केल्यानंतर तें कां घडन येतें इकडे -आपण लक्ष देऊं. ध्वनिपरिवर्तनानीं कारणें अगम्य व अतर्क्य आहेत अशी

Page 108

ध्वनिपरिवर्तन ७१

एक जुनी समजूत आतां स्वीकार्य राहिलेली नाहीं. भाषेच्या इतिहासाचा अम्यास आणि भाषा आत्मसात् करून घेण्यासाठी मुलांनी केलेल्या प्रय- त्नांचें निरीक्षण यांच्या पुराव्यानें या प्रभावर आतां बराच प्रकाश पढ- लेला आहे. शिवाय एखादी विशिष्ट भाषा बोलणान्या समाजाचें जीवनहि योग्य अभ्यासाअंती या प्रशाचा समाधानकारक उलगडा करण्याला मदत करूं शकतें. मूल भाषा शिकूं लागण्यापुर्वा त्याच्या तोंडून अनेक प्रकारचे वर्णोच्चार आपल्याला ऐकायला मिळतात. यांतले कित्येक वर्ण तर तें मूल पुर्दें जी भाषा बोलणार असतें तिच्यातहि नसतात. आजबाजूच्या लोकांचें अनु- करण करण्याचा प्रयत्न यानंतर मुलांकडून होऊं लागतो आणिं जेवणें, खाणें, उठणें, बसणें, इत्यादि क्रियांबरोबर बोलण्याच्या क्रियेच्चेंहि घडे तें घेऊं लागतें. पण हें अनुकरण पूर्ण नसतें. मात्र आजूबाजूच्या मंडळीच्या उच्चाराच्या मानानें मुलाच्या उच्चारांत राहिलेली अपूर्णता किंवा घडून आलेला फरक इतका सूक्षम असतो कीं ऐकणाऱ्यांच्या अगर बोलणा- न्यांच्या कानाला तो किंचित्हि उमगत नाहीं. स्विस ध्वनिशास्रज्ञ गोशा यांनी एकाच काळच्या एकाच प्रदेशांतील वुद्ध लोक, तरुण मंडळी व मुलें यांच्या उच्चारांचें ध्वनिमुद्रण करून त्याची तुलना केली, तेव्हां अत्यंत लक्षपूर्वक ऐकून देखील श्रवणगोचर न होणारे अनेक सूक्ष्म भेद त्यांना आढळून आले आणि त्यांना असेंहि दिसून आलें कीं एकाच वयाच्या व्यक्तीच्या भाषणांत हे फरक एकान्च दिशेनें होत असतात, म्हणजे ध्वनींत घडून येणारे हें परिवर्तन प्रत्येक समान वयाच्या व्यक्तीत वेगवेगळें नसून सारख्याच प्रमाणांत आणि एका निश्चित मार्गानें जाणारें असतें. ग्हणूनच काहीं काळानंतर जेव्हां एखादा ध्वनि बदलतो तेव्हां तो सबंध समाजाच्या उच्चारांत एकाच वेळीं बदलतो, अशा रीतीनें ध्वनि- परिवर्तन ही निश्चित मार्गानें जाणारी, प्रत्येक पिढीला निश्चित प्रमाणांत बदलणारी एक सार्वजनिक प्रवृत्ति आहे. या दोन कारणांमुळेंच या परि- वर्तनाचा समाजा्या व्यवहाराला कोणताहि अडथळा होऊं शकत नाहीं. परंतु ध्वनिपरिवर्तनाचें बीज मुलांकडून होणान्या अनुकरणाच्या अपूर्ण-

Page 109

७२ ध्वनिविचार

तेत आहे असें दाखवतां आलें तरीहि एकच ध्वनि मिन्नभिन्न प्रदेशांत भिन्नभिन्न दिशांनी का बदलत जावा हैं कळत नाहीं. गुजरात-महाराष्ट्राच्या एका वेळी एकभाषिक असणान्या प्रदेशांत ग्राम याचीं गाम व गांव, क्षेत्र याचीं खेतर व शेत, हस्त याचीं हाथ व हात, भ्रात याचीं भाई व भाऊ, इत्यादी भिन्न परिवर्तनें कोणत्या मूलभूत कारणांनी झालीं तें सांगतां येत नाहीं. आनुवंशिक गुण हें कारण उच्चारभेदासाठीं व भिन्न परिवर्तनासाठी देण्यांत येतें, पण उच्चारावर परिणाम घडवण्याइतका भेदया दोन समाजांत आपणाला दाखवर्ता येणार नाहीं, एवढेंच नव्हें तर महाराष्ट्रांत अगर महाराष्ट्रीयांच्या संगर्तीत वाढलेली गुजराती मुलें आणि गुजरातेत अगर गुजराती लोकांच्या संगतींत वाढलेलीं महाराष्ट्रीय मुलें परस्परांच्या भाषा अतिशय शुद्धपणें, म्हणजे मूळ रहिवाशांच्या सफाईनें बोलूं शकतात असा अनुभव आहे. हिंदुस्तानाच्या वेगवेगळ्या भागांत पसरलेलीं निर्बासितांचीं मुलें त्या त्या भागांतली भाषा सह्जपणे आत्मसात् करतात, हाहि अनुभव आातां आपल्याला आलेला आहे. मात्र हेंहि कबूल केलें पाहिजे की ज्या लोकांची मुखरचना आपल्यापेक्षां ठळकपणें भिन्न आहे त्यांच्या उच्चारांत कांही वैशिष्टयें येणें शक्य आहे. कांही वंशांतील लोकांची जीभ जाड व बोथट असते, कांहीच्या टाळूचा घुमट कमीअधिक प्रमाणांत खोल असतो, कांही लोक नरमाईनें व अस्पष्टपणे बोलतात, कांही ठांसून स्पष्ट उच्चार करतात. एकच परकीय भाषा दोन भिन्न मानववशांनी स्वीकारली आणि त्याच्या मुखरचनेत अशा प्रकारचे भेद असले तर ते त्या भाषेच्या भिन्न उत्कांतीला कारणीभूत होतील, पण एकाच समाजाच्या भार्षेत स्थानपरत्वें जे भेद निर्माण होतात त्यांचें समर्थन या कारणानें करता येणार नाहीं. शिवाय इतरां्शी संबंध न आलेला निर्भेळ मानववश आता जबळजवळ दुर्मिळच आहे. सुसंस्कृत जगार्शी मुळींच संबंध न आलेल्या वनवासी मानववंशांतच मुखरचनेच्या दष्टीनें कांहीं वैशिष्टयें आढळणें शक्य आहे. मुलांच्या अनुकरणाची अपूर्णता ही प्रयत्न टाळण्याच्या प्रबुत्तीमुळें येते,

Page 110

ध्वनिपरिवर्तन ७३

असे कारण बरेच लोक देतात. कठीण गोष्ट सोपी करणें हा मनुष्य- स्वभाव आहे, म्हणून इतर गोर्ष्टीप्रमाणे उच्चारसौकर्याकडेहि मनुष्याचें 4. लक्ष असणे स्वाभाविक आहे. कांहीं वर्णोच्या (उदा. मूर्धन्य) आणि वर्णसमुदायांच्या (उदा. संयुक्त व्यंजनें, संयुक्त स्वर) उच्चाराला परिश्र- माची आवश्यकता असते त्यामुळें ते सोपे करण्याकडे वक्त्याचा कल असतो. हें विधान मानसशास्त्रदृष्टयाहि पटण्यासारखें आहे. संस्कृताचें प्राकृतांत परिवर्तन हैं या विधानाच्या पुष्टर्थ देण्यांत येईल. पण आर्य भार्षाच्या ध्वनिविषयक इतिहासावर नीट नजर फिरवली तर कठीण उच्चार टाळण्याचा हा प्रयत्न यशस्वी होत नाहीं हैं दिसते आणि इंडोयुरोपीय भाषांच्या उत्कांतीकडे पाहिलें तर कठीण व सोपें या वर्गीकरणाबद्दलहि सर्व लोकांत एकवाक्यता नाहीं असें दिसून येतें. उदाहरणार्थ, संस्कृतमधील के, क्र्, ते, त्र, र्प, प्र, स्क, ष्ट, णे, इत्यादी उच्चार प्राकृतांत नष्ट झाले, परंतु आज मरार्ठीत हेच उच्चार काय पण संस्कृतच्या ध्यानीमनीही नसलेले अनेक उन्चार आलेले आहेत, मात्र लेखनावरून ते दिसून येणार नाहींत. वारकरी= वार्करी; व्याकरण, व्याकणाचा ... भरती= भर्ती; कातर, कात्रीचा, खुरपें = खुपे; वापरणें, वापर्ताना, वापून. मस्करी, विस्कटणें, वस्कन्. उष्टा < उशिटा < उस्सिट्ठ (अ) < उच्छिष्ट (क) करणें = कर्णे; भरणें, भर्ण्यांसाठी बरील शब्दांतील संयुक्त वर्ण संस्कृतच्या परिचयाचे आहेत. आतां पुढील शब्द पाहा. बाळा, वाळ्याचा; पकड्णें, पक्डून बघुर्णे, बघित्ला; आपट्णें, आप्दून बसणें, बसवायला; खेळणें, खेळकर पाटील, पाट्लाचा; गोऱ्या; एक्सष्ट

Page 111

७४ ध्वनिविचार

या शब्दांतले एकत्र उच्चारले जाणारे म्हणजे संयुक्त वर्ण संस्कृत भार्षेंतील संयुक्त वर्णापेक्षां उच्चाराला खान्नीनें अधिक सोपे नाहींत. शिवाय अमुक वर्ण अथवा वर्णसंघ सोपा, अमुक कठीण हैं निश्चित ठरविण्याचें कोणतेंच माप नाहीं. आर्यभाषांना बरेच स्वरमध्यस्थ स्फोटक आंणि सर्व संयुक्त वर्ण उच्चाराला कठीण वाटत होते. भ्रातृचें या भाषांत भाऊ-भाई रूप झालें, पण याच्याच इंडोयुरोपीय रूपापासून आलेल्या फ्रेंच, जर्मन, इंग्रजी, इ. भाषांत frere, brother, Bruder असें परिवर्तन शोऊन त्याचा संयुक्त वर्ण टिकून राहिलेला आहे. जो संयुक्त उच्चार करण्याचें भारतीयांना परिश्रमाचें किंवा अशक्य वाटत होतें तो उच्चार भारतीय भाषांत उच्चारसुकर परिवर्तन घडून आल्यानंतर २५०० वर्षानी युरोपांत अजून कायम असावा, ही घटना उच्चारसौकर्यांच्या मुद्दयाचें निराकरण करण्याला पुरेशी आहे. भाषेष्या परिवर्तनांत विशिष्ट वर्ण व वर्णसंघ समानांतील उच्चाराच्या जुन्या अथवा नव्या मवुर्त्तीना अनुसरून बदलतात आणि या प्रबुत्तीमुळठें स्या वेळच्या वर्णोची एक ठराविक उत्क्रांति होत जाते. कांहीं प्रवृत्ती दीर्घ काळ टिकतात आणि एकभाषिक घटना परत घडवून आणतात. जर्मन भाषिकांची उम्लौट ही प्रवृत्ति लागोपाठच्या दोन परिवर्तनांत दिसून आली आहे. उलट कांहीं भार्षात उपात्य अवयवावर आघात अस्यामुळें अंत्य अवयव दुर्बल बनून नाहींसा होईल आणि उपांत्य अवयव हाच नंतर अंत्य अवयव बनून तो आघातयुक्त होईल आणि याचा परिणाम जवळच्या म्हणजे नव्या शब्दांतील उपात्य अवयवावर होऊन वर सांगितलेल्या अंत्य अवयवाच्या उलट परिणाम येथें घडून येईल, कलिका या शब्दांतील लि (उपांत्य अवयव) आघातयुक्त अस- स्यास कालांतरानें तिचें कलिआ> कली कळी असें रूपांतर होईल आणि उंदीर्, हरीण बगैरे शब्दांत अंत्य अवयवावर असलेला आघात या शब्दांचीं उंदिरा,* हरिणा* हीं सामान्य रूपें होतांच त्यांतल्या अंत्य अवयवांवर म्हणजे राव णा यांच्यावर येऊन मागील अवयव दुर्बल

Page 112

ध्वनिपरिवर्तन ७५

बनेल व तो आद्यावयवाचा अंत्य भाग बनून उंदू-रा, हर-णा अशी रूपें होतील. अशा रीतीनें भाषिक व्यवहार बन्याच अंर्शी उच्चारविषयक प्रवुर्त्तीनी उत्क्रांत होत जातो. या प्रवृत्ती समजल्या म्हणजे एकंदर परिवर्तनाच्या प्रवाहाची दिया आपणाला समजते आणि ज्या ठिकाणी इतर कांहीं पुरावा नाहीं त्या ठिंकाणी ती मार्गदर्शक होते. भाषेच्या कालक्रमानुसार येणाऱ्या अवस्थांचा अभ्यास करून या प्रवृत्ती आपणाला सांपडं शकतात. या प्रवुत्ती कशा निर्माण होतात हा प्रभ् अर्थात्च सर्वोत मह- च्वाचा आहे. ·. मौगोलिक परिस्थिति व हवामान यांचा ध्वनिपरिवर्तनावर परिणाम घडतो असा एक मुद्दा आहे. डोंगराळ अथवा सखल प्रदेश, उष्ण अथवा शीत प्रदेश, समुद्राजवळचे अथवा त्याहून अंतरावर असणारे प्रदेश, ध्वनीच्या जीवनावर व स्वरूपावर महत्वाचा परिणाम घडवतात, असें कांहीं ललोकांचें म्हणणें आहे. हें कारण व अनुवाशक कारण हीं परस्परावलंबी आहेत, कारण भौगोलिक परिस्थितीचा मनुष्याच्या संवयीवर, शरीरावर व सामाजिक जीवनावर निश्चित परिणाम घडतो, असा अनुभव आहे. केवळ बोलण्याच्या ढबीवरून मनुष्य कोणत्या प्रांतांतला आहे हैं पुष्कळदा सागता येतें. कोल्हापूर, कोंकण, खानदेश, वन्हाड, गोवे, इत्यादी प्रदेशांतील व्यक्तींच्या बोलण्यांत कांहींतरी वैशिष्टथ आढळून येतें. शहरां- तल्या माणसापेक्षां खेडयांतला माणूस आणि खेडयांतल्या माणसापेक्षा र्डोंगराळ प्रदेशांतला माणूस अधिक जोरानें बोलतो. स्तब्ध वातावरणांत राहणाऱ्या लोकांपेक्षां वाहत्या हर्वेत जीवित कंठणारे मच्छिमारे, खलाशी, यांच्यासारखे लोक जास्त उंच आवाजांत बोलतात. जोरानें बोलणें म्हणजे उच्चारकरिया नीट करून स्पष्टपणे सर्व ध्वनी उत्पन्न करणें. परंतु अशा प्रकारची उच्चारांत दृढता असलेली भाषा ज्यात उच्चारशैथित्य अधिक आहे अशा इतर भाषांपेक्षां मंद गतीनें उत्क्रांत होत जाते असें अनुमान केल्यास तें चुकीचें ठरेल. अमुक भौगोलिक परिस्थितीचा भाषेच्या

Page 113

७६ ध्वनिविचार·

उत्क्रांतीवर अमुक परिणाम होतो, असें वेगवेगळ्या भाषांची उदाहरणें देऊन सिद्ध केल्यावांचून असें विधान विचारांत घेतां येणार नाहीं. शिवाय भौगोलिक परिस्थिति कोणत्याहि प्रकारें भिन्न नसलेल्या एकाच प्रदेशांत पूर्वी एक असलेली भाषा वेगवेगळ्या मार्गानी बदलत जाते, ही गोष्टहि विसरन चालणार नाहीं. भिन्नमिन्न प्रदेशांतील ध्वनिविषयक वैशिष्टयांचा अभ्यास करणारें प्रादेशिक भाषाश्यास्त्रहि या बाबतींत उपयोगीं पडत नाहीं. फ्रेंच भाषेच्या प्रादेशिक भेदांचा अभ्यास करणारे झिल्येराँ यांनी मूळ एकाच ध्वनीची स्थानपरत्वें भिन्न उत्क्रांति दर्शवणारे नकाशे तयार केले आहेत. या नकाशांवरून अमुक एक ध्वनि कोणत्या क्षेत्रमर्यादेत कशा रीतीनें बद- लतो एवढेंच दिसून येतें, परंतु या परिवर्तनाचा आजूबाजच्या भौगोलिक परिस्थितीरशी कोणताहि कार्यकारण संबंध जोडतां आलेला नाहीं. एखाद्या विशिष्ट काळची राजकीय व सामाजिक परिस्थितिहि ध्वनि- परिवर्तनाला कारणीभूत होते, असें एक मत आहे. राष्ट्राच्या इतिहासांत अस्वस्थता व अस्थिरता, शांतता व सुव्यचस्था यांचा चक्रनेमिक्रम चाललेला असतो. या मताच्या लोकांचें म्हणणें असें आहे की राष्ट्रीय अस्वास्थ्याच्या काळांत भार्षेतहि जोराच्या उलथापालथी होतात आणि शांततेच्या काळांत भाषेचें परिवर्तन अतिशय मंद गतीनें घडून येतें. 1

अस्वास्थ्य आणि शांतता या परस्परविरोधी घटना आहेत हैं खरें असलें तरीहि त्यामुळें भाषेवर त्यांचा परिणाम झालाच पाहिजे आणि तोहि परस्परविरोधी स्वरूपाचा असला पाहिजे, या अनुमानाला वस्तुस्थितीच्या अभ्यासानें पुष्टि मिळत नाहीं. शांततेच्या काळांत सुसंस्कृत समाजांत अनेक संस्थांची अभिवृद्धि होत असते. शिक्षणप्रसार, साहित्यनिर्मिति, रूढिबद्ध लेखन, लोकव्यवहारासाठीं एका सामान्य बोलीचा स्वीकार इत्यादी कारणांनी भाषेच्या स्वैर विका- सावर नियंत्रण पडतें आणि या संस्कृतिपोषक संस्थांची भरभराट होष्या- सारखें वातावरण शांततेमुळें आणि राजकीय व सामाजिक स्वास्थ्यामुळे

Page 114

ध्वनिपरिवर्तन ७७

निर्माण होतें. क्रांति, अराजकता, अश्ञांतता इत्यादी कारणांनी ही नियामक शक्ति कांहीं काळ दूर झाल्यास भाषेवर पडलेली बंधनें नाहींशी झोतात आणि तिच्या नैसर्गिक विकासाला वाव मिळतो. परंतु राजकीय अस्वास्थ्याच्या काळांत ध्वनिपरिवर्तन बेगानें होतें.शांतते- च्या काळांत होत नाहीं असें सिद्ध करण्याला फारसा पुरावा नाहीं. मराठी साहित्याच्या प्रारंभापासून तों विसाव्या शतकापर्येत महाराष्ट्रांत अनेक राजकीय आणि धार्मिक आंदोलनें झालीं; परधर्म आणि परसंस्कृति यांच्यार्शी संघर्ष येऊन निर्माण झालेली खळबळ अगर्दी खेडोपाडीं पोंचली; पण या कालावर्धीत मराठीचे उच्चार फारसे बदलले दिसत नाहींत. व्याकरण बदललें, शब्दसंग्रह वाहून त्यांत फेरफार घडून आले, पण ध्वनिदृष्टया मात्र भाषा त्या मानानें बदलली नाहीं. भार्षेतील ध्वनी बदलण्याची गति हें एक अनिश्चित तत्व आहे. प्रति > 'प्रटि > पटि > पडि > पड या उत्क्रांतीचे टप्पे सारख्याच काळानें गाठण्यांत आलेले नार्हींत. परिवर्तनाची गति दर पिढीला निश्चित असते आणि पूर्ण परिवर्तन सर्व समाजांत एकाच बेळीं घडून येतें, या दोन गोष्टीच फक्त निश्चितपणें सांगतां येतात. एका ध्वनीकडून दुसन्या ध्वनीकडे जातांना काय होतें याचें दिग्दर्शन 'ध्वनिपरिवर्तनाध्या प्रवृत्ती* या प्रकरणांत आलेलें आहे. पूर्वभाषेची पार्श्वभूमि हें आणखी एक कारण ध्वनिपरिवर्तनाचा खुलासा करण्यासाठी दे्यांत येतें. एखाद्ा बलिष्ठ मानववंशानें आक्रमण करून नवा प्रदेश बळकावल्यावर राजकीय वर्चस्वामुळें या प्रदेशांतले मूळचे रहिवासी कित्येकदां आपली भाषा टाकून जेत्यांची भाषा स्वीकारतात. पण मूळ भार्षेतील उच्चाराच्या संवयी या नव्या भाषेच्या उच्चारांत कांहीं वैशिष्टये उत्पन्न करतात. आपली परंपरागत भाषा टाकून जिची आपल्या पुढील जीवनकमाला मदत होईल अशी जेत्यांची भाषा स्वीकारणाऱ्या समाजापुरतें हैं कारण ग्राह्य घरतां येईल, रोमन आक्रमणापूर्वीची आपली भाषा टाकून फ्रेंच लोक आज लॅटिनोद्जव फ्रेंच भाषा बोलत आहेत. पूर्व संवयीमुळे जुनी भाषा टाकून नवी भाषा आत्मसात् करतांना पहिल्या

Page 115

७८ ध्वनिविचार

फ्रेंच पिढीला पडलेले परिश्रम या ठिकाणी लक्षांत घेणें भाग आहे. शिवाय इटलीमधील मूळपासून लॅटिन बोलणाऱ्या समाजांत घडून आलेलें परिवर्तन आणि फ्रान्समध्यें घडून आलेलें परिवर्तन यांत या कारणांमुळेंच कांहीं ठळक भेदहि दिसून येतात. पण विश्वव्यापी स्वरूपाच्या आणि एकाच समाजाकडून दीर्घ काळ बोलल्या जाणाऱ्या भार्षेत घडून येणाऱ्या ध्वनि- परिवर्तनाच्या प्रभावर यानें कोणताच प्रकाश पडत नाहीं. हें उदाहरण परंपरागत संबयी टाकून देऊन नव्या उच्चारांचें अनुकरण करायला प्रारंभ केल्यामुळें घडून येणाऱ्या परिस्थितिजन्य क्रांतीचें आहे आणि आपण ज्याचा विचार करीत आहोत तें ध्वनिपरिवर्तनाचें उदाहरण परं- परागत संवर्यीतच हळूहळू घडून येणाऱ्या स्वाभाविक उत्कांतीचें आहे. शेवटचें एक विधान असें आहे कीं जुने उच्चार टाकून नवे उच्चार स्वीकारणें हा मनुष्याचा नैसर्गिक मनोधर्म आहे. इतर प्रकारच्या चाली- रीतीप्रमाणें उच्चारांच्या चालीरीतींतहि फरक करणें समाजदष्टया समज- ण्यासारखें आहे. पण ध्वर्नीत होणारा फरक अत्यंत मंद गतीनें, अतिशय सूक्ष्म प्रमाणांत होत जातो, आणि तो नियमित व सर्वव्यापी (म्हणजे एक विशिष्ट भाषा बोलणाऱ्या एका विशिष्ट समाजांतील सर्व न्यक्ततींना लागूं पडणारा) असतो. समाजाकडून बुद्धिपुरस्सर केली जाणारी कोणतीहि गोष्ट इतक्या पूर्णतनें आणि निरपवादपणें घडून येणें शक्य नाहीं. आपलें लक्ष नसतांहि आपली श्रासोक्कासक्रिया ज्याप्रमाणें नियमित व अविरत चालूं असते, त्याचप्रमाणें ध्वनिपरिवर्तनहि आपल्या नकळत पद्धतशीर मार्गानें आणि मुळींच खंड न पडतां चालूं असतें, ज्या ठिकाणी एखादा व्यापार बुद्धीच्या स्वाधीन असतो, त्या ठिकाणी त्याचें स्वरूप अनियमित व अनिश्चित होतें, याचा अर्थ असा नव्हे की, ध्वनिपरिवर्तनाच्या घडा- मोर्ड़ीत मनुष्याची बुद्धि ही सर्वस्वीं उदासीन असते. पण मानवी बुद्धीच्या हस्तक्षेपानें भार्षेत घडून येणाऱ्या घडामोडी आणि ध्वनिपरिवर्तनावर होणारा परिणाम हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे; आणि भाषा- विषयक घटनांत बुद्धीकडून होणारें हें कार्य चालीरीती बदलण्याच्या कार्या- प्रमाणें ऐच्छिक नसून ध्वनिपरिवर्तनाच्या निरपवाद कार्यामुळें भार्षेत

Page 116

ध्वनिपरिवर्तन ७९ 4. होणारी उलथापालथ निस्तरण्याचें म्हणजे सुव्यवस्था आणि शिस्त निर्माण करण्याचें आहे.

वरील सर्व विवेचनावरून असे स्पष्ट दिसून येईल की ध्वनिपरिवर्त- नाचें मूलभूत कारण निश्चितपणें सांगणे अजून शक्य झालेलें नाहीं आणि मुलांनी केलेलें भाषेचें अनुकरण अमुक प्रमाणांतच अपूर्ण का राहतें आणि अमुक दिशेनेंच का होतें आणि सहजीवन कंठणाऱ्या मानवसमूद्दांत सर्वत्र सारखेंच का असतें, या प्रश्नाची उत्तरें मिळाल्याशिवाय या विषया- बद्दल निश्चित मतप्रदर्शन करणें अशक्य आहे. ध्वनिपरिवर्तन हें निरपवाद, एकमार्गी आणि सर्वव्यापी असल्यामुळें त्याचा भाषेवर होणारा परिणाम अनेक बिकट प्रश्न उपस्थित करतो आणि भाषेच्या साधनानें होणारा व्यवहार सुरळीत चालावा याच्याकडे समाजाचें एकसारखें लक्ष असल्या- मुळें असे प्रश्न सोडवण्याची बौद्धिक धडपड समाजाकडून स्वाभाविकपणें होत असते. नकळतपणें घडणारें ध्वनिपरिवर्तन आणि त्यामुळें उत्पन्न होणान्या अडचर्णीना तोंड देण्यासाठीं समाजाकडून होणारी सहेतुक बुद्धिपुरस्सर प्रतिक्रिया हा भाषेच्या इतिहासाचा सारांश आहे.

म्हणून ध्वनिपरिवर्तनाचें मूलभूत स्वरूप न विसरतां भाषेचा अभ्यास झाला पाहिजे, विचार व्यक्त करण्याच्या ध्वनिरूप साधनाचें अनुकरण करण्याचा कितीहि प्रयत्न झाला तरी एका पिढीची भाषा दुसऱ्या पिढीला येऊन पोचेपर्यत तिचे स्वरूप सूक्ष्म प्रमाणांत बदलतेच. हा बदल कालां- तरानें तीव्र होऊन मूळ ध्वनीचें पूर्ण परिवर्तन होतें. पण एका विशिष्ट काळीं एका विशिष्ट प्रदेशांतील सबंध एकभाषिक समाजांत तें सारखेंच घडून येतें, हें तत्त्व अत्यंत महत्वाचें आहे. अशा प्रकारें घडून येणान्या परिवर्तनाची प्रदेशमर्यादा व कालमर्यादा नकी करणें हें भाषेचा इतिहास लिहिणाऱ्याचें काम आहे.

Page 117

८० ध्वनिविचार

मात्र एका पिढींतील माणसांचे उच्चार पूर्वाच्या पिढीतील माणसांच्या उच्चारांपेक्षां लक्षांत येण्याइतके कधींच बदलत नाहींत. तसें झालें तर समाजव्यवहार अशक्य होईल आणि ज्यांच्या वयांत अतिशय अंतर आहे अशा एकाच समाजांतील व्यक्तींना एकमेकांशी भाषिक व्यवदार करतां येणार नाहीं. यावस्न ध्वनिपरिवर्तनाच्या सूक्ष्मतेची कल्पना येण्या- साठी भाषेचें सामाजिक स्वरूप न विसरणें हैं किती आवश्यक आहे य्याची पुन्हां एकदा खात्री पटते.

Page 118

प्रकरण चवथें ध्वनिपरिवर्तनाच्या प्रवृत्ती कोणत्याहि भाषेच्या ध्वनींत कालांतरानें घडून येणारें परिवर्तन कसें घडतें हैं अंशतः आपणाला समजूं शकलें, तरी त्यामागें असणारें तत्व कसें अश्ञेय आहे हैं आपण पाहिलें. कारण हैं तत्व समजल्यास भाषेचें 1 भविष्यकालीन रूपहि आपणांला आतांच समजणें शक्य होईल, पण भाषा इळूंहळूं बदलते व अनुकरणाच्या अपूर्णतेमुळें ती बदलते हें समजलें, तरी

येत नाहीं. अमुक ध्वनि कोणत्या दिशेनें बदलेल हैं निश्चितपणे आपणांला सांगतां

प्रत्येक भाषेचें एका विशिष्ट काळांतील स्वरूप आपण त्या काळच्या लेखी पुराव्यावरून ठरवतों. परंतु हा पुरावा त्या भाषेचें ध्वनिदष्टया त्या काळी निश्चित स्वरूप काय होतें याबदल नेहमींच उपयोगीं पडेल असें नाहीं. उदाहरणार्थ,च चे त्स व त्श हे मिन्न उच्चार मराठींत केव्हां रूढ झाले हैं ठरवण्याचा आपण प्रयत्न करूं लागलों तर जुन्या मराठी वाड्म- याच्या अभ्यासाची त्याला कांहींच मदत होणार नाहीं. मानभावीय जुन्या वाख्यायांत व ज्ञानेश्वरीत चार याचें च्यारि असें रूप आहे.या जुन्या रूपांतील यचा उद्देश च हां तालव्य होता असें दाखवण्यासाठीं मुद्दाम केला असेल, तर त्या काळीं चचे दंत्य व तालव्य असे दोन्ही उच्चार प्रचलित होते असें म्हणावें लागेल; पण तो य परंपरागत असेल तर हा तर्क चुकीचा 111 ठरेल. ध्वनी बदलले तरीहि त्यांना योग्य अशा प्रकारचा फरक लिपींत न केल्यामुळें ही अडचण उभी राहते. तरीहि योग्य निरीक्षणानंतर कांहीं गोष्टी आपण समजूं शकतों. प्राकृतचें वाचन करणा्या अभ्यासकाला ड हें अक्षर परिचित असतें. केवळ लेखनाकडे पाहिलें तर सर्वत्र एकच प्रकारचा ड दिसतो. पण ध्वर्नीचा इतिहास पाहिल्यावर ही समजूत बदलणें भाग पडतें, कशी तें पहा. *व. वि .... ६

Page 119

८२ ध्वनिविचार

सं. प्रा. म. वट > वड > वड् स्फोट > फोड > फोड् घटनम् > घडणं > घड़णें

याच्या उलट सं. प्रा. म. पीडनम् > पीडणं > पिळणं गुड > गुड> तडाअ> गूळ् तडाग > तळाबू बरवर पाहिलें तर प्राकृत डपासून मराठींत ड व ळ हे दोन्ही ध्वनी आले असावेत असें वाटतें. पण ध्वनिपरिवर्तनाच्या नियमाप्रमाणें एकाच ध्वनीचीं एकाच भार्षेत एकाच काळीं दोन भिन्न रूपें होणें अशक्य आहे. शिवाय मूळ संस्कृतमध्यें याच्या मूळार्शी दोन भिन्न ध्वनी असल्यामुळें प्राकृतमधील ड दोन प्रकारचा असलाच पाहिजे असें निश्चितपणें म्हणतां येतें: त्यापैकीं संस्कृत टपासून येणारा ड आपण नेहमीच्या अक्षरानें दाखवला आणि संस्कृत डपासून येणारा ड जर ड या अक्षरानें व्यक्त केला तर ही उत्क्रांति अधिक स्पष्ट होईल, एवढेंच नव्हे तर ज्या अर्थी हूची उत्क्रांति मराठींत ळ अशी होते त्या अर्थी हा ड़ ळप्रमाणें जिह्वाग्र तालुशिखराकडे नेऊन उच्चारला जात असे असें अनुमान निघतें, शिवाय ज्या संस्कृत डचा मराठींत ळ होतो त्याचा वेदकाळांतहि ळ असाच उच्चार होता, ही गोष्ट लक्षांत घेण्यासारखी आहे. अशा रीतीनें एखाद्या भाषेच्या महत्वाच्या अवस्था पाहिल्या म्हणजे ती बोलणाऱ्या लोकांच्या उच्चाराच्या संबयी, कित्येकदा दोन अवस्थांना सांघणारा मघला दुवा, तर कित्येकदा एखाद्या अवस्थेच्या आधीचें रूप, आपणाला मिळतात आणि हीं नियमानें बनवलेलीं काल्पनिक रूपें निय- मित रूपांइतकींच आ्रह्य असतात.

Page 120

ध्वनिपरिवर्तनाच्या प्रवृत्ती ८३

भार्षेतील ध्वनींत घडून येणारा फरक हा वस्तुतः उच्चारांत घहून येत असतो. संस्कृत शब्दांतील स्वरमध्यस्थ पचा मराठींत व होतो असें विधान आपण करतों, तें केवळ सोयीचें आहे म्हणून करतों .- प-चा व होणें हैं विधान अशास्त्रीय आहे. तें करतांना आपणासमोर भाषेच्या दोन अवस्था असतात. पहिली, एका विशिष्ट वस्तूला संबोधतांना ज्या शब्दाचा म्हणजे वर्णसमुच्चयाचा उपयोग आपण करतों त्यामध्यें प हा वर्ण दोन स्वरांच्या मध्यें असणारी पूर्वावस्था; दुसरी, त्याच वस्तूला त्याच भाषेच्या वारसदारांनी वापरलेली, पण-प-च्या जागीं व उच्चारला जाणारी उत्तरावस्था : दीपक > दीवअ> *दीवा> दिवा म्हणजे नंतरच्या समाजात पचा उच्चार बदलत जाऊन व झालेला आहे. तो कसा झाला ? पचा उच्चार करतांना ओठ पूर्ण बंद होतात, स्वरनालिकांत कंप. उत्पन्न न करतां आणि नाकाच्या पोकळीकडे न वळतां हवा सरळ तोंडांत: येते व तिथला अडथळा दूर करून एकदम बाहेर पडते. बचा उच्चार करतांना ओठ किंचित् उघडे राहतात, स्वरनालिकांत कंप उत्पन्न करून पण नाकाच्या पोकळीकडे न बळतां हवा तोंडांत येते व तिथला अडथळा दूर करून एकदम बाहेर पडते. म्हणून प आणि व यांचें उच्चारदष्टया तौलनिक वर्णन असे : प ः उद्धाटन -शून्य व : उद्धाटन - अंशत: कंप स्फोट - नाही कंप -होय -पूर्ण स्फोट . नासिका -नाहीं - पूर्ण नासिका- -नाहीं वरील तुलनेवरून प आणि व या वर्णोमध्यें दोन प्रकारचा भेद आहे: असें दिसून येईल : पला उद्धाटन नाहीं, वला आहे. पमध्यें कंप नाहीं, वमध्यें आहे.

Page 121

८४ ध्वनिविचार

पच्या दोन्ही बाजुंस स्वर आहेत ही गोष्ट लक्षांत व्या, स्वरांचे वैशिष्टथ काय १ उद्धाटन आणि कंप. प-या स्फोटकात हीं दोन तत्वें या बाजूंब्या स्वरांमुळें आलीं, या दोन स्वरांनी त्याला आपल्याप्रमाणेच सकंप व उद्धाटनयुक्त केलें, येथें दोन स्वरांमध्यें प हा स्फोटक स्वरांसारखा बागला; त्याचें स्व्ररीभवन झालें. ध्वनिपरिवर्तनाच्या नियमाप्रमाणें हें उदाहरण सदशीकरण, म्हणजे एका वर्णानें आपल्या जवळच्या वर्णाला आपल्या- सारखा करणें, या सदरांत येतें. दोन स्वरांमधील परजातीय वर्णाला स्वराजवळ ओढण्याची भारती- यांची ही संवय लक्षांत घेतली म्हणजे संस्कृतमधील वर्ण प्राकृतांत येतांना होणारा फरक किती नैसर्गिक आहे, हैं लक्षांत येईल, आणखी कांही उदा- हरणें घेऊन हा मुद्दा आपण अधिक स्पष्ट करूं. गत हा शब्द ध्या. यांतील त दोन स्वरांच्या मध्यें बसला आहे: ग अ त् अ. स्फोटक (त) व स्वर यांमधील पहिला महत्वाचा फरक काय १ तर स्वर हे सकंप आहेत; त तसा नाहीं. म्हणून त्याला आपल्या- सारखा करण्यासाठी त्यांत कंपतत्त्वाचा शिरकाव करणें, हें प्रथम घडून येईल. कंपयुक्त त म्हणजे द, त्यामुळें गूअ त्अ हा वर्णसमुच्चय गू अ दू अ असा बनेल, पण स्वरां्शी विसंगत असणारें स्फोटतत्व या दमध्यें आहेच. हळूंहळूं त्याचाहि पूर्ण लोप होऊन जाईल आणि मग हा शब्द ग् अ (अ) असा होईल. तमध्ये कंपतत्त्व येण्याचें कारण हैं की आर्धी कंपयुक्त अ, मग कंप- शान्य त आणि परत कंपयुक्त अ, असा उच्चार करतांना पहिल्या अचें कंपन तचा प्रारंभ झाल्यावरहि किचित् काळ चालूं रहातें आणि दुसन्या अचें कंपन तचा उच्चार पूर्ण होण्यापूर्वीच किचित काळ सुरूं होतें. पुढल्या व मागल्या स्वरांतील कंपनाचा काळ हळूंहळूं वाढत जाऊन ज्यावेळीं हैं कंपन अखंड झालें म्हणजे त्यामधील स्तब्धतेचा काळ शून्य झाला त्या वेळींच तचा द हा उच्चार स्पष्ट होऊन तो लक्षांत आला.

Page 122

ध्वनिपरिवर्तनाच्या प्रवृत्ती ८५ 4

त्याच्या मध्यंतरीच्या अवस्था लक्षांत येणें संभवनीय नव्हतें. आकृतिद्वारें आपण हें पुढीलप्रमाणे व्यक्त करूं. स्फोट १ कंप २ स्तब्धता कंप ४ काल-WWAWNWNWNWI अ त् अ पहिल्या अचा कंप २ येथें संपला पाहिजे व दुसऱ्या अचा कंप ३ येथें सुरूं झाला पाहिजे. तसें न होतां पहिल्या अमधील कंप २ च्या दिशेनें पुढें सरकतो आणि दुसन्या अचा कंप २ च्या दिशेनें मागें सरकतो. तच्या उच्चारांतील स्तब्धतेला एक कालमर्यादा आहे, पण स्वरांच्या आक्रमणामुळें ही कालमयादा प्रत्येक पि्ढीत कमी कमी होत जाऊन शेवटीं शुन्यावर येते. तच्या स्तब्धतेची नैसर्गिक कालमर्यादा शन्यावर: येईपर्येत जेवढा काळ जातो, तेवढा काळ गत याचें गद हैं रूप व्हायला लागतो. गद हैं रूप शौरसेनी प्राकृतांतील आहे. म्हणून संस्कृत भाषेची ध्वनिदष्टया शौरसेनी ही अवस्था येण्याला तेवढा काळ गेला पाहिजे हा त्याचा अर्थ आहे. प्रवाह स्फोट प्रवाह १ कंप २ कंप ३ कंप काल WW NNINY wA प्रवाह अ द् अ स्तब्धतेचें अंतर-अत्यंत सूक्ष्म प्रमाणांत कमी होत असतें आणि प्रत्येक पिढीला तें सारख्याच प्रमाणांत कमी होत असतें. त्यामुळें गतचा पूर्णपणे गद हा उच्चार एकाच वेळीं सर्व समाजांत-म्हणजे एक विशिष्ट भाषा बोलणाऱ्या एका विशिष्ट प्रदेशांतील आणि एका विशिष्ट काळांतील जनसमूहांत-होईल. परंतु या दम्ध्येहि स्वरांना अपरिचित असें स्फोट तत्त्व आहे. स्वरी- भवनाची पहिली पायरी ज्या प्रमाणें स्तब्धता नाहींशी करून कंप निर्माण करणें, त्याप्रमाणें स्वरीभवनाची दुसरी पायरी म्हणजे स्फोट तत्वाचा

Page 123

८६ ध्वनिविचार

पूर्ण लोप करून तें ज्या दोन स्वरांच्या मध्यें आहे त्यांच्या मर्यांदा एक- मेकांना आणून मिडवणें. ज्याप्रमाणे कंप हें स्तब्धतेचें विरोधक तत्त्व आहे, त्याप्रमाणें प्रवाह हैं स्फोटाचें विरोधक तत्त्व आहे. म्हणजे एका स्वराच्या उच्चारणासाठीं सुरूं केलेला प्रवाह आपल्या आड येणाऱ्या स्फोटाचा अडथळा पूर्ण दूर करून जेव्हां पुढील स्वरापर्येत अखंड चालूं राहतो, त्यावेळीं द या स्फोटकाचा पूर्ण लोप होतो, आणि गद याचें गअ हें रूप आपणाला मिळतें. गत याचें गद हैं रूप शौरसेनी प्राकृतांत व गअ हैं रूप माहाराष्ट्री प्राकृतांत मिळतें. यावरून माहाराड्ट्री ही शौरसेनीची अधिक उत्कांत म्हणजे कालक्मानुसार नंतरची अवस्था आहे, हें सिद्ध होतें. या दोन प्राकृतां- मधला फरक प्रादेशिक नसून उत्कांतिदर्शक आहे असें अनुमान बांधण्याला कोणतीच हरकत नाहीं. याच कोटिकमानें अथ याचें अध हैं रूप शोरसेनी अवस्थेंतील व अह हैं रूप त्यामागून येणाऱ्या माहाराष्ट्री या अवस्थेंतील असलें पाहिजे हैं मान्य करावें लागतें. ज्या तत्वानुसार गतमधील तचा द झाला, त्याच निष्कंप वर्णांचा सकंप वर्ण करण्याच्या तत्वानुसार थचा ध झालेला आहे. थमध्ये त व ह् हे दोन वर्ण आहेत व ते दोन्हीहि निष्कंप आहेत, पण. दोन स्वरांच्या मध्यें आल्यामुळें स्वरीभवनाच्या तत्वानुसार प्रथम दोघांतहि कंपन तत्त्व शिरलें आणि थचा ध झाला. ध हा वर्ण उच्चारदष्टया असा द्+हू आहे. अध चा अह होगें म्हणजे धची सर्व जागा हनें घेणें. असें होतांना प्रथम दूचें स्फोट तत्व ढिलें होऊन तेथें ह मधील श्वास तत्वाला प्राधान्य मिळालें. ध या वर्णोत द मागून ताबडतोच हचा उच्चार झालेला आहे. तसें न होतां प्रथम हा उच्चार द.बरोबरच होऊं लागला व नंतर दला त्यानें पूर्णपणे बाजूला सारलें.

Page 124

ध्वनिपरिवर्तनाच्या प्र त्ती ८७ 1

कंप प्र. स्त. स्फो. स्त. घे. । कंप प्रवाह पहिली अवस्था त् - अ हू. अ

कंप प्र. कंप स्फो. कंप घ. कंप प्र. दुसरी - : अ द् ह् अ कंप प्र. कंप घर्षण स्फो. कंप प्र. तिसरी अ धु. अ कंप प्रवाह। कंप घर्षण कंप प्र. चौथी अ ह् अ

आतां ज्या स्फोटकाच्या उच्चारांत स्फोटाबरोबरच प्राणाचाहि उच्चार होतो त्याला आपण घर्षक हैं नांब दिलेलें आहे, कारण हा उच्चार हवेचें घर्षण. होऊन होतो. घर्षण आणि स्फोट एकाच वेळेला होऊन जो ध निर्माण होईल तो घर्षक ध (इंग्रजीत this या शब्दांत th या अक्षर- द्वयानें दाखविला जाणारा) होय, शुद्ध द मध्यें असणारें दचें स्फोटतत्व घर्षक धमध्यें आणखी ढिलें झालें आणि कालांतरानें त्याचा पूर्ण लोप होऊन शुद्ध ह शिलक राहिला. घर्षक हा स्वरांप्रमाणेच प्रवाही म्हणजे कमीअधिक काळ उच्चारतां येण्यासारखा असून येथें तो पूर्वीच सकंपहि झालेला आहे. म्हणजे प्रवाह व कंप हीं स्वराचीं वैशिष्टयें त्याच्यांत आलेलीं आहेत. त्यामुळें थचा ह झाल्यावर उच्चारदष्टया स्वरीभवन पूर्णं झालें असें म्हणण्यास हरकत नाहीं. घर्षक ध हा अर्धस्फोटक धपेक्षां भारतीयांच्या कानाला फारसा वेगळा लागणारा नसल्यामुळें त्याकडे लक्ष न जाणें साहजिक होतें, तो जेव्हां उच्चारदृष्टया उत्क्रांत होऊन त्याचा पूर्णपणे ह झाला तेव्हांच त्याच्या- कंडे लक्ष जाऊन त्याचें लेखन बेगळें करण्याची आवश्यकता निर्माण झाली. भारतीयांची दुसरी एक संवय ही कीं ते शब्दांतील उपात्य स्वराबर आघात देत. त्यामुळें अंत्य स्वर निर्बल होऊन शेवर्टी लोप पावत असे :- बाण-चाणू, तीर-तीर्, विद्युत्-विज्जु-बीजू, पह्ली-पाल, माला-माळू,

Page 125

८८ ध्वनिविचार

बगैरे, याचाच दुसरा परिणाम असा झाला की, या शब्दांतील मूळ उपात्य स्वर दीर्घ बनला. पूट, बीळू, हींब्, बगैरे. ही संवय अगदी अलीकडच्या काळापर्येत चालूं असावी असें वाटतें. कारण पूर्ण तत्सम शब्दांच्या शेवटचा स्वरहि लोप पावल्याचीं अनेक उदाहरणें आहेत. मध, रीत, पद्धत्, जात्, बगैरे. या संवयीचा हल्ींचा परिणाम असा आहे कीं पूर्वी उपात्य असलेले पण आतां अत्य झालेले मराठींतील सर्व स्वर दीर्घ बनले. शेवटचा स्वर दीर्घ उच्चारण्याच्या संवयीमुळें मराठी शब्दांतील इतर स्वर निर्बल व नहस्व बनलेले आहेत. तसेंच शब्दाचें सामान्य रूप होतांना हा उच्चार पुढे सरकल्यामुळें मागील स्वराचा लोप झालेला आहे :- हरीण-हरणाचा वाघूळठ-वाघ्ळाचा मूळ दीर्घ स्वर व्हस्व बनले आहेत. पीळू-पिलणें मूळ्-मुळी व्हस्व होणें, लोप पावणें, दीर्घ होणें हैं अगदी नियमित रीतीनें होतें, पण त्याची विशेष चर्चा करण्याचें हैं स्थळ नव्हे. पुत्र आणि त्रपा या दोन्ही शब्दांत त्र हा वर्णसमुच्चय आहे. यांतील त्रपाच्या त्रचा उच्चार त आणि र यांच्या उच्चारांत मुळींच विलंब न लावतां होत असे. त्यांतील त हा स्फोटक घृतिशून्य आणि स्तंभित आहे. म्हणजे त्याचा पूर्ण स्फोट होण्यापूर्वीच त्याच्या नंतरच्या वर्णाचा उच्चार सुरूं झाला आहे. पूर्वीच्या ध्वनिलेखनपद्धतीनें हैं आपण पुढीलप्रमाणें व्यक्त करूं,

त्रपा: त् र् अ प् आ

Page 126

ध्वनिपरिवर्तनाच्या प्रवृत्ती ८९

पण पुत्र या शब्दांतील त्र मात्र तचा उच्चार दीर्घ करून होत असे :- < > >< पुत्रः पू उ त् ... त्र अ किंवा सामान्य भार्षेत म्हणावयाचें झालें तर पुत्-त्र असा होत असे, पु-त्र असा होत नसे. त्यामुळेंच पहिल्याचें प्राकृतीकरण तवा असें झालें आणि दुसन्याचें पुत्त असें झालें. पुत्र याचा उच्चार (पु)तर असा झाला असता, तर त्याचें उत्तरकालीन रूप पुत असें झालें असतें. पुत्र आणि त्रपा या दोन शब्दांत लिहिल्या जाणाऱ्या त्रमध्यें उच्चार- दृष्टथा भेद असलाच पाहिजे, हें त्या दोन शब्दांतील त्रच्या भिन्न उत्काती- वरून दिसून येतें. दोन मिन्न वर्णाची किंवा वर्णसमुच्चयांची उत्क्रांति एकाच दिशेनें होणें शक्य आहे. प्रसाद> पसाअ पति > पइ योग्य > जोग द्ातम् > जूं ज्वल् > जल्, इत्यादी. पण ज्या ठिकाणी एकाच बोलींत दोन भिन्न रूपें उपलब्ध होतात तेथें त्यांचें मूळ भिन्नच असलें पाहिजे. अशा रीतीनें भाषेच्या सर्व अवस्थांचा नीट अभ्यास केला तर ती भाषा बोलणाऱ्या समाजाच्या उच्चाराच्या संवयीचें आपणाला अधिकाधिक ज्ञान होत जातें. या ज्ञानाचा उपयोग कित्येक शब्दां्ची उपलब्ध नसलेलीं जुनी रूपें हुडकून काढण्याकडेहि होतो. या सर्व गोष्टी कोणत्याहि भाषेच्या ऐतिहासिक व्याकरणांत आल्या पाहिजेत, म्हणजे ध्वनिपरिवर्तन हें स्वैर- पणे घडणारें नसून नियमित मार्गानें जाणारें आहे, हैं दाखवतां येईल, पण ध्वनिपरिवर्तनाचे हे नियम एका विशिष्ट भाषेला एका विशिष्ट काळी एका विशिष्ट भौगोलिक मर्यादेपुरतेच लागूं पडतात. स्वरमध्यस्थ पचा व हिंदुस्तानांतील अमुक भाषांत अमुक काळीं झाला तोच नियम फ्रान्स, नॉर्वें किंवा चीन या देशांतील त्या काळच्या भाषांना लागूं पडेल किंवा

Page 127

१० ध्वनिविचार हिंदुस्तानांतील त्याच भाषेच्या पुढील उत्क्रांतींतहि तो लागूं पडेल, असें समजणें चुकीचें आहे. उदाहरणांर्थ, संस्कृतांतील स्वरमध्यस्थ सम्राण स्फोटकाचा प्राकृतांत ह होतो (मधु >म हु). पण प्राकृताचें स्थित्यंतर होऊन मराठींत जे सप्राण स्फोटक आले. त्यांना हा नियम कांहीं व्युत्पत्ति सिद्ध करण्यासाठीं लावणें ध्वनिपरिवर्तनाच्या मूलभूत सिद्धांतांना सोडून आहे. संस्कृत अस्ति याचें प्राकृतांत अत्थि व जुन्या मराठीत अथि हें रूप झालें, आतां आहे या शब्दाची उत्पत्ति सिद्ध करण्यासाठीं केवळ अर्थ- साम्यामुळें तो आथि या शब्दापासून आला हें म्हणणें चुकीचें होय. ्वनिपरिवर्तनाचे नियम निरपवाद म्हणजे सर्वं सारख्या उदाहरणांना सारखेच लागूं पडणारे असतात. आथि मघत्या थचा ह झाला तर माथा, पोथी वगैरे इतर शब्दांतील थचा ह झालाच पाहिजे, तसेंच आथि मधल्या इचा ए झाल्यास इतर सर्व (निदान) अंत्य इना हा नियम लागूं पडलाच पाहिजे. थोडक्यांत म्हणजे अमुक परिस्थितींतील वर्णाचें अमुक परिवर्तन होण्याला एक ऐतिहासिक व भौगोलिक मर्यादा असते. त्या मर्यादेपलिकडे नशाच परिस्थिरतीत असणारा तोच वर्ण त्याच रीतीनें बदलेल असा आग्रह धरणें म्हणजे ध्वनिपरिवर्तन एकसारखें त्याच त्याच नियमांनीं होत असतें असें म्हणण्यासारखें आहे. पण ध्वनिपरिवर्तनाचें भावी स्वरूप त्याच्या भूतकालीन इतिहासानें अजमावतां येण्यासारखें नाहीं. एका विशिष्ट समाजाव्या उच्चाराच्या संबयी आज काय आहेत हें जर आपण पाहिलें, तर कालच्या भार्षेत व आजच्या भाषेत आढळून येणारा फरक आपणांला ध्वनिशास्त्राच्या दष्टीनें समजावून सांगतां येईल, उदाइरणार्थ, नवें घर-नवीं घरें याऐवजीं आ्धीं नवं घर-नवीं घरं व आज नव घर्- नंवी घर असे उच्चार झाले आहेत. म्हणजे एं हा ध्वनि आर्धी अं व मग अ असा झाला आहे. पण यावरून मराठीतील सर्व एंचे अ झाले आहेत असें म्हणतां येणार नाहीं. कारण जें-हें-तें यांचे उच्चार आपण जे-हे-ते असे करतों, म्हणजे या एकाबयवी शब्दांत फक्त सर्वत्र आढळ- णारा अनुनासिकाचाच लोप झालेला आहे. तसेंच इथें-तिथें-कुठें या-

Page 128

ध्वनिपरिवर्तनाच्या प्रवृत्ती ९१

ऐवजी इथे-तिथे-कुठे असाच प्रयोग आपण करतों, त्याअर्थी एंचा अ होण्याचा नियम नपुंसकलिंगी एंकारांत शब्दांना ते अनेकावयवी असले तरच लागूं पडतो असें दिसतें. त्यानें-तिनें इत्यादि रूपांऐवर्जी आतां त्यानी-तिनी हीं रूपें रूढ झालीं आहेत. पण तीं मात्र त्या-चा त्यांचा याच्या अनुकरणानें झालेलीं आहेत :- त्यांचा-त्याचा त्यांनी-त्यानी अश्ञा प्रकारें होणाऱ्या फरकाची चर्चा 'अनपेक्षित ध्वनिपरिवर्तन' या प्रकरणांत आलेली आहे. कित्येकदा एकाच भाषेच्या स्वामित्वाखाली असलेल्या प्रदेशांत दोन वेगळ्या भागांत एक ध्वनि दोन वेगळ्या मार्गानी परिवर्तन पावतो. या दोन भागांपैकीं ज्या भागाची बोली प्रमाणभूत असते तेथील परिवर्तन शिष्टमान्य भार्षेत येतें, पण कित्येकदां भिन्न दिशेनें परिवर्तन पावलेले ध्वनी असणारे शब्दहि विशिष्ट अर्थानें प्रमाणभूत भार्षेत शिरकाव करतात. पाद याचें प्रमाणभूत मराठीव्या दष्टीनें पाव हैं परिवर्तन भार्षेत असूनहि पाय हैं रूपहि विशिष्ट अर्थानें मरार्ठींत आलेलें आहे आणि पाय व

आहेत. पाऊ(ल)-सामान्य रूप पाव(ला)-हे दोन्ही शब्द आज बापरले जात

संस्कृत क्ष या वर्णसंघाच्या प्राकृत भाषेत होणाऱ्या ख व छ या परि- वर्तनांबद्दलहि असेंच म्हणतां येईल. दोन व्यंजनें एकत्र आलीं असती उद्घाटनाचें प्रमाण कमी असलेल्या व्यंजनावर भारतीयांचें लक्ष अधिक असे, असें म्हणतां येईल. या प्रवुत्तीचा परिणाम काय होतो तें एक उदाहरण घेऊन आपण पाहूं. संस्कृतमध्यें सत्य हा शब्द आहे. या शब्दांत त व य हीं दोन व्यंजनें एकत्र आलेलीं आहेत. दुसन्या प्रकरणांत दिलेल्या कोष्टकाप्रमाणें त या व्यंजनाचें उद्घाटन शून्य आहे आणि यचें चार आहे. तेव्हां त या व्यंजनाच्या निर्मितीकडे अधिक लक्ष जाऊन त्याचा परिणाम पुढे येणाऱ्या च्यंजनावर होईल, त व य या दोहोंतला पहिला भेद हा कीं त हा वण

Page 129

९२ ध्वनिविचार निष्कंप आहे. य हा सकंप आहे. तच्या वर्चस्वामुळें त्याचा निष्कंप य बनेल. पण असा वर्ण भारतीय आर्यभाषांत नाहीं, शिवाय यचा उच्चार तालव्य असून घर्षणयुक्त आहे, तेव्हां त्याच्या जार्गी निष्कंप तालव्य घर्षक श हा येईल आणि सत्य याचा उच्चार कालांतरानें सच्च (म्हणजे सत्-त्श) असा होईल. त्य या संयुक्त वर्णातील यच्या जागीं ज्याप्रमाणें निष्कंप तालव्य घर्षक श येतो त्याप्रमाणें द्य या संयुक्त वर्णातील यच्या जागी (द या वर्णात कंप असल्यामुळें) सकंप तालव्य घर्षक झ हा येईल, त्यामुळें अद्य या शब्दाचा कालांतरानें अद्झ म्हणजे अज्ज असा उच्चार होईल. एका भाषेच्या दोन वेगवेगळ्या काळांतील अवस्था पुढें ठेवून त्यांचा अभ्यास केल्यास ध्वनिपरिवर्तनांमागील कांहीं प्रवुत्तीचा बोध होतो. या प्रवृत्ती लक्षांत आल्यानंतर अमुक वर्ण बदलून त्याच्या जागीं अमुक वर्ण येण्यासारठी उच्चारदष्टया काय घडामोडी झाल्या असतील हैं समजतें. त्याचप्रमाणें प्रत्येक वर्ण स्वैरपणें बदलत नसून सबंध वर्णमाला कांहीं प्रनुत्तीना धरून एका विशिष्ट दिशेनें उत्क्रांत शेत जात असते आणि शेवटी परिवर्तन पूर्ण झाल्यावर अस्तित्वांत येणारी नवी वर्णमालाहि पूर्वीच्या वर्णमालेसारखीच सुसंबादी असते ही गोष्ट आपल्या नजरेस येते. म्हणुन ध्वनिपरिवर्तनाचा विचार करतांना प्रत्येक वर्णांच्या इतिहासा- बरोबरच एकंदर मालेच्या परिवर्तनाचें चित्रहि अभ्यासकानें आपल्या दृष्टीसमोर ठेबलें तर या विषयाचें शास्त्रीय स्वरूप त्याला पूर्णपणे दिसून येईल.

Page 130

प्रकरण पांचवें व्वनिपरिवर्तनाचा भाषेवर परिणाम एका विशिष्ट काळीं, एका विशिष्ट प्रदेशांत बोलल्या जाणाऱ्या एका विशिष्ट समाजाच्या भार्षेतील ध्वनी कालांतरानें बदलतात. यालाच ध्वनि- परिवर्तन हैं नांव आहे. हें परिवर्तन निरपवाद, अमर्यादित व अज्ञेय असतें. प्रथम आपण या तीन गुणांचा विचार करूं, हैं परिवर्तन निरपवाद असतें, म्हणजे एका विशिष्ट परिस्थिर्तीत असलेला वर्ण एका विशिष्ट समाजाच्या भार्षेत एका विशिष्ट प्रदेशांत एखाद्या विशिष्ट काळीं अमुक एका कालमर्यादेनंतर अमुक प्रकारें बदलला असें आपणास दिसून आलें, तर त्या समाजाच्या भार्षेत त्या प्रदेशांत त्या काळीं त्या परिस्थितीत असलेला तो वर्ण सर्व शब्दांत तसाच बदलला पाहिजे. तो तसा बदलतो म्हणून त्याचा अभ्यास आपण करूं शकतों, त्या संबंधींचे नियम आपणांला बनवतां येतात आणि त्यांच्या मदतीनें आपण शब्दांची जुनीं र्वरूपें ओळखं शकतों अथवा नकी करूं शकतों. हा अभ्यास व्युत्पत्तिशास्त्राच्या विद्यार्थ्याला अगर्दी अपरिहार्यं आहे, कारण व्युत्पत्ति हें बहंशी ध्वनीच्या इतिहासावर उभारलेलें शास्त्र आहे. हें परिवर्तन अमर्याद असतें, म्हणजे ध्वनीमध्यें घडन येणारा बदल एकसारखा चालूं असतो; तो कधींहि बंद पडत नाहीं. अमुक मर्यादेपलि- कडे शब्दांचें स्वरूप बदलणार नाहीं असें मानणें म्हणजे त्यांच्यांत अमुक चिरस्थायी घटक आहेत असे गहीत घरण्यासारखें आहे. परंतु सर्व शब्द अशा रीतीनें त्या मर्यादेला येऊन पोचल्यानंतर ध्वनिदष्टया एकंदर भाषाच स्थगित होईल असें मानावें लागेल, पण सर्व भाषांचा इतिहास पाहिला तर त्या एकसारख्या उत्क्ांत होत जाणान्या सामाजिक संस्था आहेत असें स्पष्ट दिसून येतें. शिवाय अनेकदां मूळ शब्द आणि त्याचें परिणत झालेलें रूप यांत कोणतेंच साम्य आढळून येत नाहीं; त्यामुळें

Page 131

ध्वनिविचार

त्यांतील कांहीं घटक चिरस्थायी असतात, अशी कल्पना करणें निराधार ठरतें. हैं परिवर्तन अज्ञेय असतें, ग्हणजे आज अमुक प्रदेशांत अमुक समा- जांत बोलल्या जाणाऱ्या भार्षेतील ध्वनीत कालांतरानें काय फरक होतील हें सांगतां येणें शक्य नाहीं. भाषाशास्त्रांतील ध्वनिपरिवर्तनाचे नियम हे एकाच भाषेच्या लागोपाठ येणाऱ्या दोन भूतकालीन अवस्थांच्या अभ्यासानें बनवलेले असतात. त्यांतील कालमानानें अधिक जुन्या असणान्या अवस्थेतील ध्वनींचें परिवर्तन तिच्या मागून येणाऱ्या अवस्थेत अमुक प्रकारचें होतें हैं निरीक्षणानें आपणाला ठरवतां येईल व त्या- संबंधीचें कोष्टकहि आपणांस बनवतां येईल, तसेंच दोन दीर्घकालीन अवस्थांचे मधले टप्पेहि आपणाला ध्वनिशास्त्राच्या साह्यानें ताडतां येतील. परंतु या सर्वं ज्ञानाचा कोणताहि उपयोग भाषेचें भविष्यकालीन स्वरूप हुडकून काढण्याकडे आपणाला करता येणार नाहीं. तें भाषाशास्त्राला शक्यहि नाहीं व तें त्याच्या कार्यक्षेत्रांत येतहि नाहीं. प्रचलित व भूतकालीन भाषांची शक्य त्या सर्वं मार्गानी माहिती गोळा करणें, एकाच भाषेच्या सर्व उपलब्ध अवस्थांचा क्रम नकी करून त्यांचा अभ्यास करणें, एकाच काळीं उपयोगांत आणत्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पण मूळ एकाच भाषेतून निघालेल्या भाषांची तुलना करणें व या सर्वोच्या साह्यानें भाषेच्या विकासाचे, न्हासाचे, परिवर्तनाचे चिरमान्य नियम शोधून काढणें, हें भाषाशास्त्राचें काम आहे. पण जेयें पुरावा लागूं पडणार नाहीं इतक्या मागे भूतकालांत जाऊं पाहणे किंवा भविष्यकालाविषयीं सिद्धांत ठरवीत बसणें, भाषेची उत्पत्ति किंवा अंतिम स्वरूप याविषर्यीचे तर्क करणें, हें भाषाशास्त्राचें काम नव्हे. भाषाशास्त्रांत तर्काला जागा आहे, पण तो तर्क स्वैर नसून इतर उपलब्ध पुरा्यानें मांडल्या गेलेल्या सिद्धांतावर आधारलेला असला पाहिजे, दोन अवस्थांना सांधणारें एक तात्विक स्वरूप, किंवा अनेक समकालीन एकवंशोद्भव भाषांचें त्या सर्व भाषांच्या अभ्यासानें सूचित होणारें, पण सर्वोत जुन्या भाषेच्या मागे एखादाच टप्पा जाणारें, तात्विक स्वरूप आपणाला गहीत

Page 132

ध्वनिपरिवर्तनाचा भाषेवर परिणाम

घरतां येईल, पुष्कळदा नवा पुरावा सांपडून असें तात्विक स्वरूप खरें असल्याचें आढळून आलें आहे, तर क्वचित् पूर्वी होणारी दिशाभूळ् सुधारण्याला अश्ञा पुराव्यानें मदत केली आहे. अर्थात् भाषा जरी ध्वनिदृष्टया, अर्थदृष्टया व व्याकरणदष्टया बदलत असली तरी हा बदल अत्यंत मंद गतीनें व सुक्ष्म प्रमाणांत चालूं असतो; त्यामुळें तो बोलणान्या व्यक्तींच्या लक्षांत येत नाहीं, तो ठळक झाल्या- नंतरच त्याचें पूर्वस्वरूप माहीत असलेत्या अभ्यासकाला तो समजतो. शिवाय अशा बदलामुळें निर्माण होणारी आपत्ति निवारण करण्यासाठीं मनुष्याचें मन स्वाभाविकपणेंच नेहमीं जागृत असतें; कारण आपण बोललेलें दुसऱ्याला कळलें पाहिजे, हें तत्व ध्यानांत ठेवूनच प्रत्येक वक्ता आपले सामाजिक व्यवहार करत असतो. त्यामुळें ज्या ठिकार्णी विचार करण्याच्या साधनांत त्याला अपुरेपणा वाटेल त्या ठिकाणी तें साधन बदळून, अगर त्या ऐबरजी नवें साधन उपयोगांत आणून, तो आपली अडचण पार पाडतो. म्हणून एका भाषेच्या दोन अवस्थांतील भेद हे भाषेच्या अभ्यासकाच्या जितके ध्यानांत येतील, त्याच्या अत्यंत अस्पांशानेंहि ते बोलणारांच्या ध्यानांत येणार नाहीत, तसेंच एकाच मनुष्याच्या आयुष्यांत कोणतीहि भाषा सहसा न समजण्याइतकी बदलण्याचा संभव नसतो. पूर्वकालीन वाब्चय, कागदपत्र, शिलालेख, बगैरे वाचून त्यांचा अर्थंबोध होण्यासाठी आणि भाषेच्या प्रवाहाचा अभ्यास करून त्यामागील चिरस्थायी तत्वें समजन घेण्यासाठी साहित्यप्रेमी वाचक, इतिहासलेखक किंवा भाषा- शास्त्राचा अम्यासक या विषयाकडे वळतो. आपल्या भाषेचें स्वरूप ध्वंनि- दृष्टया अमुक शतकामागें काय होतें याचें अज्ञान समाजव्यवहाराच्या आड येत नाहीं. स्वसमकालीन भाषेच्या उच्चाराला व आकलनाला हैं ज्ञान आवश्यक नसल्यानें या विषयावरील चर्चा जरी तज्ज अभ्यासकाच्या कार्यक्षेत्रांत येते, तरी सामान्य बुद्धीच्या कोणत्याहि सुशिक्षित माणसाला कळण्याइतकी ती शास्त्रशुद्ध व सरळ असते हैं येथें सांमणें इष्ट आहे. ..

Page 133

९६ ध्वनिविचार

ध्वनिपरिवर्तनाचीं आणखी दोन महत्वाचीं तत्वें आपण विसरतां नयेत. तीं ग्हणजे त्याची नियमितता व नकळतपणा. पूर्वी असें सांगण्यांत आलेलें आहे की प्रत्येक भाषेची वर्णमाला ही पूर्णपणें सुसंबादी असते. कालांतरानें या वर्णमार्लेत बदल पडून जेव्हां नवी वर्णमाला तथार होते, तेव्हां तीहि तितकीच सुसंवादी असते. म्हणजे ध्वनींची एका अवस्थेंतून दुसन्या अवस्थेकडे होणारी उत्कांति, ही एका विशिष्ट नियमित मार्गानें होत असते. प्रत्येक ध्वनीची स्वैर उत्कांति होत नसून सबंध वर्णमालेत पद्धतशीर फरक घडून येतो. दुसरें तत्व नकळतपणाचें. भार्षेतील ध्वनीचें परिवर्तन बोलणान्यांच्या नकळत घडून येत असतें, कारण तें इतकें सूक्ष्म व मंद असतें कीं अतिशय सूक्ष्म भेद दर्शवणारें ध्वनिलेखन यंत्रच दोन लागोपाठच्या पिढयांच्या उच्चारांतीळ फरक दाखवूं शकेल, शिवाय एकाच वेळी बोलली जाणारी भाषा वेगवेगळ्या वयाचे लोक वेगवेगळ्या पद्धतीनें बोलूं लागल्यास समाजव्यवहार अशक्य होईल. प्रत्येक मूल आपल्या आजबाजला बोलल्या जाणाऱ्या भाषेचें शक्य तितकें पूर्ण अनुकरण करत असतें. हें अनुकरण जयवहाराला अडथळा न येईल इतकें पूर्ण असतें आणि भाषेच्या स्वरूपांत कोणत्याहि प्रकारचे जे बदल होतात ते व्यवहाराला अडथळा न येण्याचें हैं धोरण संभाळूनच नकळत होत असतात. प्रत्येक व्यक्तीनें केलेले उच्चार कितपत शुद्ध असावेत यासंबंधीं कायदा नाहीं, परंतु ते लक्षांत येण्याइतके ठळक आणि ऐकणाराच्या दष्टीनें आपलें बोलणें दुर्बोध होण्या- इतके बहुसंख्य व तीव्र नसावेत हें उघड आहे. या प्रास्ताविक विवेचनानंतर सर्वव्यापी व निरंतर असें हैं ध्वनिपरि- वर्तन भाषेवर कोणता परिणाम घडवितें हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. ध्वनिपरिवर्तन हें सर्वत्र नियमित घडून येतें. तसेंच पुष्कळदा मित्र असलेले वर्ण एकरूप होतात, त्यामुळें त्याचा पहिला महत्वाचा परिणाम हा होतो की अनेक मिननरूपी शब्द कालांतरानें सारखे दिसूं लागतात. शिवाय भिन्नभिन्न प्रत्ययांनी भिन्नभिन्न काळ, भाव व स्थान व्यक्त कर- गारी करियापदें अथवा नामें यांर्ची रूपें या प्रत्ययांच्या परिवर्तनानें किंवा

Page 134

ध्वनिपरिवर्तनाचा भाषेवर परिणाम ९७

इतर गौण शब्दांर्शी एकजीव होऊन इतकीं बदलतात की त्यांच्यांतील संबंध व साम्य पूर्णपणे अथवा बऱ्याच अंशी नष्ट होतें, यामुळें व्याकरण- क्षेत्रांत भलतीच उलथापालथ घडून येते आणि व्युत्पत्तिदष्टया एकच मूळ असलेले शब्द ओळखूं येईनासे होऊन बेगळे वाटूं लागतात. पति > पइ > पै दलपति > दुलवइ > दळवै दळ्वी ध्वजद्ण्ड > झअअण्ड > झेंडा दण्डक > दण्डअ > दांडा पक्ष > पक्ख पंख-पांख कालपक्ष > कालवक्ख > काळोख या उदाहरणांत पै-वै, दांडा-ण्डा, पंख-ओख यांचें मूळ एकच आहे, हें वरवर पहाणाराच्या मुळींच लक्षांत येत नाहीं. तसेंच स्वतंत्र अर्थ असणारे शब्द इतर शब्दांशी संयोग पावल्यावर त्यांचें जें रूप होतें, तें पुष्कळदां अर्थशून्य वाटतें, काळोखमधील ओख, दळवीमधील वी, इ. यामुळेंच

गृह घर घर मातृगृह माइहर माहेर कुल कुल कुळ देवकुल देअउल देऊळ इत्यादि उदाहरणांत मुळचे भिन्न शब्द एक झाल्यावर एखादा नवाच शब्द ऐकल्याचा भास होतो. ध्वनिपरिवर्तनानें जुन्या वर्णांच्या जागी नवे वर्ण येऊन शब्दाथ्या घटनेंत जी ही कांति घडून येते, त्यामुळें मुळच्या शब्दांत असलेल्या मिन्न व अर्थपूर्ण घटकांचें आपणाला विस्मरण होतें व त्यांचें पृथक्करण करणेंहि आपणाला अशक्य होतें. झेंडा, काळोख, माहेर, देऊळ इत्यादि शब्द आपणाला एकार्थसूचक वाटूं लागतात. उपाध्याय या संस्कृत शब्दाचें ध्व.वि. ७

Page 135

९८ ध्वनिविचार

प्राकृतांत उवज्झाअ व मराठींत वझा ( *< वाझा) अनेकवचनी वझे हैं रूप बनतें, तर मातृस्वसृ या संस्कृत शब्दाचें प्राकृतांत माउसिआ असें रूप होऊन मराठी मावशी (उच्चार मावूशी <माउशी) हा शब्द तयार होतो. अशञां रीतीनें प्रथम पृथककरण कठीण करून पुढें तें पूर्णपणे अशक्य करण्याकडे ध्वनिपरिवर्तनाची प्रवृत्ति असते; ध्वनिपरिवर्तन हैं आंधळें असतें, आपले नियम निरपवादपणें सर्वंत्र लागूं पडल्यानें काय अनवस्था निर्माण होते इकडे त्याचें मुर्ळीच लक्ष नसतें. ही अनवस्था व्यवहाराच्या आड येऊन तो अशक्य होऊं नये अशी व्यवस्था समाजाचें अंतर्मन सदैव करत असतें. रसत्यांत असलेला खाडा किंवा डबकें दृष्टीला पडतांच ज्याप्रमाणें मनुष्याचे पाय आपोआपच तें टाळून सुरक्षित मार्गाकडे बळतात, त्याप्रमाणें वर्णपरिवर्तनानें भाषेला सोसावी लागणारी झीज व तिनें उद्भवणारे प्रश्न समाजाच्या अंतःचक्षूं- समोर सदैव असतात. तसे नसतें तर भार्षेत केवळ ध्वनिपरिवर्तनच घडून आलें असतें आणि व्याकरणाच्या घडामोडी, शब्दसंपत्तीचा विकास, सांस्कृतिक प्रगतीचा अविष्कार करण्यासार्ठी भाषेष्या अंगी असाबी लागणारी शक्ति, शब्दांच्या अर्थात होणारे फरक, इत्यादी गोष्टी संभवल्या नसत्या आणि उच्चारदष्टया भाषा एकसारखी उत्क्रांत होत राहून इतर सर्व दष्टीनीं स्थिर राहिली असती. ध्वनिपरिवर्तनाच्या या आंधळेपणानें भाषेत उत्पन्न होणारा गोंघळहि पुष्कळदां तिन्या भावी जीवनाला मार्गदर्शक बनतो. संस्कृतांत इन् प्रत्ययात कांहीं नामें आहेत. या नामांचें स्त्रीलिंगी रूप या प्रत्ययाला ई जोडून म्हणजे इनी हा प्रत्यय मूळ शब्दाला जोडून तयार होतें. हस्त हस्तिन् हस्तिनी माला मालिन् मालिनी गृह गृहिन् गृहिणी

Page 136

ध्वनिपरिवर्तनाचा भाषेवर परिणाम ९९

कालांतरानें ध्वनिपरिवर्तन होऊन मूळ शब्दांची हत्ती-माळी, हत्तीण- माळीण अर्शी रूपें तयार झाली, पुढे त्याच्या मर्यादित स्वरूपाचें विस्मरण होऊन व त्याच्या सुटसुटीत व अर्थबोधक स्वभावाचे महत्व पटून मराठींत तद्भव ईण प्रत्यय बहुतेक सर्व पुलिंगी नामांचीं स्त्रीरूपें करण्याकडें वापरण्यांत येऊं लागला. कुम्भार वाघ मास्तर कुम्भारीण वाधीण मास्तरीण अशा प्रकारें एका विशिष्ट शब्दसमूहालाच लागूं पडणारें तत्व सर्रास लागूं करण्याचें कांहीं तरी महत्त्वाचें कारण असलें पाहिजे, तें कारण हें :-

होतो. मरार्ठींत प्राकृतद्वारा आलेस्या संस्कृत शब्दांच्या अत्यस्वराचा लोप

सं. पल्ली जिह्वा माला वृद्धि प्रा. पल्ली जिब्भा माला वड़ि म. पालू जीभ माळू बाढू ज्या नामांनी लिंगभेदयुक्त जाति व्यक्त होत नाहीं असे वर दिलेले प्राणिवर्गाबाहेरील अगर क्षुद्र प्राणिवाचक शब्द अंत्य स्वराचा लोप होऊन भार्षेत वावरत आहेत, परंतु जेयें स्त्रीपुरुष, नरमादी हा भेद व्यक्त करायचा आहे तेथें असा लोप झाल्यास दोन्ही लिंगांची रूपें एक होऊन स्पष्ट अर्थबोध होणें कठीण झालें असतें. सं. व्याघ्र-न्याघ्नी प्रा. वग्घ-वग्घी म. वाधु-वाघु* हा घोटाळा टाळण्यासारठी व शब्दांत अधिक स्पष्टता आणण्यासाठी बरील उपाययोजना घडून आली. मात्र ध्वनिपरिवर्तनाशी या उपाय- योजनेचा कोणताच संबंध नाहीं. ध्वनिपरिवर्तनामुळें उत्पन्न झालेत्या अडच्णीना तोंड देण्यासाठी भाषेच्या घटनेंत उपलब्ध असलेल्यां एका

Page 137

१०० ध्वनिविचार

सोयीस्कर साधनाचा समाजाच्या अंतर्मनानें स्वीकार केला व त्याचें योग्य वाटेल तेयें अनुकरण केलें; म्हणून या अनुकरणाला परिवर्तनाचा निरपवादित्वाचा नियम लागूं करतां येणार नाहीं. ज्या ठिकार्णी घोटाळा होणार नाहीं, क्या ठिकाणी जुरनी रूपें उपयोगीं पडूं शकतील किंवा न्यांची स्त्रीवाचक रूपें पुरुषवाचक रूपांहून पूर्णपणें भिन्न आहेत असे शब्द यांतून बगळले गेले. बाप नवरा बैल राजा घोडा आई बायको गाय राणी घोडी अश्या प्रकारची अडचण संस्कृत भार्षेतहि कांही रूपांच्या बाबतीत आढळून आली होती, आकारांत स्त्रीरूमें असणारे अकारांत पुरुषवाचक शब्द हे त्यांपैकीं होत. उदाहरणार्थ बाल व बाला हे शब्द घ्या आणि मग बाला गच्छन्ति, बालानां सुखबोधाय यांतील बाला-बालानां शब्दाचें लिंग नकी करतां येतें की काय तें पहा. ही अडचण टाळण्याची युक्ति शोधून काढून ती वापरण्यालाहि संस्कृत भाषेनें प्रारंभ केला होता. मूळ पुलिंगी शब्दाला अक व स्त्रीलिंगी शब्दाला इका हे लिंगभेदसूचक पण स्वार्थी प्रत्यय लावून कित्येक शब्दांपुरता तरी आपला हेतु अर्थ स्पष्ट करूं इच्छिणाऱ्या व्यर्क्क्ीनी तडीस नेला. घोटक बालक शिखण्डक१ * मैथुनक घोटिका बालिका शिखण्डिका मैथुनिका घोडा शेंडा घोडी शेंडी मेहुणा मेहुणी मराठींतील एकारांत बहुवचन असणारीं आकारांत पुललिंगी नामें व य्याकारांत बहुवचन असणारी ईकारांत स्त्रीलिंगी नामें हीं या अक-इका प्रत्ययांत नामापासून आलीं असून ईकारांत बहुवचन असणारी एंकारांत नपुंसकलिंगी नामें याच प्रत्ययाच्या मदतीनें बनलेलीं आहेत: घोटकम् > घोडें भाण्डकम् >भांडें घोटकानि > घोडीं भाण्डकानि > भांडी

Page 138

ध्वनिपरिवर्तनाचा भाषेवर परिणाम १०१

विशेषणांनाहि हे प्रत्यय लावून त्यांना लिंगमेद दर्शवतां येण्यास समर्थ करण्यांत आलें. > नवा, *चतुर्थक > चवथा * नवक * नविका > नवी, *चतुर्थिका > चवथी या तत्वानुसार न बनलेलीं विशेषणें मुळींच बदलत नाहीत हें आपण पाह्तोंच. सुंदर मुलगा-मुलगी-मूल, वाईट दिवस-ऱत्र-वर्ष, कडू पाला- भाजी-फळ, इ. या सर्व विवेचनान्या प्रारंभी जी उदाहरणें दिलीं आहेत त्यावरून असा समज होण्पाचा संभव आहे की एकच वर्ण ध्वनिहष्टया दोन दिशांनी उत्क्रांत होत जातो. पक्षचीं पंख व ओख, पतिचीं पै व वी, इत्यादि रूपें पाहून ही कल्पना मनांत येईल, पण ती अगदी दोषपूर्ण आहे. बरतीं जीं दोन उदाहरणें दिलीं आहेत, तीं वस्तुतः जरी एका शब्दाची आहेत तरी त्यांची भिन्न दिशांनी होणारी परिणति त्या शब्दाभोंवतीं जी मिन्न परिस्थिति आहे त्यांत सांपडते. पंख व पै झालेले पक्ष व पति यांचें स्थान स्वतंत्र आहे. यांतील प शब्दारंभी आल्यानें कायम राहिला तर काळोख व दञवी या शब्दांत तोच वर्ण दोन स्वरांच्या मध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या वर्णाच्या सान्निध्यांत आल्यानें त्याचें परिवर्तन भिन्न प्रकारचें झालें, ग्हणून पुष्कळदा परिवर्तन हें निरपेक्ष रीतीनें केवळ अमुक वर्णाचें होत नसून अमुक स्थानी अमुक परिस्थिर्तीत असलेल्या वर्णाचें होतें. निरपेक्ष परिवर्तनाचीं उदाहरणें कोणत्याहि भार्षेत फारच थोडी सांपडतील. पण अनेक उदाहरणें देऊन एकाच वर्णाचें द्विंघा परिवर्तन होतें असें दाखविण्याचा प्रयत्न करण्यांत येईल. पाद > पाव-पाय भ्रातृ > भांऊ-भाई धर्म > घाम-गरम वृद्धि > वाढ-बुड्टी या बाह्मतः विसंगत दिसणान्या जोड्या द्विंघा परिवर्तनाला पोषक वाटतात. पण वस्तुतः तसें नाहीं.

Page 139

१०२ ध्वनिविचार

पाद या शब्दाची पाव हीच उत्कांति मराठीच्या क्षेत्रांतली आहे. संस्कृत शब्दांतील एखादे व्यंजन लोप पावून प्राकृतांत होणाऱ्या त्याच्या रूपांत दोन स्वर लागोपाठ आल्यास त्यामुळें उत्पन्न होणारें उच्चार- वैगुण्य (स्वरसामीप्य) या दोन स्वरांच्या मध्यें व अथवा य हें व्यंजन घालून नष्ट करण्यांत येई. मराठींत हें वच्या साह्यानें साघण्यांत येत असे. घात राज झुतक छाया तडाग *लागन घाव राव जुवा साव (ली) तळाव लावणें तेव्हां पाय हें पोटभार्षेतील किंवा परभाषेतील रूप आहे असें मानावे लागतें. भ्रातृ याचें भाऊ हैं रूप मराठी असून भाई हें रूप गुजराती अथवा हिंदी यांपैकीं एकींतून आले आहे. धर्म याचें घाम हैं परिवर्तन मराठी आहे. गरम हा शब्द इराणी गर्म यापासून आला आहे. मराठीचा जुना शब्द उन्ह (सं. उष्ण> प्रा. उण्ह) हा आहे. वृद्धि याचें वाढ हैं मराठी रूप असून बुड़ी हें हिंदींतून आर्लें आहे. पुष्कळदां एखादा संस्कृत शब्द भार्षेत उशीरा येऊ लागल्यानें त्याला पूर्ण परणत असे ध्वनिपरिवर्तनाचे सर्व नियम लागूं पडत नाहींत. मध्ये याचें प्राकृतांत समानार्थक मज्झम्मि हैं रूपअसून त्याचें मराठीत भार्जी-मार्झी नसें रूप होतें. हा शब्द शिष्ट भार्षेत हलीं जसाच्या तसा वापरला जातो. स्यावर दिला जाणारा अनुस्वार बहुतेक ससम्यंत शब्द अनुनासिकयुक्त असतात हैं पाहून त्यांच्या अनुकरणानें दिलेला आहे. याच शब्दाचें आधीं, कधी, जधीं, तधीं यांच्या परिणामानें मर्घीं असें रूप होऊन तैहि भार्षेत रूढ आहे. परंतु हें रूप संस्कृत, प्राकृत, मराठी या क्रमानें ध्वनिपरिवर्तनाच्या सर्व अवस्थांतून आलेलें नाहीं, हें लक्षांत ठेवलें म्हणजे तें ध्वनिपरि- वर्तनाच्या एकमार्गी प्रवृत्तीच्या तत्वाला बाधक नाहीं हैं पटतें. तसेंच एखाद्या विस्तीर्ण प्रदेशांत बोलली जाणारी भाषा सर्वत्र अगर्दी सारखी बोलली जात नाहीं, तिच्यांत प्रांतिक भेद निर्माण होतात; पण स्यांतील एकच कोणती तरी प्रांतभाषा समाजाच्या सांस्कृतिक व्यवहारा-

Page 140

ध्वनिपरिवर्तनाचा भाषेवर परिणाम १०३

साठी प्रमाण मानण्यांत येते. पुष्कळदां एकच मूळ शब्द प्रांतभार्षेत ब प्रमाणभूत भार्षेत दोन मिन्न मार्गानी व भिन्न अर्थानीं परिणत होत जातो. प्रंतमार्षेत निर्माण झालेला ध्वनिरष्टया व अर्थदृष्टया किंचित् भिन्न असा हा शब्द सोयीस्कर वाटल्यास सूक्ष्म अर्थभेद व्यक्त करण्यासाठीं प्रमाणभूत भार्षेत अंतर्भूत करण्यांत येतो; अशा बेळीं तो उसना मानणें इष्ट आहे. पाव व पाय हीं मराठी रूपें याच तत्वानुसार भार्षेत अस्तित्वांत असावीत, असें मानणें चुकीचें होणार नाहीं. सर्व प्रांतभाषांचा त्यांच्या पोट- भार्षासह केलेला अभ्यास व इतिहास या का्मी मार्गदर्शक होईल. म्हणून ध्वनिपरिवर्तनाचा विचार करताना संस्कृतमधुन प्रारंभ होऊन संस्कृतोत्तर व मराठीपूर्व अश्ञा सर्व अवस्थांमधून आलेलीं पूर्ण परिणत रूपेंर कोणतीं, उशीरा या उत्क्रांतिप्रवाहांत प्रवेश केल्यामुळें अंशतः बदललेलीं अर्धपरिणत रूपेंर कोणती, पूर्णपणे मूळ स्वरूप वापरलीं जाणारी शुद्ध संस्कृत रूपें कोणतीं, थोडे विकृत स्वरूपांत झालेलीं अर्ध- संस्कृत रूपें कोणतीं, परभाषेतून व पोटभाषेंतून उसनी घेतलेली कोणतीं हें योग्य अम्यासानंतर ध्वनिपरिवर्तनाची तत्वें नक्की करून ठरवणें, शक्य तर त्यांची कालमर्यादा घालून देणें ब मग मात्र अशा रीतीनें तयार केलेले नियम कडकपणें पाळणें, हैं मराठीच्या शास्त्रीय संशोधनाच्या दष्टीनें अपरिहार्यं आहे. हिंदुस्तान हा देश अतिशय विस्तीर्ण असला तरी एकसंस्कृतिप्रधान आहे. धार्मिक चळवळी, राजकीय उलाढाली, यांनी उत्पन्न झालेलीं आंदोलनें तेथें एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्येत सहज पोचतात. मूल धार्मिक व शास्त्रीय वाक्म मुख्यतः एकाच भार्षेत असल्यामुळें व त्या वाड्ययाच्या अनुकरणानेंच दीर्धकालपर्यत पुढेहि वाडायनिर्मिति तसेंच बहुतेक धार्मिक व सामजिक चळवळी झाल्यामुळें सर्व भारतीय आर्यं भाषांत शब्दसंप्रह्द्ष्टया, व्याकरणदष्टया व उच्चारदष्टया बडून आलेले · फरक या मूळ स्वरूपाभोवतीं केंद्रीभूत होऊन राहिले आहेत, पुष्कळदा अनेक भिन्न भाषा बोलणार प्रांत एकाच परकीय सत्तेखालीं येऊन त्याच्यांत भाषादृष्टया उत्पन्न होऊं पाहणारे तीव्र भेद नियंत्रित केले गेले.

Page 141

१०४ ध्वनिविचार

इतिहासाच्या अपुरेपणामुळे व पूर्वकालीन घडामोरडींवर प्रकाश टाकणारी साधनें कालदृष्टथा व स्थलृष्टया अनिश्चित व असमाधानकारक असल्या- मुळें आज आर्य भाषांचा इतिहास व स्वरूप केवळ स्थूल मानानेंच आपणाला परिचित आहेत. या भाषांतील सूक्ष्म भेदाचे प्रश्र पुष्कळदा सोडवर्ता न येण्याचें कारण आपलें हैं अज्ञानच होय. अनेकदां हैं द्विधा परिवर्तन क्रियापदांच्या कांहीं रूपांद दिसून येतें. क्रियापदांतील एखादा स्वर किंवा स्वर आणि व्यंजन यांत एका विशिष्ट तत्वानुसार फरक करून एकाच क्रियेचे दोन भिन्न प्रकार व्यक्त करण्याला यानें मदत होते. मरणें-मारणें फुटणें-फोडणें पडणें-पाडणें तुटणें-तोडणें सरणें-सारणें सुटणें-सोडणें पहित्या स्तंभांतील क्रियापदांत अचा आ करून व दुसऱ्या स्तंभांतील क्रियापर्दात स्वराचा गुण करून व अंत्य व्यंजन मृदु बनवून अकर्मक क्रियापदें सकर्मक बनवण्यांत आलों आहेत. परंतु यावरून मूळ एकच असलेला वर्ण दोन मिन्न दिशानी जाऊन दोन प्रकारचे अर्थ निर्माण झाले असें विधान करणें चुकीचें होईल. बाह्यतः आपणाला दिसणारी ही द्विधा परिणति है संस्कृत व्याकरणाच्या कांही रूपांचें वैशिष्टथ असून प्राकृतानें व पुढें मराठीनें जरूर तेथें त्याचें अनुकरण केलें. त्रुख्यति > तुदृइ्ट > तुटे त्रोटयति > तोडेइ > तोडे रफुख्यति > स्फोटयति> फ़ुदृइ > फोडेइ> फुटे फोडे म्हणजे हीं उदाहरणें ध्वनिपरिवर्तनाचीं नसून भाषेनें व्याकरणांतील एका सोयीस्कर प्रथेचा उपयोग करून घेण्याचीं आह्देत.

Page 142

ध्वनिपरिवर्तनाचा भाषेवर परिणाम १०५

ध्वनिपरिवर्तन हें प्रवाही असजें, म्हणजे त्याची गति कालप्रवाहाच्या दिशेनें चाललेली असते; जसजसा काल पुढें सरकतो तमतसे ध्वनीहि अधिक उत्क्रांत होत जातात. ध्वनीचीं बदललेलीं सर्व रूपें कालक्रमानुशार व्यक्त करावयाचीं असतात. जोंपर्येत हा अनुक्रम नकी झालेला नाहीं, तोंपर्येत त्याचा अभ्यास करून त्यांतून ध्वनीची उत्क्रांति दर्शविणारे नियम काढणें व त्या नियमांचा व्युत्पत्ति किंवा ध्वनिशास्त्र यांच्या बाबर्तीत उपयोग करणें पूर्णपणें अशक्य आहे. यामुळेंच संस्कृतापूर्वी पाली किंवा पालीपूर्वी प्राकृत असा क्रम अट्टाहासानें ठरवूं इच्छिणान्या वितंडबादी पंडिताला ध्वनिशास्त्राला गुंडाळून ठेवूनच आपलें संशोधन करावें लागतें. मूळ अस्तित्वांत असलेल्या एखाद्या सोयीस्कर रूपाचें अनुकरण करून व्याकरणानें तयार केलेलीं रूपें हीं ध्वनिपरिवर्तनाच्या उत्क्रांतीच्या निय- मांनी झालेली नसतात; व्हणून अनुकरणात्मक रूपें नक्की करून त्यांचा खुलासा व्याकरणदष्टया करणें अधिक श्रेयस्कर व युक्त होय. ज्या कारळी फुटे-फोडे, तुटे-तोडे हीं रूपें भाषेला मिळालीं त्याच काळीं त्यांचा सुटसुटीतपणा लक्षांत घेऊन समाजाच्या अंतर्मनानें त्यांचें अनुकरण केलें व कित्येक क्रियापदांच्या बाबतीत अर्शीच रूपें प्रचारांत आणलीं, अर्थात् येथे हें सांगणे इष्ट आहे की अनुकरण हैं व्याकरणक्षेत्राचें एक अंग असल्यामुळें त्याचा संबंध मनोव्यापाराशी अधिक येतो, तें ध्वनिपरिवर्तना- प्रमाणे निरपबाद नाहीं, क्रियापदाचीं काहीं रूपें अनुकरणानें बनतील, कांहीं त्याला विरोध करून जुनी परंपरा कायम ठेवतील, तर कांही अगदी वेगळ्या प्रकारेच तयार होतील, पण हीं रूपें तयार करण्याचें कार्य शब्दशास्त्र अथवा व्याकरण यांच्याकडून होत असल्यामुळें त्यांची अधिक चर्चा करण्याचें येथें कारण नाहीं. आणखी एक गोष्ट ही की ध्वनिपरिवर्तनानें तयार होणारी रूपें हीं कालटष्टया एकांमाणून एक अशा रीतीनें येतात आणि ध्वनिपरि- वर्तनाचा अभ्यास करण्यासाठीं आपण एकाच वेळीं एकाच शब्दार्ची दोन कालांतील रूपें विचारांत घेतों, दोन मिन्न काळांतील रूपांचा ध्वनीच्या उत्कांतिदष्टया अभ्यास हा ध्वनिपरिवर्तनाचें विवेचन कर-

Page 143

१०६ ध्वनिविचार

व्याच्या दृष्टीनें अपरिहार्य असल्यानें तो द्वैकालिक आहे असें म्हणतात. कोणत्याहि गोष्टीचा इतिहास लिहितांना हें दैकालिक अभ्यासाचें तत्व रष्टीसमोर असलेंच पाहिजे, एका घटनेच्या लागोपाठ येणाऱ्या अवस्थाचा अभ्यास करतांना त्यांतील एका अवस्थेची तिच्या ताबडतोब मागून येणान्या दुसन्या अवस्थेशीं किवा तिच्या ताबडतोब पूर्वी अस्तित्वांत असलेल्या पूर्वावस्थेशी तुलना करून त्यांना सांधणारे दुवे शोधून काढणें हैं त्या शास्त्राची उत्क्रांति कशी होत गेली हैं दाखवण्यासाठीं आवश्यक तर आहेच, पण असें केल्यानें त्यांतून जी तत्वनिष्पत्ति होते ती इतर शास्त्रांना, किंवा त्याच शास्त्राच्या इतर शाखत्रांच्या अथवा इतर अवस्थांच्या अभ्यासाला, मार्गदर्शक होते.

व्याकरणांत अनुकरणानें बनलेलीं रूपें हीं भूतकालीन रूपांवरून तयार होत नाहींत, तर आपल्याच कारळीं उपलब्ध असलेल्या सोयीस्कर रूपांचें उदाहरण पाहून त्यावरून बनवली जातात. येथे दोन भिन्नकालीन अब- स्थांचा विचार होत नसून एकाच कारळीं अस्तित्वांत असलेव्या वैशि- ष्टयाचा अभ्यास होत असल्यानें हा अभ्यास एककालिक आहे असें म्हणतात. कोणत्याहि भाषेच्या एका विशिष्ट काळाचें अथवा अवस्थेचें व्याकरण हैं एककालिक असतें, असें व्याकरण हें भाषा स्थिर आहे असें मानून तिच्या शुद्धाशुद्धतेची एका विशिष्ट कालांतील रूढि आपणाला दाखवतें. त्या भाषेचा पूर्वेतिहास, तिचे भूतकालीन ध्बनी, इत्यादि गोष्टींच्या ज्ञानाची व्याकरणकर्त्याला मुळींच गरज नसून फक्त ज्या काळव्या भाषेचें व्याकरण तो लिहितो त्या काळची भाषाच त्याच्या पूर्ण परिचयाची असावी लागते.

भाषा हैं विचार व्यक्त करण्याचें साधन असल्यामुळें स्पष्टता हा तिचा .आवश्यक व सर्वश्रेष्ठ गुण आहे. परंतु ती ध्वनीनी व्यक्त होते आणि न्या ध्वर्नीचें तर एकसारखें परिवर्तन होत असतें, त्यामुळें प्रारंभी एकच विचार व्यक्त करणारा शब्द पुष्कळदा भिन्न प्रत्यय लागून अनेक अर्थभेद व्यक्त करतो. पुढे परिवर्तनाच्या प्रवाहांत सांपडल्यामुळें या

Page 144

ध्वनिपरिवर्तनाचा भाषेवर परिणाम १०७

भिन्नप्रत्ययी शब्दांची स्वरूपें अगर्दी वेगवेगळीं होतात किंवा त्यांचें मूळ साम्य अंशतः नष्ट होतें. उदाहरणार्थ, मराठी लिहिणें हा शब्द ध्या. साधारणपणे मराठी क्रियावाचकें संस्कृत अन प्रत्ययांत तद्धितांवरून आलेलीं आहेत. करणम् > करणं > करणें भवनम् > होणं > होणें घटनम् > घडणं > घहणें यानं > जाणं > जाणें, इत्यादि परंतु हा व्याकरणाचा सामान्य नियम झाला. पुष्कळदां असें होतें कीं, अशा रीतीनें मिळालेलें रूप त्याच क्रियापदाच्या इतर रूपांहून इतकें मिन्न असतें कीं, अनुकरणाचा कायदा अमलांत आणून भाषा त्या रूपाला इतर रूपांर्शी मिळतें रूप धारण करण्याला भाग पाडते, एकाच करियेचे मिन्नमिन्न अर्थभेद व्यक्त करणाऱ्या शब्दांत एक ध्वनिरूप शिस्त किवा एकवाक्यता असावी असा प्रयत्न समाजाचें अंतर्मन सदैव करत असतें. उदाहरणार्थ, मराठोंतील लिहिणें, लाघणें, लागणें, हीं रूपें ध्या. ध्वनि- परिवर्तनाच्या नियमाप्रमाणे हीं लेखनम् लेहणं * लेहणें लभनम् लहणं * लहणें लगनम् लअणं * लाणें अर्शी व्हात्रयास हवींत. परंतु मराठीरचीं भुतकालदर्शक रूपें (इ) हल हा प्रत्यय भतकालवाचक धातुसाधितांना लावून होतात; गत *गअइल गेला आगत * आअअल्ल आला उत्थित *उट्ठिअल्ल उठिला, उठला * पडिअल पडिला, पडला आणि पुष्कळदां या धातुसाधितार्चीं रूपें आधारभूत धरून क्रियावाचक रूप बनवलें जातें.

Page 145

१०८ ध्वनिविचार

लिखित लिहिअ लिहिणें * लिहिअल लिहिला लब्ध लद्ध लाधणें * लद्धइल लाधेला, लाधला लम्न लग्ग लागणें * लग्गाइल्ल लागेला, लागला हीं रूपें व्याकरणानें आपस्या सोथीसाठीं तयार केलीं पण तीं ध्वनि- परिवर्तनाचा कोणताहि नियम मोडून अथवा त्याला अपवाद निर्माण करून झालेलीं नाहींत. ध्वनिपरिवर्तनानें नियमितपणें दिलेलें एखादें रूप आ्रह्य ठरवून तें वाक्प्रचारांत रूढ करण्याचें काम मनुष्याच्या ग्रहणशक्ती- कड्डन साहजिकपणें केलें जातें. या सोयीस्कर रूपाची निवड एकदम होत नाही. कित्येकदा एकाच वेळेला एकार्थवाचक अनेक रूपें प्रयोगासाठी वापरली जातात. त्यांतली बहुजनसमाजाला ग्राह्म न वाटणारी रूपें बोलणाऱ्या व्यक्तीनी दाखवलेल्या अनास्थेमुळें व्यवहारांतून नष्ट होतात. एकच कम्पना दर्शवणारे अनेक प्रत्यय बोलणारांना त्रासदायक हातात, अनेक जुर्नी रूपें जरी नित्य वापरलीं गेल्यामुळे एकवाक्यतेच्या तत्वाला बाधक दिसलीं तरी भाषेचा एकंदर कल सुव्यवस्थेकडेच असतो हें विसरतां नये. जुनीं रूपें राहतात ती त्यांच्या अतिपरिचयामुळें किंवा अखंड उपयोगामुळें, परंतु त्याचा जुनेपणा व्याकरणपद्धतीच्या दष्टीनें असतो, ध्वनिपरिवर्तनाच्या दष्टीनें नव्हे. करणें जाणें होणें येणें केलें गेलें झालें आलें यांतील भूतकाळाचीं रूपें व्याकरणकार अनियमित म्हणोत, पण त्यांनी ध्वनिपरिवर्तनाचा कोणताहि नियम मोडलेला नाहीं. वरील विवेचनाचा सारांश हा : ध्वनिपरिवर्तनानें भाषेची व्याकरणपद्धति विस्कळित होते, पूर्वी मिन्र असणारे शब्द पुढे सारखे दिसूं लागतात किंवा पूर्वी एकच असलेला शब्द प्रत्ययांतील ध्वनींची उत्क्रांति होऊन वेगबेगळीं रूपें धारण करतो.

Page 146

ध्वनिपरिवर्तनाचा भाषेवर परिणाम १०९

होत नाहीं. यामुळें वस्तुतः भाषा पुढेपुढें दुर्बोध बनत गेली पाहिजे; परंतु तसें

कारण मानवी जीवनाचा प्रवाह व त्याच्यार्शी संलग असलेला समाज- कयवहार हे अखंड आहेत. त्यांत व्यत्यय येईल असें कोणतेंहि तत्व मनुष्य दूर केल्याशिवाय राहणार नाहीं. मनुष्याचा व्यवहार भाषेवर चालला आहे आणि ध्वनिपरिवर्तन हैं त्या व्यवहारांत अडथळा आणणारें निसर्गतत्त्व आहे. तें नैसर्गिक व अपरिहार्य असत्यामुळें तें नष्ट करणें मनुष्याला शक्य नाहीं; म्हणून त्याच्या मूलभूत स्वभावार्शी न भांडतां न्यानेंच पुरविलेल्या साधनांचा बुद्धिपूर्वक उपयोग करून मनुष्य हे अडथळे दूर करतो. ध्वनिपरिवर्तनानें भार्षेत घडून येणारी क्रांति नकळत झालेली असल्यामुळें तिचे परिणाम जाणवूं लागदांच व्यवहार सुलभ व्हावा असे इच्छिणारी मनुष्याची बुद्धि जागृत होते आणि या क्रांतीचे दुष्परिणाम नष्ट करणारी मानसिक घडामोड एकदम सुरूं होते. पुष्कळदा एकाच भाषेच्या इतिहासात आपल्याला मधूनमधून असे घडामोर्डीनी भरलेले कालखंड दिसतात. अनेक प्रकारचीं नवीन रूपें, शब्दप्रयोग, वाक्यरचना, आपल्या दृष्टोत्पत्तीस येतात. हळूं हळूं त्यांतील जगण्याला पात्र, म्हणजे समाजानें पसंत ठरवून रूढ केलेलीं रूपेंच शिलक राहतात. म्हणून समाजाच्या कल्पकतेला चालना देऊन मोडकळीस आलेली व्याकरणपद्धति पुन्हां ऊर्जितावस्थेला आणणे हा ध्वनिपरिवर्तनाचा मुख्य परिणाम होय, पण अशा रीतीनें होणारी पुनर्घटना हा ध्वनिपरिवर्तनाचा अपवाद नसून त्यांतील निवडक तत्वांचा ऐक्यपरिपोषाच्या दष्टीनें समाजानें बुद्धिपुर्वक केलेला स्वीकार होय. त्यानें ध्वनिपरिवर्तनाचें सर्वव्यापित्व सिद्ध हेतें, पण त्याबरोबरच भाषा हैं मनुष्याचें व्यवहाराचें साधन असल्यामुळें त्यांत उत्पन्न होणारे अडथळे दूर करण्यापुरतें ते मनु- व्याच्या अधीन आहे, हेंहि स्पष्ट होतें.

Page 147

प्रकरण सहावें अनपेक्षित ध्वनिपरिवर्तन क्रमशः भार्षेतील वर्णात घडून येणारें सार्वत्रिक परिवर्तन अमुक प्रदे शांत अमुकच दिशेनें का होतें या प्रश्नाचा खुलासा करणें शक्य नाही, हें आपण यापूर्वीच पाहिलें, मात्र ध्वनीत होणान्या या परिवर्तनांचे आपण गट पाडले आणि त्यांतील प्रवुत्तीकडे पाहून या प्रभ्ाचा विचार केला, तर या परिवर्तनामागील कांहीं तत्वांचा बोध आपणाला होतो. परण हे गट पाडतांना पूर्वी सांगितलेलीं ध्वनिपरिवर्तनाबद्दलचीं मूल- भूत तत्वें आपल्या मुळींच दष्टीआड होता नयेत, तरच हा अभ्यास निर्दोष होणें शक्य होईल. ध्वनिपरिवर्तन हैं एखाद्या वर्णाच्या उच्चारा- साठी होणारी ध्वनियंत्राची हालचाल एका निश्चित दिशेनें बदलत जाऊन कालांतरानें होतें, निष्कंप वर्णाचें एका विशिष्ट परिस्थितींत सकंप वर्णात होणारें परिवर्तन एका झटक्यांत होत नसून, सकंप वर्णाना आवश्यक असणारी स्वरनालिकांच्या कंपाची किया त्यांच्या उच्चारांत हळूंहळूं प्रवेश करत, क्रमाक्रमानें वाढत आणि अखेरीला त्या निष्कंप वर्णाची सर्व कालमर्यादा व्यापून होतें. अशा रीतीनें येणाऱ्या नव्या वर्णाच्या उच्चारासाठीं मुखयंत्राच्या हालचार्लींत जो बदल बडून येतो तो शारीरिक स्वरूपाचा असतो, म्हणून बदललेला वर्ण आर्धीं कसा उच्चारला जात होता आणि परिवंर्तनाचें स्वरूप निश्चित झाल्यावर कसा उच्चारला जाऊं लागला हीं दोन टोकें अभ्यासकानें लक्षांत घेतर्ली पाहिजेत. म्हणजे यांतत्या पहि्या टोकापासून दुसऱ्या टोकाला जाईपर्येत पहिल्या वर्णाला टाकून होणाऱ्या दुसऱ्या वर्णाच्या निर्मितींत उच्चाराच्या दष्टीनें कोणतें शारीरिक स्थित्यंतर घडून आलें तें सांगता येईल, प्रत्येक वर्णाचा उच्चार कसा होतो हैं माहीत झास्यावर सचा झ, झचा र, रचा ल, लचा ळ, पचा व, वचा ब, छचा स, सचा श, इत्यादि परिवर्तनांचे टप्पे सहज लक्षांत येतात, मात्र हें परिवर्तन ध्वनीच्या ११०

Page 148

अनपेक्षित ध्वनिपरिवर्तन १११

उच्चारांत होत असल्यामुळें जुन्या भाषेचा विचार करतांना केवळ तिच्या लेखनावर अवलंबून न राहतां, अमुक एका चिन्हानें व्यक्त केलेला ध्वनि ज्या काळीं ती भाषा बोलली जात होती त्या काळीं कसा उच्चारला जात असे, याचें निश्चित ज्ञान करून घेतलें पाहिजे. उदा- हरणार्थ, ज्ञ हें अक्षर घ्या. मराठी भाषा बोलणारे लोक आज या अक्ष- रानें दून्य हा वर्णसंघ व्यक्त करतात. पण हा उच्चार संस्कृतमधील ज्ञला लावून जर आपण त्या वर्णसंघाची उत्कांति पाहूं लागलों तर आपली दिशाभूल झाल्यावांचुन राहणार नाहीं. हें अक्षर मुळांत ज् +ञ् असें आहे याची जाणीव ठेवून केलेला अभ्यासच या अक्षराची म्हणजे वर्ण- संघाची उत्क्रांति अमुकच दिशेनें का होते या आपल्या जिज्ञासेचें समा- धान करूं शकेल.

उच्चारांच्या मूलभत तत्वांचा आपण विचार केला तर कांहीं परिवर्त- नांचा खुलासा आपणांला सहज मिळतो. उदाहरणार्थ, आपण भक्त हां शब्द घेऊं. याचा मूळ उच्चार भक कुर्त असा आह्दे, म्हणजे यांतील: क हा वर्ण स्तम्भित असून त हा स्फोटयुक्त आहे, स्तंभन व स्फोट या दोन, क्रियांपैकीं स्तंभन हें स्फोटांहून दुर्बल असतें, ज्या व्यंजनाचा स्फोट करा- यचा आहे, त्याच्याकडे अधिकाधिक लक्ष दिलें गेल्यामुळें स्तंमित व्यंज- नाचे उच्चारण जास्त जास्त ढिलें होत जातें. आणि त्याची जागा पुढील स्फोटयुक्त व्यंजनाकडून व्यापली जाऊन कालांतरानें भक्. कृत याचें भत् त असें परिवर्तन घडून येतें.

फ्रेंच ध्वनिशास्त्रज्ञ ग्रामाँ यानी असें दाखवून दिलें आहे कीं दोन वर्णाचा संयोग झाला असता प्राकृतांत सामान्यपणे कमी उद्धाटन अस- णारा वर्ण अधिक जोरदार ठरतो. उदाहरणार्थ अर्क व चक्र या, दोन्ही शब्दांत क हा वर्ण पहिल्या शब्दांत रनंतर आणि दुसऱ्या शब्दांत रपूर्वी- आला असूनहि रपेक्षां अधिक जोरदार ठरला आहे. पण भक्त आणि भत्क असे शब्द घेतले तर त्यांतील त व क हे उद्धाटनाच्या दृष्टीनें सारखेच जोरदार असल्यामुळें यांपैकीं ज्या वर्णांचा स्फोट होणार असेल तो म्हणजे

Page 149

११२ ध्वनिविचार

द्वितीय स्थानी असणारा वर्ण, अधिक जोरदार ठरेल आणि भकूत याचें प्रिवर्तन भत्त होईल; तर भत्क याचें भक्क असें होईल, अशा रीतीनें वेगवेगळ्या कारणांनीं संयुक्त वर्णोतील एक वर्ण अधिक जोरदार बनून कालांतरानें त्यानें आपल्या जवळच्या आधीं किंवा माणून येणाऱया वर्णाला पूर्णपणे आपल्यासारखा बनवलें आहे; म्हणून या कियेला सदशीकरण असें म्हणतात. या चारहि उदाहरणांत एक वर्ण अजिबात चदलून पूर्णपणें दुस्या वर्णासारखा झाल्यामुळें हैं सदशीकरण संपूर्ण झालें, गत याचें गद असे रूप होताना पूर्वीच्या शब्दांतील स्फोटतत्व शिल्लक राहतें, पण दोन्ही बाजुला असणान्या अ या सकंप वर्णाचा परिणाम होऊन तमध्येंहि हैं कंपतत्व इळंहळूं शिरतें, म्हणजे तचा द्द होतो; म्हणून हें सदशीकरण अंशतः झालेलें आहे. भक्त व अर्क या शब्दांत नंतरचा वर्ण जोरदार ठरून त्यानें आपल्या आधीं असणाऱ्या वर्णाला आत्मसात् केलें आहे, म्हणून हें सदृशीकरण अतिगामी म्हणजे मागे सरकणारें आहे; तर चक्र या शब्दांत आ्धी येणान्या क या वर्णानें पुढे येणाऱ्या र या वर्णाला आत्मसात् केव्यामुळे हैं सदशीकरण पुरोगामी म्हणजे पुढे सरकणारें आहे. अशा रीतीनें एका विशिष्ट वर्णाच्या उच्चाराकडे अधिक लक्ष जाऊन तो जारदार बनल्यामुळें सदशीकरण घडून येतें; पण दोन्ही वर्णोकडे सारखेंच लक्ष राहून ते दोवेहि सुरक्षित रहावेत असें वाटणेंहि स्वाभाविक आहे. अशा प्रकारची सुरक्षितता दोन वेगवेगळ्या प्रकारांनी साधतां येईल. उदाहरणार्थ चक्र व धर्भ हे शब्द घ्या. यांतील र हा दुर्बल वर्ण टिकून रहावा असें वाटत असेल तर ज्या दुसऱ्या बलवान् वर्णाशी त्याचा संयोग झाला आहे त्था वर्णांपासून त्याला जरा बाजूला केला पाहिजे. हैं करण्याचा उत्तम उपाय म्हणजे कर वर्मेया संयुक्त वर्णोत एक स्वर आणून ठेवणे, म्हणजे चक््, कूर याच्या ऐवर्जी चक्क अर् आणि घर. रम याच्याऐवर्जी घर रअम् असा उन्चार करणें. पहित्या उदाहरणांत सातनिध्यांत असलेव्या दोन वर्णात अंशतः अगर पूर्ण साम्य आणून बलवान् वर्णाचें दुर्बल वर्णावरचें वर्चत्व मान्य कर-

Page 150

अनपेक्षित ध्वनिपरिवर्तन ११३ ण्यांत आलें होतें. या ठिकाणी दुर्बल वर्णाला धोका पोचूं नये या हेतूनें सान्निध्यांत असणाऱ्या दोन वर्णोच्या मध्यें एक वर्ण आर्धीच आणून ठेवण्यांत आला. श्री, सूत्र, यंत्रमंत्र, शुक्र(वार), इत्यादींचीं सिरी-सरी, सुतर, जंतरमंतर, शुक्कुर(बार), अर्शी रूपें होतात तीं या कारणामुळेंच. दोन वर्णाना एकमेकांपासून एका आगंतुक वर्णांच्या मदतीनें दूर करून त्यांचें संरक्षण करण्याच्या या क्रियेला वियोजन हैं नांव आहे. हैं संरक्षण दुसन्या एका साधनानेंहि करता येतें. दोन संयुक्त वर्णा- तील एक वर्ण अशा रीतीनें बदलला कीं त्यांत कोणतेंच साम्य शिल्क राहिलें नाहीं, तर त्यांची परस्परावर परिणाम घडवण्याची शक्ति संपुष्टांत येईल व ते दोघेहि तुल्यबल होतील, चक्र या शब्दांत क् व र् हे दोन स्फाटक आहेत. त्यांत्या कचा घर्षक बनवला म्हणजे कचें स्तंभन सुरूं असतांच कांहीं प्रमाणांत हवेचें बहिःसरण चालूं ठेबलें तर स्फोटक क+ द्रव स्फोटक र याऐवर्जी घर्षक ख+द्रव स्फोटक र हा संयुक्त वर्ण तयार होईल. हा संयुक्त वर्ण अवेस्तामधील Caxra या शब्दांत आपणाला आढळतो. याच नियमानें पुत्र याचें puera, प्रमाण याचें framana अर्शी रूपें आपणाला मिळतील. या ठिकाणी दोन वर्णातील साम्य नष्ट करण्यासाठी जें साधन वापर- ण्यांत आलें त्याला विसदशीकरण असें म्हणतात. सदशीकरण, विसदृशीकरण आणि वियोजन यांतील कोणत्यातरी एका साधनाकडे भाषेची प्रवृत्ति आढळून येते. भारतीय भाषांची संस्कृतांतून पुढें होत गेलेली उत्क्ांति सदशीकरणाच्या तत्वानें स्पष्ट होते. कांही ठिकारणींच वियोजन हें तत्व लागूं पडतें, याच्या उलट इराणी भाषा ही र्षकप्रधान झाल्यामुळें तिच्यात विसदशीकरणाच्या तत्वाचें वर्चस्व अधिक आहे. वरील तीन प्रकारचें परिवर्तन वर्ण एका विशिष्ट परिस्थिर्तीत असत्या- मुळें घडून आलें, म्हणून या परिवर्तनाला सकारण किंवा परावलंबी परिवर्तन ग्हणतात. पण आजबाजच्या वर्णाचा परिणाम एव्ढेच कारण ध्व.वि .... ८

Page 151

११४ ध्वनिविचार

सर्व वर्णाच्या परिवर्तनामागे नसतें. कांहीं वर्ण कोणत्याहि ठिकाणी बद- लतात; अशा वेळीं ते वर्ण जाऊन त्यांच्या जागीं दुसरे वर्ण येणें याशिवाय दुसरें कोणतेंहि कारण या परिवर्तनाला देतां येत नाहीं, या निरपेक्ष परि- वर्तनाला निरवलंबी किंवा स्वयंभू परिवर्तन असें म्हणतात. संस्कृत ऐ किवा औ यांचें प्राकृतांत ए किंवा ओ होणें, प्राकृतांतील छचा मराठींत स होणें, इत्यादी उदाहरणें निरवलबी परिवर्तनार्ची आहेत. उच्चाराची एक संवय टाकून समाजानें तिच्या ठिकाणी दुसरी संवय आणली, एवढेंच फार तर आपणाला या परिवर्तनाबदल म्हणतां येईल. पण परिवर्तन कोणत्याहि प्रकारचें असो, तें पूर्वी सांगितल्याप्रमाणें समान परिस्थिरतीत सर्वत्र सारखें लाणूं पडणारे, नकळत घडणारें आणि नियमित म्हणजे एका निश्चित दिशेनें जाणारें असलें पाहिज, एका भाषें- ततीळ वर्णात कालांतरानें जी घडामोड होते त्यांतून एक नवी परंतु पूर्ण सुसंवादी वर्णव्यवस्था अस्तित्वांत येते, हा ध्वनिपरिवर्तनाचा मूलभत सिद्धांत केव्हाहि विसरून चालणार नाहीं. त्सेच ध्वनिपरिवर्तनाच्या प्रवा- हांत भाषेच्या वर्णव्यवस्थेला विसंवादी असा एखादा वर्ण निर्माण होण्याचा प्रसंग येतांच तो वर्ण टाळून त्याच्या जवळचाच पण सर्व वर्णपद्धतीला सुसंगत असा दुसरा वर्ण भाषा स्वीकारते, ही भाषेच्या मूलभूत स्वरूपाबद्दलची महत्त्वाची गोष्ट आहे. अशा रीतीनें ध्वनिपरिवर्तनाची दिशा समजल्याबर कोणत्याहि भार्षे- सील ध्वनींचा इतिहास त्या भाषेच्या भिन्नकालीन स्वरूपांच्या कालक्रमवार अम्यासानें आपणाला तयार करता येईल, ग्हणजे आज अमुक भार्षेत असलेला अमुक वर्ण मूळ कोण त्या स्वरूपापासून बदलत कसकसा हलींच्या रूपापर्येत पोचला याचे नियम देता येतील. उदाहरणार्थ मराठींतला क डा ध्वनि जुन्या मराठींत काय होता, प्राकृताच्या उत्तर, मध्य व पूर्व अवस्थेत कसा होता, वेदकाळीं कसा होता, याचें ज्ञान भाषेचा योग्य अभ्यास करून आपल्याला झालें पाहिजे, तसेच हा क स्थानपरत्वें म्हणजे शब्दाच्या आर्धी, मष्यें अथवा शेवटी असल्यास त्याच्या परिवर्तनाच्या दिशेत कांहीं फरक होतो काय, स्थानपरत्वें या ध्वनीचा इतिहास कोणत्या

Page 152

अनपेक्षित ध्वनिपरिवर्तन ११५ 1.

प्रमाणांत आणि कसा वेगळा असतो याचा नीट अभ्यास केल्यावर या ध्वनीच्या वेदकाळापासून मराठी अवस्थेपर्येतच्या उत्कांतीचा बोध आप- णांला होईल, सुका, शिंकण, भूक, कान, वाकळ, चाक, इत्यादी शब्दां- तील क हा वर्ण इतिहासदृष्टया किती वेगवेगळ्या मार्गोनी आलेला आहे हैं एकदां समजलें म्हणजे भाषेच्या वेगवेगळ्या अवस्थांतील रूपें ओळखतां येणें आपणांला शक्य होईल. सर्व वर्णपद्धर्तीत नियमित रीतीनें होणारें परिवर्तन याशिवाय इतर कोणत्याहि कारणाचा संबंध भाषेच्या ध्वनींत बडून येणाऱ्या फरकांमागें नसता तर प्रत्येक वर्णाच्या इतिहासार्चे ज्ञान करून घेऊन आपलें काम संपलें असतें. अमुक एक वर्णपद्धति असणारी भाषेची एक अवस्था, कालांत- रानें अमुक एका दिशेनें हे ध्वनि बदलत जाऊन निर्माण झालेली पुढची अवस्था, अशा दोन अवस्था मिळाव्यानंतर त्यांना सांधणारे ध्वनिपरि- वर्तनाचे नियम शोधून काढण्यापलिकडे भापेच्या अभ्यासकांना कोणतेंहि दुसरें काम उरलें नसतें. पण अर्थ व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे हे ध्वनी समाजाच्या व्यवहारासाठी वापरले जात असतात. भाषा है समाजाच्या हातांतलें एक साधन आहे आणि या दृष्टीनें तें समाजाच्या स्वाधीन आहे. एकदा रूढ झालेली वर्णपद्धति आणि तिच्या साघनानें निर्माण केलेले अर्थवाहक वर्ण- समुच्चय म्हणजे शब्द हे स्वैरपणे बदलण्याची शक्ति समाजाच्या अंगी नाहीं, आज आपण ज्याला घोडा म्हणदों त्याला गाय म्हणावें आणि ज्याला झाड म्हणतों त्याला दगड म्हणावें, असें आपण ठरबलें तरी तें कृतीत आणणें शक्य नाहीं. भार्षेतील ध्वनी, व्याकरण, शब्द बदलतात; पण ते भाषेनें चालवलेल्या परंपरेंत खंड न पडडूं देतां, हळूं हळूं बदलतात; जुने शब्द जाऊन नवे येतील, शब्दांच्या अर्थातहि सूक्ष्म भेददर्शक छटा येऊन पुढें त्या ठळक बनतील, पण समाजाला याची जाणीव असणार नाही. याचा अर्थ असा नव्हे कीं समाज तटस्थ राहून भाषेला वाटेल त्या दिशेला जाऊं देतो. नियमित ध्वनिपरिवर्तन होत असतांना भार्षेत कित्ये-

Page 153

११६ ध्वनिविचार

कदा अर्शी कांहीं रूपें निर्माण होतात की एकंदर भाषेष्या धाटणीच्या दष्टीनें अथवा हीं रूपें व्याकरणांतील ज्या वर्गाच्या शब्दांचीं असतील त्या वर्गाच्या दृष्टीनें बोलणाऱ्यांना 'अनियमित' वाटतात, ही नापसंत रूपें थोडीशी बदलून त्यांना सोयीरकर बनवण्यांत येतें, अर्थात् हे फरक घडवून आणणे हा सबंध समाजाच्या मर्जीचा प्रश्न आहे. या ठिकार्णी होणारा फरक ध्वनिपरिवर्तनाप्रमाणें हळूंहळूं आणि नकळत होत नाहीं, ज्या वेळीं ध्वनिपरिवर्तनाच्या नियमांनी बनलेलें एखादें रूप कोणत्याहि कारणानें लोकांना अग्राह्य वाटतें, त्या वेळीं त्याच्यांतील दोष बगळून तयार झालेलें एक रूप ते स्वयंस्फूर्तीनें उपयोगांत आणतात. हीं दोन्ही रूपें कांहीं काळ बरोबरच वापरलीं जातात, कारण अनेकांच्या तोंडी ध्वनिपरिवर्तनानें मिळालेलें नियमित रूप असतें. कांहीं काळानंतर जुनें नियमित रूप आणि नबें रूप यांतलें कोणतें तरी एक रूढ होतें. कि येकदा समाजाची पसंती जुन्या रूपाकडेच् सुकते व तेंच ग्राह्य ठरतें, तर कर्धी नवे प्रयोग लोकमान्य होऊन रूढ होतात आणि जुनें रूप उप- योगांत आणणें बंद होतें किवा कांहीं विशिष्ट स्थळींच तें वापरलें जातें. नव्या रूपांच्या बाबर्तीत समाजाकडून होणाऱ्या प्रयोगापैकीं कोणता यशस्वी होईल कोणता होणार नाहीं, यासंबंधीं निश्चित दंडक घालून देतां येणार नाहीं, पण ज्या तत्वाला घरून नवीं रूपें व नवे प्रयोग अस्तित्वांत येतात त्या तत्वांचा म्हणजे ध्वनिविषयक फरकांच्या बौद्धिक नियमांचा विचार या ठिकाणी करायचा आहे. या नियमांनी तयार झालेलीं रूपें ध्वनिपरिवर्तनाच्या नियमांनुसार अपेक्षित नसत्यामुळें या प्रकरणाला 'अनपेक्षित व्वनिपरिवर्तन' असें म्हटलें आहे. संस्कृतमधील श्वशुर (क) या शब्दाचें परिवर्तन प्राकृतांत ससुर (अ) असें होऊन कालांतरानें त्याचें मराठी रूप सासरा असें बनतें. ध्वनिपरिवर्त- नाच्या नियमाप्रमाणें तें प्रथम ससुरा व नंतर ससरा असें झालें पाहिजे. संस्कृतमधील आर्य (क) या शब्दावरून प्राकृतांत अज्ज (अ) हें रूप येतें व पुढें मराठीत तें आजा असे होतें. एखाद्या नात्यापलीकडचें (वरचें 'किंवा खालचें) नातें दाखवायचें असेल तर प्र हा उपसर्ग त्या नातें दाख-

Page 154

अनपेक्षित ध्वनिपरिवर्तन ११७

वणाऱ्या शब्दाला लावून तयार झालेल्या रूपानें तें दाखवतां येतें. पितामह-प्रपितामह या नियमानें आर्य या शब्दाला प्र हा उपसर्ग लागून झाले्या प्रार्य या रूपाचें प्राकृतांत ध्वनिपरिवर्तनानें पज्ज (अ) व मरा- ठींत त्यापुढील पाजा असें रूप झालें पाहिजे, तें तसें न होतां पणजा हैं अनपेक्षित रूप आपणांला मिळतें. केवळ ध्वनिपरिवर्तनाचे नियम लावून पाहिले तर हीं रूपें मिळणार नाहींत आणि त्यांना अपवाद या सदरात जमा करावें लागेल, अपवाद म्हणजे ज्यांच्याबद्दलचा समाधानकारक खुलासा आपणाला मिळालेला नाहीं अर्शी रूपें, असे म्हटल्यास त्याबददल आक्षेप घेतां येणार नाहीं. पण अपवाद म्हणजे इतर सर्वहि ठिकाणी लागणारे नियम मोडून आणि आपल्यापुरता एक विशेष नियम लावून तयार झालेलें रूप, असें विधान जे लोक करतात त्यांनी हैं लक्षांत ठेवलें पाहिजे की शास्त्रांतील घटना ज्या नियमांना धरून होतात त्या नियमांना अपवाद नसतो, ज्यांचा योग्य खुलासा आपल्याला देतां येत नाहीं अशा रूपांना अपवाद या सदरांत टाकण्याची अशास्त्रीय पळवाट न काढता या बाह्यतः अनियमित वाट- णान्या घटनांचें खरें कारण शोधून काढण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. ज्या अर्थी ध्वनिपरिवर्तनाच्या शारीरिक व सर्वव्यापी नियमांतून हें कारण आपणांला मिळत नाहीं त्या अर्थी तें या नियमांच्या कक्षेबाहेर शोघलें पाहिजे, म्हणजे तें बौद्धिक किवा मानसिक असलें पाहिजे, कारण मनुष्याचे विचार व्यक्त करून त्याचे व्यवहार शक्य करणारी भाषा ही एक सामाजिक संस्था असस्यामुळें तिच्यांत होणाऱ्या घडामोडींच्या मुळाशी जी कारणें आहेत त्यांत समाजाच्या मनाचाहि अंतर्भाव होतो. भाषेत कित्येक शब्द असे असतात की ते जोड्याजोड्यांनी वावरतात. या शब्दांत एक प्रकारचें साम्य आणणें, त्यांना समतोल बनवणे, यांकडे मनाची स्वाभाविक प्रवृत्ति असते. श्वशुर या शब्दाचें स्त्रीवाचक रूप श्वश्त असें आहे. प्राकृतांत त्याचें परिवर्तन सस्सू व मराठींत सासू असें होतें. सासू-ससरा या जोडीपेक्षां

Page 155

११८ ध्वनिविचार

सासू-सासरा ही जोडी आद्य अवयवांच्या साम्यामुळें उच्चाराच्या दष्टीनें अधिक समतोल वाटते, गुजराती भाषेला हा समतोलपणा आवश्यक न वाटल्यामुळें त्या भाषेत सासू-ससरो ही ध्वनिपरिवर्तनानें मिळालेली जोडी जशीच्या तशीच चालूं राहिली आहे. नातवाच्या मुलाला संस्कृतांत प्रणप्त हा शब्द आहे. त्याचें परिवर्तन प्राकृतांत *ं पणत्तु असें होऊन मराठींत पणतू असें होतें. आपल्यापासून दुसऱ्या पिढीचा प्रतिनिधि नातू व त्या खालचा पणतू, तर आपल्या वरच्या दुसन्या पिढीचा प्रतिनिधि आजा व त्यावरचा पणजा, या ठिका- णीहि समतोलपणाच्या तत्वावरच अपेक्षित नियमित रूपाऐवजी एक नर्वेच रूप बनवण्यात आलें आहे. अशा रीतीनें दोन किवा अधिक रूपांपैकीं एक रूप नमुनेदार मानून अपेक्षित शब्दांत फरक करण्याच्या अथवा नवे शब्द निर्माण करण्याच्या या प्रवुत्तीला अनुकरण असें नांव आहे. मात्र ध्वनिपरिवर्तनाच्या नियमाप्रमाणे अनुकरणाची ही प्रवृत्ि सर्व- व्यापी नसते. अनुकरणाचा उपयोग कुठें करावा व कसा करावा या बाबर्तींत समाज पूर्ण स्वतंत्र असतो. स्वरमध्यस्थ प चा संस्कृतांतून मरा- ठींत येतांना व झालाच पाहिजे, समाजाच्या उच्चारांत नकळत व हळूंहळूं बदल होत हैं परिवर्तन आपोआप घडून आलेलें आहे आणि तें कांहीं ध्वनिविषयक प्रबुत्तीना धरून झालेलें आहे. पण ससरा हें टाकून सासरा हैं रूप स्वीकारणें किंवा मूळ रूपालाच चिटकून राहणें ही गोष्ट समाजाच्या हातची आहे. त्याचप्रमाणें सासू-सासरा अशी जोडी बनवावी की ससू-ससरा अशी बनवावी हा समाजाच्या मर्जीचा प्रश्र आहे. कित्येक ठिकाणी अनुकरण कां झालें नाहीं असा प्रभ् मनाला पडतो. कृ-करणें मृ-मरणें यांचीं कृत व मृत या धातुसाघितावरून आलेलीं केला व मेला हीं रूपें पाहिल्यावर धृ-धरणें याचें धेला हैं रूप घृत या धातु- साधितावरून न येतां धरला हें रूप आलेलें पाहून आश्चर्यं वाटतें. पण ते बसणें-बसतो-बसला, उठणें-उठतो-उठला, निजणें-निजतो-निजला, इत्यादी असंख्य धातूंतील रूपांच्या अनुकरणानें बनलें आहे. मृन ब कृत

Page 156

अनपेक्षित ध्वनिपरिवर्तन ११९

यांना इल्ल हा प्रत्यय लागून बनलेलीं नियमित रूपें अनुकरणाच्या आक- मणापासून सुरक्षित राहिलीं, यावरून या व त्यासारख्या इतर बौद्धिक साधनांचा उपयोग करण्याच्या बाबतींत समाजाला असणारे स्वातंत्र्य स्पष्ट दिसून येतें. महत्वाच्ी गोष्ट ही की अशा रीतीनें मिळणाऱ्या वेगवेगळ्या रूपांचा समधानकारक खुलासा समाजाचें मानसश्यास्त्र लक्षांत घेतल्यास आपल्याला देतां येतो. अनुकरणाचें महत्त्व लक्षांत आलें की भार्षेतील अनेक अपवादात्मक रूपांबद्दलचे गैरसमज दूर होतात. संस्कृत षष्ठ (क) या शब्दापासून परि- वर्तनानें प्राकृतांत छदअ हें रूप मिळतें. या रूपावरून ध्वनिपरिवर्तनाच्या नियमानें मराठींत * साठा हैं रूप आलें पाहिजे. पण त्याऐवर्जी सहावा हैं अनपेक्षित रूप आपणांला मिळतें, पांच-पांचवा, सात-सातवा या दोन रूपांच्या मध्यें सहा या संख्येचें सहावा हैं क्रमवाचक रूप अनुकरणानें आर्लें आहे. गुजराती व हिंदी या भाषांत छट्टो-छट्ठा हीं नियमित रूपें सांपडतात. नववर (क) या संस्कृत शब्दावरून जुन्या मराठींत नोवरा व नंतरच्या मराठीत नवरा हैं रूप आलें आहे. नववर याचें, स्त्रीवाचक नववधू हें रूप आहे. परंतु नवरा-नवी, मेहुणा-मेहुणी या- सारख्या पुरुषवाचक आकारांत शब्दाचें स्त्रीवाचक रूप आ या अंत्य अवयवाच्या जागीं ई आणून करणांऱ्या अनेक शब्दांच्या उदाहरणानें नवरा याचें स्त्रीवाचक नवरी हैं रूप अनुकरणानें बनवलें आहे. अशाच रीतीनें परंतु उलट क्मानें जाऊन राणी या शब्दावरन राणा हैं रूप आलेलें दिसतें. मराठींत पुरुषवाचक नामांर्ची स्त्रीवाचक नामें बनवण्या- साठी वापरण्यांत येणारा ईण हा प्रत्यय हत्तीण (इस्तिनी), माळीण (मालिनी ), इत्यादी शब्दांत ध्वनिपरिवर्तनाच्या नियमित प्रवाहांतून आलेला असला तरी कुंभारीण, शिक्षकीण, वाघीण, सिंहीण, इत्यादी शब्दांत तो अनुकरणानें आलेला आहे. चतुरंगी (चतुर+अङ्ग+इन्) यांतील उत्तरपद रंगी आहे असें मानून पंचरंगी, तिरंगी, दुरंगी, हे शब्द निर्माण झाले आहेत. कुम्भकार या शब्दाच्या कुंभार या नियमित रूपाचा परिणाम होऊन चर्मकार या शब्दापासून अपोक्षेत असलेल्या चामार या रूपाऐवजी चांभार हें रूप आलें आहे.

Page 157

१२० :ध्वनिविचार

अर्शी पुष्कळ रूपें दाखवतां येतील, परंतु त्यावरून लक्षांत घेण्याचा महत्त्वाचा मुद्दा हा की भार्षेतील शब्दांच्या रूपांत, क्रियापद चालवण्याच्या पद्धर्तीत, विभक्तिरचर्नेत एक प्रकारचा समतोलपणा, व्यवस्थितपणा आणि साम्य आणण्याकडे समाजाचें लक्ष लागलेलें असतें, कारण त्यामुळें भाषेचें स्वरूप अधिक नियमित होतें. हा नियमितपणा आणण्यासाठी ज्या अनेक मार्गाचा अवलंब भाषेकडून केला जातो ते मार्ग म्हणजे ध्वनिपरिवर्तनाचे बौद्विक नियम.

कित्येकदा जवळजवळ असणाऱ्या एकाच शब्दांतील दोन वर्णात साम्य आणून उच्चारसौकर्य साधण्यांत येतें, तर कित्येकदा याच्या अगर्दी उलट मार्गोनें जाऊन जवळजवळ असणाऱ्या दोन बर्णातील साम्य नष्ट करून पुनरुक्ति होऊं न देण्याची खबरदारी घेण्यांत येते. संस्कृत तिलक या शब्दाचें परिवर्तन प्राकृतांत तिलअ असें होऊन मराठींत * तिळ्ा असें झालें पाहिजे, पण या ठिका्णी पुढील दंतमूलीय ळ या वर्णाच्या आकर्षणानें त या दंत्य वर्णाच्या उच्चाराच्या वेळींहि जिमेचें टोंक दंत- मूलांना लाणून त या वर्णाऐवर्जी ट या ळला जवळ असणान्या वर्णाचा उच्चार होतो. याच आकर्षणाच्या तत्वानें तालु या शब्दापासून टाळू हा शब्द आपणाला मिळतो.

पण दोन विषम वर्णात आकर्षणानें जसें साम्य उत्पन्न केलें जातें तर्सेंच दोन साम्य असणाऱ्या वर्णात भिन्नताहि उत्पन्न केली जाते. गोधूम या संस्कृत शब्दाचा मराठी प्रतिनिधि * गोहूंव असला पाहिजे. पण यांतला अंत्य व उपात्य ऊँ या वर्णात मिसळतो आणि गोहूं हें रूप तयार होतें. या शब्दांतील दोन्ही अवयवांत ओष्ठय स्वर आहेत. यांतला पहिला स्वर मिन्नत्वाच्या तत्वानें बद्लून त्या जागीं अ हा स्वर आणला जातो आणि गहूं हें रूप मिळतें. या मिन्नत्व आणण्याव्या तत्त्वाला साम्यनाश हैं नांव आहे. याच नियमानें जुन्या मराठींतील नोवरा याचें नवरा हें रूप मिळतें. श्रु या धातूचें शृणु हें रूप नु या प्रत्ययामधील उ.मुळें होणारी पुनरुक्ति टाळण्यासाठीं होतें.

Page 158

अनपोक्षेत ध्वनिपरिवर्तन १२१ 1> ध्वनिपरिवर्तनानें मिळालेलीं रूपें कित्येकदा वर्णक्रमाच्या दृष्टीनें गैर- सोईचीं वाटतात. अशा वेळीं हा क्रम आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे बदलून शब्दाचें एक किंचित् नवें रूप तयार करण्यांत येतें, दोन वर्णोची स्थानटष्टया अदलाबदल करण्यांत येते किंवा एखादा वर्ण ज्या ठिकाणी अधिक सुरक्षित राहील अश्ञा ठिका्णी त्याला नेण्यांत येतें, हैं नवें रूप उच्चाराच्या दष्टीनें भाषेत आधींच अस्तित्वांत असलेल्या इतर शब्दार्शी जुळेल अशी काळजी घेण्यांत येवे. कुठार या संस्कृत शब्दापासून प्राकृतांत कुढार व मराठींत कुढार असें रूप अपेक्षित आहे. तसें न होतां मराठींत कु्हाड हैं रूप मिळतें. कुढार या शब्दांतील ड रन्या जागी आणि ₹ डच्या जागी जाऊन हें रूप तयार झालें आहे. जुन्या मराठीतील बिढार याचें पु्ढें बिन्हाड असें रूप झालें आहे. वन्हाड, कुन्हाड, बिन्हाड हा एक नियमित क्रम असणारा वर्णसंघ भाषेनें तयार केला आहे. संस्कृत स्नुषा याचें प्राकृतमध्यें आर्धी * प्हुसा, त्यानंतर वर्णोच्या अदलाबदलीनें सुण्हा. व त्यावरून पुढें मराठींत सून हैं रूप तयार होतें. तृष्णा, कृष्ण, उष्ण, इत्यादी शब्दांच्या तण्हा, कण्ह, उण्ह या रूपांच्या संवयीमुळें * फ्हुसा हैं रूप टाकून सुण्हा हा परिचित स्वरूपाचा शब्द भार्षेत आला, आपला क्रम बदलण्याच्या वर्णाच्या या क्रियेला स्थलांतर असें नांव आहे. संस्कृत उपानह-या शब्दाचें पार्लीतील रूप उपाहना असें आहे. प्राकृतांत तें उवाणह किंवा वाहण असें होतें आणि मराठींत वहाण होतें. मराठींतील ह्कार हा नेहमीं अस्थिर असून ज्या ठिकारणी स्वतःा स्थैर्य मिळल असें ठिकाण तो शोधत असतो. हें स्थैर्यं पुष्कळदा स्थलांतरानें मिळतें. भगिनी याचें परिवर्तन प्राकृतांत भइणी असें होतें आणि या शब्दांतील दोन स्वर लागोपाठ येण्याचें टाळण्यासाठी भमधील हकार इ या स्वरांत मिळून बहिणी हैं रूप तयार होतें, तृष्णा यांचें प्राकृतांत तण्हा व मराठींत आधी * तान्ह व पुढें तहान हें रूप होतें, स्पष्टा याचें फट्ठा *फाठा-फाटा हैं ज्ञानदेवकालीन रूप मिळतें. पुढें इतर शब्दांप्रमाणें फाटा यांतील अंत्य आ नाहींसा होऊन फाट-पहाट हें रूप तयार होत. शक्ष्ण- लण्ह-लान्ह-लहान किंवा ल्हान हैं अशाच प्रकारचें रूप आहे.

Page 159

१२२ ध्वनिविचार

एका सप्राण स्फोटकामागून ताबडतोब दुसरा सप्राण स्फोटक येणें, शब्दाच्या अत्य वर्णाच्या जागीं हकार असणें, स व श या वर्णाच्या माणून किंवा ह्काराच्या माणून सप्राण स्फोटक येणें मराठीच्या प्रकृतीला फारसें मानवत नाहीं. म्हणूनच भस्त्रा-भत्था -* भाथा-भाता, मिक्षा-भिक्खा- * भीख-भीक, हस्त-हत्थ -* हाथ-हात, महर्घ-महग्घ -* महाघ-महाग, शुष्क-सुक्ख- सुखा-सुका, सिक्थ-सित्थ - सीथ-शीत, इत्यादी रूपें आपणाला मिळतात. असें असूनहि पुष्कळदां सामान्य रूपाच्या अनुकरणानें हा अंत्य हकार सुरक्षित बनतो, उन्हांत, दुधाचा, काखेत, राखेचा, वाघाचा बगैर रूपांत तो उच्चार्यं असल्यामुळें उन्ह, दूध, काख, राख, वाघ, इत्यादी शब्दांत तो कसाबसा टिकून राहिला आहे. अनुकरण, स्थलांतर, इत्यादी घटनांत शब्दांचा एकमेकांवर परिणाम झालेला दिसतो. तर आकर्षण, साम्यनाश, यांमध्यें एकाच शब्दांतील वर्णोचा एकमेकांबर परिणाम घडलेला आहे. जबळ असणाऱ्या दोन वर्णातलें साम्य कित्येकदा नष्ट करून वर्णदृष्टया एखादया शब्दाला अधिक ठळक स्वरूप देतां येतें, यांत एकाच वर्णाची अथवा एकाच प्रकारच्या वर्णाची पुनरुक्ति टाळण्यांत येते. एकाच शब्दांत लागोपाठ येणाऱ्या दोन समान वर्णाची पुनरक्ति टाळण्याचें दुसरें एक साधन ग्हणजे त्या दोन वर्णाचा एकदाच उच्चार करणें, वररात्री या शब्दाचें परिवर्तन मराठींत वररात असें झालें पाहिजे, त्या ऐवजी तें बरात असें होतें. उसें हा शब्द जुन्या मराठींत उसीसें (प्रा. उस्सीसअं, सं. उच्छीर्षकम्) असा आहे. 'गुरें राखणारा' या अर्थी गुराखी (* गुरराखी) हा शब्द असाच आहे. इंग्रर्जीतील fortnight हा शब्द अॅग्लो सॅक्सन feowertyne niht ( चौदा रात्री) यावरून, partake हा शब्द part-take यावरून, sunday हा शब्द sunnan daeg (जर्मन sonntag) या अॅग्लो सॅक्सन शब्दावरून आलेले आहेत. अशा रीतीनें एका बर्णानें दुसऱ्या वर्णाशी एकरूप होणे याला वर्ण- प्रास हें नांव आहे.

Page 160

अनपेक्षित ध्वनिपरिवर्तन १२३

हीं वर्णग्रासाचीं उदाहरणें वैदिक भाषेतहि सांपडतात. मधु + दुघ =

गर्जणारा). मधुघ (मध देणारी वनस्पति), तुवीरव + वान् = तुवीरवान् (मोठ्यानें'

उच्चाराच्या सोईसाठीं दोन समान वर्ण एकजीव होणें हें ज्याप्रमाणें कित्येकदा आवश्यक वाटतें, त्याचप्रमाणे दोन मिन्न वर्णांचें एकमेका- माणून होणारें उच्चारण कठीण वाटलें की तें सोपें करण्यासाठीं त्या दोहोंमध्यें मुळांत नसलेला एक तिसरा मदत करणारा वर्ण आणणेहि कित्येकदा आवश्यक बनतें. उदाहरणार्थ हे शब्द पहा :- सं. आम्र प्रा. अंब म. आंबा ताम्र तंब तांबें वानर बांदर पञ्चदश पण्णरह पंधरा यांपैकीं आम्र व ताम्र या शब्दांतील म व र यांनीं बनलेल्या संयुक्त वर्णात ब हा वर्ण आलेला आहे. आम्र यार्चे प्रथम * आम्न्र असें रूपांतर होऊन पुढें प्राकृतांत अंब असें झालेलें आहे. कारण हा ब प्राकृतपूर्व अवस्थेंतला नाहीं असें मानलें तर आम्र याचें अम्म असें परिवर्तन होऊन त्यापासून नंतर आम असें रूप मिळेल. हा ब कुठून येतो? ध्वन्युच्चारणाचें योग्य ज्ञान झाल्यावर या प्रश्ाचें उत्तर देणें कठीण नाहीं. म हा अनुनासिक स्फोटक आहे. तो उच्चार- तांना तोंड पूर्णपणें बंद होतें, स्वरनालिकांत कंप सुरू होतो आणि तालुपट खालीं लोंबत रहातो. अशा वेळी ओठांनीं अडवून धरलेली हवा बाहेर पडून जो ध्वनि उत्पन्न होईल तो सकंप अनुनासिक ओष्ठयवर्ण म्हणजे म होय, त्यानंतर येणा्या र् या द्रववर्णाच्या उच्चारांत अनु- नासिकत्व नाहीं म्हणून लोंबत असलेला तालुपट वर जाऊन ह्वेची नाकाच्या पोकर्ळीत प्रवेश करण्याची वाट बंद करतो. पण ही बंद कर- ्याची क्रिया र या वर्णाला लागणारी मुखयंत्राची हालचाल सुरूं होण्या- पूर्वीच झाली तर मच्या उच्चारानंतर व रव्या उच्चारापूर्वी या

Page 161

१२४ ध्वनिविचार

दोहोंना सांधणारा एक उच्चार ऐकूं येईल, तो म्हणजे मप्रमाणें इतर सर्व बाबतींत ओष्ठय परंतु रप्रमाणे निरनुनासिक असा वर्ण ब.

वर्ण येतो. याच तत्वाला अनुसरून न व र या वर्णाच्या उच्चारामध्यें द हा

वानर या शब्दाचें सामान्य रून* वानूरा-असें होतें, या रूपांतील न्या या वर्णसंघांत उच्चार सुलभ करण्यासाठीं दोन्ही बाजंच्या वणाशी अंशतः साम्य अ्णारा द हा वर्ण करतो. न्यामुळें वान्द्रा (लेखनांत चांदरा-) हें रूप तयार होतें. या सामान्य रूपाच्या अनुकरणानेंच वांदर हा शब्द आपण तयार करतों. कमर या मूळ शब्दाचें कमूरे-असें सामान्य रूप बनून तें वरील नियमानें कंब्रे-(लेखनांत कंबर-) असें होतें. अशा प्रकारचीं उदाहरणें परभाषांतूनहि सांपडतात. लॅटीन cam(e)- ra, num(e)ru, remem(o)rare यांचीं फ्रेंचमध्यें अनुक्रमें chambre, nombre, remembrer अशी रूपें होतात, तर ten(e)ru, pon(e)re, min(o)r यांची अनुक्में tendre, pondre, meindre moindre ) अर्शी रूपें होतात. (पुढें

सामाजिक व्यवहारांत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठीं दूरदूरचे समाजहि सहजगत्या एकाच प्रकारचीं साधनें कशीं उपयोगांत आणतात हैं भार्षेत उपयोगांत आणल्या जाणाऱ्या बौद्धिक नियमांच्या अभ्यासानें दिसून येतें. सदशीकरण, विसदृशीकरण, वियोजन, अनुकरण, स्थलांतर, आकर्षण, साम्यनाश, वर्णग्रास या ठळक नियमांवरून परस्परांशी संबंध नसलेले समाजहि मानसशास्त्रदृष्टया कसे एक आहेत है दिसून येतें. शब्दांच्या व्युत्पत्ती निश्चित करतांना ध्वनिपरिवर्तनाध्या नियमांप्रमाणें हे बौद्धिक नियमहि लक्षांत घेतले पाहिजेत, तरच आपलें कार्य निर्दोष व यशस्वी होईल, बर दिलेले नियम केवळ मार्गदर्शनासाठी दिलेले आहेत. त्याच्या सक्ष्म अभ्यासासाठीं आणि अधिक पूर्ण माहितीसाठीं फ्रेंच भाषाशास्त्रज्ञ मोरीस ग्रामाँ यांच्या Traite de phonetique या अ्ंथार्ची १५१ ते ३६७ हीं पानें जिज्ञासूंनी पहावींत.

Page 162

अनपोक्षेत ध्वनिपरिवर्तन १२५

सौंदर्यदृष्टि, सुलभता, अनुकरण इत्यादी मार्गानी भाषेला आपल्या दृष्टीनें नियमित, स्पष्ट व कल्पना व्यक्त करण्याला अधिक समर्थ बनवणें हैं सामाजिक जीवनांत स्वाभाविकपणें घडून येतें, कारण आपण निर्माण केलेल्या संस्थांकडून आपल्या गरजा शक्य तितक्या अधिक प्रमाणांत भागवून घेणें हैं समाजाचें ध्येय आहे. केवळ व्वनिपरिवर्तनाच्या नैसर्गिक नियमांच्या हातीं भाषेला सोंपवून आपले व्यवहार करत राहणारा उदा- सीन समाज विरळाच, या नियमांचें स्वैर स्वामित्व चालूं दिल्यानें भार्षेत अनेक अडचणी उत्पन्न होतात आणि या अडचणी ज्या ठिकाणी भाषेची व्यवहारसुलभता नष्ट करतात त्या ठिकाणी तसें न व्हावें म्हणून दुस्या कोणत्या तरी साधनाचा उपयोग करणें समाजाला भाग पडतें. या अडचणी जाणवूं लागतांच समाजाची भाषेविषयीं सुस असलेली निरीक्षणबुद्धि जागृत होते आणि या अडचर्णीना टाळण्याचे मार्ग शोधूं लागते. ज्या ठिकाणी भाषेचें पूर्वी असलेलें रूप समाजाला निरुपयोगी, कठीण, अस्पष्ट, गोंधळाचें वाहूं लागतें, त्या ठिकाणी योग्य तो बदल करून व भार्षेतून इतर मार्गानी मिळालेल्या साधनांचा उपयोग करून समाज आपणाला हवें तसें रूप तयार करतो. भाषेला साधी व सुट- सुटीत बनवणें याकडे समाजाचा कटाक्ष असल्यास नवल नाहीं, कारण निरक्षर अपंडितापासून तों सर्वश्रेष्ठ पंडितापर्येत सारख्या स्वरूपांत बापरलें जाणारें भाषा हें एक साधन आहे. ज्या क्षणी वैदिक भार्षेतील गणांची आणि पदांची, द्विवचनादि रूपांची आणि क्रियापद्धतीची, बिभक्तींची आणि इतर अनेक साधनांची आवश्यकता समाजाच्या मनांत नष्ट झाली आणि ध्वनिपरिवर्तनाच्या सर्वव्यापी नियमांनी जेव्हां आपल्या परीनें या कार्याला हातमार लावला त्या क्षणींच तिला आजचें स्वरूप देणाऱ्या प्रवुत्ती सुरूं होऊन पाली, प्राकृत इत्यादि मार्गोनी ती उत्कांत होत गेली. आत्मनेपद व परस्मैपद यांना एकरूप करून, गणपद्धति नाहींशी करून, कालवाचक व अर्थवाचक रूपांऐवर्जी बऱ्याच ठिकाणी धातु- साधितांचा उपयोग करून, विभक्तिप्रत्ययाऐवजी सामान्यरूप व त्याला जोडलेले स्वतःला अभिप्रेत असलेल्या अर्थाचे शब्द वापरून, अनुकरणादि

Page 163

१२६ ध्वनिविचार

तत्त्वांच्या जोरावर भाषेचें स्वरूप अधिक सुटसुटीत बनवण्याचें काम समाजानें केलें. या कारणामुळें भाषा ही एक सामाजिक संस्था आहे आणि तिथ्या जीवनाचा अभ्यास समाजाचें मानसशास्त्र अभ्यासून आणि जया विशिष्ट समाजाध्या व्यवहारासाठी ती उपयोगांत आणली जाते त्या समाजाचा इतिहास, चालीरीती, संस्कृति अधिकाधिक समजावून घेऊन होणेंच शक्य आहे, या मुदावर भाषेचे अभ्यासक भर देत असतात.

Page 164

प्रकरण सातवें नव्या भाषा जगांत बोलल्या जाणाऱ्या असख्य भाषांचे शास्त्रज्ञांनी गट पाडले आहेत, आज भिन्न बनलेत्या पण मुळात एक असलेल्या भार्षेतील ध्वनीत फरक होऊन उत्पन्न झालेल्या भाषांना एकवंशीय भाषा म्हणतात. इंडो- युरोपियन भाषा, सेमिटिक भाषा या एकवंशीय भाषा आहेत. इंडोयुरो- पियन या प्रागैतिहासिक तर्कसिद्ध भाषेपासून आयर्लेड ते आसामपर्येत पसरलेल्या भाषा निर्माण झाल्या. या एकवंशीय भाषांचा परस्परांशी असणारा संबंध, त्यांची परिवर्तनें इत्यादीचा अभ्यास पुराव्याच्या प्रमा- गांत आपणाला करतां येतो. या भाषांची विविधता अभ्यासणें शक्य आहे, परंतु भाषांचे भिन्न वंश कसे असि्तित्वांत आले हा प्रश्न सोडवणे शक्य नाहीं. एकांत मार्गदर्शन करण्यासाठीं भरपूर पुरावा आहे, तर दुस- न्यांत केवळ तर्काशिवाय दुसरें कांहींच करता येणें शक्य नाहीं. पहिला प्रश्र भाषाशास्त्राच्या कक्षेंत्ला आहे; दुसराहि भाषेबद्दलचाच असला तरी त्याचें उत्तर शास्त्रीय पद्धतीनें दयायला लागणारी साधनें आपल्याकडे नाहींत. उदाहरणार्थ, इंडोयुरोपियन भाषावंश आणि सेमिटिक भाषावंश यांचा संबंध दर्शविणारी साधनें आपणांजवळ नाहीत, त्यामुळें त्यांची तुलना करून त्यांचें मूळ एकच आहे की काय हैं शोधून काढण्यासाठीं झालेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. मूळ एकच भाषा असून तिचेच पुढें अनेक वंश बनले असा तर्क काही लोक करतात, पण या तर्काचें समर्थन करूं शकणारा कोणताच पुरावा अद्यापि उपलब्ध झालेला नाहीं. एकाच वंशांतील भाषांची विविधता निर्माण कशी झाली, हें आपणाला त्या भाषेचा इतिहास पाहून समजूं शकेल, हिंदी, गुजराती व मराठी या वेगवेगळ्या पण एकमेकाला लागून असलेल्या भाषा ज्या मूळ भाषेंतून निघाल्या तिचें स्वरूप नक्की करणारे दुवे आपणाला या भार्षाच्या ऐति- हासिक उत्क्ांर्तीत सांपडवात. मुळांत एक असणारी भाषा कालांतरानें १२७

Page 165

१२८ ध्वनिविचार

वेगवेगळ्या प्रदेशांत भिन्न मिन्न स्वरूपें कर्शी धारण करते, या प्रश्नाचा तात्विक अभ्यास इयें आपणाला करायचा आहे. अशी कल्पना करा कीं एका सलग प्रदेशांत एकच भाषा एका ठरा- बिक काळांत बोलली जात आहे; म्हणजे त्या प्रदेशांत राहणारा मानव- समाज आपले भाषिक व्यवहार एका विशिष्ट ध्वनिपरंपरेनें करतो; शब्दांची रूपें, शब्दसंग्रह, ध्वनी, भाषाशैली या बाबतींत त्या समानांतील सर्व व्यक्ती पूर्णपणे सारख्या परंपरेचा आश्रय घेतात आणि कुठल्याहि ठिका- णच्या दोन व्यक्ती सारख्याच ध्वनीनी, सारख्याच शब्दांनी, सारख्याच रूपांनी आणि वाक्यांनीं आपलें मनोगत व्यक्त करतात, काहीं काळानंतर या प्रदशांतल्या कांहीं भागांत कांही ध्वनी बदललेले आढळून येतील, काहीं ध्वनी सर्व प्रदेशांत सारखेच चदलतील, तर कांही ध्वनी वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या दिशांनी बदलतील, प्रत्येक ध्वनीचें क्षेत्र निश्चित असेल, उदाहरणार्थ, एका विशिष्ट भागांत-सचा ह होईल, दुसऱ्या एका भागांत झ होईल आणि तिसन्या भागांत स च राहील. पण याचा अर्थ असा नव्हे कीं या प्रदेशांत सर्वच ध्नी पहित्या दोन भागांत दोन वेगळ्या दिशांनी बदलत जातील आणि तिसन्या भागांत अजिबात स्थिर राहतील, याच प्रदेशांत पचा कांहीं भागांत व तर कांहीत व होईल आणि या दोन परिवर्तनांच्या क्षेत्रमर्यादा स च्या परिवर्तनाच्या क्षेत्रमर्या- दांहून अगदी भिन्न असूं शकतील, बदलणाऱ्या ध्वनीच्या क्षेत्रमर्यादेच्या अनिश्चिततेमुळें जी गुंतागुंत निर्माण होणें, तिचाच परिणाम स्थानिक भेद अस्तित्वांत आणण्यांत होतो. या स्थानिक भेदांत कांहीं ध्वनी सारखे तर कांहीं निराळे असतात आणि या प्रदेशांतील कोणतोि दोन स्थानिक भेद एकमेकांहून पूर्ण मिन्न किंवा एकमेकांशी पूर्ण साम्य असणारे नसतात. कारण ते पूर्ण भिन्न झाले तर त्यांचा परस्परांशी संबंध लावणें किवा त्यांचें मूळ एकच होतें असें सिद्ध करणें कठीण किंबहुना अशक्य होईल, शिवाय प्रत्येक स्थानिक भेद बेगळा झाला तरी मूळ भाषेच्या अंगी असलेलीं कांहीं महत्वाचीं वैशिष्टये त्याच्यांत येतात, कारण तो मूळ भाषेपेक्षा वेगळा असला तरी तिचीच परंपरा चालं

Page 166

नव्या भाषा १२९ ठेवत असतो. एकाच भाषेच्या दोन मिन्न काळांतील अवस्थांत भेद असला,तरी एका विशिष्ट मानवसमूहाच्या सामाजिक व्यवहारांना अडथळा न येईल अशा रीतीनें हा भेद उत्पन्न होतो. त्या भाषेचा उपयोग कर- णा्या व्यर्क्तीना आपल्या भाषिक परंपरेंत घडून येणाऱ्या फरकांची मुळींच जाणीव नसते. म्हणजे हे फरक अत्यंत सूक्ष्मपणें, सामाजिक व्यवहारांत खंड पहूं न देवां आणि त्यांत कोणतीहि अडचण उत्पन्न न करतां घडत असतात. या अखंडितपणामुळेच एकाच भाषेच्या भिन्न अवस्थामागील सामान्य तत्वें आपण अभ्यास करून पाहूं शकतों. उलट पक्षी जर एखाद्या एकभाषिक प्रदेशांतील ध्वनी सर्व भागांत सारखेच बदलले, तर जी नवी भाषा उत्पन्न होईल ती सर्वत्र सारखीच असेल; म्हणजे स्थानिक भेद निर्माण होणार नाहीत. पण असें होत नाहीं. अनेक भाषांचा अभ्यास करून शास्रज्ञांनी असें दाखवून दिलें आहे की, १ भार्षेतील ध्वनी एकसारखे बदलत असतात. २ प्रत्येक ध्बनीचें क्षेत्र निश्चित असतें. ३ एका ध्वनीचें परिवर्तनाचें क्षेत्र दुसऱ्या ध्वनीच्या परिवर्तनाच्या क्षेत्राइतकें जवळजवळ कधींच नसतें. उदाहरणार्थ, संस्कृत स्वरमध्यस्थ मचा गुजरातीत म राहून मराठींत च हिंदीत अनुस्वारपूर्व व होतो. म्हणजे एका ध्वनीचें परिवर्तन गुजरातीच्या भाषाक्षेत्रांत वेगळें आणि मराठी-हिंदीच्या क्षेत्रांत बेगळें होतें. पण या सर्ब क्षेत्रांत पर्ण आणि सप्त यांचें पान आणि सात असें परिवर्तन होतें, तर न चें परिवर्तन गुजराती-मराठी क्षेत्रांत ण होऊन हिंदीचें क्षेत्र बाजूला पडतें. पानीयम् गु. म. पाणी, हिं. पानी. वेगवेगळ्या क्षेत्रांत वेगवेगळ्या ध्वनींचीं भिन्न भिन्न दिशांनी परिवर्तनें होऊन एकाच भार्षेत ही जी विविधता निर्माण होते, तो भाषेचा एक स्वभावच असून त्याला भेदनिर्मिति असें नांब आहे. यांतील प्रत्येक ध्वनी- च्या परिवर्तनाचें क्षेत्र त्या ध्वनीपुरतेंच मर्यादित असल्यामुळें कांहीं काळा- नंतर जेव्हां बरेचसे ध्वनी बदलतात, तेव्हां वेगवेगळ्या परिवर्तनाचे सयोग होऊन अनेक स्थानिक भेद निर्माण होतात. उदाहरणार्थ पुढील एक- भाषिक पट्टा पहा : ध्व.वि.९

Page 167

१३० ध्वनिविचार

कांहीं काळानें यांतील कित्येक ध्वनी बदलतील आणि प्रत्येक ध्वनीचें क्षेत्र बेगवेगळें असेल, त्यामुळें पुढील प्रकारचे विभाग या पट्टयांत आपल्याला दिसतील :

-प व व

सं ह

आणि अशा प्रकारचे वेगवेगळे विभाग एकाच आकृर्तीत द्शबले तर या अनेक परिवर्तनाच्या संयोगाचें एकत्र स्वरूप पुढीलप्रमाणें दिसेल :

म्हणजे कुठेहि थोड्याशा दूर अंतरावर गेलें तरी कांहींतरी नवे उन्चार कानावर येतील, ही गोष्ट अनुभवानें सर्वोच्या परिचयाची आहे आणि भाषेचा तो स्वभावच आहे.

Page 168

नव्या भाषा १३१ पण यावरून असें वाटण्याचा संभव आहे की भार्षेतील ध्वनीतील भेदांचें कारण भौगोलिक भेदांत आहे आणि ध्वनीच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत होणाऱ्या वेगवेगळ्या परिवर्तनामुळें या कल्पनेला पुष्टि मिळते. हैं विधान बरोबर नाहीं. कारण वर आपण पाहिलें आहें की कित्येकदा एका विस्तृत प्रदेशांत एकच भाषा बोलली जाते; मात्र कांही काव्यनंतर या प्रदेशांतल्याच वेगवेगळ्या भागांत या भार्षेतील ध्वनी वेगवेगळ्या मार्गानी बदलतात. हे बदलणारे ध्वनी एकाच ठराविक क्षेत्रांत परिवर्तन पावत नाहींत- प्रत्येक ध्वनीचें परिवर्तनक्षेत्र भिन्न असतें. गुजरात व महाराष्ट्र यांता असें कोणतें मौगोलिक साम्य आहे कीं तेथें -नचा -ण व्हावा आणि हिंदीच्या भाषिक क्षेत्रांत असें कोणतें वैशिष्ट्य आहे की तेथें हा-न बदलूं नये ? आणि -न बदलत नाहीं तर इतर कांहीं वनी का बदलावे? हिंदीचें क्षेत्र आणि महाराष्ट्र यांच्यामधील कोणत्या भौगोलिक सारखे- पणामुळें -मचा अनुस्वारपूर्व व व्हावा ? या प्रश्नांचें उत्तर भौगोलिक फरकाच्या आधारानें मिळणार नाहीं- भार्षेतील ध्वनीच्या फरकाचें उत्तर भाषेच्या अंतर्गत पुराव्याच्या अभ्या सारनेंच मिळेल. ध्वनीथ्या परिवर्तनामागील एकमेव तत्त्व शोधून काढतांन आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेन्हां आपण एकाच भाषिक: परंपरेच्या दोन भिन्न कालखंडांतील अवस्थांचा विचार करतों तेव्हांच हें परिवर्तन आपणाला दिसून येतें. एकाच काळांतील एकाच ठिका- णच्या एकाच् समाजाच्या भार्षेत सारखे ध्वनी बापस्नच समाजव्यवहारु होतो; ग्हणून काळ हाच हैं परिवर्तन घडवून आणणारी शाक्ति होय. उद्यां एक लाख मराठी बोलणाऱ्या लोकांना उचलून वेस्ट इंडिजमधील एखाद्या बेटांत नेऊन ठवलें म्हणून त्यांच्या उच्चारांत ताबडतोब कोण- ताहि बदळ होणार नाहीं. शिवाय भौगोलिक फरकामुळें प्बनी बदलतात असें म्हटलें तर एकाच ठिकार्णी दीर्घकाळ राहणाऱ्या लोकांच्या उच्चा- रांत मुळींच फरक व्हायला नकोत.

Page 169

१३२ ध्वनिविचार

यावरून हें दिसून येईल कीं ध्व्नीत जरी मिन्न ठिकाणी भिन्न परि- बर्तन घडून येतें, तरी तें घडन येण्याला कांहीं काळ जाणें आवश्यक असरतें. स्थलांतर होऊन विशेष काळ लोटला नाहीं तर हैं परिवर्तन घडून येणें शक्य नाहीं, पण अमुक ध्वनि एका विशिष्ट मर्यादेत अमुकच दिशेनें कां बदलतो आणि दुसन्या एका मर्यादेंत वेगळ्या दिशेनें का बदलतो किंवा स्थिर कां राहतो, हा प्रश् सुटलेला नाहीं; आणि अमुक एक ध्वनि भविष्यकाळांत कसा बदलेल आणि कोणत्या मर्यादेत बदलेल, हेंहि सांगणे शक्य नाहीं. म्हणूनच भूतकालीन व चालू पुरावा लक्षांत घेणें व ्याच्या निरीक्षणानें भाषेंतील अनंत घडामोर्डीमागील स्थिर तत्वें शोधून काढणें हेंच भाषेच्या अभ्यासाचे क्षेत्र राहिलें आहे.

एकाच निश्चित क्षेत्रमर्यददेत सर्व ध्वनी विशिष्ट दिशेनें बदलत नसल्या- मुळें निश्चित स्थानिक भेद भार्षेत असूं शकत नार्हीत. प्रत्येक ठिकाणच्या भारषेत कांहीं ध्वनिविधयक वैशिष्टथें असतात. सलंग प्रदेशांतून प्रवास करतांना जसजसे आपण पुढें सरकूं तसतशीं कांहीं नवीं उच्चारवैशिष्टयें आपल्या कानांवर येतील, तर कांहीं ठिकाणी पूर्वी परिचित असलेले उच्चार परत ऐकूं येतील, याचें कारण हें की, एखाद्या विशिष्ट ध्वनी- पुरते आपण मिन्नोच्चार दर्शवणाऱ्या क्षेत्रांत आलेले असतों, तर दुसऱ्या एका ध्वनीचें क्षेत्र आपण ज्या दिशेनें प्रवास करत असतों तिच्या बाजनें जाऊन परत आपस्या प्रवासमार्गाला येऊन भिडतें.

अशा रीतीनें स्थानिक भेद हे विशिष्ट ध्वनीपुरते मर्यादित असतात; चाकीचे ध्वनी आजबाजच्या इतर स्थानिक बोलींतील ध्वनींहून बेगळे नसतात. हे भेद आसपासच्या प्रदेशांत येजा करणाऱ्या लोकांच्या ध्यानांत येतात आणि 'अमुक ठिकाणी अमुक शब्दाचा उच्चार असा होतो,' असें आपण त्यांच्या तोंडून ऐकतों. साधारणपणे आपली स्वतःची बोली प्रमाणभूत मानण्याकडे प्रत्येकाचा स्वाभाविक कल असल्यामुळें भिन्न दिशांनी परिवर्तन पावलेले ध्वनी 'विचित्र' व 'अशुद्ध' मानण्याची लोकांची प्रवृत्ति असते.

Page 170

नव्या भाषा १३३

हे स्थानिक भेद एकमेकांना जितके जवळचे तितकें त्यांच्यांतील साम्य अधिक; जितके दूरचे तितका त्यांच्यांतील फरक तीव्र असें सामान्यपणे म्हणतां येईल. गुजराती मराठीला, कच्छी गुजरातीला, सिंधी कच्छीला जवळन्दी आहे; तर हिंदी राजस्थानीला, राजस्थानी गुजरातीला आि गुजराती मराठीला जवळची आहे. मोठ्या प्रमाणावर साम्य आणि भेद याबद्दलचा हा जो नियम भाषांना लागूं पडतो, तो मर्यादित प्रमाणाबर स्थानिक बोलींना लागूं पडतो, एकत्र व्यवहार करणारे, सदैव एकत्र राइ- णारे लोक ध्वनिटष्टया एकाच रूढीचा आश्रय घेणार, हें उघड आहे; एवढेंच नव्हे तर ज्यांचे सहजीवन अधिक निकट, अधिक समान दर्जाचें, त्यांची भाषाहि एक असणार ही गोष्ट उघड आहे. पण सामाजिक दर्जा आणि निकट सहजीवन या बाबर्तीत पूर्ण सादृश्य असलेले दोन समूह जर भिन्न प्रदेशांत राहिले, तर मुळांत त्यांची भाषा एक असूनहि कांही काळांनंतर ध्वनिदष्टया भिन्न मार्गानें बदलत जाईल, पैठणचा ब्राह्मण, पुण्याचा ब्राह्मण आणि रत्नागिरीचा ब्राह्मण वेगळ्या ध्वनींचा, शब्दांचा, रूपांचा उपयोग करतील. पण ध्वनींत परिवर्तन होतांना तें एका विशिष्ट काळी एका विशिष्ट समाजांत एका ठराविक दिशेनें होतें. ध्वनी नुसते बदलत नाहींत, तर एका ठराविक मार्गानें बदलतात; कारण ज्या ध्वनींचा उपयोग भाषा म्हणून एखादा समाज करतो, ते ध्वनी एका सुव्यवस्थित पद्धतीचे .घटक असतात आणि तिच्यांतले कांहीं ध्वनी बदलले तरीहि ते ही सुव्यवस्था न दुखावतां बदलतात. उदाहरणार्थ दोन स्वरांमधील निष्कंप स्फोटकाचा सकंप स्फोटक बनण्याची प्रवृति एखाद्या भागांतील भार्षेत दिसूं लागली, तर ती त्या काळच्या त्या परिस्थितीत असणाऱ्या सर्व स्फोटकांना सारखी लागूं पडेल, काक हा शब्द कालांतरानें वरील नियमाला घरून काग असा झाला, तर वातमधील तलांहि तो नियम लागून त्याचें परिवर्तन वाद असें होईल; आणि ज्या काळीं एका विशष्ट भागांतील भार्षेत पूर्वी काग असा उच्चारला जाणारा शब्द काअ असा उच्चारला जाईल, त्यावेळीं वाद याचें परिवर्तनहि वाअ असें होईल.

Page 171

१३४ ध्वनिविचार

म्हणजे क्षेत्रमर्यादेच्या दृष्टीनें अनिथमित वाटणारी हीं परिवर्तनें एकाच स्थानिक बोलींताल ध्वर्नीच्या व्यवस्थेच्या दृष्टीनें विचार केला तर अति- शय पद्धतशीर असतात, याचें कारण हैं की केवळ एका विशिष्ट ध्वनीचा उच्चार बदलत नसून एका ठराविक वर्गातील वर्णाच्या उच्चारामार्गे अस- णारी तोंडांतील अवयवांची हालचाल एका निश्चित मार्गानें बदलते. अमुक परिस्थितीतले स्फोटक, अमुक परिस्थितींतले घर्षक, अमुक परिस्थितीतले दंत्य वर्ण एका निश्चित मार्गानें बदलतात आणि म्हणूनच एखाद्या ध्वनीचें परिवर्तन मिळाल्यावर व्याच्या समकालीन आणि समवर्गीय ्वनीचें परिवर्तन कसें होईल, याचें अनुमान करणें शक्य होतें. त्याच- प्रमाणें एकाच भार्षेतील दोन भिन्नकालीन ध्वनीतला परिवर्तनाचा दुवाहि शोधून काढतां येतो. मार्ग-मग्ग, विप्र-विप्प ही परिवर्तनाची दिशा सम- जत्यावर ज्या काळीं ज्या ठिकाणी हीं परिवर्तनें घडून आलीं त्या काळीं क्या ठिका्णी कर्म-कम्म, तक-तक हीं परिवर्तर्नेहि झालीं असलींच पाहि- जेत, ही गोष्ट स्पष्ट होते. अशा रीतीनें अतिशय विस्तृत प्रदेशांत बोलल्या जाणान्या एकाच भाषेचे ध्वनी कांही काळानंतर वेगबेगळ्या भागांत उच्चारदृष्टया बदल- तात, हे बदललेले ध्वनी याहून मर्यादित क्षेत्रांत कालांतरानें आणखी चदळतात आणि परिवर्तनाचा हा प्रवाह अखंड चालूं असतो. सरतेशेवटी कांहीं खेडीसुद्धां ध्वनिटष्टया एक विशिष्ट स्थानिक भेद दर्शवणारे घटक बनतात; मात्र पूर्वी सांगितल्याप्रमाणें अत्यंत निकट सहजीवन असणारे मानवी समूह एकाच ध्वनिपरंपरेला धरून राइतात, कारण भाषा हा पूर्वीच्या पिढीकडून नंतरध्या पिढीकडे जाणारा एक सामाजिक आणि जवळजवळ नैसर्गिक वारसा आहे. हा वारसा वडिलांच्या अनु- क्करणानें प्राप्त करून ध्यायचा असतो; त्याचें अनुकरण करतांना पुदील वपेढीन्या उन्चारांत जें परिवर्तन घडन येंतें, तें एकत्र राहणाऱ्या समा- जाच्या प्रत्येक घटकांत सारख्याच दिशेनें आणि सारख्याच प्रमाणांत चडून येतें; त्यामुळें जेन्हां एखादा ध्वनि पूर्णपणें बदलतो, तेव्हां तो एका विशिष्ट घटकाच्या भाषेत एका निश्ित काळीं ती भाषा बोलणाऱ्या सर्व

Page 172

नव्या भाषा १३५

व्यक्तींच्या भाषणांत बदलतो. हें प्रमाण आणि ही दिशा प्रत्येक समान वयाच्या व्यक्तींत सारखी नसेल तर वेगवेगळ्या व्यक्तीच्या भाषणांत एक ध्वनि वेगवेगळ्या कार्ळी बदलेल किवा वेगवेगळ्या दिशानी बदलेल आणि एकाच भाषिक परंपरेष्या उपयोगानें समाजाचे व्यवहार करणें अशक्य होईल, अ आणि ब या दोन जवळच्या खेड्यांतहि कदाचित् ध्वनि परिवर्तनाची गति आणि दिशा भिन्न असतील, पण अच्या रहिवाश्यां- पुरती तरा ती सारखीच असली पाहिजे. आपल्या देशांतील विशिष्ट सामाजिक परिस्थितींत एकजातीयत्व हें निकट सहजीवनाचें एक प्रमुख अंग होतें. एकाच जाताचे लोक गांवाच्या एका विशिष्ट भागांत रहात; त्यामुळें सामाजिक निर्बेध व धार्मिक व्यवहार यामुळें जखडल्या गेलेल्या या लोकांची भाषाहि सारखी बनली. एकाच गांवच्या एका विशिष्ट जातीच्या उच्चारांत दिसून येणारी वैशिष्टयें, समान वाक्प्रयोग, विशिष्ट शब्दांचा उपयोग यांची आपल्याला कित्येकदा इतकी संबय झालेली असते की केवळ विशिष्ट शब्दांचा प्रयोग किंवा अमुक एक उच्चार यावरून एखाद्या माणसाची जात किंवा प्रांत सांगणे शक्य होतें. पण वरील सर्व विवेचन एका आदर्श परिस्थितीचें झालें, तें करतांना असें गृह्ीत धरण्यांत आलें होतें की सर्व व्यक्ती आपापल्या गांवांतच रहातात; पण हैं स्थैर्य काल्पनिक आहे. पोटाधंद्यासाठीं किंवा व्यापारा- साठी मजूर किवा व्यापारी बाहेर जातात, शिकण्यासाठी किवा ज्ञान- दानासाठीं विद्यार्थी व पंडित आपला गांव सोडतात, मुली लग्न होऊन परगांवीं जातात, महत्वाकांक्षी राजे आप्ले साम्राज्य वाढवण्यासाठी नवीन प्रदेश काबीज करतात, प्रवास करून अधिक ज्ञान मिळवण्यासाठी जिज्ञासहि भटकत असतात. अस्थिरता हा जीवनाचा आत्मा आहे आणि तो लक्षांत घेऊन समाजजीवनाचा अभ्यास झाला पाहिजे, दैनिक व्यब- हारांत आजबाजुच्या जगाचें मान नसलेलें खेडें राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, व्यापारी आणि इतर अनेक कारणांनी आजबाजच्या प्रदेशा- पासुन अविभक्त असतें. शिवाय केवळ एक लहानसें खेडे किंवा सेड्यांचा

Page 173

१३६ ध्वनिविचार

समूह अगदी स्वयंपूर्ण असूं शकत नाहीं. त्याच्या गरजा अनेक असतात आणि प्रगतीच्या वाढीबरोबरच आसपासच्या किंवा दूरदूरच्याहि समा- जाशीं त्याचे संबंध वाढत जातात. परस्परांच्या अधिक वाढत्या सह- कार्याची अपेक्षा, अधिकाधिक परावलंबित्व हा समाजजीवनांतील अपररि- हार्य टप्पा आहे. हा सहकार परिणामकारक करण्यासाठीं आणि शक्य होण्यासाठी एकमेकांना कळूं शकेल अशा भाषेची जरूर असते. आपली स्थानिक बोली कोणतीहि असली तरी एका विस्तृत प्रदेशावर स्वामित्व गाजवणाऱ्या शासनसंस्थेखालीं असणान्या व्यक्ती शक्यतोंवर एका प्रमाण- भूत स्थानिक बोलीचा आश्रय घेतात. अशा रीतीनें स्थानिक बोली अनेक असूनहि संघटित प्रदेशांत एकाच भाषेचें वर्चस्व असतें, फ्रान्सच्या वेग- वेगळ्या भागांत बोलल्या जाणाऱ्या स्थानिक मेदापैकीं पॅरीसच्या भोवतीं असलेल्या ईल द फ्रांस(Ile de France) या भागाची भाषाच प्रमाणभूत ठरली आहे. राज्यकारभारांत, शिक्षणकार्यात, साहित्यलेखनत तिचाच आश्रय घेण्यांत येतो. आणि ज्याप्रमाणे स्थानिक बोलीमुळें मर्यादित प्रमाणांतील ग्रामीण जीवन शक्य आणि सुकर बनतें, त्याचप्रमाणें या प्रमाणभूत भाषेच्या आश्रयामुळें विस्तृत राष्ट्रीय जीवन, शिक्षण, राज्य- कारभार, साहित्यिक जीवन, दूरदूरच्या प्रदेशांचा विनिमय, या गोष्टी शक्य बनतात. मात्र हैं विस्तृत सहजीबन सलग प्रदेशांत राहणाऱ्या आणि मूळ एका भार्षेत भेदनिर्मिति होऊन अस्तित्वांत आलेल्या स्थानिक बोली बोलणाऱ्या समान संस्कृतीच्या आणि एका राजकीय सत्तेवर अवलंबून असणाऱ्या लोकांत अधिक शक्य आणि सोपें आहे. एकाच प्रदेशांतील अनेक स्थानिक बोलीपैकीं जी बोली साहित्य- निर्मिति किंवा बौद्धिक चळवळ या बाबर्तीत आघाडीला असते ती बोली किवा ज्या भागांतील लोक अधिक कर्तृत्ववान् असतात, ज्या भागांत राजसत्तेचें किवा शैक्षणिक चळवळीचें केंद्र असतें, त्या भागांतील बोली अधिक प्रभावशाली ठरते. राज्यकर्त्या गटाची भाषा रहिवाशांच्या भाषे- हून बेगळी असली तरीहि ती तेथील शब्दसंग्रहावर केवढा तरी परिणाम बडवून आणते. नॉर्मन विजयानंतर इंग्रजी भार्षेत घडून आलेले फरक

Page 174

नव्या भाषा १३७

किवा मोगलसत्ता दृढमूल झाल्यानंतर फारशी व अरबी भाषांचा हिंदु- स्तानांतील भाषांवर घडलेला परिणाम प्रसिद्धच आहे. एखाद्या मूळ एकभाषिक प्रदेशांत कालांतरानें दोन अथवा अधिक राज- कीय सत्ता अस्तित्वांत आल्या आणि त्यांनी आपापल्या स्थानिक बोलीना प्रमाणभूत ठरवून राज्यव्यवहाराच्ी भाषा ग्हणून नक्की केलें, तर त्या दोन्हीहि बोली भाषा ग्हणून समजल्या जातील, तसेंच ज्या बोलीत साहित्य निर्माण करण्याची शक्ति असेल आणि परपरा अस्तित्वांत येईल ती बोलीि भाषा म्हणूनच समजली जाईल. भाषा व बोली यांत निश्चित भेददर्शक असें फार थोड़ें आहे. उदयां गोवें आणि त्याच्या आजबाजन्ा प्रदेश हा स्वतंत्र स्वायत्त प्रांत बनला, तेथें बोलण्यांत येणारां बोलीच पद्धतशीर रीतीनें लिपिबद्ध करून शिक्षण- क्रमाचें माध्यम आणि राज्यव्यवहाराचें साधन ग्हणून तिचा उपयोग होऊं लागला, आणि पत्रलेखन, साहित्यनिमिति, इत्यादि क्षेत्रांत ती मनोगत व्यक्त करण्याचें स्वाभाविक साधन झाली, तर तिला मराठीची पोटभाषा न म्हणतां स्वतंत्र भाषा ग्हणावें लागेल, मुळांत स्पष्टपणे एकरूप अस- लेली भाषा कालांतरानें आपल्या स्वामित्वाखाली असलेव्या प्रदेशांतील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या मार्गोनी बदलत जाते. ही भाषा बोलणारा समाज संघटित असून एकत्र रहाणारा असलातर त्यांतत्या व्यक्ती आपत्या व्यापक व्यवहारासाठी सर्व समाजानें प्रमाणभूत मानलेली भाषा वापर- तील आंि एरवीं आपल्या मर्यादित व्यवहारांत स्थानिक बोलीचा उप- योग करतील आणि स्थानिक बोलीचा उपयोग करणाऱ्या प्रत्येक समृहाला आपण एका मोठ्या भाषेशी संलग्न असणारा एक मर्यादित गट आहों याची जाणीव असेल, ही जाणीव पोटभाषे्या मर्यादा नकी करते. म्हणून पोटभाषा व भाषा यांचे परस्पर संबंध हे ती पोटभाषा बोल- णाऱ्या लोकांची संस्कृति, राजकीय महत्वाकांक्षा, बौद्धिक पातळी, यांवर

बनूं शकेल. अबलंबून रहातील आणि पोटभाषेची भाषा किवा भाषेची पोटभाषाहि

Page 175

१३८ ध्वनिविचार

अर्थात् आधुनिक काळांत अशा घटना फारशा घडणार नाहींत, परंतु भाषा आणि पोटभाषा यांच्यामागे केवळ भाषिक त्त्वेंच नसून राजकारण, साहित्यनिर्मिति, स्वायत्ततेची इच्छा, दुसन्यांपासून स्वतंत्र आणि वेगळे राहून आपलें अस्तित्व अधिक ठळक करण्याची महत्वाकांक्षा, आर्थिक आणि इतर प्रश्नांबाबत आपलें जीवन इतरांपेक्षां भिन्न आहे, तें स्वतःच सुसंघटित केलें पाहिजे ही जाणीब, इत्यादि कारणेहि असूं शकतील. स्वतंत्र भाषिक समाज निर्माण करण्याचें सामर्थ्य या जाणिवेत असतें हैं लक्षांत ठेवलें पाहिजे.

Page 176

प्रकरण आठवें भाषेचें दृश्य स्वरूप: लेखन ध्वनींच्या साह्यानें विचार व्यक्त करण्याचें भाषा हैं एक साधन असल्यामुळें तिचा अभ्यास करणारांनीं खरें महत्व ध्वनीनाच दिलें पाहिजे, हैं पूर्वी सांगितलें, प्रत्येक भाषा ज्या ध्वनींचा उपयोग करून समाजव्यवहार चालवते, ते त्या भाषेचे विशिष्ट ध्वनी ती भाषा बोल- णाऱ्या लोकांच्या तोंडून आपणाला ऐकायला मिळतात. हिंदी, फारसी, मराठी, इंग्रजी, फ्रेंच, इत्यादि भाषांतील ध्वर्नीचें ज्ञान त्या ज्यांच्या मातृभाषा आहेत अशा त्या व्यक्तींच्या बोलण्यावरून आपणाला होतें. पण ध्वनी हे अल्पजीवी आहेत; निर्माण होतां होतांच आपला हेतु साध्य करून ते ताबडतोब नाहींसे होतात. त्यांनों व्यक्त होणारा विचार त्यांच्या इतकाच क्षणभंगुर राहतो; पण बौद्धिक प्रगतीष्या एका विशिष्ट बिंदूवर आव्यानंतर आपले विचार दीर्घकाल टिकावे, आपल्या गैरहजेरीतहि ते इतरांपुढे ठेवण्याचें साधन आपणाजवळ असावें, असें मानवाला वाटलें असणें साइजिकच आहे. मात् त्यामुळें ध्वनीहून अधिक चिरजीवी साधनाचा उपयोग करणें अवश्य होतें. ध्वनी हे हर्वेत निर्माण होणारे अत्पजीवी तरंग आहेत. ते दृश्य नाहींत आणि पकडून ठेवतां येण्यासारखे पार्थिवहि नाहींत.१ म्हणून चिरजीवी, दृश्य व पार्थिव असें विचार पकडून ठेवण्याचें साधन निर्माण करण्याची इच्छा ज्या क्षणी माणसाच्या मनांत उत्पन्न झाली, त्या क्षणींच लेखनाचा म्हणजे विचार व्यक्त करण्याच्या चिरजीवी, दृश्य आणि पार्थिव अशञा साधनाचा तात्विकद्ष्टया जन्म झाला, असें म्हणण्यास हरकत नाहीं. प्रथमतः केवळ विचार व्यक्त करणें यावरच सर्व लक्ष केंद्रित झालेलें असल्यामुळें जी चिन्हें ताबडतोब दुसऱ्या व्यक्तीला हे विचार कळबूं १३९

Page 177

१४० ध्वनिविचार

शकतील ती, म्हणजे अगदी प्रारंभिक आणि सोपें असें एक साधन मनु- व्यानें हुडकून काढलें; तें म्हणजे विचारविषयीभूत गोष्टीचें चित्र. आतां अशा चित्रांत जबळजवळ मूळचे विचारच प्रत्यक्षपणे इतरांसमोर ठेवले जात असल्यामुळें हैं चित्रलेखन म्हणजे एक प्रकारची भाषाच, किंबहुना ध्वनीनीं व्यक्त होणाऱ्या भाषेपेक्षाहि विचारांना अधिक जवळ असणारें एक साधन होतें. आधुनिक लेखन हैं विचार व्यक्त करणाऱ्या ध्वनीना व्यक्त करणारें साधन असल्यानें तें व हैं प्रारंभीचें चित्रलेखन यांत किती फरक आहे, हें सहजच लक्षांत येईल, इतिहासपूर्वकालीन मानवी जीवनाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी असें दाखवून दिलें आहे की चित्रकला ही थोड्याबहुत प्रमाणांत माण- साला फार प्राचीन काळापासून अवगत होती. हीं जुनी चित्रें कोणत्या हेतूनें काढलीं गेलीं हें ठरवणे जवळजवळ अशक्य आहे; कारण ती सहजस्फूर्त असून त्यांतन केवळ सौंदर्यसुखानुभव घेण्याची मनुष्याची इच्छा होती किंवा दुसऱ्या कोणाला तरी त्यांतून कांहीं अभिप्राय व्यक्त करण्यासाठीं ती काढलीं गेलीं होतीं, या प्रभ्नाचें उत्तर मिळण्याइतका पुंरावा आपणजवळ नाहीं, कलेचा आस्वाद घेण्याची प्राचीन मानवाची पात्रता असेल की नाहीं, हैं सांगणेहि सोपें नाहीं. पण या मुदाचा निकाल न लागतांहि एक गोष्ट आपण नीट समजू शकतों आणि ती ही कीं मानवी संस्कृतीच्या बाल्यावस्थेच्याहि प्रारंभी बाह्य वस्तुंचें वस्तुस्थिति- निदर्शक चित्रण मनुष्याला करतां येत होतें. परंतु हें चित्रण जेव्हां प्रथम अस्तित्वांत आलें, त्यावेळीं तें केवळ एखाद्या विशिष्ट वस्तूचें प्रतीक आहे असे मात्र मनुष्य मानत नसे. चित्र हें मूळ वस्तचें प्रतीक आहे, स्मारकचिन्ह आहे, ही उत्क्रांतीची पायरी नंतर आली, चित्र आणि मूळ वस्तु यांच्या अभिन्नत्वाबद्दल प्राचीन मानवाला एवढी खात्री होती की बाघाचें चित्र आणि बाघ यांची प्रति- ्रिया त्याच्या मनावर सारखीच होत असे. जोंपर्येत हा भ्रम शिल्क होता तोंपर्येत, म्हणजे वस्तु आणि प्रतीक, मूळ आणि स्मारक, साध्य आणि साधन, यांचें भिन्नत्व लक्षांत येईपर्येत,

Page 178

भाषेचें दृश्य स्वरूप: लेखन १४१

चित्रण हें केवळ साध्य रूपानेंच मनुष्याजबळ होतें. हा भ्रम दूर होतांच, म्हणजे चित्रांत असलेली वस्तू हें एक सूचक चिन्ह आहे, मूळ वस्तहून ती भिन्न आहे, भूळ वस्तूचें ती स्मरण करून देते आणि एवढ्यापुरताच तिचा त्या वस्तुरशी संबंध आहे, हें ज्ञान होतांच त्या ज्ञानाचा उपयोग करण्याचा, म्हणजे पर्यायानें लेखनकलेचा शोध लागला. प्रतीक व वस्तु यांतील भेद न समजणाऱ्या मनुष्याच्या या पूर्वा- चस्थेंतील मनोवृत्तीचें आश्चर्य वाटण्याचें कांहींच कारण नाहीं. छापील किंवा लिहिलेल्या अक्षरांना भाषा समजणे हें आपल्या इतकें अंगवळर्णी पडलें आहे कीं मुद्रण अथवा लेखन हैं विचारांचें तृतीयावस्थेंतील स्वरूप असून मूळ विचारापासून तें फारच भिन्न आहे, ही गोष्ट जर आपल्या- देखील लक्षांत येत नाहीं, तर चित्रांनाच मूळ वस्तु समजणाऱ्या आपल्या प्रागैतिहासिक पूर्वजांबद्दल हसूं येण्याचें आपणांला कांहींच कारण नाहीं. मनोविचाराना ध्वनिरूप साधनांनी व्यक्त करून श्रुतिगोचर करणें आणि श्षतिगोचर क्षणभंगुर ध्वनींना दृश्य स्वरूप देऊन त्यांचें आयुष्य वाढवणे, हा भाषेचा थोडक्यांत इतिहास आहे. लेखनकलेचें हैं महत्व एवढें आहे की पूर्वकालीन भाषांच्या अस्तित्वाचा आणि स्वर्पाचा सर्वं पुरावा, लेखनकलेचा उपयोग मनुष्यानें सुरूं केला त्या काळापासूनच मिळालेला आहे. विचार व्यक्त करण्याचें साधन म्हणुन करण्यांत आलेला ्वनींचा उपयोग ही ज्याप्रमाणें भाषेची सुरुवात, त्याच प्रमाणें मूर्त साधनांचा उपयोग करून हे ्बनी दृष्टिगोचर करणें ही लेख- नाची सुरुवात होय. पण लेखनाचें अगदी प्रारंभीचें स्वरूप व त्याचें प्रचलित स्वरूप यांत फार अंतर आहे. मूळ लेखन हें कल्पनानिदर्शक होतें; तेव्हां आपण ज्या अर्थानें भाषा हा शब्द वापरतों व तिचा अभ्यास करतों, तो अर्थ या प्राचीन लेखनाला लागूं पडत नाहीं, कसा तो पहा : असें समजा की केवळ कल्पनाचित्रण जाणणाऱ्या एका महाराष्ट्रीयाला 'मासा' ही कस्पना व्यक्त करायची आहे. साहजिकच .तो त्या प्राण्याची आकृति काहून आपला हेतु सिद्धीला नेईल.

Page 179

१४२ ध्वनिविचार

या आकृतीकडे लक्ष जातांच प्रकाशविद्येच्या नियमानुसार तिच्यापासून निघणारे प्रकाशकिरण डोळ्यांवाटे त्याच्यामागें असणाऱ्या पडद्यावर पडतात, या पडद्यार्शी संबंधित असलेल्या संवेदनाक्षम तंतूंच्या द्वारे मनु- ष्याच्या मेंदूंत त्या आकृतीशी संलग्न असणाऱ्या भावनेला चालना मिळून 'मासा' या कल्पनेचें ज्ञान प्रेक्षकाला होतें, म्हणजे मासा या प्राण्याचें कल्पनाचित्र त्याच्या मनश्रक्षंसमोर उमें राहतें. 'मासा' हा शब्द उच्चारून हाच परिणाम कर्णेद्रियाच्या मार्गानें आपणाला घडवतां येईल. या शब्दांत जे चार ध्वनी म् आ स आ आहेत ते डोळ्यांना परि- चित असणाऱ्या चिन्हांनी व्यक्त करणें याला आपण लेखन म्हणतों. प्रेक्षकाला परिचित असलेल्या वाटेल त्या लिर्पीत हें आपणाला करतां येईल. पण 'मासा' या प्राण्याचें चित्र, 'मासा' ही कल्पना ज्या ध्वनीनी व्यक्त होते त्यांचें लेखन नसल्यामुळें, केवळ कल्पनाचित्रण झालें. हैं कल्पनाचित्रण आणि ध्वर्नीनीं व्यक्त होणारा विचार (मग तो लेखनांत असो कीं बोलण्यांत असो) यांत एक महत्वाचा फरक आहे. कोणत्याहि डोळस माणसासमोर एखाद्या वस्तूचें चित्र ठेवून आपलें मनोगत आपणाला व्यक्त करतां येतें. माशाचें चित्र पाहून त्याच्या मागील कल्पना जगांतील कोणत्याहि भागांत सारखीच आकलन होईल, पण 'मासा' हा शब्द मात्र मराठी जाणणाऱ्या माणसालाच समजूं शकेल. चित्राची कल्पना व्यक्त करण्याची शक्ति स्थल आणि काल यांनी अनि- यंत्रित ग्हणजे अमर्याद अशी आहे. 'मासा' हा शब्द स्थल व काल यानीं मर्यादित आहे. 'मासा' हा शब्दाचें ध्वनिटष्टया अगरदी बेगळें असें रूप कित्येक शतकांपूर्वी महाराष्ट्रंत होतें; आणखी कांहीं शतकांनीं तें कदाचित् पुन्हां बदलेल, तसेंच 'मासा' हा शब्द एका विशिष्ट प्राण्याला एका विशिष्ट समाजाचे लोक वापरतात आणि हे लोक साधारणपणे एका विशिष्ट क्षेत्रमर्यादेंतच राहतात; म्हणून या समाजाबाहेर, ग्हणजे या क्षेत्राबाहेर तें समजलें जाणार नाहीं.

Page 180

भाषेचें दृश्य स्वरूप: लेखन १४३

अशा रीतीनें दिक्कालातीव असस्यामुळें विचारचित्रणांत जो सोपेपण आला होता, तोच त्याला घातक ठरला. विचारचित्रण सोपें कां झालें ? तर विचाराचें प्रत्यक्ष चित्रच तें आपणांसमोर ठेवी म्हणून, पण विचार असंख्य आहेत आणि सर्वच कांहीं चित्रांनीं व्यक्त होण्यासारखे मूर्द स्वरूपाचे नाहींत, जे व्यक्त होण्यासारखे आहेत, त्यांत एकमेकांशी साम्य असणारे कांही विचार आहेत. मनुष्य-पुरुष-नवरा, राजा-राणी, बायको- स्त्री, इत्यादि कल्पना चित्रलेखनाच्या दष्टीनें एकमेकांपासून फारशा भिक्र नाहींत. अशा क्पना व्यक्त करतांना मुळांत एक सामान्य वर्ग दाखवि- णारी खूण आणि मग त्यांतील वैशिष्टय नजरेला आणणारी दुसरी एक खास खूण, अशा दोन खुणांचा उपयोग करणें अपरिहार्य झालें. चिनी भाषेची लिपि याच तत्वानुसार झालेली आहे. लेखनाची प्रगति कथी झाली तें लक्षांत येण्यासाठीं तिचा तात्विक परिचय करून घेणें इष्ट आहे.

कोणताहि दृश्य पदार्थ त्याचें चित्र काढून दाखवणे (त्या पदार्था- साठी वापरण्यांत येणाऱ्या ध्वनीच्या लेखनानें नव्हे), हैं चिनी लेखन- पद्धतीचें मूलभूत तत्व आहे. अर्थात् कोणत्याहि वस्तूचें चित्र तिच्या सर्क बारकायांसह काढणें शक्य किंवा जरूर नसल्यामुळें पुढेपुढे हे चित्रशब्द लेखनापुरते रूढिबद्ध झाले, म्हणजे अमुक चिन्द हें माणूस दाखवर्ते, अमुक पक्ष्यासाठीं आहे, तमक्याचा अर्थ घोडा, असें मानण्याचा रिवाज रूढ झाला, ज्याप्रमाणे आपल्या लेखनपद्धतीचा मूलभूत घटक वर्ण, त्या- प्रमाणें चिनी लेखनपद्धतीचा घटक (ती विचारचित्रण करणारी लिफि असल्यामुळें) शब्द होय, हें उघडच आहे. अशा रीतीनें निसर्गोतील घडामोडी, प्राणी, वनस्पति, दृश्य वस्तु यांचें चित्रण झालें, पण भाषें- तील एकंदर शब्दसंग्रहाच्या मानानें या चित्रशब्दांची संख्या मर्यादित आहे; कारण क्रियादर्शक, मनोव्यापारदर्शक अमूर्त कल्पना असंख्य आहेत. त्याँचें चित्रण करणें तत्वतःच अशक्य आहे. अर्थात् या अमूर्त कल्पना दर्शवणारें प्रतीकात्मक चित्रण करणें अवश्य होतें.

Page 181

१४४ ध्वनिविचार

ही अडचण सोडवण्यासाठीं चित्रसंघ तयार करण्यांत आले, उदा- हरणार्थ 'बायको' व 'मुलगा' हीं चित्रें एकत्र करून 'सुखी' ही कल्पना व्यक्त करण्यांत आली, कारण सामान्यतः विवाहित पुत्रवान् मनुष्य सुखी असतो अशी समजूत आहे. तसेंच 'खोडसाळपणा' ही कस्पना स्त्रीचें चित्र तीनदा काहून व्यक्त करण्यांत आली. पण एबढधानेंहि सर्व कल्पनांचें चित्रण करणें शक्य नाहीं, म्हणून आणखरी एक युक्ति चित्रलेखकांनी योजली, कित्येकदां एकच शब्द म्हणजे ध्वनिसमुच्चय दोन अर्थ दाखवणारा असून त्यांतील एक अर्थ मूर्त पदार्थवाचक व दुसरा अमूर्त कल्पनावाचक असतो. अशा वेळी मूर्त पदार्थाचें चित्रच अमूर्त कल्पनेऐवर्जी वापरून हा प्रश्र सोडवण्यात आला. उदाहरणार्थ, खेळणें, लाटणें, जोडा, इ. मात्र यांतील मूर्त पदाथाचें चित्र हा खरा चित्रशब्द असून अमूर्त कल्पना व्यक्त करतांना तो केवळ उच्चारसाम्यामुळें वापरलेला आहे. पहिला शब्द विचारदर्शक असून दुसरा ध्वनिवाचक किंवा उच्चारवाचक आहे. असे समानोच्चारित अनेक अर्थ असणारे शब्द चिनी भार्षेत पुष्कळ आहेत. कित्येक शब्द दोनांहून अधिक अर्थ व्यक्त करणारेहि आहेत. स्यांतील अर्थभेद व्यवहारांत आघात बद्लून कमी अधिक हेल कादून दाखवला जातो; अशा अनेक अर्थ असणान्या शब्दबिरोबर आपणांला अभिप्रेत असलेल्या अर्थाचा आणख्री एक शब्द वापरून निश्चित अर्थ च्यक्त करण्याचा प्रघात पडला. पण अनेकार्थवाचक शब्दाचा कोणता अर्थ लेखकाला दर्शवायचा आहे तें स्पष्ट करणें लेखनांत नेहमींच शक्य नसल्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी एक उपाययोजना करण्यांत आली, ती म्हणजे अशा चित्राला जोडून असे एक सूचक चिन्ह काढायचें की त्यानें एक विशिष्ट अर्थच व्यक्त व्हावा आणि संदिग्धपणाला मुळींच जागा राहूं नये. उदा- हरणार्थ, 'सर' हा शब्द घ्या. अशी कल्पना करा की तो शिक्षकाचें चित्र काढून लििला जातो. आतां याच्या जोडीला पाणीवाचक शब्द

Page 182

भाषेचें दृश्य स्वरूप: लेखन १४५

काढला तर पावसाची सर, हिरा किंवा मोती काढून हार, पदक काढून पदवी, सूर्य काढून योग्यता, हे अर्थ व्यक्त होतील, म्हणजे नुसत्या शिक्ष- काच्या चित्रानें एकच कल्पना व्यक्त होते, पण त्याला सूचक चिन्हें जोडून त्याच उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द दाखवतां येतात. अर्शी सूचकचिन्हें चिनी भाषेत २४२ आहेत. मात्र ही चित्रलिपि चिनी भाषेलाच सोथीची आहे. त्या भाषेतील शब्दांना अंतर्बाह्य असा कोणताच विकार होत नसून नाम, किया, गुण, इत्यादि वर्गव्यवस्था किवा इतर भाषांत विभक्तिप्रत्ययानी अथवा इतर साधनांनी व्यक्त होणारा शब्दांचा परस्परांशी संबंध चिनी भारषेत शब्दांचा क्रम, त्यांचें साननिध्य अश्ा रचनात्मक साधनांनी व्यक्त होतो. कोणताहि शब्द स्वभावतःच नाम किंवा विशेषण, क्रियापद किंवा अव्यय नसून एकंदर वाक्यांत त्याचें जें स्थान अथवा इतर शब्दां्शी साहचर्य असतें त्यामुळें त्याला विशिष्ट अर्थ अथवा कार्य प्रकट करण्याचें सामर्थ्य येतें. अशा रीतीनें कोशांतील शब्द मुळींच न बदलतां भार्षेत जसेच्या तसे वापरले जात असल्यामुळें चित्रलेखनांतहि ही अडचण उमी रहात नाहीं. उदाहरणार्थ, 'जाणें' या शब्दारचीं मराठींत जाऊन, जातांना, जात, गेला, जायला, जावें हीं आणि कर्ता, काळ, लिंग, वचन, अर्थ याष्या अनुरोधानें अनेक रूपें होतील, याचा अर्थ असा कीं, हें क्रिया- पद विकारक्षम, म्हणजे त्याला जो अर्थ व्यक्त करावयाचा असेल त्या- प्रमाणें बदलणारें, आहे. चिनी भार्षेत तें मुळींच बदलणार नाही. 'गेले" असें म्हणायचें असेल तर 'जाणे-संपणे', 'जाऊन' म्हणायचें असेल तर 'जाणे-नंतर', 'जातांना' असें म्हणायचे असेल तर 'जाणे-चालूं राहणें', असे शब्दप्रयोग करून अर्थसिद्धि होते. पण जगांतील बहुतेक भाषा विकारक्षम आहेत. अशा भार्षाना चित्र- लेखन हैं एका विशिष्ट मर्यादेपर्येतच उपयोगीं पडेल, अशा लेखनाने प्रेक्षकाला चित्रकाराच्या विचाराची काहीं कल्पना येईल, पण पूर्ण अर्थ- बोध होणार नाहीं. व्याकरणांतील संबंधदर्शक प्रत्यय, उपपदे इत्यादि व्यक्त करण्याचें कोणतेंच साधन या लिर्पीत नसल्यामुळें, त्या दिशेनें स्व.वि.१०

Page 183

१४६ ध्वनिविचार

प्रयत्न करून आपल्या भाषेला सोयीस्कर अशी लेखनपद्धति शोधून काढण्याच्या मार्गाला हे लोक लागले.

या प्रयत्नांचा परिणाम म्हणून चित्रांतीलच कांहीं भाग ध्वनीप्रमाणे वापरण्याची कल्पना निघाली. उदाहरणार्थ, 'कान्' व 'तार' हे शब्द त्यांची चित्रें काढून लिहिण्यांत येतात असे समजा. पण ही चित्रें 'कानू' व 'तार' या ध्वनींचीं दोतक मानून 'कान्तार' हा शब्द लिहितांना एक नवें चित्र न काढतां हीं दोन चित्रें एकापुढे एक काढून हें लेखन करण्यांत येऊं लागलें. अशा रीतीनें कांहीं शब्दांची चचित्रें ध्वर्नीप्रमाणे वाचतां येऊं लागलीं.

पण हे ध्वनी बेगळे नसून समूहात्मक किंवा अवयवमूलक होते. म्हणजे 'कान्तार' या शब्दांत 'कान' हे तीन ध्वनी व्यक्त करणारा एक समूह व 'तार्' हे तीन ध्बनी व्यक्त करणारा दुसरा समूह होता. पण विचारांचें चित्रण त्यांना व्यक्त करणाऱ्या ध्वनीचें लेखन करूनहि होतें, ही कस्पना मनुष्याला सुचली, हाच लेखनकलेच्या उत्कांतीतील अत्यंत मह- रवाचा टप्पा होय. कारण थोड्या अंशी मोजक्याच शब्दांना लागूं कर- ण्यांत आलेलें हैं तत्व सर्वोशी सर्व ध्वर्नीना लागूं करणें, एबढेंच आतां शिल्लक राहिलें.

ध्वनिसमूह वापरता बापरतां त्यांचें हदू इळूं पृथकरणहि स्वाभाबिक रीतीनें झालें. 'पाय्' या ध्वनिसमृहासाठीं पायाच्ें चित्र आणि 'गायू' या ध्वनिसमूहासाठीं गाईचें चित्र वापरतां बापरतां त्यांतील साम्य व भेद लक्षांत येऊन प व गया दोन ध्वर्नीचें ज्ञान मनुष्याला झालें, या ज्ञाना- नंतर भार्षेतील ध्वनीना सोयीस्कर चिन्हें म्हणजे अक्षरें शोधुन काढून त्यांचा लेखनांत उपयोग करणें एवढेच कार्य शिलक राहिलें.

अशा रीतीनें प्रथम चित्र, नंतर चित्र व सूचक चिन्ह, नंतर ध्वनि- सूचक चित्र किंवा ध्वनिसमह आणि सरते शेबटी मूलभूत ध्बनी अशञा कमानें लेखनकला अर्वाचीन काळापर्येत उत्क्ांत होत आली आहे.

Page 184

भाषेचें दृश्य स्वरूप: लेखन १४७

पण वर सांगितले्या कारणांमुळें चिनी भाषेचें लेखनमात्र बऱ्याच अंशी विचारचित्रण करणारें राहिलेलें आहे. याचा परिणाम वाचकांच्या दृष्टीनें अपूर्व झाला आहे. प्रत्येक भाषा ध्वनिदष्टया सारखी बदलत असते. तेव्हां आज चिनी भाषेचे जे उच्चार आहेत तेच दोन हजार वर्षापूर्वी असणें संभवनीय नाहीं, हें उघड आहे. उदाहरणार्थ, दोन हजार वर्षो- पूर्वीचें मराठीच्या पूर्वावस्थेंतील सोप्यांत सोपें असें वाबयदेखील आप- णांला बाचतां आले तरी कळणार नाहीं. पण ही अडचण चिनी वाच- काला येत नाहीं; कारण जुनें चिनी वाझाय हैं त्या काळच्या ध्वर्नीचें लेखन नसून त्या काळच्या विचारांचें चित्रण असल्यामुळें आणि हें चित्रण करणारीं दृश्य चिन्हें बन्याच अंशी जवळजबळ त्शीच राहिल्यामुळें, जुनें वाझय आणि नवें वाझ्यय यांच्या भार्षेत उच्चारदृष्टया पुष्कळदां न कळण्याइतकी भिन्नता असते, हैं त्याच्या गांवीहि नसतें, याच लेखन- पद्धतीचा दुसरा एक मनोरंजक परिणाम असा झाला आहे की मूळ चिनी भाषा चीन देशांतील वेगवेगळ्या भागांत ध्वनिदृष्टया वेगवेगळ्या दिशांनी परिणत होत जाऊन तिच्या अनेक पोटभाषा बनलेल्या आहेत. कित्येकदा दोन पोटभाषा उच्चाराच्या दष्टीनें एकमेकांपासून इतक्या भिन्न अस- तात की त्या बोलणारे लोक एकमेकांचें बोलणें समजं शकत नाहींत. पण त्यांनी जर एकमेकां्शी पत्रव्यवहार केला तर मात्र स्वतःचे विचार दुस- च्याला कळवणे त्यांना शक्य असतें. अशा रीतीनें उपयुक्ततेच्या दृष्टीनें चिनी लिपि ही विश्वलिपि होण्याला योग्य आहे; कारण ध्वनीच्या मागे दडलेले पण सर्व मानवजारतीत सारखेच असणारे विचारच ती प्रत्यक्षपणें वाचकासमोर ठेवते. मात्र सर्व वस्तु व अमूर्त विचार व्यक्त करणारीं हीं चित्रें इतकीं आहेत की आयुष्याचा चराचसा भाग तीं शिकण्यांतच घालवावा लागतो आणि विद्वत्तेचें प्रमाण ठरवण्याचें हैं एक साधन आहे. उयाला हीं चित्रें जितकीं अधिक येतील तितका तो अधिक विद्वान् समजला जातो. असंख्य विचारांचें भिन्नभिन्न चिन्हानी चित्रण करणाऱ्या विचारदर्शक लिपीपासून ज्या शब्दानी अर्थ व्यक्त होतो त्या शब्दांतील मर्यादित ध्वर्नींचें लेखन करण्यापर्येत मनुष्यानें कशी प्रगति केली, हें आपण पाहिलें.

Page 185

१४८ ध्वनिविचार

प्रथम विचारांचें चित्रांच्या साह्यानें प्रदर्शन, नंतर सर्वच विचार अशा रीतीनें प्रदर्शित होण्यासारखे नसल्यामुळें त्या दिशेनें या चित्रांत बदल, पुढें समान उच्चारांच शब्द एकाच चित्रानें व्यक्त करण्याची प्रथा, पुढे एकाच शब्दांतील कांहीं भाग एका चित्रानें (म्हणजे ध्वनिसमूहानें) व दुसरा भाग दुसऱ्या चित्रानें दाखवून चित्रांचा ध्वनिसमूह म्हणून उपयोग, हा उपयोग करतां करतां शब्दाचें मूलभूत स्वरूप पूर्णपर्णे ध्वनियुक्त आहे ही जाणीव व ही जाणीव होतांच शब्दाचें अधिकाधिक पृथकरण होत प्रथम अवयवलेखन व शेवटी वर्णलेखन यांचा शोध. वर सांगितलेंच आहे कीं लेखनकलेचा शोध लागला नसता, तर भाषेचा अभ्यास करण्यार्चीं साघनें मिळवण्याचा एकमेव मार्ग नष्ट झाला असता. म्हणून लिपीचा इतिहास, ति्ची बेळोवेळीं बदलणारी रूपें आणि एकाच लिपीनें जेव्हां भाषेच्या मिन्नमिन्न अवस्था व्यक्त होतात, तेव्हां त्या त्या अवस्थेत प्रत्येक अक्षरानें व्यक्त होणाऱ्या. ध्वनीचें, म्हणजे तें अक्षर खरोखर कसें उच्चारलें जात होतें याचें, ज्ञान करून घेणें अवश्य आहे. उदाहरणार्थ, आज मराठींत च या अक्षराचे दोन उच्चार प्रचलित आहेत किंवा श व ष हीं दोन्ही अक्षरें सारखीं उच्चारलीं जातात. हैं स्थित्यंतर खरोखर केव्हां घडन आलें, हैं नुसत्या लिपीकडे पाहून आप- णांला मुळींच समजणार नाहीं; कारण ध्वनी बदलले तरी जुन्या लिपीनें ते व्यक्त करत राहणें ह। अनुभव सर्वत्र येतो. म्हणून कोणतीहि भाषा केवळ तिची लिपि म्हणजे अक्षरें शिकून येत नाहीं. त्याबरोबर ती उच्चारण्याच्या रूढीचें म्हणजे अमुक अक्षर अमुक्क ठिकाणी कसें उच्चारलें जातें याचें ज्ञान होणें अवश्य आहे. इंग्रर्जीतील t हैं अक्षर tion यांत अमुक प्रकारें उच्चारलें जातें, ture यांत अमुक प्रकारें उच्चारलें जातें, h पुढे आला असता अमुकर प्रकारें उच्चारलें जातें, हैं लक्षांत घेतल्यासरेरीज उच्चारदृष्टया इंग्रजीचें योग्य ज्ञान होणें शक्य नाहीं. हाच नियम थोड्याबहुत अंशी सर्व भाषांना लागूं आहे. क्ष हें अक्षर क् श् अ या ध्बनीचें बनलेल आहे, म्हणजे या अक्षराचा उच्चार क्श असा केला पाहिजे असें सांगावें लागतें. एखाद्या भाषेची वर्णमाला शिकल्यानंतर

Page 186

भाषेचें दृश्य स्वरूप: लेखन १४९

न्याच वर्णानी बनलेली पण लेखनदृष्टया त्यांच्यारशी कोणतेंहि साम्य नस- लेलीं अक्षरें शिकण्याचा प्रसंग येणे किंवा अमुक ठिकाणी अमुक अक्षर असें उच्चारलें पाहिजे असें लक्षांत ठेवावें लागणें, हैं ती भाषा तिथ्यांतील अक्षरांनी लिहिल्याप्रमाणें उच्चारली जात नाहीं याची कबुली देणें आहे. लिपि आणि लेखन न बदलतांहि ज्याअर्थी अनेकदा उच्चार बदलतात, त्या अर्थी लेखन हैं ध्वनिपरिवर्तनाला कोणताच अडथळा करूं शकत नाहीं, हें स्पष्ट दिसून येतें. भाषेचें अस्तित्व लेखनावर अबलंबून नसतें. लेखनाचा उपयोग न करणाऱ्या भाषा कांही थोड्या नाहीत. लेखनाला महत्त्व येण्याचें कारण वाड्ायनिमिति हैं होय. वाकाय हें लेखकाच्या भार्षेत म्हणजे लेखक आपली भाषा जशी बोलतो तसें लिहिलें जात नसून शिष्टसंमत अशा कोणत्यातरी एका प्रमाणभूत पोटभार्षेत लिहिलें जात असतें, लोकव्यवहारांतील उच्चारापेक्षां अथवा भाषपेक्षां वेगळ्या व पुष्कळदा शिष्टांच्याहि भाषणांत नसलेल्या पण शिष्टसंमत अशा कृत्रिम शैलीचा लेखकाला उपयोग करावा लागतो. ध्वनिपरिवर्तनानें अनेक फरक घडवून आणले, तरीहि ते लक्षांत घेऊन आपलें लेखन ताबडतोब सुधारणारी भाषा विरळाच, इंप्रजी भाषेची ल्लेखनपद्धति ही या सनातनीपणाचा उत्कृष्ट नमुना आहे. याचा परिणाम असा झालेला आहे कीं, वाझयांत असलेलें लेखन कोणत्या ध्वनीचे आहे हें समजन घेण्यासाठी शब्दकोशाकडे धांव ध्यावी लागते. शब्दकोशाचें खरें काम शब्दांचे अर्थ देप्याचें आहे. कारण शब्दांचे उच्चार देणें हैंहि शब्दकोशारचेंच काम झाल्यास लेखनाचें काम काय, हा अपूर्व प्रश्ष आपणांसमोर उभा राहतो. अमुक एक चिन्ह कोणत्या ध्व्नीचें द्योतक आहे, हा प्रश फक्त चित्र- लेखनांतच येऊं शकतो. कारण 'गाय' ही कल्पना चित्रानें व्यक्त होत असली, ग्हणजे तिचा अर्थ आपणांला स्पष्ट कळत असला, तरीहि अमुक एका समाजाच्या व्यवहारांत म्हणजे बोलण्यांत कोणत्या ध्वनिसमु्चयानें ती व्यक्त होते, हैं त्यावरून कळणार नाहीं. म्हणून चित्रलेखन करणाऱ्या भाषेला शब्दांचे उन्चार द्यावे लागणें अवश्य आहे.

Page 187

१५० ध्वनिविचार

पण ध्वनिलेखन करणाऱ्या भाषेला मात्र कालांतरानें उच्चारांत घडून येणान्या परिवर्तनावर दृष्टि ठेवून वामलें पाहिजे. उन्चारांत झालेला फरक जी भाषा लेखनांत ताबडतोब व्यक्त करील तीच लेखनाव्या दृष्टीनें आदर्श भाषा होय, असें ग्हणणें योग्य ठरेल. अर्थात् भाषा ही अत्यंत हळूं आणि नकळत बदलणारी असल्यानें तिच्या सर्व सूक्ष्म अवस्था लिपीनें व्यक्त व्हाव्या किंवा होतील, अशी अपेक्षा करणें अयोग्य आहे. पण ध्वनीचें परिवर्तन श्रुतिगोचर झाल्या- नंतरहि त्यांचें पूर्वीचेंच लेखन चालूं ठेवणे अशास्त्रीय अर्थशून्य होय. लेखन उच्चारानुसारी असावें कीं नसावें या प्रभ्नावर अनेक बाद माजले आहेत. या प्रश्नाचें उत्तर दोन मिन्न दृष्टिकोणांनीं देता येण्या- सारखें आहे. ज्यांना वाडयनिर्मितीच करायची आहे, आपले विचार ब अनुभव प्रकट करायचे आहेत आणि या वाडयनिर्मितीला गंभीर स्वरूप दयायचें आहे, ते कृत्रिम, शिष्टमान्य आणि जराशी स्थिर स्वरूपाची अशी किंचित् जुनी भाषा वापरतील, पण जोंपर्येत ही भाषा विवेचनाला सोयीस्कर अशी ग्रांथिक भाषा आहे असें ते कबूल करत असतील तोपर्येत त्यांच्यावर आक्षेप घेणें योग्य ठरणार नाहीं. शिवाय ध्वनि- शास्त्राचें अज्ञान हैं इतकें पसरलेलें आहे कीं अगदी बोलस्याप्रमाणेच लिहूं असा निर्वाणीचा दंडक जर आपण पुढे ठेवला, तर लेखनांत गैरव्यवस्था माजेल, कारण आपण काणत्या ध्वनीचा उच्चार करत आहों, तो न्हस्व आहे की दीर्घ आहे, हैं पुष्कळ विचारानंतरहि समजणें कित्येकदा कठीण असतें. भार्षेतील सर्व ध्वनी व्यक्त करण्याला आपल्याकडे पुरीशी साधनें नसतात आणि उच्चाराच्या बाबतीत सर्व समाजात एकवाक्यता नसते; म्हणून हा दंडक बाह्यतः व तात्विक दृष्टीनें योग्य वाटला, तरी व्यवहारांत तो निरुपयोगी ठरेल, सर्व समाजानें वापरण्याचें साधन एकरूप असलें पाहिजे, मग त्यांत थोडी कृत्रिमता आणाबी लागली तरी हरकत नाहीं. सर्व वर्गोच्या व सर्बं प्रकारच्या लोकांना देण्यांत येणारे शिक्षण ज्या साधनानें देण्यांत येतें तें लेखनरूप साधन निश्चित स्वरूपाचें असणें समाजव्यवहाराच्या दृष्टीनें अत्यंत हिता-

Page 188

भाषेचें दृश्य स्वरूप: लेखन १५१

वह व अवश्य आहे. यासाठीं लिहिण्यांत येणाऱ्या भाषेचे नियम अधि- कृत संस्थांनी घडणें आणि मधूनमधून त्यांत योग्य ते फेरफार करणें अत्यंत श्रेयस्कर आहे. लेखनासंबंर्धींचा दुसरा दृष्टिकोण भाषाशास्त्रज्ञांचा होय. शास्त्रज्ञाचा भाषेचा अभ्यास बोललेल्या भाषेवरून होत असल्यामुळें बोलणें व लिहिणें यांत शक्य तितकी एकबाक्यता आणणें, हें त्याला अपरिहार्य आहे. शब्दाचा उन्चार लेखनानें नकी होत नसून त्याच्यांतील ध्वनींच्या इति- हासानें नक्की होतो, हं लक्षांत ठेवून ज्या काळच्या जुन्या भाषेचा लेखी पुरावा त्याला सांपडेल त्या काळीं ती भाषा खरोखर कशी उच्चारली जात होती, हें ध्वनिपरिवर्तनाचा अभ्यास करून त्यानें नक्ी केलें पाहिजे. अशोकाच्या शिलालेखात व्यंजनयुग्माचें लेखन एकाच अक्षरानें होत असे. 'पुत्त' हा शब्द 'पुत' असा लिहिला जाई; पण तो तसा उच्चारला जात नव्हता, हैं स्पष्ट आहे. हें उच्चार नकी करण्याचें काम भाषाशास्त्रज्ञानें केलें नाहीं आणि लेखन हेंच उच्चाराचें प्रामाणिक प्रति- बिंब आहे असें मानून तो चालला, तर त्याचें संशोधन समाधानकारक होणार नाहीं. तो निरीक्षक असेल तर आपल्या पद्धर्तीत कांहीं चुकतें आहे याची जाणीव त्याला पुढेमागें झाल्याखेरीज राहणार नाहीं आणि तसा नसेल तर आपणबरोबर इतरांचीहि दिशाभूल करील. प्रत्येक शिक्षणक्रमांत अमुक एका मर्यादेनंतर विद्यार्थ्याला ध्वनी कसे उत्पन्न होतात याचें, तसेंच त्याच्या स्वतःच्या भार्षेतील ध्वर्नीचें म्हणजे वर्ण- मालेचें योग्य ज्ञान करून देणें अवश्य आहे. म्हणून व्याकरणकर्त्यानी केवळ भाषेची अक्षरमाला म्हणजे भार्षेतील ध्वनी व्यक्त करण्यासाठी वापरण्यांत येणारी लिपिन देतां, ध्वनिविचाराची सामान्य माहिती द्यावी व आपल्या भार्षेत कोणते ध्वनी आहेत आणि ते लेखनांत कसे व्यक्त होतात, याचें योग्य दिग्दर्शन कराबें. साक्षरताप्रसार हेंच जेथें ध्येय आहे तेयें अक्षरांची कामचलाऊ ओळख चालेल, पण सुशिक्षित नागरिक म्हणून समजल्या जाणान्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या भाषेचें लेखन व त्या संबंधीचे प्रश्र यासारख्या जिन्हाळ्याच्या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीं.

Page 189

प्रकरण नववें लिपीचीं मूलतच्वें आणि मराठीचें लेखन कोणत्याहि भार्षेतील ध्बनी व्यक्त करण्याचें लिपि हैं दृश्य साधन होय. 'पाय' या ध्वनिसमुच्चयानें एखादा रूढ अर्थ व्यक्त करणें ही भाषा, ह्ा ध्वनिसमुच्चयांत किती वर्ण आहेत व ते कसे उच्चारले जातात हा ध्वनिविचार, ध्वनिविचाराच्या साह्यानें उपलब्ध झालेल्या वर्णाना देण्यांत येणारी दृश्य चिन्हें म्हणजे लिपि. ज्याप्रमाणें एखादा रूढ ध्वनिसमुच्चय आणि त्यानें सूचित होणारा अर्थ यांत कोणताहि कार्यकरण संबंध नसतो, त्याचप्रमाणे अक्षर (म्हणजे ध्वनीसाठी वापरण्यांत येणारें दृश्य चिन्ह) आणि तें ज्याच्यासाठी बाप- रलें जातें तो ध्वनि यांतहि काहीं संबंध नसतो, लेखनांत वापरली जाणारी ध्वनिसूचक चिन्हें हीं स्वेच्छेनें निवडलेलीं असून त्यांना प्राप्त झालेला अधिकार केवळ परंपरागत असतो. एवढेंच नव्हे तर आकाराच्या बांब- र्त्तीत एकमेकांशी सादृश्य असणारीं चिन्हें उच्चाराच्या दष्टीनें पुष्कळदा अगदी भिन्न असून रूढीवर अवलंबून असतात. उदा. इ, ड, झ; थ, य; घ, ध; क, फ; प, ष. लेखनांतील चिन्हांचें खरें कार्य ध्वनीतील भेद व वैशिष्टय दर्शवण्याचें आहे. ध्वनी हे एकमेकांपासून मिन्न, स्पष्ट व एका निश्चित प्रमाणानुसार उच्चारले असावे लागतात. उदाहरणार्थ, मध्यतालव्य कचा उच्चार सर्व ठिकाणी मध्यतालव्य कच झाला पाहिजे, तो पूर्वतालव्य किंवा अंततालव्य करून चालणार नाही, तसाच ख किंवा ग करूनहि चालणार नाहीं. न्याच्या उच्चाराला एका विशिष्ट प्रदेशांत एका विशिष्ट काळच्या समा- जात जें प्रमाण मान्य करण्यांत आलेलें आहे तें शक्य तितक्या कसोशीनें पाळलें गेलेंच पाहिजे. हा कडकपणा क या अक्षराच्या बाबर्तीत ठेवण्याचें कारण नसतें. तें कसेंहि लिहिलें तरी चालेल, पण इतर अक्षरांशी त्याचा .१५२

Page 190

लिपीचीं मूलतत्वें आणि मराठीचें लेखन १५३

घोटाळा होतां कामा नये. उदाहरणार्थ, कळ या शब्दांत तें फ असें चाचलें जातां नये. लेखनांतील या स्वातंत्र्यामुळेंच हस्ताक्षरच असंख्य नमुने आपणाला मिळतात. सामान्यतः दोन माणसाचें अक्षर सारखें असणें दुर्मिळच. हाच नियम उलट प्रकारे उच्चाराला लागूं पडतो, म्हणजे दोन एकभाषिक माणसांच्या उच्चारांत (आवाजांत नव्हे) जवळ- जवळ कांहींच फरक नसतो. सारांश परस्परमिन्नत्व हा अक्षरांचा आत्मा आहे. यापेक्षां इतर कोण त्याहि तत्त्वाची त्यांना आवश्यकता नाहीं. लेखनाचीं चिन्हें ही ज्याप्रमाणे ध्वनीशी केवळ रूढीनेंच बांधलेलीं असतात, त्याचप्रमाणे लेखनासाठी वापरण्यांत येणारी साधने व सामग्री हीं देखील त्यांच्याशी यदच्छयाच संबंधित असतात. एखादें अक्षर शिलेवर लोखंडी हत्यारानें खोदतां येते, ओल्या मातीत काठीनें काढतां येतें, ताम्रपटावर अणकुचीदार साधनानें व ताडपन्रावर तीक्ष्ण दाभणानें कोरतां येतें, किवा कागदावर लेखणीनें लिहितां येतें; पण यामुळें त्याच्या ध्वनिप्रदर्शक गुणांत कोणताच फरक होत नाहीं, इंग्रजी K या चिन्हानें दर्शवलेला ध्वनि अशोककालांत + असा दाखवला जाई. आज गुज- रातींत असा व मराठींत क असा लिहिला जातो. मूळ एका प्रकारें लिहिले जाणारे ध्वनी आज वळण बदलून वेगळ्या प्रकारें कां लिहिले जातात याचीं कारणें, म्हणजे लिपीच्या उत्कांतीचा इतिहास, हैं आज एक शास्त्र बनलें आहे; पण ध्वनिपरिवर्तनाच्या शास्त्रारशी त्याचा कांहीं संबंध नाहीं, लिपीच्या उत्क्रांतीचें ज्ञान असेल तर जुने लेख वाचता येतील, त्यांच्य तील अक्षरांच्या वळणावरून कित्येकदां त्यांचा कालखंड ठरवतां बेईल आणि एवढें झालें की अमुक काळच्या अमुक्र भाषेचा नमुना म्हणून भाषाभ्यासक त्यांच्याकडे पाहूं शकेल, लिपिशास्त्र येणें हैं भाषेष्या अभ्यासकाला जरूरीचें आहे, अपरिहार्य मात्र नाहीं, एखादा जुना लेख उपलब्ध झाला असतां लिपिशास्त्र जाणणाऱ्या भाषेच्या अम्यास- काला त्याचा ताबडतोब उपयोग करता येईल आणि लिपिशास्त्र येत नसेल तर त्याला तो आधी एखाद्या लिपिशास्त्रश्ञाकडून वाचून ध्यावा लागेल.

Page 191

१५४ ध्वनिविचार

पण लिपीचा पूर्वेतिहास भाषाशास्त्रज्ञाला माहीत नसला तरी आपल्या समकालीन भाषेचे ध्वनी, त्यांना वापरण्यांत येणारीं चिन्हें, या चिन्हां- तील गुणदोष, यांचा अभ्यास करून शक्य तितकी शास्त्रीय, ग्हणजे भार्षेतील ध्वनी व्यवस्थितपणे व्यक्त करणारी, लिपि वापरण्याचा लोकांना आग्रह करणें हें त्याचें काम आहे. आप्या भाषेच्या लखेनासाठी मराठी समाज देवनागरी लिपीचा उपयोग करतो. ही लिपि इसवी सनापूर्वी सहासात शतकें हिंदुस्तानांत सुरूं झाली, त्या काळीं उपलब्ध असलेल्या या लिपीला ब्राह्मी हें नांव असून अशोकाचे बहुतेक सर्व शिलालेख याच लिपीत आहेत. ही लिपि आरेमियन लिपीवरून बनवण्यांत आली. मूळ आरेमियन अक्षरें संस्कृत किंवा संस्कृतोद्भव भाषा लिंहिण्याला फार्शी सोयीस्कर नव्हती; परंतु भारतीय लिपिकारांनी त्यांध्यांत आवश्यक असे बदल करून आपली भाषा योग्य रीतीनें व्यक्त करण्याला समर्थ अशा एक नवी लिपि तयार केली. पण आरेमियन लिपीच्या तुटपुंज्या भांडवलांतून ब्राह्मीसारखी समर्थ लिपि तयार करण्याचें खरें श्रेय पाणिनीला किंवा पाणिनि ज्या परंपरेंत निर्माण झाला त्या परंपरेला दिलें पाहिजे. माहेश्वर सूलें प्रथम अस्तित्वांत आलीं त्था काळीं दृश्य चिन्हांनी वनी व्यक्त करण्याची कल्पना भारती- यांना सुचली नव्हती असें गृहीत धरलें, आणि सर्व अ्रंथ मुखोद्त कर- प्याच्या व गुरुमुखानें विद्या शिकण्याच्या परंपरेमुळें अशी कल्पना येण्याचा संभव कमी होता असें मानलें, तरीहि एकदा ही कल्पना हाती आत्यावर मुळांतच पृथकरण करून ठेवलेल्या ध्वनींसाठी चिन्हें निर्माण करणें किंवा आयात केलेल्या परदेशीय चिन्हांत योग्य तो फरक करून तीं संस्कृत व्वनीना लागूं करणें, एवढेंच काम लिपिकारांना करावें लागलें, लेखन- कलेच्या उत्कांतीत निर्हेतुक चित्रलेखनांतून विचारलेखन व पुद्ें क्रमशः ध्वनिलेखन कसें आलें हैं यापूर्वीच दाखबलें आहे; परंतु भाषेचे मूलभूत घटक शब्द नसून वर्ण आहेत हैं केवळ निरीक्षणाच्या जोरावर पृथ- करण करून शोधून काढत्याचे उदाहरण विश्वसंस्कृतीभ्या इतिहासात दुर्मिळच आहे.

Page 192

लिपीचीं मूलतत्वें आणि मराठीचें लेखन १५५

पण केवळ उच्चाराच्या दृष्टीनें संस्कृत भाषा लिहिण्याला समाधान- कारक ठरलेली ही लिपि याहून सोपी व शास्त्रीय केली पाहिजे, असे पुष्कळ लोकांना वाटतें, एवढेंच नव्हे तर शास्त्रीय प्रगतीचा उपयोग करून ही लिपि आपणांला हवी तशी बदलतां न आल्यास तिचा सर्वस्वी त्याग करून एखादी नवी लिपि स्वीकारावी, अस्ेहि कित्येकांना वाटूं लागलें आहे. शास्त्रीय प्रगतीमुळें लागलेले शोध कितीहि क्रांतिकारक असले तरी ते स्वीकारलेच पाहिजत ही खन्या शास्त्रज्ञाची भूमिका असल्या- मुळें या दोनहि सूचना त्याला स्वागताईच वाटणार यांत शंका नाहीं. मात्र शास्त्रीय लिपीबद्दल असणाऱ्या कल्पना कित्येकदा इतक्या चम- त्कारिक असतात की त्या लक्षांत घेऊन तयार केलेली विकृत लेखन- पद्धति स्वीकारण्यापेक्षां आहे हीच लिपि चालूं ठेवणे इष्ट ठरेल. यासाठी आधीं आपण आदर्श लिपि म्हणजे काय तें पाहूं. उच्चारलेले ध्वनी जसेच्या तसे लिहिणें हैं आदर्श लेखनाचें आद्य तत्त्व आहे. ध्वनींचा उच्चार आपण क्रमाक्रमानें करतों, म्हणज प्रथम पहिला वर्ण, पुढें त्यानंतरचा वर्ण, अशा क्रमानें आपण बोलतों. उदाहरणार्थ, तो चालतो या वाक्यांत आधीं तो या शब्दांतील त् व ओ हे वर्ण एका मानून एक असे येतात आणि चालतो या शब्दांतील वर्ण चू आ ल् त् ओ या क्रमानें येतात, तो व चालतो है दोन भिन्न कल्पना दर्शवणारे आणि वाक्यरचनेंत भिन्न कार्य करणारे शब्द आहेत, याचप्रमाणे त्या दोहोंचा उच्चार मध्यें किंचित् कालावधि ठेवून केला जातो, हें दाख- वण्यासाठीं त्यांच्या लेखनांतहि थोडें अंतर ठेवण्यांत येतें. प्राचीन लेख- नांत हें अंतर सांपडत नाहीं. सारांश, एकाच शब्दांतील वर्ण एकामागून एक असे ताबडतोब उच्चा- रले जातात, म्हणून या अनुक्रमानें ज्या लेखनांत हे वर्ण लिहिले जातात तें लेखन वस्तुस्थितीला घरून होय. तसेंच शब्द जितक्या वर्णाचा बनला असेल तितके सर्व वर्ण ज्या लिपींत अनुक्रमानें, बेगवेगळे व स्पछ्ट लिहिले जातील ती लिपि आदर्श

Page 193

२५६ ध्वनिविचार

होय. उदाहरणार्थ, चालतो या शब्दांतले पांच वर्ण लेखनांत एकामागून एक स्पष्टपणे दाखवतां आले नाहींत तर तें लेखन सदोष होय. ज्या लेखनांत एकाच चिन्हानें दोन अथवा अधिक ध्बनी व्यक्त होतात तें लेखन सदोष होय. उदाहरणार्थ, विचार-भाचा, रजा-पूजा, वाक्याचा-आवाक्यांत, प्रशांत-खिशांत. याच्या उलट एकच ध्वनि दोन किंवा अधिक चिन्हांनी व्यक्त कर- णारें लेखनहि दोषपूर्ण होय. संस्कृतच्या अनुकरणानें आपण श व ष हीं अक्षरें वापरतों, परंतु नेइमीच्या उच्चारांत त्याच्यांतील ध्वनिविषयक भेद नाहींसा होऊन तीं एकोच्चारदर्शक झाली आहेत. भूर्धन्य ष आतां मरा- ठीत राहिलेला नाहीं. एकच उच्चार दोन प्रकारें व्यक्त करण्याची आणखरी अनेक उदाहरणें देतां येतील, उच्च-वाच्य, मुद्दयाचा-मद्याचा, ऋत-रुत, रोष-आक्रोश, सतरा-पत्रा, श्याम-शाळा, अवजड-आदार्य इ. अर्थात् स्वाभाविक समजून येते. बोलण्यातले उच्चार लक्षांत घेतले ग्हणजेच ही विसंगति स्पष्टपणे

शिवाय उच्चार एक व लेखन दुसरें असा एक शब्दांचा प्रकार आहे तो वेगळाच. दुःख, विठ्ठल, बु्ढा, अवश्य बगैरे शब्द उच्चारांत दुक्ख, विट्ठल, बुड्ढा, अवश्श असे आहेत, ज व ञ्र यांच्या संयोगानें बनलेला ज्ञ आज उच्चारहष्टया मराठींत दून्य असा आहे, त्यामुळें परप्रांतीयांचे ज्य, अ हे उच्चार ऐकून आपल्याला गंमत वाटते. य हा उत्तरवर्ण असल्यामुळें संयुक्त व्यंजनाचे जे दोन उच्चार होतात (उद्यान-उद्यां) ते मिन्न लेखनानें व्यक्त करण्याची सोध फक्त र्+य या संघापुरतीच मर्या- दित आहे. सुप्याचा-सूर्याचा, दप्या-दर्या. ह + व्यंजन हीं रूपेंसुद्धां आतां मरार्टीत व्यंजन +ह अर्शी झाली आहेत. ब्राह्मण-ब्राम्हण, आह्वान-आव्हान, सह्य-सैय्ह. संस्कृताचें प्राकृतीकरण होण्यापूर्वी मह्य याचें मय्ह हैं रूप झालेलें आाहे. म्हणूनच पुढें मय्ह ग्हणजे मयुय्ह यांचें मजज्ह ग्हणजे मज्झ हैं

Page 194

लिपीचीं मूलतत्वें आणि मराठीचें लेखन १५७

रूप मिळतें, त्याचप्रमाणे मध्य याचें आधीं *मद्यह हें रूप गृहीत घरलें म्हणजे पुढे होणारें मज्झ हें प्राकृतीकरण स्पष्ट कळतें. प्राणव्यंजनाचा उच्चार संयुक्ताक्षराच्या शेवटीं आणण्याची ही संबय पाहिल्यानंतर विठ्ठलः सख्खा बगैरे शब्दांतील पहिलें सप्राण व्यंजन चुकीचें असून त्याचें उच्चारा -- नुसारी लेखन विट्ठल, सक्खा असें केलें पाहिजे, हें कबूल करावें लागेल. संस्कृताच्या अज्ञानामुळें कित्येकदा डोळ्यांना चुकीचें वाटणारें लेखना उच्चारदृष्टया बरोबर असतें. ब्रम्ह, अपन्हुति, महत्व, तत्वज्ञान इ .. बोलभाषा हीच लेखनाला मार्गदर्शक ठरली पाहिजे असें असूनहि कित्ये- कदा वाचनांत आळेल्या लेखी रूपांचा पगडा मनावर बसतो. आम्ही -- तुम्ही, जेव्हां-तेव्हां, पुन्हां इत्यादि शब्द बोलण्यांत आ-म्ही, जे-व्हां, पु-न्हां असे असूनहि पुष्कळ वाचक, रंगभूमीवरील नट व आकाशवाणीचे कलावंत आम्-म्ही, जेव्-व्हां पुन-न्हां असा उच्चार करतात. कविता- लखनांत तुम्ही मधला तु वृत्ताच्या सोयीप्रमाणें कधीं एकमात्रिक (तु-म्ही) तर कधीं द्विमात्रिक (तुम्-म्ही) असतो. घ, ध इत्यादी अर्धस्फोटकां- प्रमाणें म्ह, न्ह, व्ह, ल्ह, व्ह, या अर्धस्फोटकांना स्वतंत्र चिन्हें असतीं तर हा घोटाळा झाला नसता. मराठी शुद्धलेखना ्या नियमांची चर्चा करण्याचा या प्रकरणाचा हेतु नसून आपण ज्या लिपीचा मराठीच्या लेखनासाठी उपयोग करतों त्यांतील महत्वाचे दोष दाखवणे आणि मराठीचें लेखन सुबोध आणि सुलभ होण्या- साठी कोणत्या प्रकारची लिपि बापरली पाहिजे हैं दाखवणे हा आहे. आज जी लिपि आपण वापरत आहों ती (म्हणजे देवनागरी अथवा बाळबोध) लिपि ही जगांतली सर्वश्रेष्ठ लिपि होय, असा बहुतेक लोकांचा समज आहे. लेखनवाचनाच्या संवयीमुळें ही लिपि आपल्या इतकी अंग- वळणी पडली आहे कीं तिची दुर्बोधता व अशास्त्रीयता आपणांला दिसे- नाशी झाली आहे. समाजाच्ी संवय म्हणजेच रूढि होय, तर्कशुद्ध तत्त्वांवर आधारलेली रूढि मिळणे दुर्मिळच. अशा या रूढीतले दोष शास्त्राच्या मदतीशिवाय आपणांला कळणार नाहींत.

Page 195

१५८ ध्वनिविचार

प्रत्येक भाषेचा व्यवहार कांहीं मूलभूत वर्ण व ध्वनित्त्वें यांच्यावर चाललेला आहे. मराठीचें शास्त्रीय लेखन करणारी लिपि तयार करायची असेल तर प्रथम मराठींत किती वर्ण व मूलभूत तत्वें आहेत तें पहावें ल्लागेल, ही ध्वनिसंख्या पुढे दिल्याप्रमाणें आहे. स्वर : अ, आ, इ, उ, ए, ओ. स्फोटक : क, ट, त, प, ग, ड, द, ब, ङ, ण, न, म, ज, अर्धस्वर : य, व. द्रव : र, ल, ळ. घर्षक: स, श, ह, ह (विसर्ग). तत्वें : दीर्घ व अनुनासिक (स्वरांसार्ठी) घर्षक (स्फोटकाचे अर्थस्फो- टक करण्यासाठीं आणि निष्प्राण व्यंजनांची सप्राण व्यंजनें बनवण्यासाठीं). इतक्या ध्वनितत्वांनी मराठीचा सर्वं भाषिक व्यवहार होतो, पण मराठी लिपीत मात्र पुढे दिल्याप्रमाणें चिन्हें आहेत. अ आ इ ई उ ऊ ऋ ऋ ल लृ ए ऐ ओ औ - क ख ग घ क च छजझञटठ डढणत थदधनपफ बभ म य र ल व श ष स इ ळ क्ष ज्ञ. दुसऱया प्रकरणांत सांगितल्याप्रमाणें दीर्घ स्वर हे बेगळे मानण्याची आवश्यकता नाहीं. मराठीतील -हस्वदीर्घत्व स्थानपरत्वें होतें. संस्कृतांत मात्र दीर्घ स्वराचें स्थान निश्चित नसून बन्याच ठिकाणी -हस्वाबद्दल दीर्घ अथवा दीर्घाबद्दल -हस्व आल्यास अर्थभेदहि होतो. सूत-सुत, सलिल- सलील, सिता-सीता. उलट मराठींत दीर्घ अ, वहस्व आ, ए व ओ असनहि त्यांना स्वतंत्र चिन्हें नाहींत. ऋ, ऋ हे तत्सम शब्दांत येतात, ल हा स्वर फक्त क्लप्ति या शब्दां- तच येतो आणि दीर्घ लू तर खुद्द संस्कृतातच नाहीं, पण प्रत्येक स्वर दीर्घ असू शकतो या तत्वाला अनुसरून मराठीनें तो निर्माण केला आहे. शिकबतांना या अक्षरांना रु रू लु लू म्हणण्याची पद्धत पडली आहे.

Page 196

लिपीचीं मूलतत्त्वें आणि मराठीचें लेखन १५९ ऐ, औ हे अनुक्रमें अय्, अब् असे आहेत. त्यांचा अ व्हस्व असतो. चय, जय् इ. शब्दांतील अ दीर्घ आहे. - हें चिन्ह पुढें येणाऱ्या वर्णाच्या वर्गातील अनुनासिक असतें. अंग- अड्ग, दंत-दन्त, उंट-उण्ट, लिंबू-लिम्बू, इ. अनुस्वार म्हणूनहि त्थाचा उपयोग होतो. दांत, घरीं; एवढेंच नव्हे तर दीर्भ अ दाखवण्या- साठींहि तें बापरलें जातें. (नवीं) घरं, (ता्जी) फुलं, इ. साधारणपणे आज हैं चिन्ह पहिल्या प्रकारच्या शब्दांशिवाय इतरत्र निरर्थक बनलें आहे. पुढे श, स, ह आल्यास अनुस्वार व हे धर्षक यांत एक उच्चार सुलभ करणारा व येतो. संशय-संवशय, संसार-संवसार, सिंह-सिंवह, पुढे य आल्यास अनुस्वारानंतर य येतो. संयम-संयूयम. : हैं चिन्ह अ, आ या स्वरांनंतर हा; इ, ई, ऐ बानंतर ही; उ, ऊ औनंतर हु; एनंतर हे व ओनंतर हो उच्चारला जातो. बालः-बालाः, कवि :- श्रीः-शनः, इ. पुढे स्फोटक आल्यास त्या स्फोटकाचा पुनरुच्चार या चिन्हानें सुचबला जातोः अन्धःकार-अन्धकार, अधःपात-अधप्पात, दुःख-दुक्ख. स्फोटकांच्या क, ट, त, प आणि ग, ड, द, व या रूपांत अनुकमें कठोर ह (विसर्ग) व मृदु ह (श्वास) मिळवून होणारे ख, घ, इत्यादि भवनी अर्धस्फोटक आहेत.

च वर्गोतील ध्वनी तालव्य व दंत्य आहेत. तालव्य च,छ,ज, झहे अनुक्रमें द, दह, द्झ (तालव्य घर्षक), द्झह्द् असे असून दंत्य च, छ, ज, झ हे त्स, तरह, दूझ (दंत्य घर्षक), द्झहद असे आहेत. ष हें अक्षर लेखनांत वेगळें असलें तरी त्याचा उच्चार तालव्य म्हणजे श असाच आहे. शिवाय षला पोटफोख्या आणि शला शेंडीफोड्था हीं विशेषणें लावून या दोन अक्षरांत उच्चारभेद नसून परंपरागत लेखन- ेदच आहे, हें आपण मान्य केलें आहें. :

Page 197

१६० ध्वनिविचार

ह कठोर व मृदु असा दोन प्रकारचा आहे; पण असंयुक्त ह मृदुच असतो. क्ष वज्ञ हीं अक्षरें ज्या ध्वनीच्या संयोगानें बनलीं आहेत त्यांचा लेखनांत मागमुसहि नसल्यानें ती वर्णमालेत अंतर्भूत करण्यांत आलीं असे आहे. आहेत. यांपैकीं क्ष हें अक्षर मराठींत क् + श असें असून ज्ञ हैं द् + न्य

पण लेखनांत दर्शवलेले सर्व अ अथवा अनुस्वार उच्चारांत नाहींत. अवयवाच्या शेवटी असलेलें व्यंजन लेखनांत अ शेवर्टी ठेवून दाखबलें जातें. सरकार, घागर, घागरीचा असे लिहिले जाणारे शब्द उच्चारांत सर-कार, घागर, घाग-री-चा असे आहेत. =हस्व आणि दीर्घ स्वरांचें लेखनहि वस्तुस्थितीपेक्षां परंपरेला धरूनच अधिक असरतें. बर दर्शवलेल्या चिन्हांशिवाय आणखी अनेक चिन्हें मराठी लेख- नांत आहेत. डॉ. भांडारकरांच्या मार्गोपदेशिकेत १६० मुख्य संयुक्त व्यंजनांची यादी दिलेली आहे, कारण वर्णमालेतलीं अक्षरें लेखनांत जर्शीच्या तशी वापरलीं जात नाहींत. स्वर आणि व्यंजनें शिकून झाल्या- वर मुलांना बाराखडी शिकवावी लागते. ऋ, ऋ, ल, लू या स्वरां- शिवाय इतर स्वर व्यंजनानंतर येऊन त्यांचीं जी प्रत्येकीं बारा रूपें होतात त्याना बाराखडी हें नांव आहे. ती शिकूं लागतांच आपल्या लक्षांत येतें की स्वरांची चिन्हें व्यंजनांचे उत्तरवर्ण म्हणून वापरलीं जाऊं लागतांच त्यांचे रूप अजिबात बदलतें. उदाहरणार्थ, केवळ मूल- भूत अक्षरें शिकून क ह्ा अक्षरांत अ हा स्वर आहे किवा के या अक्ष- रांत ऐ हा सयुक्त स्वर आहे, हें समजणार नाहीं. वस्तुस्थिति अशी आहे की वर्णमालेंतील मूलभूत चिन्हांव्यतिरित्त इतर अनेक स्वतंत्र चिन्हें आपल्या लेखनांत आहेत. आपल्या लेखन- चिन्हांचें वर्गीकरण केल्यास तें पुढीलप्रमाणें होईल. १ केवल स्वरांचीं चिन्हें: अ, आ, ए, इ. २ संयुक्त स्वरांचीं चिन्हें: ऐ, औ.

Page 198

लिंपीची मूलतत््वें आणि मराठीचें लेखन १६१

३ व्यंजनांचीं चिन्हें (त्यांत अ आहे असें गृहीत घरून): क, ब, ड (पण वस्तुतः क् ब् ड् ), इ.

गौ. इ. ४ स्व्ररान्त किंवा संयुक्तस्वरान्त व्यंजनांचीं चिन्हेंः पा, री, बै,

५ स्वर अथवा संयुक्त स्वर शेवर्टी असणारी अनेक व्यंजनांचा संयोग दाखवणारी चिन्हें: प्रा, ड्रेरं, र्त्य, श्रौ, इ. एखाद्या व्यंजनाचें स्वरहीन रूप (किंवा लेखनदष्टया अचा अभाव) त्या व्यंजनाच्या पायार्शी एक विशिष्ट चिन्ह काढून दाखवण्यांत येतो (त्, क्), पण तेंच स्वरहीन व्यंजन दुसऱ्या एखाद्या व्यंजनाशी उच्चार- दृष्टया जोडलेलें असेल तर बेगळेंच रूप धारण करतें. ऊर्ध्वरेषांत अक्षरांचा (म्हणजे प, त, ण, इत्यादिकांच्या पुढील अक्षरांशी) संयोग ही रेषा दूर करून होतो: प्र, ण्व. पण हा नियम नेहमींच लागूं पडतो असें नाहीं. उदा. प्र, त्र. ज्या अक्षरांत ही रेषा मध्येच आहे त्यांना (म्हणजे क फ यांना) बेगळाच नियम लागूं पडतो आणि रेषाहीन अक्षरांचा नियमहि स्वतंत्र आहे. र हैं अक्षर संयुक्त न्यंजनांचा आंद्य किवा अंत्य वर्ण अस्यास वेगवेगळ्या प्रकारें लिहिलें जातें. न्य, र्य, ट्रू, प्र, श्र, इत्यादि अक्षरांकडे पाहिलें की ज्यांना आपण जोडाक्षरें म्हणतों ती पुष्कळदा मूळ रूपांशी अंशतःच साम्य असणारी स्वतंत्र ध्वनिचिन्हें आहेत हैं पटते. हें पाहिलें म्हणजे मराठीचें लेखन आदर्श नाहीं हैं लक्षांत येतें. कोणत्या गुणानी आपली लिपि आदर्श होईल किवा आपल्याला आदर्श लिपि तयार करतां येईल या प्रभ्नाचा आपण भावनावश न होतां विचार केला पाहिजे. पुढील गोष्टींकडे लक्ष दिलें तरच आदर्श लेखन करणारी लिपि मिळूं शकेल. प्रत्येक भाषेचा व्यवहार एका निश्चित वर्णसंख्येनें आणि ध्वनि- तच्बांनी होत असतो; म्हणून हे वर्ण आणि हीं तत्वें आधीं शोधून काढली पाहिजेत .. स्व.वि. ११

Page 199

१६२ ध्वनिविचार

त्यांतील प्रत्येक वर्णाला आणि तत््वाला स्वतंत्र चिन्ह दिलें पाहिजे. बोलणें म्हणजे वर्णाचा क्रमशः उच्चार करणें व लिहिणें म्हणजे ते वर्ण त्या क्मानें मांडणें असें असल्यामुळें ह वर्ण एकामागून एक वेग- वेगळे लिहितां येतील अशी सोय त्या लिपीत पाहिजे, हैं करायचें असेल तर जे उच्चार आपल्या भाषेंतून नाहीस झाले आहेत त्यांचीं चिन्हें टाकून दिलीं 'पाहिजेत आणि जे नवे उच्चार आपस्या भारषेत आले आहेत ते स्वतंत्र चिन्हांनी दाखवण्याची सोय झाली पाहिजे, जोडाक्षरांत मूलभूत वर्णाचें स्वरूप अंशतः किंवा पूर्णपणे नष्ट होत असल्यामुळें अशा प्रकारें बनलेस्या चिन्हांची अनिष्ट पद्धत टांकून दिली पाहिजे, लेखनाच्या दृष्टीनें क, का, कि, की इत्यादि बाराखड्यांचीं रूपेदेखील जोडाक्षरेंच होत, यांतील क या अक्षरांत अ हा स्वर आहे असें गहीत घरलें असूनहि या अकारायुक्त कलाच बाकीचीं स्वराचनहें जोडण्यांत आलेलीं आहेत; पण या चिन्हांचा स्वरांच्या पूर्ण चिन्हाशी फारसा संबंध नाहीं. आ हा स्वर एका ऊर्थ्व रेषेनें दाखवला असून तो कनंतर आला आहे, तर व्हस्व इचे मूळ स्वरूपाशी कोणतेहि साम्य नसणारें चिन्ह कभ्या आ्धी आलें आहे. को ब कौ ही रूपें आला एक किंवा दोन मात्रा देऊन होणान्या रूपांशी सुसगत आहेत असें मानलें तर ए व ऐ यांचा के व कै यांच्यार्शी कोणताच संबंध दाखवतां येणार

उघड आहे. नाही. म्हणून आपल्या बाराखड्यादेखील अशास्त्रीय आहेत, हैं

संस्कृत लेखनाचें अनुकरण करून मराठीनें त्या भाषेची स्वरान्तलेखन- पद्धति चालूं ठेबलेली आहे. ही पद्धति वर्णलेखन व अवयवलेखन याध्या दरम्यान आहे. वर्णलेखनात राम (उ. राम्) हा शब्द र् आ म् (r a m) असा लिहिला जाईल, म्हणजे ज्या तीन वर्णानी तो बन- लेला आहे ते वेगवेगळे एका पाठीमागून एक असे लिहिले जातील, तर राम हा शब्द एकावयवी असल्य मुळें अवयवलखनात तो एकाच चिन्हानें व्यक्त होईल, पण स्वरान्तलेखनांत मात्र आ या स्वरापर्येत एक अक्षर

Page 200

लिपीचीं मूलतत्त्वें आणि मराठीचें लेखन १६३

आणि पुढें प्रत्येक स्वरापर्येत एक अक्षर असा तो लिहिला जाईल, अनु -: नासिक व्यंजन मात्र स्वरानंतर येत असूनहि मागील स्वरावर टिंब देऊन तें व्यक्त होतें, पण स्वरान्तलेखनपद्धतीप्रमाणे बिंदु या लेखनापेक्षां बिन्दु हैं लेखन योग्य होय, याच तत्वानुसार संयुक्त स्वर शक्यतोंवर टाळून चौथा, भैया यापेक्षां चवथा, भय्या असे लेखन करणेंच अधिक सयुक्तिक ठरेल, स्वरान्तलेखनपद्धतीत व्यंजन शेवर्टी असणारे अवयव मात्र त्या व्यंजनाअखेर अ हा स्वर आहे असें गहीत धरून लिहिले जातात. पण (पण), गडकरी (गड्करी), आपण (आपण), आपणाला (आपू- णाला), इ. हा नियम तत्सम शब्दांना लागूं पडत नाह, वास्तविक मराठीत, विद्वान्, अर्थात्, कदाचित् हे शब्द विद्वान, अर्थात, कदाचित असे. लिहिले तरी चालतील, पण संस्कृत शब्दांचें लेखन मूळ लेखनाला धरून करण्याची प्रथा आहे आणि पुनः सारखा शब्द उच्चारांत पुनहा असा, असल्यामुळें आणि कालवाचक अव्य्ये अनुस्वारयुक्त करण्याची संवय असल्यामुळें पुन्हां असा लिहिला जातो, तो जवळजवळ अपवादरूपच म्हटला पाहिजे, लेखनांतील अनेक विसंगति व्यवहाराआड येऊं शकत नाहींत. कारण सामान्यतः लेखन शिकण्यापूर्वीच वाचक बोलभाषेशी परिचित असल्यामुळें या भाषेच्या ज्ञानाच्या साह्यानें तो आपलें वाचन करतो. इंग्रजी- तील put व but, laughter व slaughter, blood व flood हे शब्द पर- भाषिकांला गोंधळवतील व वाचन नुकतेंच शिकूं लागलेल्या विद्यार्थ्याला विचार करायला लावतील, वाचनाच्या प्रारंभी मूल अक्षरशः पुढे सरकतें, वाचनाची संबय होतांच शब्द वाचूं लागतें, अक्षरांकडे लक्ष न देता अक्षरसमूहाकडे देतें. थोडक्यांत म्हणजे ध्वनिवाचनाकडून विचारवाचना- कडे वळतें. 'मग राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येकडे परत बळले' हें वाक्य प्रारंभी प्रत्येक अक्षर बेगळें व पूर्ण उन्चारून वाचलें जाईल, म-ग रा-म, सी-ता आणि ल-क्ष.म-ण अ-यो-ध्ये-क-डे प-र-त व-ळ-ले." वाचनाची पूर्ण ताली झालेला विद्यार्थी हैच वाक्य 'मग् राम् सीता आणि लक्ष्मण। अयोध्येकडे परत् वळले' असे वाचेल, वाचनाच्या क

Page 201

१६४ ध्वनिविचार

लेखनाच्या बाबर्तीत पूर्ण प्रगति करण्याला लागणारा काळ शास्त्रीय लेखन- पद्धतीनें अगदी कमी करता येईल, परकीयांना आपल्या भाषेचें वाचन व लेखन अतिशय सुलम करतां येईल आणि नुद्रणव्यवसायांत काळ, श्रम आणि द्रव्य यांची मोठी काटकसर करता येईल, आपल्या भार्षेतील ध्वनीचा अभ्यास आणि प्रत्येक ध्वनीला सुटसुटीत असें स्वतंत्र चिन्ह यांतच सर्व लेखनसुधारणेचें मर्म आहे. हीं चिन्हें अर्शी असलीं पाहिजेत की प्रत्येक शब्द मध्यें फारसा अडथळा न येतां सरळ लिहितां आला पाहिजे. या दष्टीनें आदर्श लिपि बनवण्याला लागणारी बरीचशी सामग्री युरो- पांतील बहुसंख्य भाषांकडून वापरण्यांत येणाऱ्या लॅटिन लिपीजबळ आहे. तिचा प्रत्यक्ष उपयोग कितीहि अयोग्य रीतीनें होत असला तरी ती वर्ण- लेखनाच्या पद्धतीवर आघारलेली असल्यामुळें आदर्श लेखनाचें प्रत्येक वर्ण वेगवेगळा लिहिण्याचें तत्व तिच्यांत आहे. त्यामुळें आपल्या भाषें- तील ध्वनी व्यक्त करण्याचें काम तिच्यांतील चिन्हांकडून एका निश्चित तत्वावर करून घेतलें, तिच्यांतील चिन्हांत आपल्याला योग्य वाटेल ती सुधारणा केली, तर एक नवी समाधानकारक लिपि तयार करणें अशक्य नाहीं. 2

देवनागरी मुद्रण करण्याला असमर्थ असलेले पाश्चात्य प्रकाशक एका निश्चित व्वनिचिन्हांनीं संस्कृत, पाली, प्राकृत, आर्य, द्राविड भाषांतील अंथ छापूं शकतात आणि संस्कृतबर असामान्य प्रभुत्व असलेले अनेक विद्वान् याच लिपीचा आधार घेतात, त्यांना देवनागरी लिहितांवाचतां येत नाहीं असा याचा मुळींच अर्थ नसून संस्कृतचें लॅटिन अक्षरांतर्ले मुद्रण व लेखन अत्यंत स्पष्ट होऊं शकतें आणि मुद्रणसुलभताहि त्यामुळें बाढते असा अनुभव आल्यामुळें तें तसें करण्यांत येतें हाच याचा अर्थ आहे. लेखनसुधारणेच्या चळबळीला इंग्लंडमध्येंडि फार जोराचा विरोध आहे. इंग्रजीचें लेखन आणि इंग्रजी भाषेचे उच्चार यांत एवढें अंतर आहे की शब्दकोशाच्या मदतीशिवाय लिपीनें कोणता ध्वनि व्यक्त केला आाहे हें समजणें फारच कठीण झालेलें आहे. पण पुराणप्रिय इंप्जाना हैं

Page 202

लिपीचीं मूलतत्त्वें आणि मराठीचें लेखन १६५

लेखन टाकण्याची मुळींच इच्छा नाहीं, एबढेंच नव्हे तर लेखनसुधारणेची चळबळ करण्यासाठी जवळजवळ आपली सर्व संपत्ति देणारा बर्नार्ड शॉ हा त्या देशांत विक्षिस समजला जातो. लेखनसुधारणा केल्यास भाषा समजेनाशी होईल अशी भीति बन्याच लोकांना वाटते, जुन्या पद्धतीप्रमाणे ज्यांचं शिक्षण झालें आहे त्यांना three ऐवर्जी Ori अथवा ऋषि ऐवर्जी रुशी हैं लेखन केल्यास लोकांची दिशाभूल होईल असें वाटतें. वस्तुत: ज्याला बाराखड्यांपलीकडे लेखन वाचनाचें मुळींच ज्ञान नाहीं अशा माणसाला ऋषि किंवा विष हा शब्द लिहायला सांगितला तर तो निश्चित रुशी व वीश अरसेंच लेखन करील. जो शब्द बोलभाषेत रुशी किंवा वीशू असा उच्चारला जातो तो तसा लिहिला गेल्यानें दिशाभूल होईल या तर्कसरणीला रूढीनें उत्पन्न होणाऱया पूर्वग्रहाशिवाय दुसरें कोणतेंच समर्थन देतां येणार नाहीं. सरकणें हा शब्द सरक्णें असा वाचायचा की सर्कणें असा वाचायचा या संशयांत वाचकाला ठेवण्यापेक्षां यांतल्या ज्या पद्धतीनें तो भार्षेत खरोखर बाबरत असेल ती पद्धत स्वीकारणें योग्य नव्हे काय ? समाजांतील सर्वोच्च पंडितवर्गापासून अगर्दी खालच्या निरक्षर लोकां- पर्येत जे ध्वनी व्यवहार शक्य करतात ते जसेच्या तसे लिहित्यानें कोण- तीही अडचण निर्माण होणार नाहीं. ज्यांचें लद्दानपण जुनी लेखनपद्धति आत्मसात् करण्यांत गेलें आणि ज्यांचें बरेंचसें आयुष्य या लिपीतून लेखन- वाचन करण्यांत खर्च झालें त्यांना शास्त्रीय परंतु अपरिचित अशी नवी लेखनपद्धति अवघड वाटणें स्वाभाविक आहे. एक संबय टाकून दुसरी लावून घेणें ही अतिशय कठीण गोष्ट आहे. पण शास्त्रीय लिपीभ्या तत्वाचा स्वीकार करून तें नव्या पिढीच्या बाबतींत अंमलांत आणणें अतिशय जरूरीचें आहे. पूर्वी ऐकण्यांत व वाचनांत न आलेला शब्द लेखनांत कसा व्यक्त होतो ही अडचण जुन्या लेखनपद्धतीचा आधार घेणाऱ्या माणसाला असते. माशांचा आणि माश्यांचा, हुषार आणि हुशार, च्यार आणि चार,

Page 203

१६६ ध्वनिविचार

यासारखीं आणि इतर अनेक उदाहरणें एकच उच्चाराचें कसें लेखन करावें यासबंधीं शंका उत्पन्न करणारी म्हणुन देतां येतील, उच्चारानुसारी लेखन करणाऱ्या माणसाला ही अडचण भासणार नाहीं. परंपरेच्या अभ- मानाशिवाय जुन्था दोषपूर्ण लेखनपद्धतीचा बचाव करण्याला दुसरें विशेष सबळ कारण दिसत नाहीं. लॅटिन लिपीच्या अंगीहि दोन अथवा अधिक ध्वनी व्यक्त करण्यासार्ठी एकच चिन्ह वापरणें आणि अनेक चिन्हांनी एकच ्वनि व्यक्त करणें हे दोष आलेले आहेत, पण ते लिपि वापरणाऱ्या समाजांच्या अज्ञानामुळें अथवा पुराणप्रियतेमुळें आलेले आहेत. लॅटिन भाषा लिहिण्यासाठी अथवा इटालियन लेखनासाठी वापरण्यांत आलेली हीच लिपि कितीतरी नियमित आहे. वर्णलेखन हेंच तिचे मूलभूत तत्त्व असल्यामुळें आणि सर्वं समाजाच्या भाषा निश्चित वर्णमालांवर आधारलेत्या असल्यामुळें थोड्याबहुत फरकानें ही लिपि सर्वत्र बापरतां येणें शक्य आहे. प्रत्येक समाज आपले ध्वनी व्यक्त करण्यासाठी तिचा कसा उपयोग करतो, ही रूढिच काय ती मग 3 आपणाला समजून ध्यावी लागेल, इंग्रजी, फ्रेंच, बगैरे शब्दकोशांत उप- योगांत आणलेल्या ध्वनिलेखन चिन्हांवरून शास्त्रीय लिपि तयार करणें हैं काम कठीण नाहीं हैं दिसून येतें, फक्त ही नवी लिपि केवळ मुंद्रणसुलभ नसून लेखनतुलभ व वाचनसुलभहि असली पाहिज, सुदैवानें मराठीची वर्णमाला फारशी क्िष्ट नाहीं, तिचे स्वर अतिशय सोपे आहेत आणि व्यंजनांत अर्धस्फोटक च, छ, ज, झ (दंत्य व तालन्य) बगळल्यास इतर वर्णहि स्पष्टपणे मिन्न आहेत, संस्कृतसाठी वापरली जाणारी लॅटिन लिपि थोड्याफार फरकानें मराठीसाठींहि वापरता येईल. उदाहरणार्थ अ आ इ उ ए ओं चिन्हें: वहस्व, - दीर्घ, अनुस्वार, oaiueo *विवृतस्वर, 'संवृतस्वर,"स्वरभेद क ट त प ग ड़द व च ज चं ज़ स श प्राण p kttpg ddbcjcjss h

Page 204

लिपीचीं मूलतत्त्वें आणि मराठीचें लेखन १६७

(दोन्ही ह) र ल ळ य व ङ् ण न म ञ rllywhnnmñ स्वरांचे विकार दाखवणाऱ्या खुणा अक्षरावर करायच्या आहेत. उदा. v5y,pai,haygay,saman,savssy, hol (वय,प, ह्यगय, सामान, संशय, हाल). यांतलीं कांहीं चिन्हें क्कचित् प्रसंगीच उपयोगीं पढतील. उदाहरणार्थ, व्हस्व चिन्हाचा उपयोग विशेष कारणाशिवायं करण्याची जरूर नाहीं. सामान्यतः =हस्व किंवा दीर्घ चिन्ह नसलेला स्वर =हस्व (mulga मुलगा) व दीर्घ चिन्ह असलेलाच दीर्घ (mul, kala मूल, काळा) होय, शास्त्रीय ग्रंथांत, छंदोरचनेबरील पुस्तकांत या दोन्ही चिन्हांची जरूर लागेल. विवृत स्वराचें चिन्ह इंग्रजी अथवा परभा्षेतील शब्दांसाठींच लागेल, सामान्यतः चिन्ह नसलेला स्वर संतृत होय. स्वर- मेदाचें चिन्ह एकामागून एक स्वर आल्यास त्यांचा उच्चार वेगवेगळा करायचा आहे असें दर्शवतें. हें चिन्ह वापरण्याचा प्रसंगहि मराठीत फारसा उद्भवत नाहीं.१ व्यंजनांतलीं C, j, S हीं चिन्हें दंत्य उच्चारांसाठी असून C, j, s हीं तालव्य उच्चारांसाठी आहेत. श्वास (मृदुह) व विसर्ग (कठोर ह) यांना स्वतंत्र चिन्हें दिलेलीं नाहींत; कारण कठोर ह हा ख, ठ, थ, फ, छ(kh,th,th,ph,ch,ch) यांचाच उत्तरवर्ण ग्हणून येत असल्या- मुळें आणि इतर सर्वत्र असलेला ह मृद्ु असल्यामुळें हा भेद दर्शव- ण्याचें कारण नाहीं, मागे असलेला कठोरवर्ण पुढील हचें स्वरूप निश्चित करण्यास पुरेसा आहे. लेखनांत किंवा मुद्रणांत बरील चिन्हांनी मराठीचा सर्व ध्वनिसंसार न्यवस्थित रीतीनें होऊं शकेल, साक्षरता प्रसाराच्या चळवर्ळीत अशा प्रकारची लिपि स्वीकारल्यानें शिक्षक व अक्षरजिज्ञासु या दोषांचीहि सोय होऊन श्रम व काळ यांची बचत होईल. लिपिशुद्धीकडे लक्ष वेधलें गेल्यापासून आपल्याकडे अनेक सूचना कर- व्यांत आल्या असून त्यांतील कांहीं अमलांतहि आणत्या गेल्या आहेत.

Page 205

१६८ ध्वनिविचार (उ, अे, अै. इ.) शुद्धाद्वुद्धतेच्या आपल्या कल्पना शास्त्रीय विषयांत आणणे इष्ट नव्हे. देवनागरी लिपीन्ी सुधारणा सुचवणान्या लोकांर्नी रोगापेक्षांहि जालीम उपाययोजना केली आहे. यापेक्षा मूळ परिचित लिपि बरी असेंच वाटूं लागतें. लिपि सुधारण्यापूर्वी आदर्श लिपीच्या मूलभूत तत्वांची जाणीव ध्वनिविचाराच्या अभ्यासानें करून घेणें हितावह कसें आहे, हें वाचकांच्या नजरेला आणण्याचा या प्रकरणाचा मुख्य हेतु आहे ..

Page 206

प्रकरण दहावें

परिणामकारी ध्वनिविचार वैदिक भारषेतले शब्द अमुक एक स्वर उच्चारतांना आवाज वर चढ- वून बोलले जात. आवाज बर नेण्याच्या या क्रियेला आघात असें ग्हण- तात. उभय, स्वादिष्ठ, मघवन्, भगवन्त, चतुर्दश, चतुर, यांतले ठळक अक्षरांनीं दाखवलेले स्वर किंवा अवयव आघातयुक्त आहेत. वैदिक भार्षेत या आघाताचें महत्व इतकें होतें कीं समान वर्णोनी बनलेत्या एकोच्चार- युक्त शब्दांचे अर्थ आघातावरून नक्ी केले जात. अपस या शब्दांतल्या पहिल्या अवयवावर आघात असल्यास तो शब्द नपुंसकलिंगी नाम हात असे व दुसऱ्या अवयवावर आघात दिल्यास विशेषण ब्रनत असे. दोन शब्दांचा समास केल्यावर आघात कोणत्या शब्दावर द्यावा हेंहि ठरलेलें असे आणि आघाताचें स्थान बदलून समासाचा वर्ग आणि शब्दाचा अर्थ बदलला जात असे. बहुव्रीहि समासांत सामान्यपणें पहिल्या शब्दाचा आघात हा सामासिक शब्दाचा आघात होई: राजपुत्र, राजे ज्याचे पुत्र आहेत तो, पण राजपुत्र, राजाचा पुत्र; इन्द्रशत्रु, इंद्र ज्याचा शत्रु (म्हणजे नाश करणारा) आहे तो, पण इन्द्रशत्रु, इंद्राचा शत्रु. थोडक्यांत म्हणजे एकाच शब्दांतील सर्व अवयव सारख्याच आवा- जांत उच्चारले जात नसत. हैं विधान सर्ब भाषांना लागूं पडतें. षण वैदिक भार्षेत या आघाताचें स्थान प्रत्येक शब्दापुरतें ठरलेलेंआहे .. हीच गोष्ट इंग्रजी भाषेचीहि ाहे : Univer'sity, Gov'ernment, Pur'chase, Believe, Le'gion. इत्यादि शब्दांतील आघातांचे स्थान किती भिन्न आहे तें पहा. या भार्षेतहि एकोच्चारयुक्त शब्दांचें स्वरूप आघाताच्या जागेवरून नकी होते. शब्द नामवाचक आहे कीं कियावाचक १६९

Page 207

१७० ध्वनिविचार

याचा बोध पुष्कळदां आघातावरूनच होतो. उदाहरणार्थ Fore'cast- Forecast',Per'mit-Permit, Pro'duce-Produce' बगरे जोड्यां- तील पहिला शब्द नामवाचक आणि दुसरा क्रियावाचक आहे, पण लॅटिन, फ्रेंच, इटालिअन, जर्मन इत्यादि भाषा अशा आहेत कीं त्यांच्या शब्दांतील आघाताच्या स्थानाबद्दल एक सामान्य नियम देतां येतो. लॅटीनमध्यें शब्दांतील उपात्य स्वर किंवा तो =हस्व असल्यास त्या पूर्वीचा स्वर आघातयुक्त असतो, तर फ्रेंच भार्षेत हा आघाद नेहमीं शब्दांतल्या शेवटच्या स्वरावर असतो, मराठीलाहि हाच नियम लागूं पडतो. ..:. पण या स्थान निश्चित असले्या आघाताचाच उपयोग करून भाषा चोलण्यांत आली असती तर ती अगर्दी निर्जीव, नीरस आणि एकरंगी चाटली असती, कारण आपण नुसते तुटक तुटक शब्द बोलत नाहीं, पण शब्दांच्या साह्यानें बनलेली वाक्यें बोलतों. शब्द हा एक विशिष्ट कल्पनेचा घटक आणि माप होय, अशा कल्पनांना एकत्र आणून दुसन्यांना आक- लन होतील अशा स्वरूपात आणि योग्य क्रमानें मांडलेले शब्द किंवा वाक्य हा विचाराचा घटक होय, घोडा आणि धांवणें या वेगवेगळ्या कल्पना आहेत. नुसतें घोडा किंवा धांवणे असें महटल्यानें या ध्वनिसमु- च्चयार्शी परंपरेनें निगडित असलेली कल्पना जागत होईल, पण अर्थबोध होणार नाहीं. घोडा धांवतो किंवा घोडा धांवला या बरील दोन शब्दांध्या योग्य क्रमानें मांडलेल्या आणि योग्य रूपांनी व्यक्त केलेल्या विचाराच्या अंगीच अर्थबोध करण्याचें सामर्थ्य आहे. ही अर्थनिष्पत्ति एका शब्दार्नेंहि होऊं शकेल, ये ! आग! आलों ! इत्यादि शब्दांत है सामर्थ्य आहे.

पण मूळ शब्दांतली कल्पना किवा शब्दकमानें व्यक्त होणारा विचार अगदी जसाच्या तसा व्यक्त न करता त्यात काहीं विशिष्ट भाव किवा ेतुद्योतक छटा मिसळण्याचा प्रयत्न वक्त्याकडून होत असतो. शब्दांच्या साहानें वाक्य बनवलें जाताच उन्चारदष्टया शब्दाचे स्वतंत्र अस्तित्व संपून ने वाक्याकडे जाते आणि सबंध वाक्यातला एकच शब्द आघातयुक्त बनतो.

Page 208

परिणामकारी ध्वनिविचार १७१

ययाचा अर्थ असा की, ध्वनिदष्टया वाक्य हा एक नवा घटक।तयार होऊन त्यात एका विशिष्ट ठिकाणी आघात येतो. तो गांवाला गेला हैं वाक्य केवळ विधानार्थक असेल तर तें एका सुरांत उच्चारलें जाऊन त्यांतल्या शेवटल्या अवयवावर दाब येईल. तो मधील ओ आणि गांवाला मधील शेवटचा आ इतर स्वरांच्या मानानें किंचित् दौर्घ उच्चारले जातील, हें दीर्घत्व वेगवेगळे शब्द दाखवणारें अंसून शेवटस्या अवयवावरचा दाब हा हैं वाक्य पूर्ण झालें असें दर्श- चतो. लेखनांत हीच गोष्ट आपण पूर्णविराम हैं चिन्ह वापरून केली असती, तो गांवाला गेला या ऐवजी आपण तो गांवाला गेला असता असें म्हटलें तर तावर दाब येईल, परंतु त्यांतल्या आचा उच्चार या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारें पुढचें वाक्य सुरू होईपर्येत म्हणजे या पुढच्या वाक्याच्या उच्चाराला प्रारंभ होईपर्येत सुरूं राहील : तो गांवाला गेला असता तर ... इ. आतां रजा मिळाली असती तर तो गांवाला गेला असता या वाक्यांतल्या तावरहि दाब आहे. पण पात्या वाक्यत तो अपेक्षायुक्त म्हणजे पुढील अवयवाच्या उच्चाराची वाट पहाणारा आहे, तर दुसन्या वाक्यांत तो अपेक्षाशून्य आहे, कारण या ठिकाणी अर्थ पूर्ण झाला आहे. आतां तो गांवाला गेला हैं नुसतें विधानार्थक वाक्य आपण जर, तो, गां किवा गे या अवयवांबर जोर देऊन मटलें, तर तें आश्चर्यमिथित प्रश्नवाचक अथवा उद्गारवाचक बनतें, एवढेंच नव्हे तर ज्या अवयवावर आपण भार देऊं त्या अवयवानें सुरूं होणारा शब्द अशा प्रश्नांतला अगर उद्गारांतला प्रधान शब्द बनतो. उदाहरणार्थ, आपण म्हणूं : 'तो गांवाला रेला ! मला वाटलं त्याचा भाऊ गेला म्हणून ... तो गांवाला गेला ! मला वाटलं तो इथेंच आहे म्हणून. 'वो गांवाला रोला ! मला वाटलं तो अजून आहे म्हणून.'i, अशा रीतीनें एकाच बाक्यांतला अभिप्राय म्हणजे वक्त्याच्या मनांतून व्यक्त करण्याचा विशेष अर्थ वेगवेगळ्या शब्दाथ्या अवयवांवर दाब देऊन बदलतां येंतो. यांत पुदील गोष्टी आपण लक्षांत ठेव्या पाहिनेत.

Page 209

RSR ध्वनिविचार"

हा दाब अवयवाबर असतो. तो शब्दाच्या पहिल्या अवयवावर असतो. 1. तो ज्या शब्दाच्या पहिल्या अवयत्रावर असतो, त्या शब्दानें सूचित होणान्या कल्पनेला बोलणारा विशेष महत्त्व देऊं इच्छितो. सामान्य शब्दांत हा दाब शेवटच्या अवयवावर असतो आणि विधाना- र्थक वाक्यांत शेवटच्या शब्दांतल्या शेवटल्या अवयवावर असतो. पण वरील प्रकारच्या वाक्यांत असें दिसून येईल की वाक्यांतील अवयवाबर दाब देण्याची किया शारीरिक असली तरी ती विशिष्ट हेतु मनांत ठेवून केलेली असते. शब्दांवरील परंपरागत आघात हा विशेष अर्थ सुचवणारा नसतो; तो भाषेच्या ऐतिहासिक उत्क्ांतीतून आलेला असून केवळ अनु- करणात्मक असतो, पण ज्या अवयवावर मुळांत आघात नाही त्याच्यावर तो देऊन, अगर हा शब्द एकावयबी असत्यामुळे स्वाभाबिकच आघात- युक्त असल्यास तो आघात तीव्र करून ज्या बेळी आपण त्यांतून एक विशेष अर्थ व्यक्त करण्याचा प्रयत्न करतों, त्या बेळीं हा नवा आघात हेतुमूलक बनून ती एक मानसिक किया होते. केवळ आघाताचें स्थान बदलल्यानें अर्थात किती फरक होतो हैं फ्रेंच व्वनिशास्त्रज्ञ ग्रामाँ यांनी एका लेखांत सुंदर रीतीनें दाखबलें आहे. Et vous le vendez हें एकच वाक्य कॉफीच्या दुकानदाराशी बोलतांना शेवटच्या अवयवावर आघात देऊन ग्हटलें तर 'आणि तुम्हीं ती कशी विकतां?' असा साधा प्रश् होतो, तर उपात्य अवयवावर आघात दिल्यास त्याचा आश्चर्यवाचक उद्गार होऊन 'आणि तुग्हीं ती बिकू शकता!' असा अर्थ निर्माण होतो. आघाताप्रमाणें इतर कित्येक मार्गानी शब्दाला अधिक परिणामकारक करण्याचा, त्याची अर्थवाहकता अधिक भडक करण्याचा प्रयत्न कांहीं- LAP बणांकडून होत असतो. हे लोक कलाबंतांप्रमाणें भाषेचा उपयोग स्वतःभ्या उत्कट भावना व्यक्त करण्याचें साधन ग्हणून करतात. कांहीं मर्यादित शब्दांच्या बाबर्तीत हा प्रयत्न प्रत्येक समाजाकडून रेतो, शब्दांनी व्यक्त करण्याच्या कल्पनेला साहाभूत असे ध्बनी वापर-

Page 210

परिणामकारी ध्वनिविचार १७३

्याची प्रथा बहुतेक सर्व भाषांत सांपडते. अशा रीतीनें ध्वनींच्या साहाने निर्माण केलेल्या शब्दांना ध्वन्यनुकारी शब्द असें म्हणतात, पश्ुपक्ष्यांची नांवें आणि वस्तुवाचक शब्द हे अश्ा शब्दांच्या यादींत अग्रभार्गी दिसून येतात, खुळखुळा, पडघम, तुणतुणें, कोकीळ, कावळा, धबवत्रा, कल- कलाट इत्यादि नांवें ध्वन्यनुकारी आहेत. म्हणजे त्यांत ध्वर्नीच्या मदतीनें वर्ण्य विषयाचें चित्र रेखाटण्याचा अथवा त्यांतलें वैशिष्टय योड्याबहुत तरी प्रमाणांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करण्यांत आलेला. आहे. हे ्वनी बरेच वेळां परंपरागतहि असतात. इंग्रजीतला व फ्रेंच- मधला Cuckoo-coucou (कुकू) हा शब्द, मराठींतला को्कीळ किंवा कावळा हा शब्द, हे या भाषांत कित्येक शतकांपासुन आहेत. ते ज्या प्राण्यांची अथवा वस्तूंची कल्पना व्यक्त करतात त्या प्राण्यांचा अथवा वस्तूंचा नाद या शब्दांत आलेला असतो. किंबहुना ध्वन्यनुकारी शब्दांब्या चर्गातले बरेचसे शब्द विशिष्ट ध्वनींर्शी संबंधित असलेल्या प्राणिवाचक अथवा वस्तुवाचक कल्पना व्यक्त करणारे असतात. टेबल, दिवा, पुस्तक इत्यादि शब्दांत ध्वन्यर्थसंबंधाला बाव नाहीं. हैं व्वन्यनुकारित्व क्रिया- वाचक शब्दांतहि आणतां येतें, ज्या ठिकार्णी एखादी करिया एका विशिष्ट ध्वनीशीं निगडित झालेली आहे त्या ठिकाणीं ती करिया ध्वनीनी सूचित करणें शक्य होतें : 'वीज कडाडली, सोसाट्याचा वारा सुटला, ढगांचा गडगडाट झाला आणि घोधो पाऊस पडण्यास प्रारंभ झाला.' अशा शब्दांचा उपयोग करून लेखक शब्दचित्रें निर्माण करूं शकतात. उदा- हरणार्थ, नझीर अक्बराबादीच्या होळीवरील कवितेतत्या या ओळी पहा : कुछ तबले खटके ताल बजे कुछ ढोलक और मृदंग बजी कुछ झड् बीं बीं रूवाबोंकी कुछ सारंगी और चंग बजी कुछ तार तंबूरों के झंके कुछ ढिमढिमी और मुंह चंग बजी कुछ घुंगरू खटक झम झम झम कुछ गत गत पर आहंग बजी ... पण सर्वच ठिकाणी हे ध्वन्यनुकारी शब्द ध्वनीचें अनुकरण करत नाहींत, कांही ठिकाणी शब्दांचे कांही ध्वन्यर्थसंबंधाला बाब नसताहि ध्वनीनी अनुकरण करण्याचा प्रयत्न होतो. चडघडीत अन्याय, टवटवीत झांड,

Page 211

१७४ ध्वनिविचार

बगैरे शब्दांतहि आपणाला अर्थपोषक ध्वनी दिसतात. चुरचुरीत टीका, कडकड़ीत उपास, इत्यादि शब्दांत इतरत्र वाभ्यार्थानें असणारे शब्द विशिष् अर्थानें वापरले आहेत, मात्र ध्वन्यनुकरणाच्या मर्यादा आपण पूर्णपरणे लक्षांत ठेवल्या पाहि- जेत. वास्तविक एखादा शब्द ध्वन्यनुकारी आहे असें म्हटल्वानंतर न्यातले ध्वनी बदलता नयेत, कोकिल हा ध्वनिसमुच्चय जर एका विशिष्ट पक्ष्यांं्या आवाजाचें अनुकरण करत असेल तर तो ध्वनिपरिवर्तनाच्या नियमानी उत्क्रांत होतां नये. पण आज या शब्दाचें कोयल हैं परिवर्तन झालेलें आहे. उलट आज ध्वन्यनुकारी बनलेला काव (ळठा) हा शब्द त्याच्या काक या ध्वनीनी बनलेल्या पूर्वावस्थेत तितकासा प्रभावी वाटत नाहीं. ध्वनीनीं होणारें अनुकरण अशतःच असतें, कर्धींहि पूर्ण नसतें. याच कारणामुळें वेगवेगळ्या समाजांनी केलेलें एकाच ध्वनीचें अनुकरण अगर्दी वेगवेगळें असतें आणि त्या त्या समाजापुरतेंच रूढ आणि त्या त्या समाजांतील व्यक्कीनाच आकलन होणारें असतें. इंग्रजीत कावळ्याला crow (क्रो.) म्हणतात; फ्रेंचमध्यें corbeau (कॉर्बो), गुजरातीत कागडो, हिंदीत कौवा, संस्कृतमध्यें काक, या नांवांनी तो ओळखला जातो. मराठींत आपण ज्याला कावकाव म्हणतों त्याला इंग्रर्जीत क्रॉ, क्रोउक़ हे शब्द आहेत. (उलट क्रो या शब्दाचा दुसरा अर्थ 'आरवणें म्हणजे 5 कोबड्याचें ओरडणें' असा आहे). फ्रेंचमध्यें croasseement (करो आस् मां), गुजरातींत व हिंदीत अनुक्रमें काका व काँकाँ असा आहे. अशा प्रकारें दिसून येणारें हे वेगवेगळे शब्द किंवा एकाच इंग्रजीनें केलेलें या ध्वनीचें दोन प्रकारचें अनुकरण वरील मुद्याला पोषकच आहे .. म्हणून 'चिमणी चिंव्चिंव करते' हा संकेत मराठी बोलणान्या समाजा- पुरताच मर्यादित आहे. वास्तविक चिमणीचें ओरडणें लक्षपूर्वक ऐक- यास 'चिवूचिव्' हं त्याचें अनुकरण किती अपूर्ण आहे हैं दिसेल. पण

Page 212

परिणामकारी ध्यनिविचार १७५

ध्वन्यनुकारी शब्द केवळ आपल्या मनावर उमटणाऱ्या अस्पष्ट तरंगांचे अंशतः चित्रण करतात ही गोष्ट लक्षांत ठेवली म्हणजे या शब्दांत आढ- ळून येणारी विविधता व अपूर्णता आश्चर्यकारक वाटणार नाहीं. ध्वनीनी केलेलें अनुकरण यथार्थ आहे असें समजणें, म्हणजे वस्तूना आणि प्राण्यांना कांहीं मानवी ध्वनी निर्माण करता येतात असें मानण्यासारखे होय. पण हे ्वनी निर्माण करणाऱ्या साधनांतील फरक लक्षांत घेतला कीं आपलें म्हणणें किती सदोष आहे हैं पटेल, शिवाय तसें असतें आणि आपण केलेलें व्व्नीचें अनुकरण पूर्ण असतें तर ध्वन्यनुकारी शब्दांपुस्ता तरी जगांतील सर्व भाषांचा कोश एक बनला असता. म्हणून बऱ्याच अंशी इतर संकेतांप्रमाणे हे ध्वनीच्या अनुकरणावर आधारलेले संकेतहि एका विशिष्ट समाजानें स्वतःच्या अंतर्गत व्यवहारात रूढ केलेले असतात आणि म्हणूनच कोणत्याहि भार्षेतील नादमाधुर्य समजण्यासाठी त्या भाषेचा उपयोग करणाऱ्या समाजाच्या ध्वनिविषयक संकेतांचें ज्ञान असणें आवश्यक असतें. 'क बत हरिणकानां जीवितं चाति- लोलम्' या ओळींतील वर्णरचनेंत मृदुता आहे आणि 'क्व च निशित- निपाता बज्सारा: शरास्ते' यांतल्या घर्षकांची व द्रव वर्णाची पुनरा- वृत्ति कठोरतादर्शक आहे, हें संस्कृत भाषेच्या अम्यासकांशिवाय कोणा- लाहि समजणार नाहीं; कारण त्यांतल्या ध्वनीना स्वतंत्रपणें कोणताहि अर्थ नसून त्यांची रचना या ठिकाणी या शब्दांनी व्यक्त होणाऱ्या अर्थाला पोषक अशी मानली गेली आहे. या ठिकाणी कठोरता दाख- वणाऱ्या घर्षकांनीं आणि र या द्रव वर्णानेंच संस्कृतांतील अत्यंत कोम- लता दाखवणाऱ्या 'शिरीष' या फुलाचें नांव बनलेलें आहे, हैं लक्षांत घेण्यासारखें आहे. अर्थ न समजतांहि एका विशेष प्रकारें उच्चारलेल्या कांहीं विशेष गुणानीं युक्त अशा ध्वनींचा आपल्या मनावर परिणाम बडूं शकतो. त्यांत अर्थनिमिति नसते; पण आकर्षण, माधुर्य आणि परिणाम करण्याचें सामर्थ्य असतें, सामान्य भार्षेत ध्वनींचा जो उच्चार होतो त्याहून वेगळा, आलापयुक्त, आरोह व अवरोह या तत्त्वांचा उपयोग करून केलेला उच्चार

Page 213

१७६ व्वनिविचार

कांही भावना निर्माण करूं शकतो. या ध्वर्नीनी होणाऱ्या कलात्मक निर्र्मितीला संगीत हें नांव आहे. केवळ नाद, ते मांडण्याची एक विशिष्ट पद्धत, ते उच्चारण्याचा ठराविक प्रकार यांनी संगीत निर्माण होतें आणि यांत नादांची रचना व आलाप यांना इतकें महत्व आहे कीं गायकाच्या कंठांतून निषणाऱ्या लहरी वाद्यांच्या साह्यानेंहि व्यक्त करणें शक्य आहे. अर्थवाहक ध्वर्नीच्या बाबतींत हें शक्य नाहीं. नुसत्या नादांतून अर्थ निर्माण करतां येत नाही, तर अर्थाला पोषक असे नाद वापरणें ज्या ठिकाणीं शक्य आहे त्या ठिकाणी ते नाद वापरून भर्षेतल्या कल्पना अर्थ- वाहकतेच्या दृष्टीनें अधिक स्पष्ट व परिणामकारक करता येतात. पण संगीताचें सौंदर्य किंवा साहित्यलेखनांतलें नादमाधुर्य पूर्णपणे समजण्यासाठीं त्या त्या विषयांची, त्यात्याभाषांची, त्या त्या समाजांत रूढ असणाऱ्या नाद व अर्थ किंवा नाद व भावना यांच्या परस्परसंबंधांची आपणाला माहिती असली पाहिजे, तरच आनंदनिर्मिति अथवा कलाकाराला अभिप्रेत असलेला इतर कोणताहि परिणाम आपल्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्पता आहे. भारतीय संगीतानें आपणांला जो आनंद मिळतो किंवा भावना हलवण्याचें जे सामर्थ्यं त्याच्या अंगी आहे असें आपणाला चाटतें, तो आनंद परकीयांना मिळत नाहीं किंवा त्यांच्या भावनांवर तें कोणताहि परिणाम घडवूं शकत नाहीं. आपल्या दष्टीनें पाश्चात्य संगीतहि 'विचित्र' ठरतें आणि ज्या ठिकारणी भारतीय संगीतानें पाश्चात्यांच्या किवा पाखात्य संगीतानें भारतीयांच्या मनावर परिणाम होतो, त्या ठिकाणी तो या दोन पद्धतींत कांहीं ठिकाणी दिसून येणारें साम्य व पूर्वपरिचय यामुळें असतो. मधुर नादांची आकर्षक आणि नियमबद्ध मांडणी यांची ज्या ज्या वेळीं आपणांला जाणीव होते. त्या त्या बेळी मोहकतेचा अनुभव आपणांला येतो. पण ध्वन्यनुकरणाप्रमाणे संगीताच्या सौदर्यप्रतीर्तीतसुद्धां स्वाभाविकतेपेक्षा रूढिप्रामाण्यच अधिक महत्वाचें ठरतें. ध्वन्यनुकारी शब्द हा वर्ग आपण निर्माण केला तरी त्यांत समावेश करण्यात येणान्या शन्दाष्या वाबतीत नेहमीं एकवाक्यता होईल असें

Page 214

परिणामकारी ध्वनिविचार १७७

नाहीं. कारण एसराया शब्दांत ध्वन्यनुकारित्व असल्यामुळें त्याचा अर्थ व्यक्त होण्याला मदतः होते की एखादा शब्दाचा अर्थ ठाऊक असल्या- मुलें-आपल्याला तो ध्वन्यनुकारी वाटतो, हैं सांगणे कठीपा आहे. 'मन्द मन्दं नुदति पवन:1यांतील मन्दं मन्द हे शब्द व 'घरोघरिं दिप अखंड त्यांच्या सरसावुनि वाती' यांतला सरसावुनि हा शन्द ध्वन्यनुकारी वाटण्यासाठी त्यांचे अर्थ व या ओरळीचे अर्थ नीट माहीत असले पाहि- जेत. शिवाय कित्येक ठिकार्णी ध्वनीर्शी कोणत्याहि प्रकारें संबंध नसलेस्या शब्दांनाहि ध्वन्यनुकारी विशेषणें लावून अधिक जोरदार बनवण्यांत येतें. धडघडीत अन्याय किवा चुरचुरीत टीका, इत्यादि प्रयोगांतील पुनरुक शब्द येथें मूळ अर्थानें वापरलेले नाहीत. खळखळाट, जळफलाट, सुळ- सुळाट, तंगमग बगैरे शब्दहि केवळ रूढ झाल्यामुळे ध्वन्यर्थसबंधाला मदत करतात. इतकें असुनहि नादमधुर काव्य किवा ध्वन्यनुकारी प्रयोग यांमघलें सौंदर्य अथवा परिणामकारित्व एका विशेष ग्रहणशक्तीवांचून श्रोत्याच्या मनाची पकड घेऊं शकगार नाहीं. ही ग्रहणशक्ति असणारा मनुष्य रसिक समजला जातो. ती अंगी नसल्यास वाचक किंवा श्रोता यांना अर्थबोधापलीकडे असणारा ध्वनीच्या रचनेंतून आणि नादांतून प्रकट होणारा आनंद मिळणार नाहीं. संगीतांतलें नादमाधुर्य सामान्य भार्षेत सांपडलें नाहीं, तरी त्यांतलें एक तत्व तरी आपणाला तिष्यांत आढळते; हैं तत्व म्हणजे कांहीं विशिष्ट नियमांनुसार बोलणें. आपल्या आजुबाजला होणारा भाषिक न्यव- हार लक्षपूर्वक ऐकणाऱ्याला असे दिसून येईल की अतिशय रसहीन गद्य- देखीळ उच्चारदष्टया विविधतेनें भरलेलें असतें. बोलणारी व्यक्ति आघात बेवे, आवाज वर नेते, तो खाछी आणते, विसमबा घेते, पुन्हां बोलूं लागते आप यांयते, सर्व वाक्य एका द्रमांत कचितच उच्चारलें जातें. त्याचे भाग पाडले नातात आणि टप्प्याटप्प्यानें तें म्हटकें जातें. हे टप्पे सुचवण्याचें कार्य आवाजांतील विकारानें दर्शबिलें जातें. 'तो भाला तर मी जाईन, ई ाक्य 'तो आला तर मी ज़ाईन' असें होतें. हा वाक्य- छछेद अवयर्वाच्या सर्येवर अबलंबून नसून विचारां्या घटकावर स्व.वि. १२

Page 215

१७८ ध्वनिविचार

आधारलेला असतो. आपण जो विचार व्यक्त करूं इच्छितों त्याचें अर्थ- दृष्टया पृथकरण मनाकडून होतें आणि मग या पृथकरणानुसार वाक्याचें उच्चारण, आघात, आवाजाची चढउतर इत्यादि क्रिया बोलणान्याकडून होतात, हें करण्याचें मुख्य कारण मनांत असलेला अर्थ शक्य तितक्या स्पष्ट आणि परिणामकारक रीतीनें व्यक्त करण्याची इच्छा हेंच होय. क्यानी भाषेचा सूक्षम अम्यास केला आहे असे बक्ते गद्य भाषणांतहि श्रोत्यांचें मन हेलकावे खाईल असे कर्णमधुर आंदोलनतत्व आणूं शकतात. पण या आंदोलनतत्वाचा विचार करण्यापूर्वी लेखकांकडून उप- य्योगांत आणस्या जांणाऱ्या इतर काहीं साधनांचा आपण आर्धी विचार करुं. बालकर्बीच्या 'आनंदी आनंद गडे' या कबितेतलें हें कडवे पहा : आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोंहिकडे बरती खाली मोद भरें वायुसंगे मोद फिरे नभांत भरला दिश्ांत फिरला जगांत उरला मोद बिहरतो चोंहिकिडे आनंदी आनंद गडे! सर्वत्र पसरलेला अलोट आनंद कबीला या काव्यांत व्यक्त करायचा आहे. या ठिकाणी आपण फक्त कबीनें ध्वर्नीच्या उपयोगांत दाखवलेलें वैशिष्टथ लंक्षांत घेऊन हा अर्थ वाचकांच्या मनावर ठसवण्याचा कसा प्रयत्न केलेला आहे तें पाहूं. नुसतें 'आनंद म्हटल्यानें जो बोध होतो तो 'आनंदी आनंद' या दिरुक्तीनें अधिक परिणामकारक बनबता येतो. तोच शब्द जबळजवळ तोच शब्द किंवा दुसरा समानार्थक शब्द जोडीला देऊन ही परिणाम

Page 216

परिणामकारी ध्वनिविचार १७९

उत्पन्न करणारी द्विरुक्ति साधतां येते. नुसतें 'काळा' म्हटल्यानें जो अर्थबोध होईल त्याची तीव्रता 'काळाकुट्ट' किंवा 'काळाकाळाकुट्ट ' म्हणून कितीतरी पट वाढवतां येईल. 'हिरवे हिरबेगार गालिचे; हरित तृणांच्या मख्रमालीचे,' या ओळींतहि असाच प्रयत्न कबीनें केला आहे. नेहमाच्या बोलण्यांतदेखील खणखणीत, झटपट, कडकडीत, हुरहुर, बडबड, बटवट बगैरे शब्द आणि त्यांच्या साह्यानें बनवलेले शब्दप्रयोग आपण वापरतों, अर्थात् केवळ एवढ्याच साधनाचा उपयोग करून काव्य परिणामकारक होणार नाही; कारण याहून अधिक उत्कट- तेची, जी उत्कटता केवळ अर्थबोधच करणार नाहीं तर भावनेलाहि जाऊन मिडेल अशा उत्कटतेची, वाचक अपेक्षा ठेवत असतो. भावनेला जाऊन मिडणे म्हणजे क्षणभर आणि थोड्याफार तरी प्रमाणांत कबीच्या मनोवृत्तीर्शी आपण समरस होणे, कवीच्या अनुभवासारखा अनुभव आपणांला येणें. हैं सामर्थ्य ज्या कबीच्या काव्यांत नाहीं तो कवि (अशा समरस होऊं न शकणान्या वाचकांपुरता तरी) अयशस्वी म्हटला पाहिजे. ही उत्कटता निर्माण होण्याचीं कारणें आणि ती काव्यांत आणण्याचीं साधनें अनेक असूं शकतील, वाचक कशा प्रकारचा आहे, वाचक आणि कवि यांच्या जीवनविषयक भूमिकेत, संस्कारांत आणि संवर्यीत किती एकरूपता आहे, या गोष्टी काव्यानें धडणाऱ्या परिणामाध्या कारण- मीमासेत अवश्य लक्षांत ध्याव्या लागतील, साधनाचा शोध मात्रआपण कबीच्या काव्याचा जितका अधिक अभ्यास करूं, काव्य या विषयाचें जितके अधिक परिशीलन करूं, तितका आपणाला अधिक लागेल. काव्य परिणामकारक होण्यासारठी (वाचक आणि कवि यांष्या परस्परावलंबी भूमिका सोडून, त्याचप्रमाणे तत्कालीन मू्यें आणि परिस्थिति याहि महत्वाच्या गोष्टी दृष्टीआड करून) त्यांत काय गुण असावे लागतात, या विषयाचें शास्त्रीय ज्ञान, ध्वनीचें मानसशास्त्र, यांचा अभ्यास करणें अतिशय जरूरीचें आहे. सामान्य माणसाचें मनदेखील आपले विचार योग्य रीतीनें व्यक्त वहाबे म्हणून शब्दांची निवड करतें, मग योग्य ध्बनी, योग्य शब्द, योग्य

Page 217

१८० वनिविचार

रचना यांच्याकडे कविमनाचें लक्ष गेलें तर आश्चर्य काय १ रेषा व रंग यांच्या मदतीनें बाह्य सष्टीचें अनुकरण करणाऱ्या चित्रकाराप्रमाणे ्बनी आणि शब्दरचना यांच्या: आधारानें आपलें मनोगत रंगवणारा कवि हा मुद्धां एक कलावंतच आहे. गल Fir म्हणुन नेहमीच्या सामान्य आनंदापेक्षां अधिक तीव्र असा आनंद व्यक्त करायचा असल्यामुळे-आनंदी आनंद 2. हा शब्द वापरून कबीनें त्याची जाणीव आपणाला दिली, हाआनंद एका विशिष्ट स्थळीच नाहीं, तो जिकडे तिकडे भरला आहे, ही कल्पना देखील नभति भरला दिशांत फिरला जगांत उरला या ओळींतील 'नभांत,''दिशांत,' 'जगांत,' या सपम्यंत पदांच्या पुनरुक्तीनें ठळक केली, व्याचप्रमाणे बरतीं खालीं मोद भरे बायूसंगें मोद फिरे या ओळांतील 'भरे,' आणि फिरे' ही पुनरावृत्तिदि अर्थाला पोषक आहे. याहून चांगलें उदाहरण द्यायचें झालें तर तें टेनिसनच्याBreak, break,:break या कितेचें देता येईल, या ठिकाणी break या पदाच्या पुनरुक्तीनें महासागराच्या अखंड चंचलतेची तीनता प्रत्ययाला येते. हाच परिणाम याच साधनाचा उपयोग करुन कवीनें A farewell या कवितेतहि साधळा आह:iह A thousand suns will stream on thee, f z A thousand moons will quiyer; w4PN : But not by thee my steps shall be, For ever and for ever. या ओळींतील निसर्गक्रमांचें चिरंतनत्व आणि मानवी जीवनाची क्षण- भंगुरता यातला विरोष पुनरुकीनेंच तीव्र बनला आहे आणि कविमनांच्या विर्षादांची छटा सूचित केली आहे. b

Page 218

परिणामकारी ध्वनिविचार १८१

पण नुसत्या पुनरावृत्तीनेंच नेहमीं पाहिजे तेबढी उत्कटता प्रकट करता येईल असें नाहीं, अशा बेळीं उपयोगत आणलें जाणारें आणखी एक साधन विरोध हैं हाय. वरच्याच कडव्यांत no more या शब्दाच्या तुटक- पणानें व्यक्त होणारी नश्वरता for ever and for ever. या पुनरुच्चा- रित पदानी व्यक्त होणाभ्या चिरकालदर्शक कल्पनेशी आणि a thou- sand suns व a thousand moons या पुनरुच्चारानें सूचित होणाऱ्या निसर्गक्रमाध्या अखंडत्वार्शी जो विरोध दर्शबते, तो कबीला अभिप्रेत असणाऱ्या अथाला अधिक उठावदार, तीव्र व परिणामकारक बनवतो, उदाहरणार्थ, रे. टिळकांच्या 'पुरें जाणतों मीच माझे बल' या कबिते- मधस्या पुढील ओळी पहा. तूझ्या महोदार सारस्वताच्या महासागरींचा जरी मीन मी माते, तरी गे तृषा मन्मनाची कघीही कधींही न होणे कमी .. यांत महासागराची प्रचंडता आणि त्यांत राहणाऱ्या माशाची क्षुद्रता दाखवतांना क्या ध्वनींचा उपयोग केलेला आहे त्यामुळें त्या दोहोंत आकारदृष्टया असणारे अंतर स्पष्टपणे सुचवलें गेलें आहे. ध्वनीभ्यारूपांत असणारा विरोध या कार्मी उपयोगी पडला आहे. 'मीन' या शब्दांत म पूर्णपणे बंद म्हणजे ज्याचें उद्धाटन शून्य आहे. असा स्फोटक आहेंआणि त्याच्या जोडीला असणारा ई हास्वर देखील उद्धाटनदश्या सर्वोत खालचा आहे. याच्या उलट 'महोदार सारस्वताच्या महासागरींचा' या लांबलचक कस्पनेंत आधी आ या सर्वात अधिक उद्धाटन असणाऱ्या वर्णाची विपुलता आहे आणि उद्धाटनाचा परमोच्च बिंदु दाखवणारा हा हा वर्णसंयोग आहे. यामुळें सर्वात अधिक संबरण आणि सर्वात जास्त विवरण या परंस्परविरोधी करिया विरुद्ध अर्थाच्या शब्दो्चारणांत धडून येऊन अर्थ आणि नाद यांचें सईकार्य घडून येतें म्हणजे या ठिकाणचे ध्वनी अर्थपोषक बनतात. अशा रीतीनें ध्वनीचें सहकार्य कवितेला उपकारक बनते प्रण रचनेच्या दष्टीनें याशिवाय दुसरा एक गुण कबीला आपढया काव्यांव

Page 219

१८२ ध्वनिविचार

आणतां येतो. बर सांगण्यांत आलें आहे की गद्य भाषणांत अथवा लेखनांत एक प्रकारचा चढउतार, आंदोलन, ताल- बद्धता प्रत्येक वक्ता आणत असतो. एका विशिष्ट कालबिंदूकडे येतांच जरा थांबणे, पुन्हां बोलूं लागणें, पुन्हां थांबणें, बोलणें परत सुरूं करणें ही गति आणि स्थिति, वाक्प्रवाह आणि स्तब्घता या, दोन क्रियांचीं आंदोलनें आलटून पालटून चालूं असतात, या क्रियांच्या मागे असणारें आंदोलनाचें तत्व ज्या लेखकाच्या कृर्तीत स्वाभाविक, नियमित आणि परिणामकारक रीतीमें आलेलें असतें त्याचें लेखन तालबद्ध आहे असें म्हणतां येईल. पद्यलेखनांतल्या आंदोलनाला प्रमाणबद्धता असते, तें भूमितीच्या किंवा गणिताच्या स्वरूपाचें असतें, आणि या त्याच्या यांत्रिक स्वरूपामुळें तें लक्षांत ठेवणें अथवा त्याचें अनुकरण करणें अधिक सोपें असतें. विचार व्यक्त करण्याचें स्वातंत्र्य असणाऱ्या कबीला पद्यलेखनांत रचनेच्या रूपाचें बंधन असतें. याउलट किती ध्वनींच्या संख्येनें आणि कशा प्रकारच्या रचनेनें हैं आंदोलन निर्माण करावें या बाबतींत गद्य- लेखक पूर्णपर्णे स्वतंत्र असतो. गद्यलेखनाचें, पृथकरण अर्थदृष्टया किंवा विचारष्टया होत असल्यामुळें त्यांतले कल्पनच घटक, त्याचें नादमाघुर्य आणि विचारसौंदर्य यांच्याकडे वाचकाचे लक्ष असतें. बाणभट्टाच्या 'कादंबरी' तलें पहिलेच वाक्य ध्या. "आसीद्।। अशेषनरपतिशिरःसमभ्य- चितशासनः ॥ पाकशासन इव अपरः ॥ चतुरुदधिमालामेखलाया। भुबो भर्वा ।I ... राजा । शुद्रको नाम ।।" किंबा 'तैत्तिरीयोपनिषदां' तला हा प्रसिद्ध उतारा पहा." ... यान्यवद्यानि कर्माणि। तानि सेव्यानि। नो इतराणि। यान्यस्माकं सुचरितानि। तानित्वयोपास्यानि। नो इतराणि ॥ .ये तत्र ब्राह्मणाः। संमर्शिनः ॥ युक्ता ॥ आयुक्ता । अलूक्षा । धर्म- कामाः ॥ स्युः-यथा ते तेषु वर्तेरन् ॥ तथा तेषु वर्तेयाः ॥" बराल उता्यांत एकेरी उम्या रेघांनी थोडीशी आणि दुह्देरी रेघानी विशेष स्तब्घता दाखवली आहे; त्याचप्रमाणे जाड ठद्यांतील अवयब विशेष आघातयुक्त आहेत. अशा रीतीनें या गद्यलेखनांत आवाजाचें वर जाणे व खालीं येणे, प्रवाह व स्तब्घता आघातानें दाखतबलीं आणि सुच-

Page 220

परिणामकारी ध्वनिविचार १८३

बलीं जातात, म्हणुन गद्यांतलें आंदोलन आघातप्रधान असतें आणि हा आघात कल्पनेच्या दृष्टीनें ऐक्य असणान्या घटकाबर असल्यामुळें तो अर्थ- पूर्ण आहे. हें अर्थनिष्ठ आंदोलनतत्ब इतर भाषांतहि योग्य परिचयानें आपणांला दिसूं शकतें, उदाहर णार्थ, जेम्स जॉइस यांचा पुढील उतारा पहा.

There was a long rivulet in the strand, ll and as x

he waded sl'owly up its course, # he wondered l at the X x

x X éndless dfift of seaweed. II E'meraldI and black ! * and russet l and olive, I it moved beneath the cúr- x

x x x X rent, I swaying and "turning. I The water of the x x X rivulet was dark with endless drift Il and mfrrored the hi'gh-dfifting clouds.Il The clou'ds were dr'ifting above x

him I silently, Il and sflently.l the tangle was dfift- x x x

ing belów him Il and the grey warm air! was still x

x and a new wil'd life I was singing in his veins.'Il ₹ x X + +

क्या ज्या ठिकाणी अर्थटष्टया वाक्यच्छेद होतो त्या त्या ठिकाणी तो बरीलप्रमाणे दाखवण्यांत आला, तर अनभिज्ञ वाचकाला आंदोलन- पूर्ण वाचन करण्याला मदत होईल. बरील उतान्यांत फुल्यांनी आघांत- रहित अवयव आणि छोट्या रेषानीं आघातयुक्त अवयब दाखवलेले आहेत; उभ्या एकेरी रेषानीं अंशतः स्तब्घता व उभ्या दुहेरी रेषांनीं विशेष स्तब्धता दाखवण्यांत आली आहे. लेखनांत वापरली जाणारी चिन्हें थोड्या अंशी हैं कार्य करतात; आपण त्यांना विरामचिन्हें ग्हणतों. लेखकाला अभिप्रेत असलेला हेतु अगरदी अल्प प्रमाणांत या विराम- चिन्हांत आणता येतो. पण या मूठभर विरामचिन्हांनी आपली गरज भागत नाहीं. प्रश्रवाचक 'काय' आणि उद्गारवाचक 'काय' आपण दोन बेगळ्या चिन्हांनी दर्शवर्तों ही गोष्ट खरी असली तरी एकस्या उद्गारचिन्हाला आश्चर्य, आनंद, उद्वेग, तिरस्कार, उपहास, इत्यादि

Page 221

१८४ ध्वनिविचार

परस्परभिन्न आणि परस्परविरोधी भावनांचें प्रतिनिधित्व करावें लागतें, हें आपण पहातों, अर्थात् जिकडेतिकडे स्वल्पविराम पेरून विचारप्रवाहां- तले टप्पे दाखवणे लेखकाला यांत्रिक आणि सौंदर्यनाशक वाटणें स्वामा- विक आहे, म्हणून गद्यांतलें आंदोलन वाचकानें स्वतःचर शोधून काढणें इष्ट आहे. 1s साधारणतः अक्षरें अथवा अवयव यांच्या एका ठराविक बिभागणीवर पद्यरचनेची उभारणी झालेली असस्यामुळें पद्यवाचनाची संवय असलेल्या वाचकाला त्याचें च्छेदपूर्वक वाचन करणें कठीण नसतें. गद्यलेखनांत कल्पनादर्शक गट पाडणें आणि आघात शोधून काढणें सर्वस्वीं वाच- काच्या बुद्धीवर अवलंबून असत्यामुळें तें अधिक कठीण असतें. याचा अर्थ असा नव्हे कीं, सर्व पदरचना केवळ अक्षरबद्ध, अवयब बद्ध किंवा मात्राबद्ध असते. अर्थनिष्ठ आघातप्रधान गद्याप्रमाणें आघातप्रधान पदयहि असूं शकतें.मराठीतील ओवी हा छंद आघाद- प्रधान पदाचें एक उत्कृष्ट उाआहे. नेहमीच्या संवयीप्रमाणे ज्या ज्याअभ्यासकानी छंदोरचनेच्या नियमांच्या चौकर्टीत ओबीला बस- वण्याचा आजपर्यस प्रयत्न केला आहे, त्या संवच प्रयत्न असमाधान- कारक व्र अयशस्बी ठरले आहेत. ज्या छंदांतील अक्षरें अगर मात्रा कधीच निश्चित नारहीत, एवढेंच नव्हे तर चरणांतलें एखादें अक्षर अथवा शब्द वाढत्यामुळें किवा कमी झास्यामुळें ज्याच्या आंदोलनाला अथवा लोयतेला कोणताच बाध येत नाही, अशा या छंदाचें वैशिष्टय ध्वनीभ्या सखपेनें निित हेत नाहीं, ही गोष्ट उघड आहे. आतां ज्याअर्थी अक्षर किंवा मांत्रा यांची निश्चित संख्या आणि आघात यािकी कोणत्या तरी एका तत्वानें आंदोलन (मग तें गद्यांतलें विचारनिष्ठ आांदोलन असे कीं पदांतलें। संख्यानिष्ठ आंद्रोलन असो) निश्चित होतें, त्याअर्थी ओषी हा छंद आघातप्रधान असला पाहिजे हैं दिसून येते; मात्र जी स्तब्घता अच्यांत वाचकालो हुडकून काढावी लागते, ती ओ्वींत पहिल्या तीन चरगांत यमकान्या सदतीनें दाखवली जाते, तसेंच ही स्तब्घता एका

Page 222

परिणामकारी ध्वनिविचार १८५

विशेष कल्पनाघटकाच्या शेबर्टी आली माहिजे, हा गद्यांतला अपरिहार्य नियम ओवीला कडकपणे लागूं नाहीं. उदाहर णार्थ।। हैं विश्वचि माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहाला. ज्ा. १२२१ :is 1. या ठिका्णी पहिले दोन चरण विशिष्ट कल्पना दाखवणारे आहित, तर शेवटल्या दोन चरणात एकंच कल्पना आहे. तसेंच मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृत मुनी- अली सेविती. जा. १.१६. या ठिकाणी अर्थटष्टया चरणपांतले शब्द किती वेगळया रीतीनें मांडले पाहिजेत हें दिसूनयेवें. अंशा रीतीनें गदयलेखनाचें संखयेच्या निर्वेधापासून मुक्त असें विचार- प्रधान आंदोलनतत्त्व आणि पद्ांतील यमकतत्व या दोहोष्या' मिश्र- णानें तयार झालेला ओबी हा छंद आहे. कोणतीहि ओबी म्हणून पहा- णान्याच्या अथवा लक्षपूर्वक ऐकणाऱ्याच्या नजरेला हें स्पष्ट दिसेल कीं (१) ओवीच्या पहिस्या तीन चरणांत शेवटल्या शब्दांतल्या: पहिल्या अवयवा- वर आघात असतो आणि (२) चवथ्या चरणाच्या पहिल्या अवयवाबर आघात असतो. म्हणजे वरील ओव्या पुढीलप्रमाणे म्हटल्या जातील : हें विश्वचि माझें घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. आणि

Page 223

१८६ ध्वनिविचार

मज अबगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी, बोधमदाभुत मुनी- अली सेविती. पद्यातली आंदोलननिर्मिति कशी असते हैं वर्णन करून सांगणारी छंदोरचनेवरील पुस्तकें अस्तित्वांत असल्यामुळें येथें त्यासंबंर्घी लिददिण्याची जरुर नाहीं, नियमित अक्षरांच्या अथवा मात्रांच्या पुनरुच्चारानें मनाबर होणारा परिणाम हा पद्रचनेचा पाया आहे. विशिष्ट वृत्त वापरून विशिष्ट भाव सुचव्णे ही संस्कृत पद्यरचनेची परंपरा अभ्यासकांच्या परिचयाची आहे आणि बृत्तांचीं मा्पे आणि विभागणीच नव्हे तर विशेष अर्थवाचक नार्वेहि संस्कृतांत रूढ आहेत. परिणामकारक ध्वनी किंवा वाच्यार्थावाहेरहि जिचें क्षेत्र बाढवता येईल अशी ध्वनिरचना, यांचा अभ्यास प्रत्येक भाषेच्या अभ्यासकानें स्वतंत्रपणे केला पाहिजे, केवळ शब्दांच्या दृष्टीनेंच हा अभ्यास न करता गद्य आणि पद्य यांच्या दृष्टीनें, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या काळांतील या क्षेत्रांत प्रभावशाली ठरलेल्या लेखकांच्या शैलीचें परीक्षण करण्याच्या दष्टीनें हा अभ्यास करणें अतिशय हिताबह ठरेल.

Page 224

टीपा

प्रकरण पहिलें १. मृदु तालूच्या शेवटाला लोंबणारा पडदा म्हणजे वर सांगितलेला तालुपट, २. कांही शास्त्रज्ञ स्तंभनाला प्राधान्य देऊन त्यांना 'स्तंभक' अर्सेहि म्हणतात. स्फोटकांत स्फोट हैं वैशिष्ट्य मानलें आहे, याचा अर्थ इतर वर्ण स्फोटरहित असतात असा नव्हे. त्यांच्यांत स्फोटाला प्राधान्य नसतें एवढेंच. ३. संस्कृत छंदोरचर्नेतील 'मात्रा' हैं प्रमाण. वर्ण उच्चारण्याला लागणारा क्मीतकमी वेळ. ४. हा मराठींतील व होय. संस्कृत व हा इंग्रजी V प्रमाणे दंताष्ठय म्हणजे खालच्या ओठाला बरच्या दांतांनी स्पर्श करून उच्चारला जातो. ५. पत्नास वर्षोपूर्वीचें ध्वनिविचारावरील एखादें पुस्तक या विद्वानांनी बाचलें असतें (कारण च चें द्विवर्णत्व एकोणिसान्या शतकाच्या अखे- रीलाच दाखवून देण्यांत आलें होतें) तरीहि -! ६ व्यंजनाचें वैशिष्टय अडथळा हैं आहे. उ हा स्वर आणि व है व्यंजन आहे. म्हणजे उपेक्षां वच्या उच्चारांत अडथळा अधिक आहे. हा अडथळा उच्चाराब्या बेळीं तोंडाचें उद्घाटन कमी झाल्यानें होतो. स्वर- संयोगांत उत्तरवर्ण कमी उद्घाटनाचा असतो, हें यावरून दिसून येईल,

full-foo1, r. ७. हा नियम इंग्रजी भाषेलाहि लागूं पडतो. fit-feet, did-deed,

प्रकरण दुसरें १. संयम = संयू-यम. २. चतुर्थक > चठत्थअ >*चऊथा. > चउथा, चौथा (=चवथा) १८७

Page 225

१८८ ध्वनिविचार ३. सोसूर यांच्या कोष्टकांत सातच उद्घाटनें मानलीं आहेत; कारण इ, उ, उॅ, हे स्वर आणि त्यांची सिळ्तीं व्यंजनें त्यांनी एकाच वर्गात ठेबलीं आहेत. परंतु स्वरांची व्यंजनें होतांना उद्घाटन कमी होऊन अड- थळा बाढतो, म्हणुन आमाँ यांनी या कोष्टकांत केलेळी सुधारणा आ्रहा ममानून हे स्वर व व्यंजनें यांची उद्घाटनें या ठिकाणी बेगवेगळी मानली आहेत. ४. या रचनेला ठसा हं नांव आहे. कोणत्याहि स्वरोच्चारणांत हवा एकसारखी बाहेर जात असते, पण ती जात असतांना तोंडाची वाट ज्या. प्रकारची असते त्यावर या स्वराचें विशिष्ट स्वरूप अवलंबून असतें. या ठठिकाणी स्पर्श व स्पर्शस्थान यांचा प्रश्र उद्भवत नसत्यामुळे ठशाला. महच्व प्राप्त होतें. ५. म्हणजे पहित्यांत विशिष्ट प्रकारची मुखरचना (ठसा) व त्यांतून चाहेर जाणारा हबेचा प्रवाह यांना महत्व आहे, तर दुसन्यांत तोंडांतील अवयवांची हालचाल व स्पर्शस्थान याना महत्व आहे. ६. उलट गुजरातींत प्राणप्रयत्न जोरदार असत्यांमुळें भीख, मिखारी हाथ, हाथी, इ. रूपें मिळूं शकतात. अकरण तिसरें 3 ऐ वं औ यांचे अनुक्में ए व ओ होतात. अकरण चवथें १. नाकाच्या पोकर्ळींत हवा शिरल्यानें होणारा विशिष्ट नाद. २. सप्राण स्फोटकांतून ह या वर्णाकडे जातांना वाटेत घर्षक ही अवस्था लागते. ही कल्पना प्रो. ब्लॉक यांनी एका संभाषणप्रसंगी लेख- काष्या नजरेला आणली. ग्रामाँ यानीहि Traite de phonetique qा. २६२ वर हैं सचित कैलें आहे.

Page 226

टीपा १८५ ३. क्ष या वर्णसंघाची द्विया उत्कांति दोन भाषिक मेदांची निदर्शक असावी. साधारणतः गुजसतींत क्ष > ख (क्षेत्र > खेतर, मक्षण > मांखण, इ.) पण मराठीत मात्र कांहीं ठिकाणी क्ष> ख, काहीं ठिकाणी क्ष > स (श): क्षेत्र > शेत, क्षण > सण, 'पण क्षार> खार, क्षीर > खीर इ. यासंबंधीचे निश्चित नियम शोधून काढण्यासाठीं मरा ठीच्या पोटभाषांचा ध्वनिपरिवर्तनाच्या दृष्टीनें अधिक अभ्यास होणे आवश्यक आहे. प्रकरण पांचवें १ या व इतर कांहीं शब्दाव लिंगमेदानें विशिष्ट अर्थभेद व्यक्त होतो, पगडा-पगडी, सवता सत्नत, इ. अर्थात् 'अक-इका "प्रत्ययनी होणारी अनेकवचनीची सामान्यरूपे सारखींच असतात हा एक दोषच म्हटला पाहिजे. उ. घोडयां(चा) इ. रूपें घोडे ब घोडया यां दोघांचाहि सामान्यरूपें आहेत. २ कान, हात, सुरी, गूळ, माळ, इ. ३ शाळा, रीत, पद्धत, मध, इ. ४ विद्वान्, सत्य, राजा, इ. ५ वैदू, मधी, इ. ६ बाजा, भाई, छकडा, इ. प्रकरण सहावें १ संस्कृतमध्यें सचा सकंप झ हा बर्ण नाहीं. त्यामुळें हरिस गच्छति याचें *हरिझ् गच्छति असें अपेक्षित रूप न मिळतां. हरिर् गच्छति हैं अधिक व्युत्कांत परंतु संस्कृत वर्णमालेशी पूर्ण सुसंवादी रूप मिळतें. अस +धि या ठिकाणींहि *अझू धि ऐवर्जीं अयूधि = एधि हें रूप मिळतें. २ पाहिजे, म्हणजे, इ. क्रियावाचक रूपें अतिशय जुनी असून विशिष्ट अर्थानें राहिलीं आहेत, तर घरी-घरांत, हाती-हातांत, तोंडीं-तोंडांत, इ. जोडरूपें जुन्यानव्यांचीं दर्शक असून त्यांतल्या जुन्या रूपांनी अर्थ-

Page 227

१९० ध्वनिविचार

मेदाची एक छटा व्यक्त होते. क्रियावाचक रूपांऐवर्जी आतां जवळजवळ सर्वत्रच धातुसाधितें वापरलीं जाऊं लागलीं आहेत. 'अर्जुनें बोलिजे' या ऐबजीं ' अर्जुन बोलतो' किंवा 'अर्जुनाकडून बोललें जातें' असा प्रयोग भाता होतो. : प्रकरणआठवें १ ध्वनिमुद्रणानें आतां त्यांना पकडून ठेबतां येतें ही गोष्ट खरी आहे. अ्करण नववें १ पुण्याचा टांगेवाला व पुण्याचा संचय यांतील एकाच प्रकारें लिहिला जाणारा 'पुण्याचा' हा शब्दहें भेदचिन्ह वापरून स्पष्ट करतां येईल. punyaca (पुण-याचा) safiay, पण punyaca (पु-ण्यांचा) țańgewala.

Page 228

सूचि (प्र. = प्रस्तावना ) अंतर्गत पुनर्व्यवस्था, बर्णाची ४१ उच्चारणक्रिया, तीन टप्पे १९ अक्षर आणि ध्बनि, १५२ उद्धाटन, १८ अनुकरण, ११८ एककालिक, ४२ अंततालव्य, २२ ऐतिहासिक दष्टीची आवश्यकता, अंतताल, १३ ५ ( प्र ) झन्नमार्ग, १२ ओवी, १८४-५ अर्धेस्फोटक, २७ ओष्ठसंधि, १३ अर्धस्वर, २५ कठिनतालु, १३ अवधि, ३३ कठोर, १६ अवयव, ५१-८ कंठथ, २२ ", ; फे, द सोसॅरची व्याख्या, कस्पनाचित्रण, १४२-३ ५४-५ घरषेक, २३ अवरोह, ३५ ओष्थ २३ आकर्षण, १२० तालव्य २४ आकलन, ९ दंतमध्य २४ आघात, १६९ ,, दंत्यौष्ठथ् २३ " , व अभिप्राय १७१ जिव्हाम्र, १४ आंदोलन, १७८ जिव्हापृष्ठ, १४

आरोह, ३५ गद्य व पद्य यांतील १८२' जिव्हामूल, १२, १४ जुन्या भाषेची दुर्बोधता, ६२ उच्चार बदलणें, ६३ तालव्य, २१

Page 229

१९२ ध्वनिविचार

तालुशिखर, १३ ध्वनिपरिवर्तन दंतमूलीय, २२ व राजकीय परिस्थिति, ७६-७ दंतमूलें, १३ ध्वनिपरिवर्तन, दविधा १०१-४ दंत्य, २१ निरवलंबी ११४ दाब, १७२ परावलंबी ११३ दीर्घ, १९, ३४ संयोगजन्य ६८-९ द्रववर्ण, २५ स्वयंभू ६८-९ द्वैंकालिक, ४२ ध्वनिपरिवर्तनार्ची कारणें, ७२-७९ धृति, १९, ५५ ;, दोन तत्वें, ९६ ध्वनि, ११ (प्र), १० ध्वनिपरिवर्तनाचे तीन गुण, ९३-४ निष्कंप १५ दोन प्रकार, ६८ प्रवाही १६, ३४ ध्वनियंत्र, १० ", सकंप, १५ ध्वनिविचार, ११, १५२ 4 ध्वनिपरिवर्तन 'ध्वनिविचार,' नांवाचा खुलासा व आनुवंशिक गुण, ७२ ११ (प्र) व उच्चार, ६४ ध्वनिविचाराचें महत्व, ४ (प) व उच्चारसौकर्य, ७२-७३ ध्वनिसंकेत, १७५ व उच्चाराच्या प्रवृत्ती, ७४-५ ध्वनिसंख्या, मराठीची १५८-६० व जुन्या उच्चाराचा त्याग, निर्मिति, ११ ७८-९ परिभाषा, ७-९ (प) व पूर्वभाषेची पार्श्वभूमि, परिवर्तन, ४१ ७७-८ पुनरक्ति, १८० व भौगोलिक परिस्थिति, पूर्वताळव्य, २२ ७५-६ यूर्वतालु, १३ व मुलाच उच्चार, ७१ पोटभाषा, १२७

Page 230

सूचि १९३ 'प्राकृत,' ९ (प्र) लिपि प्राण, १५, २४ ब्राह्मी १५४ भारतीयांच्या उच्चारविषयक वर्णोच्चारदर्शक ६५ संवयी, ८४-९२ व उच्चार ३-४ (प्र) भाषा, १ (प), ९, १५२ व ध्वनि ४३ भाषा, एक सामाजिक संस्था, ७ लेखन, ४०

भाषा व बोली, १३७ आदर्श १५५-६ भेदनिर्मिति, १२९ व उच्चार १४८.

मध्यतालव्य, २२ वर्ण, २ (प्), ३८, ४९ मध्यतालु, १२ अनुनासिक ३३ मनुष्याचें श्रेष्ठत्व, ८ अंतःश्वास ३७

मराठी ध्वनींचा इतिहास, ६५ मराठीचे ४३-४७

मराठी लेखनाचें वर्गीकरण, वर्णग्रास, १२२

१६०-१ वर्णमाला, ४२ व सुसंबादित्व ४८-९ मात्रा, ६० मूर्धन्य, २२ वर्णमालिका, दोन टोकें १ ७ वर्णविचार, १२, ४२ मृदु, १६ वर्णसंख्या, भाषेची, मर्यादित मृदुतालव्य, २२ असण्याचीं कारणें ४७ मृदुतालु, १२ मोर्गान्यीची पोकळी, १४ वर्णाचा अभ्यास, गतिप्रधान २ (प्र) स्थैर्यप्रधान २ (प्र) न्हस्व, १९, ३४ वर्णोची प्रतिक्रिया, ४० लिपि, १५२ आदर्श १६१-२, १६४ वर्णोचें ज्ञान, ४३ वस्तुचिल्रण, १४०-१ चिनी १४३-७ वियोजन, ११३ नबी १६६ विरामचिन्हें, १८३

Page 231

१९४ ध्वनिविचार

विसदृशीकरण, ११३ सामाजिक संस्था, ९ विसर्ग, १६. व्यंजन, ओष्ठथ १७ सीत्कार, २४

स्तंभित २० तालव्य २४ दंत्य २४ स्फुट २० मूर्घन्य २४. व्यंजनयुग्म, १९ व्यंजनांचें वैशिष्टय, १६ सूचक चिन्हें, १४४-५

व्यंजनें, सकंप २९ स्तंभन, १९

व्यंजनें, स्फोटक १९ स्थानिक भेद, १२९, १३२ व्युत्पत्ति, ३ (प्र), ६६ स्पर्शस्थान, १६, १८. शब्द, ३८ स्फोट, १९ ध्वन्यनुकारी १७३ स्वर, ३० शौरसेनी व माहाराष्ट्री, ८६ संयुक्त ५९ श्रुति, ९, ११ स्वरनालिका, १४ श्वासमार्ग, १२ स्वरमध्यस्थ, ६४ सदृशीकरण, प्रतिगामी ११२ स्वरसंयोग, ३१ पुरोगामी ११२ उतरता ३२ समाज, ७ चढता ३२ संशोधकाचें कार्य, ७ (प) स्वरीभवन, ८४ साधनाचा उपयोग, हृति, ११

OLOGICALO ARGHA

( New Delhi

LIBRARY CENTRAL

Page 232

"A book that is shut is but a block"

LIBRARY R GOVT. OF INDLA Department of Archaeology NEW DELHI. CENT

Please help us to keep the book clean and moving.